नरोत्तम उर्फ अर्जुनराव पांडव यांचा हेप्पी बड्डे..

Happy Birthday, Arjun!

आज नरोत्तम उर्फ अर्जुनराव पांडव यांचा हेप्पी बड्डे..!

भगवंत म्हणतात : बहूनि में व्यतीतानि जन्मानि तव 'चार्जुन'| श्रीमद्भगवद्गीता ४:५

अर्जुनराव पांडव हे अतिशय धांदरट असले तरी त्यांना आज बड्डेला विश करायला हवंच! अगदीच 'हा' नव्हता पठ्ठ्या...!! काय मंडली...?

तेव्हा केक कापायला संद्याकाली ७ वास्ता जमायचा, कल्ला?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

कल्ला, कल्ला!!! अर्जुनाला ह्यापी बड्डे!!! (मना दिस्तो तो फकस्त पक्श्याचा डोला! अरे डोला रे डोला रे डोला म्हण्णारा यदाकदाचित वाला अर्जुन आठवला)

पन ऑफ कोर्स इंटेंडेड!

या निमित्ताने काही गीतारत्ने ऐसीकरांसाठी देतो. गीताकारांची व्हिजन किती ब्रॉड होती आणि त्यांना त्रिकालज्ञ का म्हणत ते यावरून लग्गेच कळते.

हर्षवर्धनाने रोमवर स्वारी केल्याचा उल्लेख गीतेत आहे. (रोमहर्षश्च जायते|)

चहा हा स्टोव्हवरच करावा असेही गीतेत प्रिस्क्रिप्शन आहे. (सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो| )

आंतरजातीय विवाहाचा अगोदरच उल्लेखही आहे. (कुर्वत्सिद्धिमवाप्स्यसि |)

शेवटचा उल्लेख जरा विस्कटून सांगणे अवश्यमेव आहे. गोष्ट कर्नाटकातली आहे. एका ब्राह्मणाचे सिद्धी नामक धनगरकन्येवर प्रेम होते. त्याने तिच्या बापसाकडे तिची मागणी केली तर बाप म्हणाला की इंटरकास्ट विवाह होणे इल्ले. मग त्या चतुर पंडिताने गीतेतील उपरोल्लेखित ओळीचा उल्लेख दाखविला आणि त्याची कन्नड फोडही केली- कुर्बर-सिद्धी-मम-आप्पन-सशी. (धनगराची सिद्धी माझ्या वडिलांची सून आहे) आणि गीतावचनाच्या आधारे कार्यभाग साधोन घेतला!!

वरची मौक्तिके कै. सेतुमाधवराव पगडींच्या जीवनसेतू नामक आत्मचरित्रात उल्लेखिलेली आहेत. अजून कुणाला दुसरी कुठली मौक्तिके आठवत असल्यास त्यांनी यथाशक्ति यथामति जल्द-अज़-जल्द सहाय्य करावे. प्रतीक्षेत आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हळेबीड येथील शिल्प.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्रौपदीच्या वेळेस माशाच्या डोळ्यावर डोळा होता हे खरेच, पण फेमस संवाद हा पक्ष्याच्या डोळ्याबद्दल आहे. द्रोणाचार्यांपुढे लै भाव खाल्ला होता त्यानं तो डायलॉग मारून.

बाकी शिल्प अगदी घसघशीत आहे. मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा सुरेखच शिल्प आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाण फेकुन मार्लेला वाट्टॅ! :-B

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

>>चहा हा स्टोव्हवरच करावा असेही गीतेत प्रिस्क्रिप्शन आहे

इतकेच नव्हे तर "संनिविष्टो" म्हणजेच सन्नी (Sunny) ब्रॅण्डचाच ष्टो वापरावा असंही सांगितलेलं आहे. [सध्या सन्नी ब्रॅण्डचा ष्टो बाजारात नसेल तर तो उल्लेख अजून भविष्यातल्यांसाठी आहे असे समजावे].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आयला हे लक्षातच आलं नव्हतं! प्रेज्ड बी द लॉर्ड, दरवेळेस नवनवीन काहीतरी सापडतेच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेही एक:
कासवाच्या सर्वांगांवर चहा टाकला की ते मरतं!
गीता-काळात देखील प्राणिहत्या होत असे.

<<यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गनीव सर्वशः । >>

मनेकाताई गांधी आणि त्यांचा Petaरा तेव्हा नव्हता म्हणून! नाय्तर कौरव-पांडवांची ऐसी की तैसी केली असती बाईंनी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

सहीच!

