तांडव

महाबळेश्वर सैल यांची तांडव ही कादंबरी नुकतीच वाचून हातावेगळी केली . अतिशय लाडक्या गोव्याचा हा इतिहास अंधुक होता तो या कादंबरीतून स्पष्ट झाला . एकेकाळी गोव्यातली सुंदर चर्चेस ,तिथली शांतता ,येशूची मेरीची करुणामय
प्रतिमा यांचे आकर्षण वाटत असे . या सगळ्याचा पाया किती भीषण आहे याची जाणीव हे पुस्तक वाचून झाली . अख्खा एक समाज इतक्या भयानक पद्धतीने छळाला समोर जातो हे भीषण आहे . त्यांची किव येते त्यापेक्षा नेभळट , बोटचेपे , पायओढू पणाचा राग जास्त येतो . हिंदू धर्माच्या अजब गोष्टींचीही लाज वाटते . एवढ्या तेवढ्या गोष्टीनी बाटनारा हा धर्म . जातीभेदाने पोखरलेला आणि सती सारख्या प्रथेने लाजीरवाणा झालेला . ख्रिश्चन इन्क्वीझीशन आणि सती प्रथा या दोन्ही मध्ये जास्त अमानुष काय ठरवणे कठीण आहे . एकूण गोवा धर्मांतराचा हा इतिहास कादंबरीत प्रभावी मांडला आहे . पण शेवटा मध्ये एकदम मधेच संपल्या सारखी वाटते . शेवटी रामनाथ , रवळनाथ इत्यादी देवळे फोडलेली परत कशी उभी झाली यांचे एक परिशिष्ट असायला हवे होते . चारशे वर्षांची गुलामी कशी संपली याविषयी आणि हे तांडव अखेर शांत कसे झाले याचीही माहिती असायला हवी होती . तसेच पुस्तकाच्या सुरवातीलाच ढिगभर लेखक समीक्षकांच्या प्रतिक्रिया नको वाटतात .

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

विषय रोचक आहे. कितपत भडक लेखन आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अ का प्रियोळकरांच्या गोवा इन्क्विझिशन या पुस्तकात इतकी खतरनाक माहिती आहे की ती वाचून या धर्मांतर करणार्‍या पोर्तुगीजांबद्दल संताप दाटून येतो एकदम. असो. कादंबरी पाहिली पाहिजे कशी आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखन करायचे म्हणून भडक केलेले नाही . वास्तवदर्शी वाटते . पाद्री सिमोन सारखी व्यक्तिरेखा ख्रिस्चन धर्माची खरी तत्वे दाखवते . त्यांच्यासारख्या अनेक चांगल्या लोकांवरही इन्क्वीझीशनने अत्याचार केलेत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुई