व्हिषाची परीक्षा

ग्रीष्मातल्या रणरणत्या धारोष्ण दुपारी अडीच वाजता मुंबईला, मध्यम ते हुच्च वर्गीय आबालवृद्ध जनता, चित्रविचित्र पोशाखात नटूनथटून पण करुण चेहेर्‍याने अमेरिकन व्हिसासाठी निमूट रांगेत उभे होते. कुठल्याही रांगेत उभे राहायची सवय नसलेली हुच्चभ्रू मंडळी गर्वहरण झाल्यागत चोरट्यासारखी बायोमेट्रिक उर्फ हातांचे ठसे देण्यासाठी पासपोर्ट व कागदपत्रांची चळत सांभाळत प्रतीक्षेत होती. अंकल सॅम प्रसन्न व्हावा म्हणून ते लोटांगण घालायलाही तयार होते. त्यात काहीजणांचे जन्मल्यापासून केवळ अमेरिकेला जाणे हेच जीवनाचे प्रयोजन असल्याने ते निव्वळ फॉर्म्यालिटी पूर्ण करायला आले होते. व्हिसा मिळाला की त्याना मोक्ष मिळाल्यासारखेच आहे. काही मजबूर पालक मुलांच्या घरी जायला मिळते की नाही या चिंतेचे ढग घेऊन रांगेच्या गांभीर्याला घनदाट करत होते. ऑफिसच्या कामासाठी जाणारी मंडळी मात्र निर्विकार होती. चमेलीच्या आनंदी कुटुंबासारखे तुरळक अपवाद वगळता एकंदरीत शोकसागराच्या लाटा धीरगंभीर उसळत होत्या.

चमेली, तिचा नवरा चंदू आणि त्यांचा सहा फुट उंच तरुण लेक चिंटू आपापल्या एनाराय मित्रमैत्रिणींच्या आग्रहाच्या आमंत्रणाला ठोकमध्ये बळी पडून व्हिसाच्या सोपस्काराला तयार झाले होते. व्हिसा नाही मिळाला तर सुंठीवाचून खोकला गेलाच असता. चमेली रांगेत उभी राहून "कोई फरक नही अलबत्ताऽऽऽऽऽ कोई फरक नही खलबत्ता" असे गुणगुणत होती; तेंव्हा एका चिंतातूर मातेने क्रुद्ध कटाक्ष टाकला. तो बूमरँग झाल्याने तीच घायाळ झाली. चंदूला प्रवासाची आवड असूनही अमेरिकेला जाण्यात मुळीच रस नव्हता. अजून भारतीय राहु दे पण महाराष्ट्रीतलीच प्रेक्षणीय (!) स्थळे पाहून झाली नाहीत तर अमेरिकेला जायची घाई कशाला म्हणे! ढुंगणाजवळ असलेले तलाव आणि धरणे बघून होत नाहीयेत ते आधी यथावकाश बघू मग अमेरिकेचा विचार करू असे उदात्त, काटकसरी विचार तो, चमेली आणि चिंटूच्या गळी उतरवायचा आटोकाट प्रयत्न करत असे. त्यांचा पैसे खर्च करायचा कुठलाही प्रयत्न दिसला की चंदू कागद पेन घेऊन बसे आणि अवघड गणिते, आकृत्या आणि ग्राफ मांडून त्यांना गुंगवून तात्पुरते परावृत्त करत असे. उदाहरणार्थ, जर चमेलीने मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीची मागणी केली तर चंदू तात्काळ टीव्ही आणि प्रेक्षकाची बसायची जागा त्यांच्या डोळ्यातल्या रेटीनामध्ये उमटणार्‍या प्रतिमा आणि एकूणच प्रक्षेपणाचा रेशो आदी तपशील चिकाटीने कागदावर मांडून तिच्या मेंदूतला खरेदीचा ढेकूण प्रजोत्पादनापूर्वीच चिरडून टाकत असे. 'खरेदी नको पण आकृत्या आवर' असे चमेलीला होई. काही दिवस विचार करून अखेर चंदूने "तुम्ही दोघे जा; मी येत नाही", असे जाहीर केले. स्थानिक एजंट म्हणाला, "तुम्ही तिघांनी व्हिसा काढलात तर कुटुंबाला एकत्र दहा वर्षाचा पर्यटनाचा व्हिसा मिळण्याची शक्यता जास्त आहे. मग जायचे की नाही ते नंतर ठरवा हो सावकाश". असे म्हणून त्याने हुशारीने चंदूचा मासा गळाला लावलाच.

