२०१४ लोकसभा निवडणुका: पर्याय व अंदाज (भाग - १)

भाग: | |

काल मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची तर काँग्रेसने सत्तेची सलग ९ वर्षे पूर्ण केली तर, युपीए-२ ने व सध्याच्या लोकसभेने आपल्या कारकिर्दीचे चौथे वर्ष पूर्ण केले. आता ही लोकसभा आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात शिरणार आहे. अर्थातच वातावरण राजकीय घडमोडींनी भरलेले व भारलेले दिसते आहे. काँग्रेसप्रणीत आघाडीच्या या दुसर्‍या कार्यकाळाची पहिल्याबरोबर तुलना केल्यास सरकारची कामगिरी अधिक डागाळलेली व वादग्रस्त आहे हे स्पष्ट आहे. मात्र याचे रुपांतर मतदानात होण्याआधी जवळजवळ ८ ते ९ महिन्यांचा काळ बाकी आहे. काँग्रेस पक्षाबद्दल व एकूणच या सकारबद्द्ल काहि प्रमाणात असंतोष आहे हे नक्की. मात्र तो किती मोठा व व्यापक आहे? त्याचे रुपांतर मतपेटीत परिपर्तित होईल का? काँग्रेस विरोधाची छुपी देशव्यापी लाट आहे का? असल्यास त्याचा फायदा करून घेणे कोणत्या विरोधकांना शक्य आहे? वगैरे अनेक प्रश्न पडतात. या लेखात २०१४ मध्ये लागु शकणार्‍या निकालांच्या चार शक्यतांची चर्चा करायचा मानस आहे.

त्या आधी सध्याच्या लोकसभेचे चित्र कसे आहे ते बघुया. हे चित्र बघताना भाजपा व काँग्रेस या पक्षांसोबत तिसरी आघाडी व चौथी आघाडी व इतर असे विभाजन करत आहे. तिसर्‍या आघाडित युपीएचे घटकदल + बाहेरून पाठिंबा देणारे + डावे - बसपा तर चौथ्या आघाडित एन्डीएचे घटक दल + एन्डीएला न नाकारणारे पक्ष + बसपा यांचा समावेश केला आहे. या व्यतिरिक्त लहान प्रादेशिक पक्ष, अपक्ष उमेदवारांना इतर या गटात ठेवले आहे (ही मंडळी "वेळ पाहुनी खेळ मांडणारे" असतात हे निरिक्षण)

लोकसभा: २००९

लहान राज्ये व केंद्रशासित प्रदेश
भारतातील एकूण राज्ये व केंद्रशासित प्रदेश मिळून १६ प्रदेश/राज्ये अशी आहेत ज्यांचे प्रतिनिधित्त्व ५ वा त्यापेक्षा कमी खासदार करतात. अंदमान-निकोबार(१), अरुणाचल प्रदेश(२), मेघालय(२), मिझोरम(१), नागालँड(१), सिक्कीम(१), त्रिपुरा(२), मणिपूर(२), चंदिगढ (१), हिमाचल प्रदेश (४), पाँडेचेरी (१), उत्तराखंड (५), दादरा-नगर हवेली (१), दमण-दिव (१), लक्षद्वीप (१) आणि गोवा (२) अशी राज्ये मिळून एकूण २८ खासदार लोकसभेत जातात. यापैकी सध्या १६ खासदार काँग्रेसचे, ७ भाजपाचे आणि इतर पक्षांचे ५ खासदार आहेत.

मोठी राज्ये: पूर्व
यात आसाम, छत्तिसगढ, ओधिशा व पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश केला आहे. ही चार राज्ये मिळून ८८ खासदार लोकसभेत पाठवतात. इथे काँग्रेसचे २० खासदार आहेत तर भाजपाचे १५ खासदार आहेत तर इतर पक्ष मिळून ५३ खासदार लोकसभेत आहेत. इतर पक्षांपैकी सर्वाधिक खासदार तृणमूल काँग्रेसचे (१९) आहेत तर त्या खालोखाल बिजु जनता दलाचे १४ खासदार आहेत. डाव्या पक्षांचे मिळून एकूण १४ खासदार (CPM ९ , CPI ३ व फॉब्लॉ २)आहेत.

मोठी राज्ये: युपी-बिहार
असं म्हटलं जातं की दिल्लीच्या सत्तेचा मार्ग युपी-बिहार मधून जातो. या भागातील उत्तराखंड हे लहान राज्य सोडले तरी या भाग १३४ खासदार लोकसभेत पाठवतो. सध्या या भागातून काँग्रेसचे २४ तर भाजपाचे ३० खासदार आहेत.

मोठी राज्ये: उत्तर
उत्तरेची राज्ये लहान असल्याने मोठ्या (५ पेक्षा अधिक खासदार) राज्यांचा विचार केला तर दिल्ली, हरयाणा, जम्मू आणि काश्मिर व पंजाब ही राज्ये उरतात. ही चार राज्ये मिळून ३६ खासदार पाठवतात. यापैकी २६ खासदार काँग्रेसचे असून भाजपाचा केवळ १ खासदार या भागातून आहे.

