टुकार मीशिभोबोची प्रभातवारी

टुकार मीशिभोबोची प्रभातवारी

या लोकशाही उत्पत ( उद्धट हि चालेल) देशात पोटासाठी कोण काय करेल सांगता येणे 'लै म्हणजे लैच' अवघड आहे. कोण पोटासाठी काकडीच्या साली काढून काकडी बरोबर सालीही विकत, तर कोण त्या काकडीच्या सालापेक्षाही फालतू सिनेमे काढून लोकांच्या भावनेचे भांडवल करून स्वतःचे पोट भरत.

येथे आता या दुसऱ्या टुकारगिरी विषयी लाक्षणिक विवेचन होणार आहे. कोणाला पटेल न पटेल. पण "कुत्ता जाने, चमडा जाने" अश्या ( उदात्त!) हेतूने लिहायचा प्रयत्न आहे.

असो, तर घडले असे की, बऱ्याचं दिवसात 'चांगला' सिनेमा पहिला नाही असा सगळ्यांचा सूर निघाला. मग लोकांची मते घेऊन कुठल्यातरी सिनेमाला जाऊ असे ठरले.
मग कुठून माहीत नाही पण 'एक' नाव कळले. हा सिनेमा म्हणे तुफान चालला होता. थेटरच्या बाहेरून 'तुफान चाललाय' असे काही वाटले नाही. पण वाटले की आत पहिल्यांदा पिच्चर मधली माणसे एकमेकांना बेफाम बदडून काढत असावीत आणि नंतर तिकीट काढून अश्या टुकार पिच्चरला तुझ्यामुळे आलो म्हणून प्रेक्षक एकमेकांना बदडून काढत असावीत.
मी स्वतःच्या जबाबदारी वर आत गेलो आणि मित्राकडून बदडून घ्यायचाच बाकी राहिलो.

पिच्चर तर ठरला पण आता जायचे कुठल्या थेटरात? एक म्हणाला कोथरूड सिटीप्राईड ला जाऊ. पण म्हटले 'मीशिभोबो' बघण्यासाठी फारतर २० किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे ३० रुपडे ठीक आहेत. दीडशे रुपडे घालवायच्या लायकीचा पिच्चर तरी असतो का त्या 'मांजरीचा' ?
मग त्या दिवशी आमची उभ्या वीस वर्षात न झालेली 'प्रभात' वारी घडली.

एक मित्र पहिल्यापासूनच नाखूष होता. "कुठेही आणता मला तुम्ही" असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. आख्खे ३० रुपडे मोजून तो पहिल्यांदाच अश्या मराठी पिच्चर ला आला होता.

जसा पिच्चर सुरू झाला तसा एक टकला हीरो आला आणि मग जो येईल तो या टकल्याला घालून पाडून बोलू लागला. काही काळाने तो टकला वेडा झाला. नंतर एका IT पार्क मध्ये डांबरी रस्त्याने घोडे धावताना दिसले. काही काळ असाच फालतूपणा झाला आणि मग शेवटाला तो टकला पेटला आणि मग त्याने सगळ्यांना हाणला आणि "मला रिस्पेक्ट द्या" म्हणाला". असे अगम्य काही तरी होते. ( या सगळ्यामागचा दाखवायचा, समजवायचा आणि खरा मूळ मुद्दा वेगळाच होता. )

त्यातला 'दाखवायचा' जो हेतू होता त्याने चित्रपट गृहातील माणसे चार्ज झाली होती. सगळ्यांना स्वभाषा, स्वधर्म अशी गोष्टीचा ताप आला होता. मिनटा मिनिटाला मराठीच्या महानतेचा घाम फुटत होता. पण त्यातून 'समजण्याचा' व बोध घेण्याचा मुद्दा लक्षात घेण्याच्या परिस्थितीत कोणीही नव्हते.

तो टकला तेथे पेटला होता तर, माझ्या शेजारी माझा हा मित्र पण पेटला होता, पण दुसऱ्या मुद्द्यावर. तो मिनटा मिनटाला फ्रस्टेट होत होता. वास्तविक हा आमचा मित्र उत्तम कविता करतो, उत्तम वाद्ये वाजवतो, स्टेज शो हि करतो.जाहिरातींना आवाज देतो. आणि हे सगळे मराठीतच. त्यामुळे त्याचे मराठीवरचे प्रभुत्व वादातीत आहे. पण त्याला जो काही समोर भाषेचा बाजार मांडला होता तो बघवत नव्हता. बराच वेळ तो आमच्यातच कमेंट देत होता.

शेवटी एका प्रसंगात, सामान्य मराठी माणूस म्हणवणाऱ्या माणसाची मुलगी कॉलेजाच्या ग्यादरिंग मध्ये लावणी का आयटम सॉंग ( का सोंग) करायला लागली.
हा मध्येच उठून उभा राहिला आणि आम्हाला जोरजोरात ओरडायला लागला.
ती तिथे पेटली होती आणि हा इथे.
" कसल्या भंगार पिच्चर ला आणता रे मला तुम्ही?? आत्ताच्या आता माझे तीस रुपये परत द्या. फुकट तीस रुपये घालवले माझे वाया. त्यापेक्षा मी ते भिकाऱ्याला दिले असते. "

आम्ही ओढून त्याला खाली बसवला. त्याला म्हटले "शांत बस बाबा, लोकांना इथे मराठीचे स्फुरण चढलेय, हाणतील तुला इथेच!"
तो नाईलाजाने बसला.