बायदवे याचा खरा अर्थ काय? कूर्मोऽङ्गनीव येथे उङ्गनी म्हंजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वास्तवात मूळ श्लोक आणि अर्थ:

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥

: ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अवयव आकसून आत घेतो, त्याप्रमाणे (
अध्यात्मशास्त्रात प्रगती करू इच्छिणारा)जो माणूस विषयविकारातून लक्ष काढून घेऊन आत्मरत होतो, त्याची बुद्धि सम्यग्ज्ञानात(आत्मज्ञानात)स्थिरचित्त होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

आह रैट्ट! धन्यवाद Smile

अवग्रह असूनही संधीकडे लक्षच गेले नाही. तस्मात गोंधळ झाला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं अवग्रह-नवग्रहांकडेच लक्ष लागून राहिलं ना की संधी हातची निसटून जाते आणि मग 'राधिका फळत नाही'!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंय पिडांकाका, सल्ला सर/मॅडम आंखोंपर घेतल्या गेला आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुर्वत्सिद्धिमवाप्स्यसि याचा अर्थ मला तरी, ए तुला सिद्धी दिली होती ती परत कर, असा वाटला होता. कदाचित सिद्धी मिळालेले लोक जेव्हा मोक्षप्राप्ती करतात तेव्हा त्यांच्याकडून त्यांच्या सिद्धी परत मागून घेण्याची चेकलिस्ट असावी. नवीन नवीन सिद्धी कशाला वापरायच्या, अशा 'प्रिव्हियसली लव्ह्ड' सिद्धी असताना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या बोलण्यात बिंदू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो, मत्तः स्मृतिर्ज्ञान मपोहनंच
--- सर्वजणांच्या हृदयात चहा चहा असे वाटू लागल्यावर मला मात्र छान छान पोहे हवेत असं श्रीकृष्णपरमात्मा म्हणू लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हाहाहा. तेही मत्त होऊन बरं का Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरेतर ते मस्त आहे. गरमागरम पोह्यांच्या आठवणीने भगवंताच्या तोंडाला पाणी सुटून ते मत्त म्हणताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहीतीपूर्ण श्रेणी देऊन श्रेणीचा दुरुपयोग केला आहे Wink ख्या: ख्या:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाजुचे दिनवैशिष्ट्य अपडेटावे काय? याच्या विचारात आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन:

जो आपल्या कर्माने रस्त्यावर येतो त्याला कुठलंही फळ देऊ नये!!

इथे गीताकारांचा परखडपणा दिसून येतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

ROFL ROFL ROFL

भारीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काळाच्या ओघात शब्द बदल झाला असावा. मुळातील श्लोक असा आहे
कर्मण्येराधिकारस्ते मां फलेषु कदाचन:

रस्त्यावरून (बहुदा घडा भरून नेण्याचे) कर्म करत असलेली राधिका (मला) कधीही फळत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यावर राधिका यांचे मत वाचण्यात उत्सुक Wink

(काडीसारकू नारदू) बॅटमॅनू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फळ किंवा फळाची साल एकाच चविने खाणारा तो स्तिथप्रज्ञ(असं काकाजी तुजं आहे तुजपाशी मधे म्हणतात), आणि अरजुन स्तिथप्रज्ञ होता म्हणतात.

त्यामुळे फळ दिले नाही तरी त्याला काही फरक पडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाभारतातलं नाही, रामायणातलं एक सुवचन ढकलपत्रातून आलेलं होतं:

शिक्षकः मुलांनो सुभाषिताचा अर्थ सांगा:

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा...

विद्यारर्थी: सोप्पा आहे गुर्जी. दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला, जनका तुझी तर मजा आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लई भारी.

या "चार जून" वरून आठवलं. बरोब्बर एका महिन्यापूर्वी "ष्टार वॉर्स" ची आठवण आलीवती : "मे द फोर्थ बी वुईथ यू !"
https://www.youtube.com/watch?v=D9XYKY4Km20

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

इंडीड. ष्टार वॉर्स आणि तदनुषंगिक वाक्प्रचार इ.इ. तर एक वेगळी युनिव्हर्सच आहे. त्यानिमित्ताने एपिसोड ६-रिटर्न ऑफ जेडी मधील ल्यूक स्कायवॉकर आणि डार्थ व्हेडर व सेनेटर पाल्पटीन ऊर्फ नंतरचा दुष्ट एंप्रर यांच्या फायटिंगच्या सीनदरम्यानचे ड्वायलॉक्स काही गोर्‍यांनी संस्कृतमध्ये डबवलेत. त्यांच्या अ‍ॅक्सेंटमध्ये संस्कृत ऐकायला जाम मजा येते.

