खेड्याकडे चला..

खुप दिवसानी राजेश आपल्या ग़ांवी आला होता,ग़ांव सोडुन त्याने तब्बल पाच वर्ष झाले होते,आता तो शहरात राहुन तो शहरी झाला होता,आता ग़ावात त्याच्या भावाचे घर होते, तो त्याच्याच घरी आला होता.
भाऊ शेती करुन आपले पोट भरत होत.
त्याला दोन मुलं होती.घरी येताच घरची परस्थिती पाहुन खुप दु:खी झाला आणि आपला भाऊ रमेशला म्हणाल,' हे काय घर आजुन जसेच्या तसे,मला वाटले थोडीतर प्रग़ती झाली आसेल तुझी?'
'आता खेड्यात कसली प्रग़ती हुत्यायं,खायला मिळाले तर खुप झाले',रमेश म्हणाला,
'आसलं जग़ंन काही बरे नाही,'राजेश म्हणाला,
'मग़ काय करु म्हणतोस',रमेश वैताग़ुन म्हणाला,
'आसं कर हे घर व शेत वीक आणि माझ्याबरोबर शहरात चल तुला चांग़ले काम देतो,'राजेश म्हणाला,
'इथलं घरदार शेती विकुण काय करु शहरात कोण थारा देईन मला,'रमेश म्हणाला,
'माझाकडे रहा,'राजेश म्हणाला,
'हो रे पण मला माझे स्वत:चे घर तर मिळणार नाही,तुझं सुद्धा भाड्याचं घरं,कसं चालायचं,' रमेश म्हणाला,
'आरे पण तु खुप सारे पैसे मिळवु शकतोस,त्यातुन तु पैसा साठवुन ठेव व नंतर घर विकत घे',राजेशने समजुत घातली,
' हे बघ राजेश तु म्हणतोस ते बरोबर आहे पण आपल्या कोण देणार भरमसाठ पग़ार,उलट ग़ुलामी करुन पोट भरल्याशिवाय पर्याय नाही,त्यात महाग़ाई ,संग़ळा हिशोब तेथेच येतो,खेड्यात काय आणि शहरात काय एक सांरखं पण इथलं जग़णं लय शांत हाय बघ',रमेश म्हणाला,
'आरं पण पोराच्या शिक्षणाचं काय? तो विचार केलास का? पोराचं ही आयुष्य तुझ्या सारंख करणार की काय तु?, 'राजेश म्हणाला,
'हे बघ माझा जादातर खर्चा मुलाच्या शिक्षणावरच होतोय,आणि मी त्याच्या शिक्षकांला भेटुन पुढील शिक्षणाची चौकशी केली आहे,ते म्हणाले,काही दोनचार वर्षात येथे ही सर्व शिक्षणाची सोय होईल,तुम्ही काळजी करु नका ,आमचा तोच प्रयत्न चालु आहे,'रमेश म्हणाला,
'काही आसो तु तुझा निर्णय तुच ठरंव,,'रमेश काही आपले एकत नाही म्हणुन राजेश कंटांळुन म्हणाला,
तो पर्यत वईनीने जेवनाचे ताट आणले,
'काय वईनी तुम्हीच सांग़ा याला,
'राजेश वईनीने आणलेले ताट पाहत म्हणाला,
जेवन आवरुन देघे ही शेत पाहण्यासाठी शेतावर ग़ेले,रमेशने सर्व शेती दाखवली,
राजेश शेती पाहुन बावरला.
संध्याकाळी जेवण आवरुण दोघे पान खात बसले होते.
रमेशने ग़ावांत पाच वर्षात काय काय घडामोडी झाल्यात त्या सांग़ितल्या,मग़ रमेश झोपी ग़ेला.
नंतर राजेशला बरांच वेळ झोप आली नाही,तो विचार करु लाग़ला, रमेश कीती सुखी ,समाधानी आहे,आणि आपन शहरात काम करुन थकल्या सांरखे आहोत,मी ग़ुलामासारखे काम करतो, तो स्वत:ची शेती स्वखुशीने करतो, शेतीवर पैसा मिळत आसला तरी त्याच्या पोटापुरता होतो ना, '
आशा विचारात त्याला झोप लाग़ली,
सकाळी उठुण तो भावाचा निरोप घेताना रमेश म्हणाला,
'बघ,वाटल्यास तु ये येथे राहायला,दोघे मिळुन शेती चांग़ली करु,तुझी साथ आली तर चांग़ले पिक घेऊन पैसे मिळवु,'
राजेश म्हणाले,' मला तुझा विचार पटंला,मी लाग़लीच शहरात जाऊन विलेवाट लावतो आणि मुला बाळासंकट इकडे येतो'.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

आँ लब्बाड, आम्हाला कळवत पण नाहीत कथासंग्रह कधी प्रकाशीत करणार ते? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0