मोठी राज्ये: पश्चिम
एक गोवा व काहि केंद्रशासित प्रदेश सोडले तर पश्चिमेला चार मोठी राज्ये आहेत. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान! ही चार राज्ये मिळून लोकसभेत १२८ खासदार पाठवतात. यापैकी ६० खासदार काँग्रेसचे असून भाजपाचे ४४ खासदार या भागातून आहेत.

मोठी राज्ये: दक्षिण
काहि केंद्रशासित प्रदेश सोडले तर दक्षिणेलाही चारही मोठी राज्ये आहेत. आंद्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू. ही चार राज्ये मिळून लोकसभेत १२९ खासदार पाठवतात. यापैकी ६० खासदार काँग्रेसचे असून भाजपाचे १९ खासदार या भागातून आहेत.

या सगळ्या प्रदेशातील खासदारांची काँग्रेस, भाजपा, तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि इतर अशी गटविभागणी केल्यास असे चित्र दिसते:

पूर्व

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आसाम १४ १(आगप)
ओधिशा २१ १(डावे) १४(बिजद)
पश्चिम बंगाल ४२ १४(डावे) १९(तृकॉ)
छत्तिसगढ ११ १०
एकूण ८८ २० १५ १४ ३३
युपी-बिहार

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
बिहार ४० १२ ४ (राजद) २० (जदयु) २ (अपक्ष)
झारखंड १४ ५ (झामुमो २)
उत्तर प्रदेश ८० २१ १० २८ (सप, राजद) २० (बसप)
एकूण १३४ २४ ३० ३२ ४०
उत्तर

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
दिल्ली
हरयाणा १०
जम्मु आणि काश्मिर ३ (नॅकॉ)
पंजाब १३ ४ (शिअद)
एकूण ३६ २६
पश्चिम

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
गुजरात २६ ११ १५
मध्य प्रदेश २९ १२ १६ १(बसप)
महाराष्ट्र ४८ १७ ८(राकॉ) ११(शिसे)
राजस्थान २५ २०
एकूण १२८ ६० ४४ १२
लहान राज्ये / केंप्र

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
केंद्रशासित
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड
गोवा
पुर्वोत्तर (आसाम सोडून) ११
एकूण २८ १६
दक्षिण

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आंध्र प्रदेश ४२ ३३ ६(टिडिपी)
कर्नाटक २८ १९ ३ (जद)
केरळ २० १३ ४(डावे)
तामिळनाडू ३९ १९(द्रमुक) ९ (अद्रमुक)
एकूण १२९ ६० १९ २६ १५

===========
आता २०१४ चा अंदाज घेण्यासाठी आपण एकूण चार शक्यता बघणार आहोत:
१. मतदार स्थानिक राजकारण + राष्ट्रीय कल असा दोन्हीचा विचार करून मतदान करतील. कोणत्याही पक्षासाठी किंवा विरुद्ध अशी राष्ट्रव्यापी लाट नाही.
२. काँग्रेस विरोधी राष्ट्रव्यापी लाट मात्र भाजपासाठी राष्ट्रव्यापी लाट नाही.
३. काँग्रेस विरोधी राष्ट्रव्यापी लाट शिवाय भाजपासाठी ध्रुवीकरण घडून काहि प्रमाणात राष्ट्रव्यापी लाट.
४. काँग्रेस व भाजपा दोघेही आपापल्या मतदारांचे ध्रुवीकरण करू शकले मात्र काँग्रेसविरोधी राष्ट्रीय भावना.
==========

लोकसभा: २०१४

शक्यता १:मतदार स्थानिक राजकारण + राष्ट्रीय कल असा दोन्हीचा विचार करून मतदान करतील. कोणत्याही पक्षासाठी किंवा विरुद्ध अशी राष्ट्रव्यापी लाट नाही.

इथे आपण एकेक गटाचा विचार करूयात.
लहान राज्ये व केंद्रशासित प्रदेश
या राज्यांच्या २८ जागांच्या निकालात फार मोठा फरक अपेक्षित नाही. केंद्रशासित प्रदेशात चंदिगढची अनिश्चितता सोडल्यास फारसा फरक नसेल. नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणूकीत हिमाचल प्रदेश व उत्तराखंड येथे काँग्रेस भाजपा तोडिस तोड असतील. उत्तराखंड राज्यात बसपा एखादी जागा जिंकु शकेल. थोडक्यात २६ पैकी १३ जागा काँग्रेस तर ८ जागा भाजपाकडे असतील असे म्हणता यावे.