अशा रितीने अमेरिकन कॉन्सुलेटची अपॉंईंटमेण्ट घेऊन ते व्हिषाची परीक्षा द्यायला मुंबईत अवतीर्ण झाले. असेच काही वर्षांपूर्वी ते ब्रिटीश व शेंगन व्हिसा घ्यायला मुंबईला गेले होते त्या आठवणी जागृत झाल्या. पहिल्या दिवशी एके ठिकाणी दुपारी साडेतीन वाजता बायोमेट्रिक आणि दुसर्‍या दिवशी सकाळी कॉन्सुलेटमध्ये पावणे आठ वाजता मुलाखत असा प्रदीर्घ कार्यक्रम होता. बायोमेट्रिकसाठी सगळा स्टाफ भारतीय होता. कडक तपासणी आणि ठसे, फोटो प्रकरण पाऊण तासात आटोपले. दुसर्‍या दिवशी सकाळी सव्वा सातपासून तीनशेच्या वर लोकं कॉन्सुलेटच्या बाहेर उभे होते. नंतर तपासणीच्या दारातून सरळ आत न जाऊ देता लोकांना दोन खांबांना वळसा घालून जायला लावत होते. सुवेझ कालवा असला तरी केप ऑफ गुड होप वळसा घालून जाणार्‍या गलबतासारखे ते संथ गतीने पुढे सरकू लागले. त्यांच्या सामानाची आणि शरीराची काटेकोर तपासणी झाल्यावर त्यांना संगीतखुर्ची विभागात उठाबशा खेळायला पाठवले. तिथे कोपऱ्यात एक थवा वाळीत टाकलेला होता. ते लोकं आशाळभूतपणे त्यांचा रांगेत कधी समावेश होईल याची वाट पहात होते.

तिथले कर्मचारी लहर लागली की लोकांचे कागद चिवडत आणि मग नागमोडी खुर्च्यांच्या रांगामध्ये सगळ्यांच्या उठाबशा करवून घेत. चिंटू आणि चमेलीला हसू येऊ लागले. चंदू म्हणे यामुळे किती वेळ आपण वाट पहातोय याचा विचार आपोआप नाहीसा होत असेल. चिंटू म्हणे संगीतासाठी मी थाळी वाजवू का? मायलेकाच्या गप्पा आणि खिदळण्यामुळे त्यांच्या बाजूच्या लोकांचा तणाव वाढत होता. सायलेन्स प्लीज अशी पाटी कुठेही नव्हती तरी अगदी सुई-पटक सन्नाटा पसरलेला होता. लोकहो, इतके आज्ञाधारक आणि शांतताप्रिय भारतीय पृथ्वीतलावर फक्त याच ठिकाणी आढळतात. उठाबशा संपवून आता ते कुटुंब थेट स्वर्गाच्या दारात म्हणजेच कॉन्सुलेटमध्ये प्रवेश करते झाले. अजून एका खोलीतून त्यांना टोकन नंबर देण्यात आला आणि ते थेट मुलाखतरूपी वधस्तंभाकडे अंतिम लाईनीत लागले. या खोलीत चाळीस काचबंद खिडक्यातून अखेर ती पांढरी अमेरिकन तोंडे दिसली ग बाई दिसलीच! सुटाबुटातले अमेरिकन पुरुष, (त्यातला एक पोलर बेअर सारखाच होता बै!) आणि स्त्रिया कत्तल करायला सज्ज होते. काचबंद उंच खिडक्यातून ते शाब्दिक मशिनगन चालवून लोकांचा निक्काल लावू लागले. पोलर बेअरने मुलाखत घेतली तर मजा येईल असे चमेलीला उगीच वाटले.

