माझे डॉक्टर होणे : ४ (क्रमशः)

कॉलेजची सुरुवात

अ‍ॅडमिशन घेतल्यावर लगेच पुढच्या अठवड्यात कॉलेज सुरू होणार होतं. तेंव्हा यावेळेला आम्ही पुन्हा घरून पुण्याच्या दिशेने निघालो, ते सगळ्या तयारीसहित. म्हणजे एक सिंगल सतरंजी, नवी गादी, त्यावर चादर, एक ब्लँकेट, मच्छरदाणी, कुलुप लावता येईल अशी लोखंडी ट्रंक. त्यात कपडे, तांब्या-पेला, गजराचं घड्याळ, दुधासाठी पातेलं, मग, गाळणी इ. चहा-कॉफीचं सामान. हे अन ते. थोडक्यात म्हणजे स्वयंपाकाचं सामान सोडलं, तर सगळा संसार सोबत घेतलेला होता. सायकल पण न्यायची होती. (हो. कॉलेजला सायकलवर बसून जात असत त्याकाळी. काsही ऑईल क्रायसिस वगैरे नव्हतं. ८ रुपये लिटर होतं पेट्रोल. तरीही 'विद्यार्थी' डिग्री मिळेपर्यंत, अन पोस्ट्ग्रॅड असतानाही सायकलच वापरीत.) त्यावेळी सायकल एस्टीवर टाकून नेता येत असे. पण त्यासाठी एक पायडल काढून घ्यावं लागे, अन हँडल आडवे. ते करून सायकल एस्टीच्या टपावर ठेवली की न हलता नीट बसू शकत असे. हे सगळं सामान माझ्यासकट गाडीत कोंबायची अन सायकल टपावर बसवायची जबाबदारी आमच्या बंधूराजांनी सांभाळलेली होती. पुण्यात बाळासाहेब घ्यायला येणार होते.

एस्टी स्टँडवर पोहोचलो, तर अगदी प्लॅटफॉर्म नं. पावणेदहा वर हॅरी पॉटर हॉगवॉर्ट्सला जाताना जशी ट्रंका अन घुबडांचे पिंजरे बिंजरे घेतलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी असते, तशी ट्रंक्/वळकट्यावाल्या माझ्या वर्गमित्रांची अन त्यांच्या नातेवाईकांची झुंबड उडालेली होती.

आम्ही सगळेच थोडे हवेत तरंगत होतो. अन त्याच वेळेला, धास्तावलेलेही होतो. आता घर सोडून होस्टेलला जायचं होतं. पण पुण्यात गेल्यावर अजून होस्टेल मिळणार नव्हतं. 'होस्टेल डिस्ट्रीब्यूशन' बाकी होतं. (हा 'होस्टेल डिस्ट्रीब्यूशन' नावाचा भारी प्रकार बीजेच्या होस्टेलला होता. डीटेल नंतर) मग ज्यांचे कुणी नातेवाईक इ. पुण्यात होते, ते त्यांच्याकडे, ज्यांचे कुणीच नाही ते दूरची ओळख काढून होस्टेललाच १-२ वर्षे सिनियर मुलांच्या रूमवर 'पॅरासाईट' म्हणून टेकण्याचे बेत करून निघालेले होते. माझ्या एका मित्राचा भाऊ बीजे ला होता, त्याच्या रूममधे वळकटी, अन सायकल त्याच्या ताब्यात देऊन मी पुढे खडकवासल्याला जाऊन राहणार होतो. होस्टेल मिळेपर्यंत पीएम्टीने अप-डाऊन असं ठरलेलं होतं.

***

यथावकाश पुण्यात पोहोचलो. ताईच्या घरून दुसर्‍या दिवशी कॉलेजातही पोहोचलो.

मेडिकल कॉलेजचा पहिला दिवस.

एम्जीए मधे डीन्स अ‍ॅड्रेसने सुरुवात होते, असा प्रघात आहे. अ‍ॅडमिशन्सची फर्स्ट स्टेज पूर्ण झालेली होती. नंतरच्या राऊंडस् मधले ३०-४० बाकी होते, पण मुख्य "बल्क"ला अ‍ॅडमिशन देऊन झालेली होती. म्हणून कोरम बर्‍यापैकी होता. पालकांनाही यावेळी उपस्थित रहाता येतं. भरपूर सारे प्राध्यापक तिथे हजर असतात, अन स्वतः डीन नव्या विद्यार्थ्यांना स्वागतपर बोलतात. नंतर एक दोघे प्राध्यापकही बोलतात. स्वत: डीन साहेब. अन नंतर डॉ. मोहन आगाशे, जे त्याकाळी सायकिअ‍ॅट्रीचे हेड ऑफ डिपार्टमेंट होते, त्यांचे भाषण झालेले मला आठवते.