पूर्व
आसामचा विचार केला तर गेल्या विधानसभा निवडणूकीत आसाम गण परिषदेचा प्रभाव कमी होत चाललेला गेल्या निवडणूकीत दिसला आहे. शिवाय काँग्रेसने तेथे चांगले यश मिळवले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बेंनर्जींच्या मनमानी कारभारामुळे तृणमूल काँग्रेसच्या जागा नक्कीच कमी होतील, त्याचा थेट फायदा काँग्रेस व डाव्यांना विभागून होईल. छत्तीसगढ मध्ये भाजपाने चांगले सरकार दिले आहे, तेथील निकालात फार मोठा फरक दिसेल असे वाटत नाही

युपी-बिहार
झारखंड राज्यातील पहिली काहि वर्षे चांगले सरकार चालवल्यानंतर भाजपाने झारखंड मुक्ती मोर्चासोबत काडीमोड घेतला होता. तरी जनता सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याचे वाटत नाही. त्यामुळे तेथे गेल्याएळ प्रमाणेच निकाल लागतील असे म्हणता यावे. बिहारमध्ये अ‍ॅन्टी एन्कंबन्सी आणि लालुंच्या पुढच्या पिढीने राजकारणात येण्याने किती फरक पडेल माहित नाही पण एकूणात राजदच्या जागा अजून फार कमी होतील असे वाटत नाही. जदयु व भाजपा दोघांच्याही जागा वाढू शकतात. उत्तर प्रदेशात काँग्रेसला गेल्या लोकसभे इतके यश मिळणार नाही हे नक्की असले तरी सध्याच्या सरकारच्या नाकर्तेपणावर काही जागा कमी जातील. तर समाजवादी पक्ष ३० चा पल्ला गाठू शकेल मात्र ४० चा गाढू शकणार नाही असे वाटते. मात्र उमा भारती, वरूण गांधी, (आणि कदाचित नरेंन्द्र मोदी) वगैरेंच्या प्रभावाने भाजपा थोड्या अधिक जागा मिळवू शकते असे वाटते.

उत्तर
उत्तरेला दिल्लीमध्ये गेल्यावेळसारखा व्हाईट वॉश नक्की नसेल. काँग्रेसचा अ‍ॅन्टीइन्कंबन्सी + भ्रष्टाचार आणि विरोधी मते भाजपा आणि थोड्या प्रमाणात आम आदमी पार्टीत विभागल्याने काहि ठिकाणी काँग्रेस निसटता विजय मिळवतील. एकूणच उत्तरेला काँग्रेस आणि भाजपा तुल्यबळ ठरतील असे वाटते. पीडीपीला एखादी जागा जम्मु आणि काश्मिर मध्ये मिळायची शक्यता वाटते.

पश्चिम
गुजरातमध्ये मोदींच्या लाटेमुळे भाजपाच्या जागा बर्‍याच वाढतील असे वाटते. तर मध्यप्रदेशात मात्र अ‍ॅन्टीएन्कंबन्सीचा सामना भाजपाला करावा लागेल. महाराष्ट्र आणि राजस्थान भाजपाला आधारभूत ठरू शकतात. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना-मनसे युती झाल्यास (लोकसभेसाठी शक्यता आहे)या आघाडीला २४-३० जागा मिळू शकतील असे वाटते.

दक्षिण
गेल्यावेळी सरप्राईज देणार्‍या कर्नाटकात यावेळी भाजपाची फार डाळ शिजेल असे वाटत नाही. मात्र तेलंगाणा विभाजनाचा सतत केलेला पाठपुरावा आणि काँग्रेसचा नाकर्तेपणा बघता भाजपाला १-२ जागा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. टिडीपी व अण्णा द्रमुकच्या जागा चांगल्या प्रमाणात वाढलेल्या दिसतील. केरळामध्ये डावे व काँग्रेसमध्ये तुल्यबळ सामना होईलसे वाटते.

आता या प्रदेशातील खासदारांची काँग्रेस, भाजपा, तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि इतर अशी गटविभागणी केल्यास २०१४ मध्ये असे चित्र दिसते:

पूर्व

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आसाम १४ १० १(आगप)
ओधिशा २१ १(डावे) १५(बिजद)
पश्चिम बंगाल ४२ १५(डावे) १६(तृकॉ)
छत्तिसगढ ११ १०
एकूण ८८ २१ १६ १६ ३१
युपी-बिहार

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
बिहार ४० १३ ३(राजद) २१(जदयु) २(अपक्ष)
झारखंड १४ १० १(झामुमो)
उत्तर प्रदेश ८० १० १५ ३५ (सप, राजद) २० (बसप)
एकूण १३४ १२ ३८ ३९ ४१
उत्तर

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
दिल्ली
हरयाणा १०
जम्मु आणि काश्मिर २(नॅकॉ) १(पीडीपी)
पंजाब १३ ८(शिअद)
एकूण ३६ १२ १२
पश्चिम

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
गुजरात २६ १८
मध्य प्रदेश २९ १२ १३ २(बसप)
महाराष्ट्र ४८ १२ ११ १२(राकॉ) ११(शिसे) २(मनसे)
राजस्थान २५ १० १४
एकूण १२८ ४२ ५६ १२ १३
लहान राज्ये / केंप्र

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
केंद्रशासित
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड १(बसप)
गोवा
पुर्वोत्तर (आसाम सोडून) ११
एकूण २८ १३ १०
दक्षिण