या शेवटच्या प्रतीक्षालयात खाद्यपदार्थ आणि पेयांचा स्टॉल होता. एक वात्रट मूल मुद्दाम चमेलीसमोर उभे राहून वेफर्स खात सांडवत होतं. सर्वत्र मॉनिटर लागलेले होते. त्यावर नंबर आणि खिडकी क्रमांक झळकत होते. यु एस डिपार्टमेण्ट ऑफ स्टेट या पाटीखाली खास अमेरिकन घोषवाक्य होते, "डिप्लोमसी इन अॅक्शन". ते वाचून चिंटूला हसू आवरेना. हॉलीवूड अॅक्शन हिरोजच्या पोझेस आठवून तो आणि चमेली हसत बसले. चिंटूला भारतीय कॉन्सुलेट मध्ये काय लिहिले असेल ते बघण्याची उत्सुकता वाटू लागली. निरीक्षण केल्यास मनोरंजनाची रेलचेल होती. "अमेरिका लँड ऑफ अपॉर्च्युनिटीज" वगैरे फसवे मायाजालक बोर्ड हॉलची शोभा वाढवत होते. मुलाखतीतून मात्र स्वागताला फाट्यावर मारलेले आढळले. अखेर त्यांचा नंबर आला.

एक खडूस अमेरिकन चेटकीण कठोर चेहऱ्याने या कुटुंबाकडे बघू लागली. "कोण बोलणार आहे त्याने स्पीकर समोर या" असा हुकुम तिने सोडला. कंट्रोल-फ्रीक चंदूचे प्यादे पुढे सरकवण्यात आले. चंदूला अमेरिकन पर्यटन स्थळांची नावे फारशी माहिती नसल्याने त्याने पॉकेट डायरीमध्ये ती लिहून ठेवली होती. ती डायरी म्हणजे जणूकाही अॅटम बाँब असल्यागत चेटकीणीने तात्काळ दूर ठेवायला लावली. चंदूचे काम व्यवस्थित असल्याने त्याला कागदपत्रे दाखवायची घाई सुटे. चेटकिणीला शब्दांनीच कात्रज करायचा असल्याने ती वारंवार ,"टॉक विथ मी " असे म्हणू लागली. शेवटी चमेली कंटाळून म्हणाली, "अरे, फक्त प्रश्नांची उत्तरे दे ना!" मग तिने चमेलीलाच पाचारण केले. तिने शांतपणे व्यवस्थित उत्तरे दिली. चिंटूला बोलावून पुन्हा पुन्हा विचारले की, "तू लग्न करायला जातोयस की शिकायला?" चिंटू भडकला होता तरी त्याने शांतपणे तिथे लग्नाला अथवा शिकायला जात नसल्याचे निक्षून सांगितले. पंचविशीतला तरुण आईबापासोबत का जातोय याची चिंता चेटकिणीला पोखरत होती. शेवटी ती हिंदीत म्हणाली, "मुझे कुछ तो गडबड लग रहा है, इव्हन देन युवर व्हिसा इज अप्रुव्हड!"

प्रश्न विचारण्याची पद्धत उर्मट आणि तुच्छतादर्शक होती. ते उच्चासनावर बसणार आणि तुम्ही खिडकीबाहेर आशाळभूत उभे रहाणार असं अपमानास्पद वातावरण होतं. जखमेवर मीठ चोळण्यासाठी, "वी होप यु हॅव प्लेझंट एक्स्पिरियन्स इन व्हिसा प्रोसीजर" असे सर्वत्र लिहिले होते. चिडलेल्या चिंटूने आता सूड घेण्यासाठी अमेरिकन मुलीशीच लग्न करून तिथली लोकसंख्या वाढवायचा निश्चय केलेला आहे. "केवळ तुझ्या कृपेनेच हे शक्य झाले गं बाई", म्हणून लग्नाला चेटकिणीला अक्षत देऊन आग्रहाने बोलावायचे ठरले आहे. तुम्हाला व्हीषाची परीक्षा देऊन जमले तर तुम्हीसुद्धा खुशाल जाऊ शकता हं लग्नाला!

निकट भविष्यात होणाऱ्या इंडोअमेरिकन बाळांच्या बारशांपर्यंत तरी किमान तुम्हाला व्हीषाच्या परीक्षेत यश मिळावे अशीच शुभेच्छा!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

जर चमेलीने मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीची मागणी केली तर चंदू तात्काळ टीव्ही आणि प्रेक्षकाची बसायची जागा त्यांच्या डोळ्यातल्या रेटीनामध्ये उमटणार्‍या प्रतिमा आणि एकूणच प्रक्षेपणाचा रेशो आदी तपशील चिकाटीने कागदावर मांडून तिच्या मेंदूतला खरेदीचा ढेकूण प्रजोत्पादनापूर्वीच चिरडून टाकत असे.