मोहन आगाशे सरांचं भाषण नीटसं आठवत नाही. कारण त्यांच्या बाकी लेक्चर्स मधे ऐकलेलं अन ते वेल्कम स्पीच यांची खिचडी झालिये आठवणींत. (माझ्या निम्म्या वयापेक्षा जास्त जुन्या आहेत आठवणी, म्हणून.) डीन साहेबांचं आठवतंय. आय मीन काही स्पेसिफिक वाक्यं आठवताहेत.

You are the cream of the society! I welcome you to this august institute called B.J. Medical College & Sassoon Hospitals.

आम्ही डायरेक्ट हवेत! पहिलंच वाक्य! ते पण बीजेचे डीन बोलताहेत! अन आम्ही = क्रीम ऑफ द सोसायटी. लै भारी! मेंदूवर कोरलं गेलंय ते क्रीम ऑफ सोसायटी. पण आमच्या ज्यु. कॉलेजात अक्खं लेक्चर कधीच फक्त इंग्रजीतून ऐकायची सवय नव्हती. त्यामुळे डीन सरांची बाकीची वाक्यं स्किप झाली बहुतेक, अन पुढचं वाक्य ऐकू आलं, अन समजलं, ते म्हंजे -आता मराठीत सांगतो बाकीचं-

"आता पूर्वीचं विसरा. तुमच्या कॉलेजात कसेही जात असलात(म्हणजे सदरा-पायजमा घालून) तरी इथे कॉलेज/ हॉस्पिटलच्या वॉर्डात तुम्ही एप्रन घालून डॉक्टर म्हणून फिराल. तेंव्हा शर्ट-प्यांट हवी. धुतलेली अन इस्त्रीची. पोरांनो, रोज दाढी करत जा! एप्रन पांढरा दिसेल इतपत धूत जा. पायात स्लीपर घालून येत जाऊ नका. स्लीपर संडासात जाण्यासाठी असते. कॉलेजात बूट, किंवा कमीत कमी चप्पल हवी."

या व्यतिरिक्त पुढे काही आठवत नाही.

आपल्याला दाढी-मिश्या फुटणारेत! हे ते भाषण ऐकून उमजलं. तेंव्हा भल्तंच भारी वाटलं पण नंतर आयुष्यभर भादरायची कटकट पाठी लागणारे हे तेंव्हा कुठे समजत होतं?

हा उपदेश थोडा विनोदी जरूर वाटेल. पण अतीशय प्रॅक्टिकल होता. अन मी नंतर मेडिकल कॉलेजात मास्तरकी केली तेव्हा अनेकानेक भावी डॉक्टरांनाही त्याच शब्दात दिला (फॉर्वर्ड केला : ईमेलच्या भाषेत) हे डीन गुरूजींना नम्र अभिवादन करून इथे नमूद करू इच्छितो.

***

डीन्स अ‍ॅड्रेस नंतर आम्हाला सर्जरी डिपार्टमेंटला नेण्यात आलं. तिथे आमची 'मेडिकल' झाली. एम्पीएस्सी मार्फत ज्यांना क्लास टू वै पोस्टी मिळाल्यात त्यांना माहितेय बोर्डाकडून मेडिकल कशी होते ते. कठीण प्रकार असतो. यात, डोळे म्हंजे चष्मा फिष्मा तपासतात. मग मेडिसिनवाले तुम्चं हार्ट, लंग्ज काम करताहेत हे पहातात- स्टेथो लावून. अन सर्जरीवाले काही अगम्य कारणांकरता पुरुषांना 'इन्ग्वायनल हर्निया' आहे का? हे तपासतात.

हे हर्निया तपासणं लै विनोदी काम असतं. पेशंटाला उभे करून, त्याची चड्डी काढून जांघेत इन्ग्वायनल कॅनालच्या बाह्य द्वारापाशी करंगळी जोरात दाबून, त्याला खोकला काढायला सांगतात, अन तिथे हर्निया आहे किंवा कसे हे तपासतात. हा अस्ला हर्निया बायकांना होत नाही. त्यामुळे त्यांची कसली तपासणी केली ते मला आजपर्यंत ठाऊक नाही. (हे टाईप करेपर्यंत कुणाला विचारायचेही डोक्यात आले नाही. चान्स मिळाला की विचारून पाहीन.)