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आंध्र प्रदेश ४२ १५ २०(टिडिपी)
कर्नाटक २८ २० २(जद)
केरळ २० ९(डावे)
तामिळनाडू ३९ ११(द्रमुक) २५(अद्रमुक)
एकूण १२९ ४६ २२ ४५

आता यातून सर्वसाधारण चित्र काय दिसते


काँग्रेस भाजप तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
१४६ १४० ९३ १४० २४


गट संख्या
सद्य युपीए १६१
सद्य एन्डीए १८०
युपीए+तिसरी आघाडी+इतर+बसपा २८६
तिसरी आघाडी + चौथी आघाडी + इतर २५७
एन्डीए+(चौथी आघाडी+इतर)बाहेरून २८०

प्रॅक्टिकली अशी वेळ आल्यास, काँग्रेस +तिसरी+चौथी आघाडीतील काही + इतर असे कडबोळे सरकार बनवले जाईल किंवा जर तृणमूल, बसपा आणि जदयु या तिघांनाही भाजपा वळवू शकली तर भाजपा सरकार बनवू शकेल. दोन्ही शक्यतांमध्ये हे असे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकेल असे वाटत नाही.

आता पहिल्या शक्यतेत आपण कोणत्याही लाटेचा विचार केलेला नाही. पुढिल भागात काँग्रेसच्या विरूद्ध व बाजूने तसेच भाजपाच्या बाजूने होणार्‍या ध्रुवीकरणाच्या परिणामाचा अंदाज घेऊया. मग आपल्याला सध्याच्या अनेक राजकारण्यांच्या वागण्याचा अंदाज येईल.

(क्रमशः)

भाग: | | ३

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

पुनरावृत्ती होते आहे खरी, पण त्याला नाईलाज आहे.
माझ्यासारख्या अतिशय अडाणी आणि उत्सुक माणसासाठी अतिशय उपयुक्त, समयोचित आणि सुरचित माहिती आहे. ऋषिकेशचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
आता हावरेपणा: या मालिकेतून आकडेवारी आणि अंदाज पुरवले जातील असा अंदाज आहे. त्याला पूरक अशी एकेका राज्यातील / एकेका प्रमुख पक्षातील सध्याच्या परिस्थितीचे यथातथ्य चित्रण करणारी, विश्लेषण करणारी लेखमालिका इथल्या कुणा जाणकारांनी लिहिली, तर काय बहार येईल! घ्या बुवा मनावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१

ऋषिकेशचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. चार वेगवेगळ्या शक्यतांचा (सीनारिओंचा) विचार करून प्रत्येक भागात काय होईल, त्याची बेरीज करून चार वेगवेगळी चित्रं मांडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.

निवडणुकांनिमित्ताने वेगवेगळ्या विषयांचा सांगोपांग अभ्यास करणारे लेख आले तर उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>गुजरातमध्ये मोदींच्या लाटेमुळे भाजपाच्या जागा बर्‍याच वाढतील असे वाटते

याला काय आधार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डिस्क्लेमर राहिला. Smile
यातील आकड्यांना अंदाजांना पूर्ण शास्त्रीय आधार असेलच असे नाही. मात्र यथामती स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जाईल

आता या अंदाजाबद्दलः
जर भाजपा व काँग्रेस दोन्हीबाजुंनी ध्रुवीकरण नसेल तर याचा अर्थ मोदींचे नेतॄत्त्व घोषित नसेल. मात्र मोदी खासदारकीसाठी निवडणूक लढवतील असे गृहितक आहे. तसे झाल्यास मोदींना पाथिंबा देण्याची भावना वाढिस लागेल.
शिवाय जर पाहिले तर २००९ मध्ये काँग्रेसला ११ व भाजपला १५ जागा मिळाल्या होत्या. तर २०१४ मध्ये ८ व १८ जागांचा अंदाज वर्तवत आहे. अश्या लाटेनंतरही ३ जागांच्यावर फायदा भाजपाही होईलसे वाटत नाही. मात्र तिथे तो तोटा थेट काँग्रेसला होत असल्याने भाजपाचा फायदा अधिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अंदाज करण्याचे कठीण काम अंगावर घेतल्याबद्दल अभिनंदन.

प्रश्न विचारण्याचे कारण-
२०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाला असला तरी (मीडियात मोदींच्या विकासाचा प्रचंड हाइप असूनही) भाजपला २००७ पेक्षा २ जागा कमी मिळाल्या होत्या. कर्नाटकात मोदींनी फारसा प्रचार केला नाही पण जेथे प्रचार केला ते भाजपचे स्ट्राँगहोल्ड असूनही तेथे पराभव झाला. (पराभव होणारच होता असे गृहीत धरले तरी मोदी प्रचारात उतरूनही तो रोखू शकले नाहीत).

म्हणून गुजरातच्या बाहेर मोदींना काही स्थान आहे असे वाटत नाही. काही शहरी पॉकेट्समध्ये (दिल्ली वगैरे) मोदींचा प्रभाव कदाचित पडू शकेल. पण त्यापलिकडे भाजपला मोदींचा काही फायदा होईल असे वाटत नाही.

