उपाय - १

त्याला जाग आली. कोणी दुष्टाने पडदे सताड उघडले होते. "या सगळ्यांना माझा द्वेष करायला आवडतो", त्याने पुटपुटायचा प्रयत्न केला; पण झोपेतून नुकतंच उठल्यामुळे आवाज घशातून बाहेर आलाच नाही. पायाने पांघरूण उडवून देऊन तो उठला. प्रतिमा टिकवायची असेल तर व्यायाम करणं भाग होतं. मोकळं झाल्याझाल्या लगेच तो आरशासमोर उभा राहिला. "शाहरुख, तुझ्यासारखा कोणी ..." त्याचे शब्द तोंडातच राहिले. त्याच्या मिशीचे खुंट काही ठिकाणी आलेलेच नव्हते. त्याने हात लावून पाहिलं, खरंच मिशीच्या थोड्या भागात खुंट आलेच नव्हते. पण हाताला थोडं काहीतरी विचित्र लागलं. "चला अजून चष्मा लागलेला नाही तर!" पण मिशीचं काहीतरी करायला पाहिजे.

थोड्याच वेळात त्याचा ट्रेनर आला. "शाहरुख सर, चला आज आपण पायाचे व्यायाम करू या. तुम्हाला पुढच्या प्रोजेक्टमधे शॉर्टस घालायची आहे ना. तुमच्या पोटर्‍या फुगवल्या पाहिजेत." त्याच्या डोक्यातून मिशीचा विचार गेला. पण पाच मिनीटांच्या आतच ट्रेनर आपल्या चेहेर्‍याकडे विचित्र नजरेने बघतोय हे त्याच्या लक्षात आलं. "तुमच्या चेहेर्‍याला काय झालं सर? नव्या पिक्चरसाठी नवा लुक आहे का?" ट्रेनरने स्वतःच उत्तर सुचवलं हे बरं केलं. "ह-ह-ह-हो." शाहरुखला दम लागला होता त्यामुळे फार बोलता आलंच नाही. त्याने कसातरी व्यायाम पूर्ण केला. ट्रेनर गेल्या गेल्या त्याने डॉक्टरला फोन केला.

"हॅलो, डॉ. साने आहेत का?"
"एक मिनीट सर. आपण कोण बोलत आहात?"
"मी त्यांचा क्लायंट नं ००७."
"सर, तुम्ही स्वतः शाहरुख ... " रिसेप्शनिस्टचा आवाजच बंद झाला.
"हॅलो सर. मी डॉ. साने बोलतोय. आज तुम्ही स्वतःच फोन केलात? काही इमरजन्सी आहे का?"
"होय. तुम्ही लवकरात लवकर घरी या. मला काहीतरी झालंय. आणि काय ते मी फोनवर नाही सांगू शकणार."

डॉ. साने लगबगीने शाहरुखच्या घरी आले. त्याच्या मुलांना साने अंकल फार आवडत असले तरी आज त्यांनी थेट शाहरुखच्या ऑफिसकडेच मोर्चा वळवला. व्यायामाच्या घामट कपड्यांमधेच तो वेटींग चेअरवर बसला होता. समोरच्या टेबलावर कोपरं टेकवून गालांवर हात टेकवले होते. "डॉक्टर, हे पहा. मिशीच्या या भागात खुंटच नाही उगवलेले. आणि हात लावून पहा, कसं विचित्र लागतंय हाताला." डॉक्टरांच्या एका मित्राला विचित्र सवय होती. स्वतःच्या गालाच्या आत जिभेने उंचवटा बनवायचा. आणि दुसर्‍याला सांगायचं, "हे बघ इथे कसं आहे!" दुसर्‍याने हात लावला की लगेच त्याच्या बोटाला जीभ लावायची. डॉक्टरांना वाटलं हा तसं काही मस्करी करतोय का काय! त्यांनी हळूच गायब झालेल्या मिशीच्या इथे हात लावला. निदान शाहरुखने जीभ बाहेर काढली नाही. डॉक्टरांचा आत्मविश्वास थोडा वाढला. त्यांनी जरा जास्त दाब देऊन तिथे पाहिलं. छोटे छोटे गोळे हाताला लागले. "सर, तुम्हाला दुखतंय का हात लावल्यावर?" शाहरुखने नकारार्थी मान हलवली. अभ्यासक्रमात त्वचारोग शिकून जमाना झाला होता. सान्यांच्या आत्तापर्यंतच्या करियरमधे अशी काही केस आली नव्हती. जनरल फिजिशियनला त्वचारोगांचा कितपण अंदाज असणार! पण हे प्रकरण काहीतरी निराळंच वाटत होतं. सान्यांचा विचारमग्न चेहेरा पाहून शाहरुख अधिकच अस्वस्थ झाला.