एकमेकांच्या डोक्यातून उवा काढणारी माकडं/माणसं आत्तापर्यत पाहिली होती. खरेदीचा ढेकूण चिरडला! Biggrin

"आमच्या चिंटुच्या लग्नाला यायचं हं"
-- चिंगी, चिकी, चंदू, चिकट्राव

असं काहीतरी दिसेल असं वाटलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

" चित्त्याच्या चपळाईने चालली चतुर चमेली " असला एक च चा चमत्कारीक परिच्छेद
लिहिला आहे . तो प्रौढ वाचकांसाठी आहे त्यामुळे देत नाही . Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही प्रौढही आहोत, पुरेसे चमत्कारिकही आहोत आणि इच्छुक वाचकही आहोत त्यामुळे खुशाल येऊ द्यात तुमचे चमत्कारीक परिच्छेद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला कुक्कुली बाळं समजणार्‍या सखूताईंचा निषेध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही कुक्कुलीबाळं आहोत हे अचूक ओळखण्याबद्दल उ.स. यांचे आभार/अभिनंदन/कुदोज्/फलाणाढिकाणा.

अवांतर : "अवध्य" नावाचं नाटकं आल्यानंतर "वयात आलेले मराठी नाटक" असं वर्णन माधव मनोहर यांनी केलं होतं. तस्मात् "वयात आलेली मराठी भाषा" किंवा गेलाबाजार "वयात आलेला मराठी परिच्छेद" असा उच्छाद - आय मीन प्रघात - करण्याचा मान उ. स. तैमैअक्कांना जातो असं आमचं नम्ब्र मत्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

चित्त्याच्या चपळाईने चालली चतुर चुंबकीय चमेली
चांदराती चंद्रासंगती चक्रम चिमी ,चहाटळ चंपा ,चटोर चुंबकीय चमेली चुगलत ,चेकाळत चालल्या .चावट चंदूने चटोर चुंबकीय चमेलीच्या चेहेऱ्यावर चिकटवले चावट चंद्राचे चित्र . चावट चंदूच्या चतुर चढाईने चपापली चमेली . चला चला चटचट चांदणी चौकात , चारचौघात चिकार चांगल्याचुंगल्या चवदार चिंचा चोखुया . चेकाळलेल्या चारचौघांनी चाट चाटून , चोखलेल्या चिंचेच्या चटकदार चवीने चळलेल्या चिकट चंद्रवदन , चॅटमॅन चिक्कूने , चिकण्या चंपा ,चिमीला चिकटून , चुचकारून चौफेर चुम्बले . चंपा -चिमी चमकल्या , चित्कारल्या . चाळवून ,चरचरून चिकट चंद्रवदन ,चॅटमॅन चिक्कुला, चांदणी चौकातल्या चोरट्या चकमकीत चटकन चारीठाव चावल्या .
चिंबट चिंब .चुंबाचुंब ............
चौफेर चकाकते चंद्रबिंब .............
चिकट चंद्रवदन , चॅटमॅन चिक्कुच्या चिमुकल्या चड्डीत च्यायला चित्तथरारक चळवळ !!
चिमुकली ,चावट ,चित्तचोर, चाबूक च्यानेल चिचुंद्री , चुम्बेलीना
( चांगले चुंगले चोरलेले चकाचक चाळीस चावट चमत्कारिक चतकोर )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'झाकली मूठ सव्वा लाखाची' या म्हणीचा नेमका अर्थ काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मराठी प्रोवर्ब्स्' या थोर पुस्तकात पाहा. पुस्तकाचे पान क्र. ५२, म्हण क्र. ३७६.
(१८९९ साली कुण्या 'मॅन्वॉरिंग' नामक रेव्हरंडाने काय जबरी काम करून ठेवले आहे !)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंपकवनातील चहाटळ, चावट, चटपटीत, चुरचुरीत, चविष्ट चर्चांच्या चकल्या चाखून चिपलकट्टी चांगलेच चपापले. चाप्पल्यावर, चातुर्यावर चरितार्थ चांगला चालला.....चुणचुणीत, चंचल, चंद्रकोर चांगलीच चमकतेय, चढाई चालवतेय! चरफडले, चिंताग्रस्त चिडले! ...चांगले चाललेले चक्र चोरले!!
(चिपलकट्टींच्या चणक्यापूर्वी , चट्कन चालले...;-))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

:O :~ :love: Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च् च् च् ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायच्या चोचीत चारा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरेदीच्या ढेकणाचा संहार निव्वळ भारी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मजेशीर लिखाण.