दुसर्‍या बाजूने काँग्रेसच्या सरकारच्या नॉनपरफॉर्मन्स + भ्रष्टाचारामुळे काँग्रेसला फटका बसेल असा समजही मीडियात दिसतो. त्यालाही काही आधार आहे असे दिसत नाही. कॉमनवेल्थ गेम्स पासून चालू झालेल्या आणि पुढे अण्णा हजारे आंदोलनाच्याकाळातील भ्रष्टाचारविरोधी वातावरणानंतरही त्यानंतर झालेल्या निवडणुकांत काँग्रेसला विशेष तोटा झालेला दिसला नाही. (उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने पूर्वीपेक्षा ६ जागा अधिक मिळवल्या; गुजरातमध्ये दोन जागा अधिक मिळवल्या, हिमाचलमध्ये १३ जागा अधिक मिळवल्या, पंजाब मध्ये २ जागा अधिक मिळाल्या, उत्तराखंडात ११ जागा जास्त मिळाल्या. अलिकडे कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळाला). [मागच्यावेळी २६/११ चे प्रकरण २००८ मध्ये घडून गेल्यावर सहाच महिन्यानंतर झालेल्या निवडणुकांत काँग्रेसने पूर्वीपेक्षा मोठा विजय मिळवला].

मुद्दा हा आहे की टीव्ही - वृत्तपत्रे - सोशलमीडियात जो फील असतो त्यावर निवडणुकांच्या निकालांचे प्रेडिक्शन करणे धोक्याचे असते. २००४ मध्ये भाजपने चालवलेल्या इंडिया शायनिंग आणि फीलगुड कॅम्पेनपैकी फीलगुड फॅक्टर मीडियाने बर्‍यापैकी उचलून धरला होता. तरीही भाजपचा निवडणुकीत पराभव झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दिलेल्या आकड्यांवर असहमत होण्याचा प्रश्नच नाही.
दुसरे असे या शक्यतेत मोदी फॅक्टरला सर्वत्र विचारात घेतलेले नाहि. किंबहुना गुजरात, काहि प्रमाणात महाराष्ट्र आणि युपी सोडल्यास मोदी फॅक्टर फारसा विचारात घेतलेला नाहि.

युपी या साठी की असे गृहितक आहे की स्वतः मोदी युपीतून निवडणुक लढवतील व त्यायोगे भाजपाला काहि प्रमाणात ध्रुवीकरणाचा फायदा होईल. शिवाय उमा भारती स्वतः एखादी जागा लढवतील व "गंगा शुद्धीकरण" मुद्दा उचलून धरतील. उमा भारती, वरूण गांधी व आता अमित शहा मिळून प्रचार करतील तेव्हा/तरीही भगव्या मतांचे ध्रुवीकरण वाढणार नाही हे पटत नाही. गेल्यावेळी कोणत्याही लाटेशिवाय १० जागा भाजपाला मिळाल्या होत्या. युपी व बिहार मिळून काँग्रेस भाजपामध्ये तुल्यबळ टक्कर होती. जदयुच्या जागा पकडल्या तर एन्डीएने बरेच जास्त यश मिळवले होते. तरीही भाजपच्या लाटेच्या अभावी यावेळी केवळ ५ जागांची वाढ वर्तवली आहे.

बाकी, नुसत्या मिडीया पर्सेप्शन कडे बघायचे असते तर वरील अंदाजात काँग्रेसला मार्जिनली का होईना भाजपापेक्षा अधिक जागांचा अंदाज वर्तवला नसता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे.

काल परवाच काही अंदाज मीडियात प्रसिद्ध झाले आहेत त्यातही यूपीएला कमी आणि एनडीए ला जास्त जागा दाखवल्या आहेत. त्यांचा सर्व्हे अधिक वाईडस्प्रेड असूही शकेल. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊशी शकेल. पण त्याचे कारण काँग्रेस सरकारचा परफॉर्मन्स किंवा भ्रष्टाचार हे नसण्याची शक्यता आहे. [निरनिराळ्या भ्रष्टांच्या युत्या कशाप्रकारे बनतील त्यावर निवडणुकीतले निकाल* ठरतील]. म्हणजे ठाण्यातला मी भाजपचा मतदार असेन तर भाजपची शिवसेनेशी युती आहे म्हणून मी ठाण्यातल्या शिवसेनेच्या मरदाराला मत देईन. भाजपने मनसेशी युती केली तर मी मनसेच्या उमेदवाराला मत देईन. (मी भाजपचा मतदार आहे पण युती असूनही मी शिवसेनेच्या उमेदवाराला मत देणार नाही असे मतदार विरळाच असतात)

*यातून काय सूचित होते? तर कोणताही (जुना) मतदार** एकाच प्रकारे/पक्षालाच मतदान करतो. अशा स्वतंत्र पक्षांच्या ज्या काय युत्या होतील त्यानुसार निकालाचे परिणाम ठरतात.

