"कोकणस्थ"

"कोकणस्थ" सहकुटुंब बघुन आलो. माझी ठळक निरीक्षणे -

० "कोकणस्थ" हे नाव दिशाभूल करते
० नटसंच आणि गोखले कुटुंबाची राहणी कोकणस्थी जीवनशैलीशी विसंगत वाटली.
० माध्यमांनी केलेली प्रसिद्धीपूर्व टवाळी अवाजवी वाटली
० व्यवस्थेशी लढायचे असेल तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांनी मतभेद मिटवायला हवेत - हा संदेश
० पैसे वाया गेले असे वाटले नाही.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

थोडक्यात केलेली समीक्षा आवडली.

० पैसे वाया गेले असे वाटले नाही.

जर हिंदी 'विरुद्ध' आधीच पाहिला असेल तर हा चित्रपट पाहण्याची गरज आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विरुद्ध आणि कोकणस्थची तुलना महाराष्ट्र टाईम्समधे आली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/moviereview/19995028.cms

फुकटात मिळाला आणि समोर सुरूच होता म्हणून कोणेएकेकाळी 'विरुद्ध' पाहिला होता. अमिताभचे ७० च्या दशकातले सिनेमे जसे असायचे तसेच त्याने २१ व्या शतकातही करावं याचा थोडा खेद झाला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने 'कबीर बाय आबिदा' या उत्तम आल्बमची ओळख झाली.

संघातल्या लोकांबद्दल असणारे व्यक्तिगत अनुभव हे फारच विनोदी किंवा दुटप्पीपणाचे असल्यामुळे संघाच्या गणवेशाचा असा वापर अधिकच विनोदी किंवा पैसे जमवायचा केविलवाणा प्रकार वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी विरुद्ध पाहिला नसल्याने विरुद्धशी केलेली तूलना योग्य की अयोग्य याबद्दल काहीच सांगता येणार नाही.

चित्रपटाच्या सुरुवातीला अर्पणपत्रिकेत राज ठाकरेचा उल्लेख बरंच काही सांगून जातो. ग्रेट मराठा एन्टरटेन्मेण्ट ही मनसेची मनोरंजन-उपक्रम चालविणारी विंग मानावी का असा प्रश्न पडतो.

संघ ब्राह्मणी अग्रेशनचं एकेकाळी प्रतिनिधीत्व करत असल्याने चित्रपटात वापरलेल्या प्रतिमा अपरिहार्य ठरतात, असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोष्टरवर कोकणस्थ म्हणून संघाच्या गणवेषात खेडेकर दाखवले आहेत. कोकणस्थ आणि संघ यांचा नक्की संबंध काय?

सगळे/बहुसंख्य कोकणस्थ संघिष्ट असतात असे काही सुचवायचे आहे का?
किंवा संघ जो काही आहे तो कोकणस्थांमुळेच असे सुचवायचे आहे का?
किंवा संघ हाच कोकणस्थांना तारेल असं सुचवायचं आहे का?

अवांतर : बहुतांश कोकणस्थ शैव असतात त्यामुळे ते इंग्रजी यू आकाराचे उभे गंध लावत नसावेत.

बाळाजी विश्वनाथ भट पेशवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तपशीलाचे कच्चे दुवे अनेक असल्यानेच मी "कोकणस्थ" हे टायटल दिशाभूल करते असे वर म्हटले आहे...बा़की ब्राह्मणद्वेष करणा-या घटकांवर हा सिनेमा कितपत प्रभाव पाडतो हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकणस्थ सिनेमातला मला आवडलेला एक प्रसंग म्हणजे गौतम पगारे गोखल्यांच्या वकीलाला तुडवतो हा... वकीलांना ठेचून काढायची खरोखरच गरज निर्माण झाली आहे.

मध्यंतरी माझ्या एका माहितीमधल्या वकिलाला त्याच्या अशीलांनी खोटे निकालपत्र दिले म्हणुन बदडून काढले. त्यात तो नंतर गेला. मला अजिबात वाईट वाटले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खोटे निकालपत्र देण्याचा उद्देश काय असू शकेल हे समजले नाही.
आज नाही तर उद्या(बहुसंख्ये केसेसमध्ये लागलिच) निकालपत्र खोटे असल्याचे कळणारच ना.
मग खोटे देउन स्वतःवर आफत का ओढवून घेतली असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अडाणी अशीलाना अव्वाच्या सव्वा प्रॉमिस केले की अशी परिस्थिती ओढवणे अगदी स्वाभाविक आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महेश मांजरेकरचे चित्रपट नकोसे झालेत... फारच अतिशयोक्ती आणि विनाकारण भडकपणा असतो त्याच्या चित्रपटांमधे. तो 'शिवाजी राजे' तसाच, 'काक-स्पर्श' ही तसाच (आणि त्याचे 'सो कॉल्ड' विनोदी(?) सिनेमे तर विचारायलाच नको) ...'लालबाग परळ', 'फक्त लढ' म्हणा ह्या बद्दल तर .... असो!!!
फक्त 'अस्तित्व' जरा बरा वाटला होता, तोही हिंदीतला (कारण मराठी मधे तब्बुचं दुसर्‍याच कोणाच्या आवाजातलं 'डबिंग' खटकलं होत) ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

० "कोकणस्थ" हे नाव दिशाभूल करते
- कोकणस्थ = स्वतंत्र बाण्याचे, सुशिक्षित , न्यायव्यवस्थेवर अजूनही विश्वास असणारे, बरेचसे लिबरल असे नागरीक. ती व्याख्या बव्हंशी योग्य आहे. बाकी, वादग्रस्त नाव घेऊन धंदा वाढवायचा हा प्रयत्न दिसतोच.

० नटसंच आणि गोखले कुटुंबाची राहणी कोकणस्थी जीवनशैलीशी विसंगत वाटली.
- असेच काही नाही. डेक्कनवर /प्रभात रोडवर रहाणारे बरेच कोकणस्थ असे जगतात.

० माध्यमांनी केलेली प्रसिद्धीपूर्व टवाळी अवाजवी वाटली.
- बरोबर.

० व्यवस्थेशी लढायचे असेल तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांनी मतभेद मिटवायला हवेत - हा संदेश
- पक्षी (स्पष्टच बोलायचे तर-) ब्राह्मण आणि आंबेडकरी जनतेने एकत्र यावे (मायावतीचे बेरजेचे गणित)

० पैसे वाया गेले असे वाटले नाही.
-अगदी पॉपकॉर्न-पेप्सीसकट सगळेच नाही तरी तिकिटाचे थोडे फुकटच गेले. Wink

गोखले संघाचा ड्रेस घालून दंड वागवत पुण्यातून फिरतात तेव्हा "शेहेनशा, शेहेनशा... अंधेरी रातोंमें सुनसान राहोंपर हर जुल्म मिटाने को.." हे पार्श्वसंगीत आपसुकच ऐकू आले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकणस्थ = स्वतंत्र बाण्याचे, सुशिक्षित , न्यायव्यवस्थेवर अजूनही विश्वास असणारे, बरेचसे लिबरल असे नागरीक. ती व्याख्या बव्हंशी योग्य आहे.

हा सर्काझम आहे असे समजून विनोदी श्रेणी देत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!