लै शोधलं पण यूट्यूबवर लिंक मिळतच नाही Sad

लिंक मिळाली, पण कॉपीराइट व्हायोलेशनमुळे व्हिडिओ ब्ळॉक झालाय Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थांबा, सुनित्राव!!

तेही आमच्याकडे आधी सांगितलेलं आहेच हजारो वर्षापूर्वी.
अष्टावक्रगीतेच्या पयल्याच अध्यायात या 'ष्टार'टीव्हीच्या एडिक्शनचा उल्लेख आला आहेच.

अयमेव हि ते बन्धो द्रष्टारं पश्यसीतरम् |

हे बन्धो, आपणच एकमात्र ष्टार च्यानल बघता!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

श्लोकांचे आधुनिक चष्म्यातून अर्थ देणारा एक धागा गेल्या वर्षभरातच येथे किंवा 'उपक्रम'मध्ये दस्तुरखुद्दानीच सुरू केला होता पण त्यावेळी वाचनखूण न ठेवल्याने आता तो मिळत नाही. कोणास आठवत आहे काय?

आता मुख्य विषय.

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन - (मी पुष्कळ जुना आहे) कारण माझे अनेक जन्म झाले आहेत. पण अर्जुना, तू मात्र अगदी अलीकडचा म्हणजे चार जूनचाच आहेस.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन - काम करत राहणे हा तुझ्या हाती आहे पण नेहमीच फळे मिळतील असे नाही. कधीकधी चण्यावरच संतोष मानावा लागेल.

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो - सगळयांच्या हृदयात स्थान मिळविलेला चहा आणि ष्टो मीच आहे.

कमले कमला शेते हरः शेते हिमालये| क्षीराब्धौ च हरि: शेते मन्ये मत्कुणशङ्कया|| - कमळगावात कमळाची शेते आहेत. हिमालयात कमळाची हिरवी शेते आहेत. हरीच्या मालकीची कमळाची धोधो (क्षीराब्धौ)शेते आहेत. ह्याबाबत कोणालाहि शंका नाही.

तमसो मा ज्योतिर्गमय - तुम सो जा माँ, ज्योति चली गई है}

पयसा कमलं कमलेन पयः - पैशाला एक कमळ, एका कमळाच्या अनेक पै.

एका विद्वान प्राध्यापकांनी गीतेचा अभिनव अर्थ सांगणारे एक पुस्तक लिहिले. ते छापायला कोणीच प्रकाशक तयार नव्हता. आपले विचार जगापुढे जायलाच हवेत असे प्राध्यापकांना फार वाटत होते म्हणून पुस्तक स्वतःच प्रकाशित करण्याचे त्यांनी ठरविले. पण जवळ भांडवल नव्हते म्हणून कोणी दानशूर मदत करेल काय असा शोध ते घेऊ लागले. शिक्षणमहर्षि आणि साखरसम्राट अशा ***पाटील ह्यांच्याकडे जा, त्यांना शिक्षणकार्यात रुचि आहे आणि ते अवश्य मदत करतील असा सल्ला त्यांना कोणीतरी दिला आणि त्यानुसार ते शि.म.सा.स. ह्यांच्यापर्यंत जाऊन ठेपले. शि.म.सा.स. ह्यांना पुस्तकातील नव्या विचाराचे महत्त्व पटवून देण्याचा प्राध्यापकांनी आटोकाट प्रयत्न केला पण शि.म.सा.स. बधेनात. अखेर प्राध्यापकांना अखेरचा बाण भात्यातून काढला. पलीकडच्याच तालुक्यातील शि.म.सा.स. मोहिते-पाटील आणि आपले शि.म.सा.स.***पाटील ह्यांचा जिल्हापरिषदेचा राजकारणावरून उभा दावा आहे असे त्यांनी ऐकलेच होते. ते शि.म.सा.स.***पाटील ह्यांना म्हणाले, "पहा गीतेमध्ये किती सत्यवचन आहे. सातव्या अध्यायात भगवंतांनी स्वतः म्हटले आहे की 'मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्' मी त्या मोहित्याला बिलकूल जाणत नाही कारण तो मला परका आहे." हे ऐकल्याबरोबर पारडे फिरले आणि पुस्तक खरोखरच थोर विचारांनी भरले आहे असे शि.म.सा.स.***पाटील ह्यांना पटले. ते म्हणाले, "सर असं म्हणतीय काय गीता, आता तुम्ही मुळीच काळजी करू नका, तुमचे पुस्तक आता आमच्याकडं लागलं. आम्हीच आमच्या कारखान्याच्या छापखान्यात छापून ते प्रसिद्ध करतो आणि प्रत्येक मेंबराला त्याच्या घरासाठी आणि मुलाबाळांसाठी ५-५ कॉपीज घ्यायला लावतो."

