चंद्रमाधवीचे प्रदेश

चंद्रमाधवीचे प्रदेश

हे माझ्या आयुष्यातला अतिशय महत्वाच पुस्तक आहे. पाच वर्षांपूर्वी हे पुस्तक मी कसं काय विकत घेतलं हे मला कळत नाही, तुमच्या नशिबात असेल तेंव्हाच एखाद पुस्तक तुम्हाला भेटत यावर माझा विश्वास आहे.
या आधी मी कविता वाचल्या होत्या शाळेतच आणि खूप काही आवडत नसत कारण त्याच्याशी त्यावरचे प्रश्न, उत्तर, मार्क असल्या गोष्टी संबंधित होत्या.
कशावर तरी बोलू काही कार्यक्रमाने मी कवितांकडे ओढली गेले आणि हे पुस्तक हातात आले.
माझ्या कवितावाचनाची सुरवात या पुस्तकाने झाली आणि
ती सुरवातच अशी झाली की, काव्यप्रेमावर 'ग्रेस' या नावाची अमीट मोहर उमटली.

चंद्र माधवीच्या प्रदेशात एकदा तुम्ही अडकलात की सुटका नाही आणि ही सुंदर कैद तुम्हाला आवडायलाच लागते.

ते एक वेगळंच जग आहे .........अनोख्या प्रतिमांच.......... एकामागून एक चित्रमय प्रतिमा कोसळत जातात...तुमच्या आत्म्यातल्या वेदनेला स्पर्श करून जातात . आपण एख्याद्या Abstract पेंटिंग मध्ये आहोत असं वाटू लागतं .
आई , राघव ,घोडे, गाई, मिथिला , साउल...पुराणातील स्त्रिया अहिल्या , द्रौपदी ,सीता,सुमित्रा , राम , कृष्ण - राधा अणि त्याचा पावा .....

आणखी किती अणि कसा सांगायचा या प्रदेशाचा विलक्षण प्रवास .... इथून जाताना तुम्ही स्वतःला नव्याने दिसता , सापडता , भेटता ... अनोख्या सुफी व्हर्लिंग चा अनुभव घेता .

या पुस्तकामुळे मी कलात्मक आणि स्पिरिचुअलदृष्ट्या उत्क्रांत झाले असं म्हणू शकते .

या पुस्तकावर अजून नक्की कसं आणि काय शब्दात लिहायचं मला कळत नाही . हे म्हणजे कवितेचा अर्थ विचारण्यासारखेच निरर्थक काम .वाचणारा शब्दहिन होणे हेच तर कवितेचं यश .
त्यामुळे ग्रेसच्याच शब्दांनीच लिखाण थांबवते .
''कविता कशा करतात
खरच का कविता करायच्या असतात ?''~ ग्रेस

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ग्रेस काय, इतर कवी काय किंवा कित्येक पारंपरिक अभंग काय वाचून्/ऐकून छान वाटते. पण नक्की काहिच समजत नाही. किंवा अगदि दोन मिनिटांपूर्वी काय वाचलं हे ही समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

किंवा अगदि दोन मिनिटांपूर्वी काय वाचलं हे ही समजत नाही.

गजनी????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"समजत नाही." आणि "आठवत नाही" ह्यात फरक आहे बॅट्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ही तर गजनीपेक्षा वैट्ट अवस्था आहे मग Wink तिकडे फक्त हार्ड डिस्कमध्ये गडबड होती, इकडे रॅममध्ये गडबड आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तिकडे फक्त हार्ड डिस्कमध्ये गडबड होती, इकडे रॅममध्ये गडबड आहे

हाहाहा मस्त!!!!
___________________________________________________________

मन यांचे पटते. मला ही अनुभूती काही शब्द ऐकल्यावर येते क्वचित आवाज कोणाचा परीचीत वाटतो अन का ते कळत नाही.

"मिमोसा" , "कन्व्हिव्हिअल" - असे काही शब्द खूप आवडतात. आणि काय आवडलं हे शब्दात मांडता येत नाही. वाटतं की ध्वनी, की यमक की अनुप्रास काहीतरी आवडलं असावं. पण कळत नाही.

काही वाक्य उदाहरणार्थ - Art is our chief means of breaking bread with the dead - W H Auden ................ हे नक्की कळत नाही पण ताकद आणि यथार्थता जाणवते. मग कितीही शब्दात मांडा की फिझीकल अन स्पिरीट यांचे मीलन अमकं अन तमकं ...... पण तो एसेन्स येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पारंपारिक माहितीनुसारः "समजत नाही" चा संबंध रॅमपेक्षा प्रोसेसरशी जास्त असावा असे वाटते. गजनीची भानगड रॅमची असावी आणि लाँग टर्म मेमरी लॉस हा हार्डडिस्कशी संबंधित असावा.
हल्ली बिग डेटा आणि बिग मेमरी वगैरे लफड्यांमुळे काहीही गोंधळ कुठेही होऊ शकतो हे मान्य आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्याची आठवण झाली : http://aisiakshare.com/node/371

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एकामागून एक चित्रमय प्रतिमा कोसळत जातात...

आणि या कोसळण्याला एक लय आहे, तीही वेढा घालते. एक काहीतरी आर्त सांगणं आहे हे जाणवतं. पण अर्थ न कळल्यामुळे काहीतरी न गवसल्याचं असमाधान हाती येत रहातं. एखाद्या फ्रेंच सुंदरीने तिच्या भाषेत आपल्याला कळवळून काहीतरी सांगावं, आणि आपण त्या भाषेतले काही शब्द निसटते कळत ऐकत रहावं तसं. हे असमाधान स्वीकारतही त्या कविता अनेक वेळा वाचाव्याशा वाटतात. तीच ग्रेस या रसायनाची जादू आहे बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कपलिंग' बघितलेल्या लोकांना तसं हिब्रू भाषेतलं असमाधानही समजेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.