अन शेवटी टीटी (टेटनस- याला मराठीत टिटॅनस असे चुकीने म्हणतात. टेट्नस हा ऑफिशियल उच्चार आहे. नॉर्मली हिंदीमधे इंग्लिशचा खून करतात. पण 'टेट्नस का टीका' हा एकमेव बरोबर उच्चार हिंदीत असावा.)चा बूस्टर डोस : हो. 'बुडा'वर टी.टी. चं इंजेक्शन देतात. मस्त दुखतं ते. ज्यांनी घेतलंय त्यांना कळेल. नंतर पुढे 'पीजी' करतांना आम्ही मार्डवाल्यांनी भांडून अजून एक इंजेक्शन सरकारी खर्चाने मागून मिळवून घेतलं होतं ते म्हणजे हिपॅटायटीस बी विरुद्ध. ते इंजेक्शन त्या काळी खूप महाग असल्याने व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटमधून अ‍ॅन्टीबॉडी टायटर्स तपासून मग ज्याला आवश्यक त्याच पी.जी. स्टुडंटास टोचले गेले होते. (माझे टायटर त्यात बसत नव्हते, म्हणून ते फुकट टोचणे मला मिळाले नाही, हे अवांतर.)

डीन्स अ‍ॅड्रेस अन मेडिकल हे प्रकरण उरकून मी २-३ वाजेपर्यंत मोकळा झालो अन 'घरी' (ताईच्या) पोहोचलो.
***

या मेडीकल कॉलेजवर मी जाम खुश होतो. १२वीला असे पर्यंत पहाटे ६ ला उठून ७ ते १० कोचिंग, मग ११ ते ५ कॉलेज मग संध्याकाळी १ तास बास्केटबॉल असा दिवसभर बिझी रहायचो. मग नंतर स्वतःचा अभ्यास. तो रात्र रात्र. लै हाल सोसले होते. इथे रोल नं. मिळाले तेंव्हा अ‍ॅनाटॉमी डिपार्टमेंटला लिहून घेतलेलं टाईमटेबल म्हणजे अठवड्यातून ३ दिवस ९ ते १० लेक्चर. रोज १० ते १ डिसेक्शन (मुडदे फाडणे) अन अठवड्यातून ३ दिवस ३ ते ५ ट्यूटोरियल. बाकी चक्क सुट्टी! म्हणजे ३ दिवस मी १ वाजताच घरी जायला मोकळा असे. (लेक्चर्स अन डिसेक्शन बद्दल डीटेल पुढच्या भागात)

असे ८-१५ दिवस गेले.

कॉलेज चालू होतं. डिसेक्शन टेबलावर लोकांशी ओळखी होत होत्या. त्यातला एक पुणेकर 'सिटीलाईट' नर्‍या. त्यानं मला हळूच विचारलं.

'काय रे? तू फिजिऑलॉजी अन बायोकेमच्या लेक्चर्स, प्रॅक्टीकल्स आणि ट्यूटोरियल्सला का येत नाहीस?'

'म्हणजे??' मी टोटली ब्लँक.

'अबे आडकित्त्या, फर्स्ट इयरला तीन विषय असतात. अ‍ॅनाटॉमी (शरीररचनाशास्त्र), फिजिऑलॉजी (शरीरक्रीयाशास्त्र) अन बायोकेमेस्ट्री(जीवरसायनशास्त्र). या तिघांची ३ डिपार्टमेंट्स वेगवेगळ्या मजल्यांवर वेगवेगळ्या जागी असतात. ते आपापली टाईमटेबल्स आपापल्या नोटीसबोर्डांवर लावतात. आपलं कॉलेज रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत असतं. मधे १ ते २ फक्त लंच अवर. तू फक्त अ‍ॅनाटॉमी विषयाला येतोस! बाकी ठिकाणी का येत नाही? तिथली पुस्तकं तरी घेतलीस का विकत?'

मी फ्लॅट! अर्रर्‍या बाप!! आमच्या ज्युनियर कॉलेजात, अस्ली डिपार्टमेंट्स अन वेगळी टाईमटेबल्स, अन स्वतः जाऊन ते पहायची सिस्टिम कुठे होती?? अन मला हे सांगायलाही कुणीच नव्हतं. ज्यु.कॉ. मित्रांकडून समजलंही असतं, पण मी डायरेक्ट कल्टी मारत असे 'माझं' टाईमटेबल संपलं की. अन हे सगळे लोक नंतर कुठे घाईघाईत पळतात हे डोक्यातही आलेलं नव्हतं. (वरतून त्या ज्यु कॉ मधले माझे मित्र जीवश्च कंठश्च म्हणजे ११वी+१२वी = २ वर्षं जुने होते. त्यातली रायव्हलरी हे वेगळं गमतीचं प्रकरण होतं.) मग नर्‍याला पटवून सोबत नेला. डीपार्टमेंटं फिरलो, अन उरलेली दोन्ही टाईमटेबलं मिळवून ९ ते ५ चं टाईमटेबल तयार केलं. पुस्तकांची यादी पण.

मग दुसर्‍या दिवसापासून खरं "मेडीकलची" चक्की पिसणं सुरू झालं. थोड्याच दिवसांत समजलं की, फर्स्ट इयर संपल्यावर हे कॉलेज ९ ते ५ नाही, २४ तास सुरु असतं! अन अटेंड करावं लागतं!!

