आत्ता माझ्या मनात काय चाललंय ते सांग

मानसशास्त्राविषयी आज सर्वसामान्यांना ऐकून माहित असतं आणि त्याचबरोबर बरेच गैरसमजही असतात. सायकोलॉजीच्या विद्यार्थी आणि प्रोफेशनल्स यांच्या वैतागाचा विषय असणारा एक प्रश्न म्हणजे 'आत्ता माझ्या मनात काय चाललंय ते सांग'. मला हा प्रश्न किती वेळा विचारला गेला हेही आता आठवत नाही. या लेखामुळे हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांची संख्या थोडी कमी झाली तर बघायचं. Wink

हा विषय बराच मोठा असल्याने मी इथे फक्त काही मोजक्या ठळक गोष्टींची दखल घेइन. मुख्यत्वे करून ऐतिहासिक विचित्र पद्धती. तसंच मानसशास्त्राचा बहुतांश अभ्यास हा आधुनिक जगात तरी पाश्चात्यांनी केलेला असल्यामुळे मला त्याचे भारतीय मूळ (असल्यास) माहित नाही (तशी स्व/आत्मा ही कल्पना मनोव्यापारांबद्दल असल्याचे म्हणता येऊ शकेल कदाचित). माझा भारतीय मानसशास्त्राचा अभ्यास नाही. इतर कुणाचा असल्यास माहित करून घ्यायला आवडेल.

तर सुरवातीपासून सुरवात करुया. Psychology हा शब्द psyche या आत्मा/जीवशक्ती अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आला आहे (लॉजी कसल्याही शास्त्राला म्हणतात). याला जरी मानस'शास्त्र' म्हणत असले तरी त्याचं 'artistic science or scientific art' असं वर्णन केलं जातं, कारण हे रसायन किंवा भौतिक प्रमाणे pure science नाही, तसंच साहित्या इतकं abstract हि नाही.

मानसशास्त्राची आपल्याला माहित असलेली सुरवात ही हिप्पोक्रेटसच्या (460 - 377 ख्रि. पु.) ह्युमर्सच्या संकल्पनेतून झाली असे म्हटले जाते. त्यात रक्त, आम्ल पित्त, black bile (मराठी?), आणि श्लेष्म/कफ यांचा समतोल साधण्यावर आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अवलंबून असते असे त्याचे म्हणणे होते. अर्थात नंतरच्या काळात ही संकल्पना मागे पडली, पण अजूनही Sanguine (उत्साही), Phlegmatic (निरुत्साही) अश्या संज्ञा एखाद्याच्या स्वभावाचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जातात. (हिप्पोक्रेटसच्याही आधी ईजिप्त आणि चीन मध्ये बलस्थाने, उणिवा, स्वभाव यांच्या अनुषंगाने थोडेफार काम झाले होते).

नंतर Aristotle ने अनीमा (आत्मा) चा सिद्धांत मांडला. या काळात किंवा पुढे Rene Descartes च्या काळापर्यंत मानसशास्त्र हे बरेचसे तत्त्वज्ञान किंवा शरीरशास्त्राचा भाग म्हणून आले आहे. शास्त्र म्हणावे अशा प्रकारचे स्वतंत्र अस्तित्व मानसशास्त्राला मिळवून द्यायचे श्रेय Wilhelm Wundt या जर्मनाला जाते.
मानसशास्त्राच्या सुरवातीच्या काळातल्या 'रोचक' संकल्पना आणि उपचार-पद्धती आज आश्चर्याच्या वाटल्या तरी त्यावेळच्या लोकांना त्या हाय-टेक वाटत असतील Wink . उदाहरणार्थ, Trephination/ Trepanation. मानसिक आजार हे कवटीच्या आत असलेल्या वाईट शक्तींमुळे होतात, तेव्हा कवटीला भोक पाडून ह्या वाईट शक्तींना बाहेर काढून टाकणे हा त्यावरचा उपाय. उत्खननात अशा बर्याच कवट्या सापडल्या आहेत ज्यांचावर काळजीपूर्वक भोक पाडण्यात आले होते. त्यासाठी विशेष हत्यारेही विकसित करण्यात आली होती. आपल्याकडे भूत उतरवण्याचा प्रकार या 'उपचाराच्या' जवळ जातो.