या संदर्भांत ऐकलेला एक किस्सा :

कलाकारांना अमेरिकेत कलाप्रदर्शनार्थ येताना वेगळा व्हिजा करावा लागतो. (बहुदा पी३. चूभूदेघे.) तर (म्हणे) यांना आपला दौरा संपल्यानंतर "आपण योग्य त्या वेळेत भारतात आलो. अमेरिकेत असताना कुठे पळून वगैरे गेलो नाही." या अर्थाची कबुली द्यायला परत अमेरिकन दूतावासात जावं लागतं.

एकंदर अमेरिकन व्हिजापद्धतीला कंटाळलेल्या एका गायिकेने उपरोक्त प्रकाराला स्वच्छ नकार दिला. असे न केल्यास भविष्यात अमेरिकेला जायला अडचणी येतील असं सांगितल्यानंतर तिने काही शेलके शब्द वापरले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

गुण उधळण्यासाठी खास व्हीसे लागत नाहीत ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आत्तापर्यंत तरी क्कीच नाही. लागत असता तर तुला कळलं असतं की... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर (म्हणे) यांना आपला दौरा संपल्यानंतर "आपण योग्य त्या वेळेत भारतात आलो. अमेरिकेत असताना कुठे पळून वगैरे गेलो नाही." या अर्थाची कबुली द्यायला परत अमेरिकन दूतावासात जावं लागतं.

खरंच की काय? मग त्या आय-९४ चा काय उपयोग? आल्या गेल्याची खबर ठेवायलाच अस्तो ना तो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

आय-९४ हा प्रकार डिपार्टमेंट ऑफ होमल्यांड शिक्युरिटीच्या अखत्यारीत यावा, तर दूतावास, व्हीज़ा वगैरे प्रकार हे डिपार्टमेंट ऑफ ष्टेटच्या अखत्यारीत यावेत. हे डिपार्टमेंट वायलं, आन् ते डिपार्टमेंट वायलं. त्यामुळे, या खात्याचा पत्ता त्या खात्यास नसण्याच्या सरकारी प्रघातास अनुसरून, आय ९४ च्या नोंदी दूतावासांस व्हीज़ा जारी करताना उपलब्ध असण्याचे काहीच कारण नसावे.

अवांतर: आजकाल कागदी आय-९४ जारी न करता त्याची नोंद इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवली जाते, असे नुकतेच वाचले. त्याउपर, प्रवाशास ही नोंद केवळ अमेरिकेत असतानाच उपलब्ध असते; अमेरिकेतून प्रस्थानाची नोंद झाल्यावर ही नोंद प्रवाशास उपलब्ध राहत नाही, असेही वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अत्यंत जिव्हाळ्याच्या व्हिषयावर उसंत सखूंनी चमेलीबाईंच्या चमत्कारिक अनुभवांचं चित्रदर्शी वर्णन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद. आम्हालाही एक राजूभैय्या माहित आहेत ज्यांना या सर्व अनुभवांतून अनेक वेळा जावं लागलेलं आहे. त्यांनी एफवण, जेवण, हेचवण, हेचवण पुन्हा रिन्यू, हेचवण पुन्हा रिन्यू अशा अनेक व्हिषांची चव घेऊन बघितलेली आहे. भारतभेटीला जायचं झालं की पेरोलवर सोडलेल्या गुन्हेगाराला पोलिस ठेसनावर जाऊन रामराम सांगून यायला लागतो, तसे दर वर्षादोन वर्षांनी त्यांना मुंबईच्या अमेरिकन कानसुलेचं दर्शन घडलेलं आहे. त्यांना खात्रीने वाटतं की अमेरिकेत लोक हरितपत्रिका घेतात ते या व्हिषांची कटकट थांबवण्यासाठी. आणि ती हरितपत्रिका करंट ठेवण्याची कटकट चुकावी म्हणून मुकाट्याने सिटिझनशिप घेतात. तुमच्या नोकरीची भीक घेतो, पण या व्हिषांची कुत्री आवर असंच जणू सगळे म्हणत असावेत असं त्यांना मनापासून वाटतं.