****
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

वाचतोय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहा नर्‍या चांगला मित्र होणार बर्का तुमचा :).

आन तुमीबी हास्टेल लाइफ कोळून प्यालेले का? बरं बरं. मंग यीऊंद्या की हास्टेलच्या पन गंमती जरा तब्येतीनी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त
पुभाप्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मस्त हो डॉक्टरसाहेब.
मज्जा येतेय वाचायला.

(फकस्‍त ते मध्‍ये येणारं 'हे नंतर', 'ते नंतर' जरा कंटाळवाणं होतंय... किती गोष्‍टी नंतरसाठी ठेवणार आहात?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते नंतर नंतरने रसभंग होतोय हे खरंच. पुढे करतो सुधरणा. ते वाक्य नसतं लिहिलं तर काही फरक पडला नसता अ‍ॅक्चुअली. पण मला वाटलं पुढच्या भागाची उत्कंठा वाढेल त्याने, म्हणून लिहिलं गेलंय. आठवणींचे धागे पाहू गेलं तर ते अनेक फांद्या असलेले असतात. एक पूर्ण होण्याआत दुसरी ,त्यातून तिसरी अशी डोळ्यांसमोर असते. ते ब्रांचिंग न करता एकसंध घटना वाचायला मिळावी म्हणून ते एकादी गोष्ट नंतर असं लिहावं लागतं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आमच्या कॉलेजातली एक शिक्षकविभूती म्हणत असे "तुम्हा मुलांना वाटते की या कॉलेजात प्रवेश मिळाला म्हणून तुम्ही क्रीम ऑफ द क्रीम आहात. पण लक्षात ठेवा. क्रीमसारखेच स्कमही वरती तरंगून येते."

मग वर्षभर तोच अपमान मिताक्षरात सुनावत : "नॉट क्रीम बट स्कम."

- - -
फक्त एकाच विषयाचे वेळापत्रक म्हणजे पूर्ण वेळापत्रक समजण्याच्या तुमच्या अनुभवावरून हे आठवले...

माझ्या आजीची कथा आहे - ५५व्या वर्षी सर्व मुले शिकून, लग्न होऊन घराबाहेर पडल्यानंतर तिने मोठ्या हुरूपाने मॅट्रिकची परीक्षा दिली.
इंग्रजीच्या पहिल्या पेपरात पहिल्या भागात सूचना होती : कुठल्याही पाच प्रश्नांची उत्तरे द्या. आजीने फक्त पाच प्रश्नांची उत्तरे दिली, बाकीचे कुठलेच भाग सोडवले नाहीत. घरी आल्यावर सूचनेचा अर्थ समजून तिला फारच हिरमुसायला झाले. त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा देऊन ती पास झाली, हे विशेष.
(वय ५५, प्रश्नांची संख्या ५ वगैरे तपशील मोघम आहेत - ही कथा "फॅमिली फोकलोर" झाल्यामुळे बरेचसे तपशील कर्णोपकर्णी बदलत गेले असतील.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, तुमची डॉक्टर व्हायला सुरूवात झाली तर. लेखनाचा ओघ चांगला आहे. दोन लेखांमधलं अंतरही योग्य वाटतंय.

आम्हाला सुरूवातीला क्रीम ऑफ द क्रीम म्हटलं होतं. Smile

अदितीशी सहमत. 'पण त्याविषयी नंतर' हे थोडं जास्त वारंवार येतंय. उत्कंठा वाढते, पण लेखकाने किती पाट काढून ठेवले आहेत आणि नंतर ते सगळे भादरून टाकणार का, अशी चिंताही वाटते. वायदे आझम हा शब्द तुम्ही ऐकला आहे का? Smile तशाच स्वरूपाचं शेवटचं वाक्य मात्र त्याविषयी नंतर असं न लिहिताही उत्कंठा वाढवतं.

एक सूचना करावीशी वाटते. या लेखात काही तांत्रिक शब्द अर्थ न देता आलेले आहेत. साधारण संदर्भ लागतो, पण तसे खूप आले तर रसभंग होऊ शकतो. बीजेमधल्या पुढच्या प्रवासाच्या वर्णनात अजून येण्याची शक्यता आहे म्हणून सांगितलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविस्तर वाचून सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

टेक्निकल शब्दांपैकी मला इन्ग्वायनल हर्निया हा एकच दिसला. त्याचा अर्थ तिथे मुद्दाम दिलेला नाही. हवा असल्यास सांगावा, थोड्यावेळात मी परत येतोय, मग टंकूण टाकीण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हा ही भाग छान. पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

रच्याकने : तुमची सही एकदम सही आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

उत्कंठावर्धक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0