"सर, हे प्रकरण मला थोडं निराळंच वाटतंय. आपण सरळ ब्रीच कँडीला जाऊन सगळ्या तपासण्या करून पाहू. हे काहीतरी निराळंच प्रकरण वाटतंय. तुमचे आजचे बाकीचे सगळे कार्यक्रम प्लीज रद्द करा."

शाहरुखला हे थोडं अनपेक्षित होतं. आज त्याच्या एका प्रोजेक्टचं डबिंग होतं, एका लग्नात नाचायला जायचं होतं आणि दोन लोक प्रोजेक्ट आणि लग्नाच्या कॉण्ट्रॅक्टसंबंधात भेटायला येणार होते. भेटायला येणार्‍यांशी सेक्रेटरी आणि मॅडम बोलू शकले असते. पण स्वतःच काम करायला गेला नसता तर त्याचेच लाखो रुपये बुडले असते. सानेंचा चेहेरा पाहून शाहरुखने फक्त बायकोला बोलावलं. "नमस्कार मॅडम. मॅडम, सरांना आजचा दिवस सगळ्या तपासण्या करून घेऊ देत. हे जे काही दिसतंय हे माझ्या समजुतीच्या बाहेरचं आहे. शिवाय सरांची वार्षिक आरोग्यचाचणीही या निमित्ताने होऊन जाईल." मॅडमचा चेहेराही आता चिंताक्रांत झाला.

"मी पण येते तुमच्याबरोबर. मला काळजी वाटत्ये फार. याला काही झालं तर माझं, मुलांचं कसं होणार? आम्हाला कोणी आधार नाही हो याच्याशिवाय."

"नाही मॅडम. तुम्ही काळजी नका करू. आत्ता फक्त तपासण्याच करायच्या आहेत. माझ्या डोक्यात ज्या चाचण्या आहेत त्यामुळे नजीकच्या भविष्यात सरांची तब्येत व्यवस्थित ठेवायलाही फायदा होईल."

"हो, तू घरीच रहा. हे एवढे चार कार्यक्रम पहा, दोन तर कॅन्सलच करावे लागतील. बाकीचे दोघं फक्त भेटायला येणार आहेत. तू बोलून घे त्यांच्याशी. काही लागलं तर मी फोनवर बोलू शकतो. आणि हो, कोणालाही काहीही सांगू नकोस. अगदीच कोणी खोदून खोदून विचारलं तर माझ्या लहानपणच्या मित्राचा अचानक ऑस्ट्रेलियातून फोन आला म्हणून मी बाहेर गेलो आहे एवढंच सांग."

सानेंनी ब्रीच कँडीला फोन करून शाहरुखच्या आगमनाची खबर दिली. प्रसिद्ध लोकांसाठी असणार्‍या गोपनीयतेच्या सोयी ब्रीच कँडीमधे होत्याच. सानेंनी त्यांच्या डोक्यात कोणकोणत्या टेस्ट्स होत्या त्याची यादीही फोनवरच दिली. सानेंचे एक त्वचारोगतज्ञ मित्र डॉ. ताडफळे अलिकडेच ब्रीच कँडीतही दोन दिवस यायला लागले होते. त्यांनी ताडफळेंनाही बोलावून घेतलं. शाहरुखच्या तपासण्या सुरू झाल्या. ताडफळेंनी शाहरुखच्या अ‍ॅलर्जी टेस्ट्स केल्या त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. लक्षणं आणि चाचण्यांचे निकाल पाहूनही ताडफळेंना काही समजलं नाही. शेवटी शाहरुखनेच आपण होऊन ज्या काही हृदय, फुफ्फुसं, यकृत सगळ्यासगळ्या अवयवांच्या तपासण्या करायला सुचवलं. क्षणागणिक त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते. वेगवेगळ्या प्रकारच्या सतरा परीक्षानळ्यांमधे त्याचं रक्त, चार परीक्षानळ्यांमधे मूत्र आणि दोन डब्यांमधे वीर्य गोळा केल्यानंतर शाहरुख गलितगात्र झाला होता. सकाळच्या व्यायामाआधी त्याने तीन कच्ची अंडी प्यायली होती तेवढ्यावरच तो दुपारी तीन वाजेपर्यंत होता. अनायासे मधुमेहाचीही चाचणी होईल म्हणून डॉक्टरांनी त्याला उपाशीच ठेवला होता. त्या चाचणीसाठी रक्त, मूत्र दिल्यानंतर त्याने दोन सँडविचेस हाणली. "ब्रीच कँडी भले हॉस्पिटल असेल पण काय भारी बीएल्टी मिळतं इथे! कुठून मागवतात हे साहित्य ते शोधलं पाहिजे", त्याने विचार केला.