तर त्यांना या व्हिषाच्या परीक्षेच्या वेगवेगळ्या फॉर्मॅटचा अनुभव आहे. एके काळी रांग तिथेच लावायला लागायची. काही काळ जेव्हा भारत युएस संबंध सुधारले तेव्हा कॉन्सुलेटच्या मागच्या बाजूला खुर्च्या टाकून लग्नमंडपासारख्या मंडपाखालीही काही काळ बसण्याची व्यवस्था पाहिली आहे. नंतर त्यात बदल होऊन शिक्का रामेश्वरी आणि रांग सोमेश्वरी अशा पद्धतीचाही त्यांनी अनुभव घेतलेला आहे. पण सुदैवाने त्यांना कधी अमेरिकन चेटक्या-पोलर बेअरांचा त्रास मात्र झालेला नाही. फारतर 'हं, अमुकतमुक युनिव्हर्सिटी का? काय दिवे लावणार आहात तिथे जाऊन?' इतपतच जहाल प्रश्न झालेले आहेत.

अमेरिकेत असताना नोकरीनिमित्त 'चार दिवसांनी तुला तैवानला जायचं आहे.' वगैरे वाक्यांची सवयही त्यांना झाली. तैवान ऐवजी कधी सिंगापूर कधी जर्मनी एवढाच तपशीलात बदल. या विविध देशांच्या व्हिषांच्या नियमित डोसांमुळे आता त्यांचा व्हिषकुमार झालेला आहे. त्यांच्या निव्वळ चुंबनामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या अंगात ते भिनतं, पण ते मात्र इम्यून आहेत. त्यांचा चेहेरा जर चुंबन घेण्यालायक असता तर एव्हाना त्यांना नोकरी करावी न लागता 'असासिन' म्हणून कामं मिळून जन्माची ददात मिटली असती. पण त्यांचं नशीबच फुटकं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद राजेश .तुम्ही अजून तपशीलात लिहायला हवे होते . :-B
तुमच्यासारखे अजून काही लोकं त्यांचे व्हिसाचे अनुभव शेअर करतील तर आवडेल . Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांनी एफवण, जेवण, हेचवण, हेचवण पुन्हा रिन्यू, हेचवण

थोकड्यात बरीच वणवण केली तर!

बाकी उसंचा लेख नेहमीपरमानं एवण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सखूताई आणि राजूभैय्या यांच्या शैलीत लिहीणं जमणार नाही. पण अमेरिकन व्हिषाच्या परिक्षेच्या वेळी बसल्याजागी मजेशीर अनुभव आला होता.

आमचा व्हीजा हैद्राबादच्या कॉन्सुलेटमधे झाला. एखाद्या जुन्या राजवाड्यातच या लोकांनी तळ ठोकलेला असावा. आम्ही चार पानभर प्रश्नांची उत्तरं काय द्यायची याचा विचार करून गेलो होतो. तीन प्रश्नांमधे "घेऊन टा़का व्हीजा" म्हणत आम्हाला फुटवलं. आता खरंतर गोष्ट इथेच संपायला पाहिजे होती. पण आमच्या बर्‍या अर्ध्याचा पासपोर्ट सात वर्षांच्या वापरातच, साडेतेरा वर्ष जुन्या, दहा रूपयाच्या नोटेपेक्षाही अधिक गरीब दिसायला लागला होता. हा पासपोर्ट चालेल का नवा आणावा लागेल याचा विचारविनिमय करण्यासाठी त्यांनी आम्हाला थांबवलं. आम्ही बाजूच्याच एका बाकड्यावर बसलो होतो. समोरच एक मुलाखत खिडकी होती.

'इश्क' सिनेमात काजोलच्या हातातल्या गिफ्टमधून सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि तो नेमका अजय देवगणच्या डोळ्यात घुसून अजय देवगण अपघात करतो, हा सीन आठवावा एवढं तुळतुळीत, चमको टक्कल असणारा एक गोरा व्हीजासाठी लोकांच्या मुलाखती घेत होता. त्याच्या गोरटेल्या हिंदीमुळेही कदाचित त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं असेल. मुलाखतीला निम्न मध्यमवर्गीय दिसणारी एक वयस्कर, मुस्लीम स्त्री आली होती. संभाषणावरून अंदाज आला की हिची मुलगी आणि जावई अमेरिकेत असतात. मुलीचं बाळंतपण दोन महिन्यात होणार आहे. लेकीच्या मदतीसाठी हिला तिथे जायचं आहे. ती हैद्राबादी हिंदी उर्फ दख्खनी बोलीत उत्तरं देत होती. त्याचे उच्चार गोरटेले असले तरी अस्खलित हिंदीतच तो प्रश्न विचारत होता. त्याचं हिंदी एवढं शुद्ध होतं की हा रशियन हेर (संदर्भ: ती फुलराणी) असेल अशी शंका आली. पण अमेरिकन वकिलातीमधे रशियन हेर भारतीय लोकांच्या व्हिजासाठी मुलाखती कशाला घेईल, हा प्रश्न थोडा उशीरा पडला.