मध्य-युगीन युरोपातील मास हिस्टेरियाचा एक tarantism नावाचा प्रकार बघायला मजेशीर वाटतो. यात लोकांचे घोळ्केच्या घोळके अचानक वेड्यावाकड्या हालचाली करू लागत, नाचू लागत, गडबडा लोळत, वगैरे. हा 'सो कॉल्ड आजार' Tarantula नावाच्या कोळ्याच्या चावण्यामुळे होतो असे मानले जाई. बहुधा dark ages च्या भयंकर परिस्थितीच्या तणावाने हे प्रकार झाले असण्याची शक्यता आहे. या काळातही आजारावरचे उपचार torture करुन भूत उतरवणे (exorcism) अशा प्रकारचे होते.

जगातले पहिले मानासोपाचारासाठीचे (?) Bedlam रुग्णालय इंग्लंडमध्ये 1337 मध्ये उघडण्यात आले. हे मानसिक रुग्णांपासून समाजाला सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने अधिक आणि त्यांना बरे करण्याच्या उद्देशाने कमी चालवले जायचे असे वाटते. धोकादायक वाटणाऱ्या रुग्णांना अतिशय जड साखळ्या मानेत, हात-पायात घालून ठेवले जाइ. इस्पितळतल्या स्वच्छतेची अवस्थाही अतिशय वाईट होती. तरी आधीच्या मानाने ती सुधारणाच म्हणायला हवी.

बहुतेक क्रमशः

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

रोचक विषय आणि छान माहीती.
लेख फारच लवकर संपला. थोडा अजुन मोठा हवा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आणि अनोखा विषय आहे.

भारतात या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास झाला नसावा असे वाटते. मात्र दृष्ट काढणे, तांत्रिक, मांत्रिक, फल-ज्योतिषी वगैरे पाहिले की काही जमातींचा वर्षानुवर्षे चालत आलेल्या व्यवसायातून मानसिक आजारांच्या काही पैलुंचा अभ्यास आपोआप झाला होता असे म्हणता यावे का?

बाकी पहिल्यांदाच इथे प्रतिक्रियेपेक्षा वेगळं असं लेखन करताय.. आनंद आणि स्वागत आहे.
पुढिल भाग नक्की येऊ द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जारण मारणाच्या रांगेत ज्योतिषाला बसविल्याबद्दल निषेध. दोहोत नक्की काय साम्य आहे ते कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्योतिषी जारण मारण करीत नसेल किंवा त्याचा तसा उद्देश नसेल, परंतु तो प्रकार स्यूडोसायन्सपेक्षा वेगळा कसा याचे उत्तर मिळालेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्योतिषी जारण मारण करीत नसेल किंवा त्याचा तसा उद्देश नसेल

हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.

परंतु तो प्रकार स्यूडोसायन्सपेक्षा वेगळा कसा याचे उत्तर मिळालेले नाही

आहे ना स्यूडोसायन्स (Pseudoscience is a claim, belief, or practice which is presented as scientific, but does not adhere to a valid scientific method, lacks supporting evidence or plausibility, cannot be reliably tested, or otherwise lacks scientific status.) च आहे. सायन्स नाही.
पण फक्त सायन्सच श्रेष्ठ हे कोणी ठरवलं? जर कोणी स्यूडोसायन्स वर विश्वास ठेवत असेल तर मनोरुग्ण का? मनोरुग्ण असण्यातही काही गैर आहे असे म्हणायचे नाहीये. पण ओढून ताणून ती बिरुदावली कशाला? रुग्ण नसताना , बनविण्याचा अट्टाहास कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोरुग्ण वगैरे सोडा. ते बिरुद अनावश्यकरीत्या जजमेंटल आहे. अन्धश्रद्धाळू असे म्हणू फारतर. या अन्धश्रद्धांचा जोपर्यंत स्वतःला किंवा इतरांना त्रास होत नाही तोपर्यंत त्यांच्या नावाने कोणी गळा काढायचं काम नाही.

बाकी, "पण फक्त सायन्सच श्रेष्ठ हे कोणी ठरवलं?" या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच वर दिले आहे. "स्यूडोसायन्स इज़ समथिंग दॅट कॅनॉट बी cannot be reliably tested." रिलायबिलिटीच नाही तर स्यूडोसायन्सला प्रतिष्ठा मिळणार कशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जारण मारणाच्या रांगेत ज्योतिषाला बसविल्याबद्दल निषेध. दोहोत नक्की काय साम्य आहे ते कळले नाही.

