की...

आपण दुसर्‍या जगात जातो आणि म्हणतो
की आधीच्या जागांच्या कोणत्याच खुणा सापडत का नाहीयेत इथे?
वेगळीच आहेत ही स्थळं.

आपण दुसर्‍या काळात जातो आणि म्हणतो
की आधीची माणसं दिसत कशी नाहीयेत? दुसरेच लोक आहेत इथं.
कसे असतील कोण जाणे?

विसरतो की आधीची माणसं तरी कुठे होती भली?
आधीची स्थळं तरी कुठे होती राहण्याजोगी?
काय होतं अनुकूल त्या काळात त्या जगात
की नव्यातल्या प्रतिकुलाची धास्ती वाटावी?

वेगळ्या चेहर्‍यानं वेगळ्या मनानं
वेगळ्या भाषेत करता येईल का वेगळा व्यवहार?
की इथेही पुन्हा होईल ये रे माझ्या मागल्या?
की करता येईल कल्पना चौथ्या मितीत जाऊन
पाचव्या मितीतल्या विचाराची?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडली .. मस्त आहे कल्पना. शेवटच्या ओळी निराळ्याच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबावलेला
---------
हा कुठे आलोय् मी?
कोणाशी इथे नाते नाही,
काहीच इथे ओळखू नाही.

आणि कुठची वेळ आहे ही?
आदले कोणीच आता नाही.
होते नव्हते, ते गेले कधी?

त्या तिथे, या आधीतरी
होती का माझी नाती?
होत्या का माझ्या ओळखी?
का तर सारखी नवखी
आता-इथेची भीती?

आदले सरावाचे हात अन् बोल
अपेशीच तर झाले होते
इथे तर ते दोन्ही नवशिके!
ठरलेच आहे का फिसकटणे?

या चक्राबाहेर कसे पडावे?
नव्या डोळ्यांनी पुन्हा पहावे- .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच! आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली.

विसरतो की आधीची माणसं तरी कुठे होती भली?
आधीची स्थळं तरी कुठे होती राहण्याजोगी?
काय होतं अनुकूल त्या काळात त्या जगात
की नव्यातल्या प्रतिकुलाची धास्ती वाटावी?

हे कडवं खूप आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता चांगली आहे ..
पण कुठल्याच जगात सगळं चांगलं किंवा सगळच वाईट नसतं .

माणसांच्या बाबतीत सुद्धा - "उडदामाजी काळे - गोरे " असणारच , त्याला काही इलाज नाही, मग कुठलाही काळ, जग अथवा मिती असूदे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||