प्रश्नः आप कहां रहती हो?
उत्तर: मै वो चिटकपल्ली में रहती ना (इथे कोणी दख्खनी बोलीत मदत केली तर उत्तम.)

प्रश्नः यहां आप के साथ कौन कौन रहते है?
उत्तरः छोटी बेटी है ना,वो कॉलेज मे पढती है.

प्रश्नः आप के कितने बच्चे है?
उत्तर: तीन बेटीयां है. एक अमेरिका मे, दूसरी हैद्राबाद मे, तिसरी मेरे साथ, वो पढ रही है. दूसरी की शादी हो गयी.

प्रश्नः आप की शादी हो गयी है?
.
.
.
.
.
मुलाखतकर्ता: मुझे माफ किजीएं. आप के पती कहां है?
... मी त्या खोलीबाहेर पळाले. गोंगाट नसताना हसू दाबण्याचा आवाजही फार मोठा येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहिला अनुभव लेकीला भेटायला जायचे म्हणून घेतला.तो जुन्या वकालतीत. चेटकीणीने माझे शिक्षण विचारले, पेशा विचारला आणि तिथेच घोळ झाला. एका पिवळ्या फॉर्मचा सामना घरी येऊन जालावरुन करावा लागला. तब्बल एक महिन्याने आवतण आले, पारपत्र घेऊन बलिवले होते. व्हिसा घरी आला तेंव्हा शॉक बसला. हिला १० वर्षांचा आणि मला एकच वर्षाचा. रसायनशास्त्र भोवले. त्यानंतर पुन्हा तिथे स्वतःसाठी कधीही जायचे नाही, ही घोर प्रतिज्ञा केली आहे.
दुसर्‍या वेळेस लेकीच्या पारपत्रावर स्टँपिंग हवे म्हणून, नवीन ओएफसी इन बीकेसी इथे गेलो. आमची हकालपट्टी समोरच्या घाणीत झाल्यावर लेक आत दोन तास बेपत्ता झाली. उन्हात तळून या म्हातार्‍याचे 'जेरी' करण झाले. तेवढ्यात एक म्हातारा कपाळावर हात मारत बाहेर आला. ऑनलाईन अर्जात फक्त नांव आणि आडनांव भरायच्या दोनच चौकटी होत्या. मधले नांव भरायला जागाच नव्हती. ते न भरल्यामुळे तिथल्याच व्हिषा पुरस्कृत सायबर कॅफेत जाऊन फॉर्म एडिट करण्याची शिक्षा त्यास दिली होती. तो हे माझ्याशी बोलत असतानाच एक सलीम रिक्शावाला ते ऐकून जवळ आला आणि म्हणाला," अंकल एडिट करना है ? पाससो देना,अभी करके लाता हूँ ." म्हातार्‍याला ऑनलाईन फॉर्म भरणे शक्यच नव्हते त्यामुळे तो मोबाईलवर मुलाचा धावा करु लागला. आम्ही उभे होतो तिथे बांद्र्याची खाडी + मेलेले जनावर, असा संमिश्र वास येत होता. वाढत्या उन्हामुळे तो मिनिटांगणी जास्त तीव्र होत होता. विनोद म्हणजे सिक्युरिटीचे अवडंबर माजवणार्‍या ओएफसी सेंटरला चिकटूनच एक मशिद दोन भोंग्यांसकट होती. 'आमचे खरे मित्र कोण' हे या नालायक भारतीयांना कळावे हाच वकिलातीचा उद्देश असावा. तेवढ्यात त्या प्रॉब्लेमवर मात करुन लेक बाहेर आली आणि आम्ही सुटलो. तिला उशीर होण्याचे कारण म्हणजे त्या सायबर कॅफेतले संगणक मधेच बंद पडले होते.
स्वतःसाठी तिथे परत न जाण्याचा माझा निर्णय आणखीनच पक्का झाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0