त्याच धाग्यात कोणीतरी दिलेला हा पाचकळ विनोद. मुलगा गुर्जीना म्हणतो, :गुर्जी, आता तुमीच बगा, गांधी म्हंत्यात सोच्छता ठेवा. टिळक म्हंत्यात मी फोलपटं उचलणार न्हाइ. आता आम्ही पोरासोरांनी कुनाचं ऐकाव?'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन - (मी पुष्कळ जुना आहे) कारण माझे अनेक जन्म झाले आहेत. पण अर्जुना, तू मात्र अगदी अलीकडचा म्हणजे चार जूनचाच आहेस.

याचा खरा अर्थ बरेचसे मे महिने गेल्यावर तू चार जूनला जन्मलास असा आहे.

असो. आज नूतन यांचा खरोखरचा बड्डे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आज नूतन यांचा खरोखरचा बड्डे आहे.

थोडक्यात नूतन, नूतन वर्षाभिनंदन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन

मला याचा अर्थ थोडा वेगळा वाटतो. बरेच मे महिने उलटून गेल्यानंतर तुझा जन्म चार जूनला झाला. यावरून हे सिद्ध होतं की त्याकाळी अनेक अधिक महिने एकामागोमाग येऊ शकायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...अधिक मासाचा फंडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचा अर्थ: "मी बरेच मे महिने पाहिलेत रे, तू केवळ चार जून बघितलेस!"
हे त्या भगवन्ताचे पामराला हिणवणे आहे. अधिक माहितीसाठी माझा ब्लोग "इतिहासातील सुरस विज्ञानकथा" जमल्यास वाचा. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

तमसो मा ज्योतिर्गमय - तुम सो जा माँ, ज्योति चली गई है}

याचाच 'तुझी आई ज्योतिबाला गेली' असाही एक पाठभेद ऐकलेला आहे. मात्र, आपण दिलेला पाठभेद अधिक रोचक तथा मनोरंजक आहे, हे प्रांजळपणे कबूल करतो.

....................

यातील 'ज्योतिबा' हे एखादे दगडाला-शेंदूर-छाप अनार्यदैवत असावे, आणि कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी तिचे नामसाधर्म्य हा निव्वळ योगायोग असावा, अशी निदान आमची तरी समजूत आहे. तसेच, प्रत्यय 'कडे' असा नसून 'ला' असा आहे, याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. हो, उगाच नसता गदारोळ नको!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यातील 'ज्योतिबा' हे एखादे दगडाला-शेंदूर-छाप अनार्यदैवत असावे

कोल्हापुरचा जोतिबा हे इतकेही गयेगुजरे दैवत नाही, इतकेच फक्त निदर्शनास आणून देऊ इच्छितो. बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीकरिता धन्यवाद.

अतिअवांतर: *योगायोगाने* श्रेणीसुविधा *नुकतीच* *पुन्हा* सुरू झाल्याच्या आनंदात 'माहितीपूर्ण' द्यायची होती, ती चुकून 'मार्मिक' दिली गेली. कृपया भावनाओं को समझो. पुनश्च धन्यवाद.

....................

'ढुम् ढुम् ढुमाक्! ढुम् ढुम् ढुमाक्!'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख अपूर्ण आहे. उगाच विद्रट (सापडलाय ना शब्द, आता वापरा चिक्कार!) लोकांनी आमच्या महान संस्कृतीची टवाळी करण्यासाठीच हा धागा उघडला आहे आणि त्याला प्रतिसादरूपी प्रोत्साहन देत आहेत. एखादा खरोखर हुशार, शिकलेला, बहुश्रुत सदस्य असता तर त्याने पाश्चात्य-सौर कालगणना कशी भारतीयांकडूनच उचललेली आहे यावर एक संशोधनपर निबंध लिहीला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा वा फारच छान धागा अन प्रतिसाद. मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

" महाराष्ट्रात हे पांडव आणि यादव वगैरे लोकांचे बड्डे साजरे करणं बंद करा " अशी आरोळी यायच्या आत आम्च्याकडून वाढदिवसाच्या शुभेछा ...

हैप्पी बड्डे अर्जुनराव .. !!

आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे विचारतो .. पार्टी कुठे आहे ??
तुमचा तो काय तो सोमरस वगैरे सकट एक झक्कास पार्टी पाहिजे ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

>>हर्षवर्धनाने रोमवर स्वारी केल्याचा उल्लेख गीतेत आहे. (रोमहर्षश्च जायते|)

इथे कोणास असा प्रश्न पडेल की श्लोकात हर्षवर्धन रोमला फक्त गेल्याचे म्हटले आहे, स्वारी केल्याचे म्हटलेले नाही. त्या शंकामंडूकांनी "तो गेला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले" हे प्रसिद्ध सुभाषित आठवावे.

(किंवा हल्ली अनेक हौशी तरूण सिंहगड किंवा तत्सम गडांवर जातात आणि मग पेपरमध्ये 'तरुणांनी *** गड सर केला' अशा बातम्या येतात. तद्वत रोमला जाणे म्हणजेच रोम सर करणे असा अर्थ घ्यावा).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मूळ ग्रंथाला अर्थबोधिनी टीका लागते ती यासाठीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'रोम हर्षश्च जायते' म्हणजे 'रोम हर्षाकडे गेले'. हे काहीसे 'Rome went to Harsha' किंवा 'Rome fell to Harsha' अशा अर्थाने घ्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! थोर, म्हणजे अगदी उच्च धागा!!!
(आमच्या धाटगुरुजींनी असं संस्कृत शिकवलं असतं तर आम्हीही त्या ब्याटम्यानासारखे पंडित नसतो झालो?)
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै भारी.....
पुन्हा वाचला. पुन्हा आवडला. बॅट्या, अरुण जोशी व अरविंद कोल्हतकर अशा सर्वांचेच प्रतिसाद भन्नाट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काही अवांतर मौक्तिके:

क्र. १:

कुठे वाचला/ऐकला साफ विसरलो. देवळात कीर्तन चाललं होतं, बुवा म्हणत होते "ऐन समयी रणांत, बाण मारिसी ताकांत".

लोकांना कळेना काय भानगड. मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून Blum 3

नंतर मग कळ्ळे, बुवा पार म्हंजे पारच गंडले होते. "ऐन समयी रणांत, बाण मारी सीताकांत" हा मूळ पाठ होता ROFL ROFL

क्र. २:

बुवांचे कीर्तन सुरू होते त्यात एका अभंगात करंटा असा शब्द आला. एकाने त्याचा अर्थ काय असे विचारले तर बुवा गडबडले पण अंगभूत चातुर्यामुळे सांगितले की "ईश्वरभक्तीमुळे शरीरात करंट मारतो त्याचे वर्णन आहे" म्हणून ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हॅप्पी बड्डे अर्जुनराव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छत्रपतींच्या आधीचे सर्व जन्मदिवस तिथीनुसार साजरे करावेत असा शासनाचा अध्यादेश असताना हा घोळ का बरे माजवला जात आहे? श्री अर्जुनराव इन्द्रसेन पाटील (पांडिल) हस्तिनापुरकर यांचा जन्म जून महिन्यातल्या चतुर्थीस झाला आहे. त्यातूनही 'मे महिन्यानंतरच्या चतुर्थीस' इतका स्पष्ट कालनिर्णय आपल्या पवित्र ग्रंथात असताना जनतेत असा संभ्रम माजवणे आणि अफवा पसरवणे सरकारला योग्य वाटत नाही. हा दंडनीय अपराध आहे याची नोंद संबंधितांनी घ्यावी. छत्रपतींशिवाय इतर कोणाचेही तीन-तीन जन्मदिवस साजरे केलेले याउप्पर खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देण्यात येत आहे. तिथीनिश्चितीसाठी कोणतीही समिती इतःपर नेमली जाणार नाही याचीही नोंद घ्यावी.
आदेशावरून,
पोलीस-कमिशनर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जून शुद्ध (अथवा शुक्ल) चतुर्थी, की जून वद्य (अथवा कृष्ण) चतुर्थी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाय द वे अर्जुनरावांच्या पुण्यतिथीबद्द्ल काही श्लोक आहे का महाभारतात ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी बालाजी तांबेंचा मोठा फॅन आहे... आज सकाळमधे,
.
मनोsर्थाव्यवभिचरणेन ! हा शब्द वाचला... माझ्या बुद्धीमत्तेप्रमाणे लावलेला अर्थ...
.
मनोबा अर्थव्यवहारासाठी व्याभिचार करतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

सिफ्र्याचे बाबाबुवा मोठेच दिलचस्प असतात, याची नोंद घेण्यात आलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गुरुजी : "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" , बंडू याचा अर्थ सांग .
बंडू : करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते ,तिला पाहताना मला काय फळ मिळेल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0