**नवीन मतदार सहसा घरातल्या/मित्रमंडळातल्या ट्रेण्डप्रमाणे मतदान करतो. त्यामुळे मतदानाचा पॅटर्न साधारण वर्षानुवर्षे तोच राहतो. तरीही नवीन मतदार हे फ्लुइड असू शकतात. त्यांना टारगेट करणे निवडणुकीत महत्त्वाचे असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्याही अंदाजात एन्डीएला जास्त जागा आहेत. शिवसेना, जदयु आणि शिअद हे तिघेही चांगले पर्फॉर्म करायची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाला काँग्रेसपेक्षा कमी जागा असल्या तरी एन्डीएला जास्त जागा आहेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने पूर्वीपेक्षा ६ जागा अधिक मिळवल्या; गुजरातमध्ये दोन जागा अधिक मिळवल्या, हिमाचलमध्ये १३ जागा अधिक मिळवल्या, पंजाब मध्ये २ जागा अधिक मिळाल्या, उत्तराखंडात ११ जागा जास्त मिळाल्या. अलिकडे कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळाला).

इथे तुलना २००७ च्या विधानसभा निवडणुकांबरोबर केली तर काँग्रेसची परिस्थिती सुधारली आहे असे वाटेलही.पण मधल्या काळात २००९ मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या त्यात पक्षाने मोठे यश मिळवले होते आणि त्या तुलनेत २०१२-१२ मध्ये झालेली घसरण लक्षणीय आहे.उदाहरणार्थ उत्तराखंडमध्ये २००९ मध्ये काँग्रेसने लोकसभेच्या ५ पैकी ५ जागा जिंकल्या आणि विधानसभेच्या ७० पैकी ५१ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती.२०१२ मध्ये जागा ३२ वर खाली आल्या.उत्तर प्रदेशातील फरक लक्षणीय आहे.२००९ मध्ये विधानसभेच्या ४०३ पैकी ९५ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने आघाडी मिळवली होती. २०१२ मध्ये पक्षाला जागा मिळाल्या ३० च्या आसपास.आता यावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठीचे मुद्दे वेगळे असतात हे समर्थन केले जाईलच.पण ९५ वरून ३० इतकी मोठी आपटी पक्षाने कशी खाल्ली, राहुल गांधींनी दोन अडिच महिने राज्यात तळ ठोकला होता आणि दोनशेपेक्षा जास्त सभांमध्ये भाषणे केली होती तरी त्याचा अपेक्षित फायदा का झाला नाही या प्रश्नांची उत्तरे मात्र त्यातून मिळणार नाही.पंजाबमध्ये काँग्रेसने २००७ पेक्षा २ जागा जास्त मिळविल्या.पण सत्ताधारी अकाली दलात फूट पडलेली असताना सत्ताधारी आघाडीची मते कमी न होता काँग्रेसचीच मते कमी झाली असे चित्र दिसते.जे राज्य काँग्रेसने अगदी आरामात जिंकायला हवे होते तिथे दोन जागा जास्त मिळाल्या यावर समाधान मानावे लागले यातच सगळे काही आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

सहमतच आहे.

म्हणूनच अलिकडे झालेल्या विधानसभा निवडणुका म्हणा किंवा एकूण "आपल्या आसपासच्या" लोकांचे (सध्याचे) मत जाणून एक वर्षानंतर होणार्‍या निवडणुकांविषयी अंदाज बांधणे फारच अवघड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या चौरंगी लढती आहेत का? की लढत दोन आघाड्यांमध्येच, मात्र येथे विश्लेषणासाठी चार आघाड्या मानल्या आहेत?
ठोकताळे म्हणून ठीक, पण उमेदवारांची संख्या किती यावर बरेच काही अवलंबून असते असे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लढती आहेत. काहि राज्यांत भाजप वि काँग्रेस असा थेट सामना आहे तर काहि ठिकाणी चौरंगी लढती आहेत. चार आघाड्या विश्लेषणासाठी आणि इतर पक्षांचा कल पटकन समजावा म्हणून केल्या आहेत (अपवाद बसप - या पक्षाचा स्पष्ट कल नाही, परंतू स्वतंत्र आकडे मांडावे अशी ताकदही नाही.)

अर्थातच, हे अंदाज अगदी प्राथमिक पातळीवरचे आणि उभे राहिलेले उमेदवार वगैरेची माहिती नसताना वर्तवलेले आहेत. यात एरर मार्जिन अर्थातच मोठी आहे.

त्या प्रकारच्या सगळ्या तांत्रिक पातळीवर आणि टक्केवारीवर आधारित विश्लेषणातही हळु हळु शिरायचा मानस आहे. पण त्याआधी एक पूर्व तयारी, विविध शक्यता (सिनारीओ) याचा वाचकांना अंदाज यावा हा या मालिकेचा उद्देश आहे. जसजश्या निवडणूका जवळ येतील व अधिकाधिक माहिती प्राप्त होउ लागेल, त्यावेळी यातील शक्यता कमी/बाद करायचा तसेच आकडेवारीतील ढोबळपणाही कमी करायचा मानस आहे. निवडणूकीला एखादा महिना राहिपर्यंत किमान मतदारसंघ निहाय विजयि पक्षाचे अंदाज देता यावेत अशी इच्छा + धेय्य आहे.