सर्वसाधारण प्रतीचे मानसिक अस्वास्थ्य (जसे निराशा(डिप्रेशन), अतृप्ती, अति-आत्मकेंद्रित पण वगैरे)असणारा माणूस ज्योतिषाला पत्रिका दाखव, हात दाखव असले उद्योग करता असतो तर तीव्र प्रतीचे मानसिक अस्वास्थ दिसु लागल्यास (जसे हॅल्युसिनेशन्स, स्किझोप्रेनिया, तथातथित भूतबाधा वगैरे) जारण मारण करणार्‍या तज्ज्ञांना बोलावत असत. खरंतर दोघांनाही अनुक्रमे समुपदेशनाची / मानसोपचारांची गरज असते.

तेव्हा या दोघांच्या उपचाराची पद्धत वेगवेगळी असली तरी ग्राहकाचा आजार मानसिक असे म्हणता यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वसाधारण प्रतीचे मानसिक अस्वास्थ्य (जसे निराशा(डिप्रेशन), अतृप्ती, अति-आत्मकेंद्रित पण वगैरे)असणारा माणूस ज्योतिषाला पत्रिका दाखव,

असच काही नाही ज्या व्यक्तीला "मानवी स्वभावाता" रस आहे, गम्य आहे, स्वतःचे भविष्य जाणून घ्यायचे आहे, अशी व्यक्ती देखील ज्योतीषाचा अभ्यास करु शकते, पत्रिका जाणून घेऊ शकते.
तुम्ही फारच "contorted" दृष्टीकोनातून बघता आहात. ज्योतिषावर विश्वास नाही ही एक गोष्ट झाली पण फक्त मनोरुग्ण च ज्योतीषात रस घेतात हे म्हणणे जावईशोध झाला.
तुम्ही वडाची साल पिंपळाला लावत आहात एवढेच म्हणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>आत्ता माझ्या मनात काय चाललंय ते सांग
अच्र्त बव्ल्त...

पुढला भाग लवकर येउ द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्युत गोडबोलेंच मनात हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्राची मनोरंजक सफर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

छान माहिती! पण अस्मिता ह्यांच्या म्हणण्याला सहमती 'लेख फारच लवकर संपला. थोडा अजुन मोठा हवा होता.'

बादवे, अजून एक गैरसमज किंवा गफलत नेहमी माझ्या निदर्शनास येते ती म्हणजे 'सायकालॉजीस्ट' आणि 'सायकायट्रीस्ट'. तुम्ही ह्या दोहोंमध्ये नेमका काय फरक असतो ते सांगाल का? (म्हणजे 'विकी' आणि जालावर वर माहिती आहे पण तरीही तुमच्या कडून अश्याच सोप्या भाषेत अजून जाणून घ्यायला आवडेल). वरवरच्या माझ्या माहिती प्रमाणे एक फक्त सल्लागार असतो तर दुसरा वैद्य असतो.

अजून एक प्रश्न, औषधे घेऊन मानसिक रोग बरे होण्याचे प्रमाण किती असते (% मधे)? की तसे प्रमाण काढणे अवघड आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही सांगितलेला फरक बरोबर आहे. सायकायट्रीस्ट हे मेडिकल डॉक्टर्स असतात ज्यांनी सायकियाट्रीमधे पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलं असतं, सायकॉलॉजिस्टस हे सायकॉलॉजीमधे डॉक्टरेट/मास्टर्स केलेले असतात. त्यामुळे सायकॉलॉजिस्टचा भर काउन्सेलिंग इंटर्व्हेन्शनवर असतो तर सायकायट्रीस्टचा मेडिकल इंटर्व्हेन्शनवर. बरेच सायकायट्रीस्ट समुपदेशनही करतात, ते योग्य कि नाही हा वादाचा मुद्दा असु शकतो. बहुतेक वेळेस सायकॉलॉजिस्ट आणि सायकायट्रीस्ट हे एका इंटर्व्हेन्शन टीमचा भाग असतात आणि रुग्णाच्या गरजेप्रमाणे ट्रीटमेंट ठरते.
सरसकट औषधांचे सक्सेस रेट सांगणं कठीण आहे, कारण ते रोगाच्या प्रकारावर अवलंबून असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ह्या माहिती बद्दल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला जरी मानस'शास्त्र' म्हणत असले तरी त्याचं 'artistic science or scientific art' असं वर्णन केलं जातं, कारण हे रसायन किंवा भौतिक प्रमाणे pure science नाही.

