'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '

'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '- वि. का. राजवाडे हे जब्बरदस्त पुस्तक कुणी वाचलं आहे का. आपल्या थोर्र थोर्र , पवित्र इत्यादी संस्कृती बद्दल ज्ञानात भर पडून आपल्या बुद्धीवर साचलेले अनेक भ्रम दूर होतात . सप्तपदी , पाणीग्रहण , अग्नीच्या साक्षीने विवाह या सगळ्या रूढी मागे दडलंय काय ते कळते . फक्त वाचायच्या आधी (मनावरचे) सगळे चष्मे काढून ठेवा .नाहीतर मनावर फारच आघात होतील . Smile
http://www.bookganga.com/eBooks/Books?BookSearchTags=Bhartiy+Vivahsansth...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हे पुस्तक नेटवर फुकटपण होतं ना?
मी सुरुवातीचा काही भाग वाचलाय. भाषा थोडी जड आणि कंटाळवाणी वाटली. पण कंटेँट जबरदस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पुस्तक घरी संग्राह्य ठेवले आहे. अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक आहेच.
या अपूर्ण पुस्तच इतके स्फोटक आहे तर राजवाडे हे पुस्तक पुर्ण करू शकले असते तर काय मजा आली असती असे वाटत रहाते.

बाकी,
@जुई, समीक्षा या धागा प्रकाराचा वापर करताना अधिक विस्ताराने समीक्षा करण्याची अपेक्षा आहे. वेळेअभावी थोडक्यात पुस्तकाची ओळख करून द्यायची असेल तर "सध्या काय वाचताय?" या धाग्यावर ती करून द्यावी अशी विनंती करतो. (या धाग्याचा ताजा दुवा पहिल्या पानावर मिळेल. सध्याचा सगळ्यात ताजा धागा इथे आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्या थोर्र थोर्र , पवित्र इत्यादी संस्कृती बद्दल ज्ञानात भर पडून आपल्या बुद्धीवर साचलेले अनेक भ्रम दूर होतात .
यप्स.
सप्तपदी , पाणीग्रहण , अग्नीच्या साक्षीने विवाह या सगळ्या रूढी मागे दडलंय काय ते कळते
आणि ते अश्वमेधाचे शुद्ध सात्विक तुपाळ विधी विसरलात का काय?
.
फक्त वाचायच्या आधी (मनावरचे) सगळे चष्मे काढून ठेवा .नाहीतर मनावर फारच आघात होतील

हो.माझ्यावर आघात झालेत Smile
.
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '- वि. का. राजवाडे हे जब्बरदस्त पुस्तक कुणी वाचलं आहे का.
अशी पुस्तक किंवा वादग्रस्त /चमचमीत चित्रपट कुणी वाचले/पाहिले असो वा नसो, त्यावर तावातावाने चर्चा करण्याइत्कए त्यातले "ते प्रसंग" कींवा "तो मजकूर" बहुसंख्यांना ठाउक असतोच.तेवढाच ऐकून गप्पा ठोकायची बव्हंशी पब्लिकला सवय. मथळे पाहून हे लागलिच प्रतिक्रिया देतात.तस्मार, संपूर्ण वाचल्याचा आव आणणारे माझ्यासारखे काही मलाच बरेच जण भेटलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे पुस्तक जालावर इथे वाचा:
http://www.marathipustake.org/Books/bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पुस्तक वाचून आलेली एक शंका - लाजाहोमातला प्रमुख भाग म्हणजे वधूला सोडून आणण्यासाठी भाजलेल्या लाह्या देवांना देऊ करणे होय, भाजलेल्या लाह्यांसाठी (कदाचित अन्नाचे प्रतिक वगैरे समजू हवं तरं) एका तरुणीला सोडून देणे हा अर्थ काही बलाढ्य देवसमाज, कमकुवत आर्ष/आर्य समाज ह्या संदर्भात पटत नाही, तर राजवाड्यांना असेच म्हणायचे आहे हे नक्की का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक पारायणं केली आहेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश, हो समीक्षा विस्तारित हवी . मान्य आहे . सध्या काय वाचताय हा धागा माहित नव्हता. यापुढे तसे करेन .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुई

कंटेंट जबरदस्त आहे>>>> म्हणजे नक्की काय आहे त्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

या विषयावर पूर्वी एका वेबसाईटवर झालेली चर्चा :
http://www.misalpav.com/node/3866

येथेही त्याबद्दल चर्चा झालेली दिसते :
http://mr.upakram.org/node/1744#comment-28773

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जालावर हे पुस्तक उपलब्ध आहे हे वर आलेच आहे. पण तेथे कॉ.श्रीपाद अमृत डांगेलिखित प्रस्तावना नाही. ही प्रस्तावना मी अनेक वर्षांपूर्वी वाचलेली होती.

डांग्यांच्या असे लिहिल्याचे स्मरते शेवटाशेवटाच्या दिवसात राजवाडे आणि डांगे ह्यांचा बराच परिचय झाला होता आणि डांग्यांच्याबरोबरच्या चर्चांमधून राजवाडयांना साम्यवादातहि रस निर्माण झाला होता. राजवाडे अजून काही वर्षे जगते तर साम्यवादाचा स्वीकार त्यांनी केला असता असे डांगे लिहितात.

मध्ययुगीन हिंदुस्तान हा सरंजामशाहीच्या युगात होता असे राजवाडयांना वाटत होते. संदर्भ आठवत नाही पण एका ठिकाणी त्यांनी हिंदुस्तानातील लहानमोठया सत्तांमधील युद्धांच्या परिणामांचे वर्णन केले आहे. अशा युद्धांमध्ये जे जिंकतात त्यांना आणि त्यांच्या कोंडाळ्यातल्यांना आनंद होते. विरुद्ध जे हरतात ते आणि त्यांच्या कोंडाळ्यातले रडतात. पण सर्वसामान्य जनता ह्यामध्ये काहीच रस दाखवीत नाही कारण सत्ताधीश कोणीही असला तरी त्यांच्या नशिबीचे दारिद्र्य आणि नाना प्रकारच्या करांच्या आणि पट्टयांच्या मर्गाने त्यांच्या संपत्तीचे होणारे हरण काही बदलणार नसते.

धागाकर्त्याच्या 'मनावर आघात होण्या'शी मात्र सहमत नाही. हिंदुस्तानात सर्व काही 'गोग्गोड' आणि 'उदात्त', साजूक तुपातले होते असे येथे कोणी मानते असे वाटत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0