पण एकदम निवडणूकांच्या आधी सगळ्या मिडीयाकडून आकडेवारीचा पाऊस पडतो आणि त्यात आपण वाहत जातो. अश्यावेळी, एक्झिट पोल किंवा सर्वेक्षण किंवा तत्सम काही करण्याइतके रिसोर्सेस माझ्यापाशी नसताही, वर्षभर आपले अंदाज रिफाईन करत काढलेले निष्कर्ष किती अचुक ठरतात याची मलाही उत्सुकता आहे.

थोडक्यात, हे अंदाज ढोबळ / ठोकताळे म्हणून आहेत हे मान्य आणि योग्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्लिंटन मास्तर ना पाचारण करतोय, अजून काही तरी झकास वाचायला मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंडिया टुडेचा पोल बघितला तर तो "आज" जर मतदान झाले तर काय होईल? स्वरूपाचा आहे.
त्यांच्या आणि माझ्या अंदाजात एकूणात फार मोठे फरक नाहित. त्यांनी एन्डिएला १७९ जागा दिल्या आहेत तर मी १८० Smile

आज मतदान झाले तर आज कोणत्याही पक्षाची लाट नाही हे स्पष्ट आहे तेव्हा हे अंदाज माझ्या सारख्याच शक्यतेच्या अंदाजाशी मिळतेजुळते असणे बघुन जरा बरे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद. अजून निवडणुकांना एक वर्ष आहे तरीही हे आकडे मला बरेच conservative वाटत आहेत.मला वाटते की युपीए ला अजून बराच जास्त फटका बसेल. माझी स्वत:ची आकडेमोड अजून सुरू झालेली नाही तरी वरकरणी माझी हंच अशी आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी भाजपची किती मते खाईल हे या क्षणी सांगता येणे अवघड आहे. ज्यावेळी एखादा नवीन पक्ष पहिल्यांदा निवडणुक लढवितो (आंध्र प्रदेशात १९८३ मध्ये तेलुगु देसम आणि २००९ मध्ये प्रजा राज्यम, आसाममध्ये १९८५ मध्ये आसाम गण परिषद, ओरिसात १९९८ मध्ये बिजू जनता दल, कर्नाटकात १९९४ मध्ये कर्नाटक कॉंग्रेस पक्ष तर २०१३ मध्ये कजप, गुजरातमध्ये २०१२ मध्ये गुपप इत्यादी) तेव्हा त्या पक्षाची नक्की ताकद किती हा अंदाज बांधणे कठिण असते.दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्ष किती मते घेतो यावरून काहीतरी अंदाज बांधता येईल.तरीही एकूणच विधानसभा निवडणुकांमध्ये प्रादेशिक/छोटे पक्ष/ अपक्ष बरीच जास्त मते घेतात पण लोकसभा निवडणुकांमध्ये यापैकी बरीच मते मोठे प्रादेशिक पक्ष (सपा वगैरे) आणि राष्ट्रीय पक्षांकडे जातात हे आतापर्यंत केलेल्या आकडेवारीवरून लक्षात आले आहे.त्यामुळे दिल्ली विधानसभेत केजरीवाल प्रभावी ठरले तरी लोकसभेतही ते प्रभावी ठरतील याची शक्यता जरा कमी वाटते.

इतर काही मुद्दे:

हरियाणा
हरियाणात भाजपला ४ जागा असा अंदाज व्यक्त केला आहे.भाजपची हरिय़ाणात स्वत:ची फारशी ताकद नाही.तेव्हा राज्यातील ४ जागा म्हणजे कोणाबरोबर तरी आघाडी करून मिळालेल्या आहेत असे गृहित धरतो.राज्यात भाजप आणि चौटालांचा INLD अशी युती होईल असे गृहित धरले आहे की कै.भजनलालांच्या पक्षाशी युती होईल असे गृहित धरले आहे?

पंजाब
पंजाबात अकाली दलाला चौथ्या आघाडीत का धरले आहे?अकाली दल एन.डी.ए मध्ये आहे आणि राज्यात पक्षाचा डायरेक्ट सामना कॉंग्रेसशी आहे तसेच पंजाब विधानसभेत अकाली दलाचे ११७ पैकी ५६ आमदार आहेत म्हणजे स्वत:चे बहुमत नाही.तेव्हा स्वत:चे सरकार टिकवायचे असेल तर अकाली दलाला भाजपबरोबर जाण्याव्यतिरिक्त काही पर्याय आहे असे वाटत नाही.