हॉस्पिटलच्या सगळ्या सिनीयर स्टाफमधे शाहरुखची ही बातमी आत्तापर्यंत पसरली होती. आँको-पॅथलॉजिस्ट डॉ. सोनाळकर बराच वेळ या गप्पा ऐकत होत्या. शेवटी त्यांनीही नवीनच आलेली कर्करोगाची चाचणी केली का असं विचारलं. कोणी रुग्ण मिळाले नाहीत तर त्यांची जागा धोक्यात होती. ही महागडी चाचणी करणारे लोकही कमीच असणार; पण शाहरुखला हे परवडणार नाहीतर कोणाला परवडणार! डॉ. सोनाळकरांनी थेट शाहरुखशीच बोलायचं ठरवलं. प्रसिद्ध लोकांसाठी असणार्‍या आलिशान वेटींग रूममधे त्या गेल्या तर शाहरुखने बीएल्टी संपवून नुकताच टीव्ही लावला होता. "काय भिकार सिनेमा आहे हा, 'कोयला'. कशाला लोकं असलं काहीतरी बनवतात! सुपरस्टार बनण्यासाठी किती कष्ट पडतात हे कोणाला समजणार?" डॉक्टरांनी मात्र याकडे दुर्लक्ष केलं आणि थेट विषयालाच हात घातला. या चाचणीसाठी काही वेगळं करायचं नव्हतं. कोणीतरी त्याच्या तोंडातून थोड्या पेशी आणि लाळ जमा करणार होतं. तेवढं झालं की तो घरी जायला मोकळा होणार होता. थोड्याच वेळात हे सगळं झालं. शाहरुखने घड्याळ पाहिलं. संध्याकाळच्या लग्नात नाचायला त्याच्याकडे वेळ होता. फोन करून त्याने हा कार्यक्रम रद्द न केल्याचं कळवलं.

पुढचे आठ दिवस शाहरुख या सगळ्या गोष्टी विसरूनही गेला. पण नवव्या दिवशी सकाळीच डॉ. सानेंचा फोन आला. या चाचण्यांमधून काहीतरी निष्पन्न झाल्याचं दिसत होतं. पण काळजीचं कारण नसल्याचंही त्यांनी फोनवर अनेकदा बजावलं. लवकरात लवकर तासभर वेळ काढून डॉ. साने आणि इतर दोन स्पेशालिस्टना भेटायलाही त्यांनी सांगितलं. निरूपाय झाल्यामुळे बिझी शेड्यूलमधून शाहरुखने एक तास काढला, दोन दिवसांनंतर सकाळी सातची मीटींग ठरली. तिघंही सकाळी शाहरुखकडे आले.

"आम्ही जे काय सांगणार आहोत ते नीट ऐक. काळजी करण्याचं, घाबरण्यासारखं आत्ता काहीही नाही. पण अशी परिस्थिती येऊ शकते. आहे त्या परिस्थितीवर उपाय आहे. पण ... "

भाग - २

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

रोचक आहे. वाचतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं मध्येच तोडायचं नाही राव, आत्ता कुठे सुरुवात होत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इन्स्पायर्ड बाय... ?! Smile Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडतेय...

अवांतर :
अशा प्रकारच्या चाचण्या करून, प्रिव्हेंटीव्ह शस्त्रक्रिया करून, टाईम्समध्ये लिहून मोठेच काही केल्याची प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रकाराला 'एंजलिना सिंड्रोम' असे नाव द्यावे काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचते आहे. पुढे काय होणार याची कल्पना येत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0