मानसशास्त्रामधील उपचारांच्या परिणामकारकतेबद्दल अधिक वाचावयास आवडेल. एका (आंतरजालीय!) चर्चेत ज्योतिषशास्त्र व मानसशास्त्राच्या परिणामकारकतेच्या टक्केवारीबद्दल वाचल्याचे स्मरते, दुवा सापडल्यास इथे नोंदवितो. हा कदाचीत वादग्रस्त विषय असावा, पण एकूणच ह्या तुलनेवर मानसशास्त्र-तज्ञांचं मत जाणुन घ्यायला आवडेल.

अवांतर - मास हिस्टेरियाचा अभ्यास सोशल नेटवर्कींग च्या परिघात झाला आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरुर Smile
अवांतरः Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्मिता, ऋषिकेश, सहज, घनु धन्यवाद. लौकरच पुढचा भाग लिहिते. भाग लहान असण्याचे कारण मराठी टायपण्याचा कंटाळा हेच. तरीही एवढं तरी लिहुन घ्यायचं श्रेय अदितीला आहे.

>>मात्र दृष्ट काढणे, तांत्रिक, मांत्रिक, फल-ज्योतिषी वगैरे पाहिले की काही जमातींचा वर्षानुवर्षे चालत आलेल्या व्यवसायातून मानसिक आजारांच्या काही पैलुंचा अभ्यास आपोआप झाला होता असे म्हणता यावे का?>> कदाचित, पण एक शास्त्र म्हणावे इतका झालासे वाटत नाही. तसा तर समुपदेशनाचा उद्योग कॅथलिक चर्चेस कित्येक शतके करत आहेत, पण त्यातले फार कमी समुपदेशनाच्या मर्यादा आणि तत्त्वे जाणून असतील.

सहज>> हाहा...असंच म्हणावसं वाटतं.

प्रकाश घाटपांडे>> वाचलेले नाही. मिळाल्यास वाचेन, पण गोडबोले बहुतेक वेळा कंपाय्लेशन करतात तसंच हेही आहे का?

हुश्श्. इतकं टायपून दमले. उरलेलं नंतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विषयाचाही इतिहास रोचक आहे. पुढचा भाग लिहीच. लेखाचं शीर्षक मस्तच आहे.

तसा तर समुपदेशनाचा उद्योग कॅथलिक चर्चेस कित्येक शतके करत आहेत, पण त्यातले फार कमी समुपदेशनाच्या मर्यादा आणि तत्त्वे जाणून असतील.

अगदी अलिकडच्या काळातही धार्मिक लोकांनी समलैंगिकांचं समुपदेशन करून त्यांना स्ट्रेट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या एक उमेदवार मिशेल बाखमन यांचे पती अशा प्रकारचं केंद्र चालवत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बहुतेक क्रमशः

मानसोपचारतज्ञाचीच अशी द्विधा मानसिक अवस्था पाहून गंमत वाटली. Wink

मानसिक आजार हे कवटीच्या आत असलेल्या वाईट शक्तींमुळे होतात, तेव्हा कवटीला भोक पाडून ह्या वाईट शक्तींना बाहेर काढून टाकणे हा त्यावरचा उपाय

अगदी २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत Psychosurgery (दुवा) केली जात होती! खुद्द अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या बहिणीवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया (Lobotomy) वॉल्टर जॅक्सन या डॉक्टरने केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>>मानसोपचारतज्ञाचीच अशी द्विधा मानसिक अवस्था पाहून गंमत वाटली. (डोळा मारत)>> भौ, हलवाई सारखा मिठाईच खात नाही. आणि मी मानसोपचार करत नाही. माझ्या व्यवसायात रुग्णांशी संबंधच येत नाहि Smile

लोबॉट्मी वेगळी. पूढे लिहीन त्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सन्जोपरावांनी त्यांच्या लेखात वापरलेले वाक्यच लिहीते - माणसाचे मन ही मोठी अजब गिजबीज आहे. (संदर्भ - http://sanjopraav.wordpress.com/2008/03/05/%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%95%...)

या मनाविषयी अजून वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0