कर्नाटक
कर्नाटकमध्ये आताच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडाला.इतरत्र म्हटल्याप्रमाणे १९९४ आणि २०१३ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये बरेच साम्य आहे. तसेच वर म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये स्थानिक पक्ष/इतर तितकेसे प्रभावी ठरत नाहीत हे १९९४ च्या विधानसभा आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांची तुलना केल्यास लक्षात येते (हा कल इतर अनेक राज्यांमध्ये दिसतो.यावर सविस्तर लेख लिहिणार आहे). तेव्हा २०१४ मध्ये येडियुराप्पा/श्रीरामुलु फार प्रभाव दाखवू शकणार नाहीत असे मला वाटते.त्यातूनही येडियुराप्पा किंवा त्यांचा पुत्र राघवेन्द्र शिमोगामधून उभे असतील तर ते निवडून यायला फार त्रास पडू नये.पण इतरत्र हा पक्ष फार प्रभाव दाखवू शकणार नाही आणि त्या पक्षांनी आताच्या विधानसभा निवडणुकांमध्ये घेतलेल्या मतांपैकी बहुतांश मते parent party (भाजप) कडे जातील असे मला वाटते.त्या परिस्थितीत भाजप ६ पेक्षा जास्त ८ किंवा ९ जागा जिंकू शकेल असे मला वाटते.

खालील टेबलमध्ये १९९४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ३, काँग्रेसने ४ तर जनता दलाने २१ लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये आघाडी घेतली असा अर्थ आहे.या टेबलवरून लक्षात येईल की प्रादेशिक पक्ष/इतरांची मते लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांकडे वळतात.तसे कर्नाटकात झाल्यास (शक्यता बरीच आहे) भाजपचा विधानसभा निवडणुकांइतका धुव्वा उडणार नाही.

मते     लोकसभा जागा/आघाडी    
  १९९४ विधानसभा १९९६ लोकसभा फरक १९९४ विधानसभा १९९६ लोकसभा फरक
भाजप १७.०% २४.८% ७.८%
कॉंग्रेस २७.०% ३०.३% ३.३%
जनता दल ३३.५% ३४.९% १.४% २१ १६ -५
कर्नाटक कॉंग्रेस पक्ष ७.३% ३.१% -४.२%
इतर १५.२% ६.८% -८.४%
एकूण १००.०% १००.०%   २८ २८
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

आभार.

सर्वप्रथम चौथी व तिसरी आघाडी अशी नावे दिशाभूल करणारी ठरताहेत असे (तुमचा व श्रामोंचा प्रतिसाद पाहता) म्हटले पाहिजे. त्याबद्दल दिलगिरी.

अधिक स्पष्ट करतो: तिसर्‍या आघाडीत मोजलेले पक्ष एकतर युपीएचे घटकपक्ष आहेत किंवा तटस्थ व गरज पडल्यास (खरंतर नाईलाज झाल्यास Wink ) काँग्रेसकडे झुकणारे आहेत (किंवा खरंतर ते असे पक्ष आहेत जे नजिकच्या भविष्यात भाजपाच्या बाजुने आपण दिसणार नाहीत असे सेफली म्हणता यावे). तर चौथी आघाडी या टायटल झाली डीएनए मधील घटकपक्ष आणि इतर तटस्थ पक्ष: ज्यांच्यासाठी भाजपा (सध्यातरी) अस्पृश्य नाही.

अकाली दल, शिवसेना हे एन्डीएतून बाहेर पडतीलच असे नाहि (तसेच राष्ट्रवादी युपीएतून) मात्र काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना १४० च्या खाली जागा आल्या तर गणित करायला सोपे जावे म्हणून त्यांना वेगळे काढले आहे.

आता तुमच्या प्रतिसादाकडे वळतो:
AAP ने आपले लक्ष दिल्लीवर केंद्रीत केले आहे. स्वतः केजरीवाल (आणि योगेंद्र यादव?) उभे राहुन एखाद-दोन जागांत ते भाजपाला डोकेदुखी होऊ शकतात असा कयास बांधला आहे. इतर क्षेत्रांत त्यांचा प्रभाव फार फरक करणार नाही असे मलाही वाटते.

हरयाणामध्ये INLD शी युती धरली पण ते आकडे वेगळे चौथ्या आघाडीत धरायला हवे होते. आता बदल करतो. चुक दाखवून दिल्याबद्दल आभार. मुळात अशी युती होईल का हे अजून तरी स्पष्ट नाहि पण ते गृहितक आहे.

बाकी कर्नाटकात ६ हा अंदाज केला आहे, मात्र त्याचवेळी इतरमध्ये एकही जागा ठेवलेली नाहि. स्वतः येडियुरप्पा लोकसभेला उभे राहतील का नाहि याबद्दल साशंक आहे. मात्र ते व जद मिळून काँग्रेस विरोधी मते दुभागतील. विधानसभा (व त्याआधी झालेल्या स्था.स्व.संच्या निवडणूका) निकालांकडे बघता भाजपा व जद ची ताकद बर्‍यापैकी समसमान झाली आहे. तेव्हा जद अपेक्षेपेक्षा अधिक त्रास देईल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चर्चा वाचते आहे.

क्लिंटन, टॅग चालण्यासाठी इनपुट फॉरमॅट Full HTML असा केला. अन्य काही संपादन करायचं असेल तर प्रतिप्रतिसाद येईपर्यंत ते शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.