नंतर पुढच्या प्रसंगात तीच नाचणारी मुलगी घरी कॉम्पुटरवर पडल्या पडल्या, एका कॉलेज ची वेबसाइट ह्याक करते म्हणे.
आता मला खरी मजा यायला लागली. माझा हाच मित्र 'एथिकल ह्याकिंग' शिकला असल्याने तो हे पाहून संपलाच. तो ताडकन उभा राहिला.
"च्यायला बापाची वेबसाइट आहे का घरबसल्या ह्याक करायला? काहीही दाखवतात का हे साले? अरे वेबसाइट ह्याक करायला इंटरनेट लागते का नाही हे तरी माहीत आहे का ह्यांना? सिम्पली रीडीक्युलस "
त्यानंतर तो पाच सहा टेक्निकल शब्द टाकून 'ह्याने हे होते का?" त्याला हे लागते का?" लोक बघतात म्हणून काहीही दाखवतात का हे लोक?" असे किंचाळू लागला. ते टेक्निकल शब्द ऐकून त्याच्या शेजारच्या माणसाने हातातल्या पुरचुंडी मधले सगळे पोपकोर्न पोटात ढकलले. (स्वतःच्या !)
तो थेटराबाहेर निघून गेला. आम्ही पिच्चर संपवून बाहेर गेलो तर गाडीवर बसला होता.

"तुम्ही सगळे मिळून माझे तीस रुपये परत द्या, नाहीतर जाऊ देणार नाही" असे म्हणत त्याने आमच्या गाड्याच पकडून ठेवल्या होत्या.

तो मी बघितलेला शेवटचा मराठी पिच्चर असावा .परत कधी ह्या मित्राच्या शिव्या ऐकायची हुक्की आली की त्याच पिच्चरच्या दिग्दर्शक म्हणविणाऱ्या माणसाचे इतर पिच्चर पाहायची ऑफर आम्ही त्याला देतो. आणि मग हजारो ऐकिवात नसलेले मराठीतील अवजड असे (अप)शब्द वायू वेगाने एका नंतर लगेच एक असे ऐकायला मिळतात.
खरंच, मराठी भाषा हि संपन्न भाषा आहे. हे तेव्हा आम्हाला स्मरते.

(तळ)टीप :
१. चांगला' सिनेमा : हि व्याख्या व्यक्तीसापेक्ष होऊ शकते.
२. लेखन ( वाचणाऱ्याला वाटले नाही तरी(ही)) विनोदी प्रकारातील आहे. येथे कोणत्याही चर्चा, अपमान व अभिमान अपेक्षित नाही.
३. टीप वरती का नाही लिहिली याचे उत्तर लेखकाकडे(ही) नाही.

सागर
इतर लेख अणि भटकंती : http://sagarshivade07.blogspot.in

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

जसा पिच्चर सुरू झाला तसा एक टकला हीरो आला आणि मग जो येईल तो या टकल्याला घालून पाडून बोलू लागला. काही काळाने तो टकला वेडा झाला. नंतर एका IT पार्क मध्ये डांबरी रस्त्याने घोडे धावताना दिसले. काही काळ असाच फालतूपणा झाला आणि मग शेवटाला तो टकला पेटला आणि मग त्याने सगळ्यांना हाणला आणि "मला रिस्पेक्ट द्या" म्हणाला". असे अगम्य काही तरी होते

बास बास! निवर्तलो इथेच!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हि पडून पडून हसल्याचे चिन्ह कसे आणता हो तुम्ही ? ते बघूनच हसायला येते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

उत्तर माझ्या प्रतिसादाच्या विषयात आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शिणेमाचे नाव सांगा की राव, आमीपण थोडी मज्जा करू!
लिहिलंय बाकी भारीच. मजा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी शि भो बो

ओळखा पाहू. टकला=कोकणस्थ वाला सचिन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जसा पिच्चर सुरू झाला तसा एक टकला हीरो आला आणि मग जो येईल तो या टकल्याला घालून पाडून बोलू लागला. काही काळाने तो टकला वेडा झाला. नंतर एका IT पार्क मध्ये डांबरी रस्त्याने घोडे धावताना दिसले. काही काळ असाच फालतूपणा झाला आणि मग शेवटाला तो टकला पेटला आणि मग त्याने सगळ्यांना हाणला आणि "मला रिस्पेक्ट द्या" म्हणाला"
सामान्य मराठी माणूस म्हणवणाऱ्या माणसाची मुलगी कॉलेजाच्या ग्यादरिंग मध्ये लावणी का आयटम सॉंग ( का सोंग) करायला लागली.
नंतर पुढच्या प्रसंगात तीच नाचणारी मुलगी घरी कॉम्पुटरवर पडल्या पडल्या, एका कॉलेज ची वेबसाइट ह्याक करते म्हणे.

ह्या एवढ्या स्टोरी वरूनही नाही कळला का कोणता पिच्चर ते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

होय होय, कळले कळले! बॅट्या, क्लूबद्दल धन्स बर्का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदी अगदी हेच माझं झालं होतं माझं हा चित्रपट पहिल्या नंतर... इतकं काही मराठी माणसांना कोणी घालून पाडून बोलत नाही बरं का... अर्थात दिग्दर्शकाला स्वतः तसा कधी अनुभव आला असेल तर तो मराठी माणसाचा नाही तर त्या दिग्दर्शकाचा 'वैयक्तिक' प्रश्न आहे त्यासाठी मराठी माणसावर अन्याय होतोय त्याचं असं चित्रं दाखवायची काही गरज नव्ह्ती (दिग्दर्शकाच्या स्वभावात तसाही 'माज' आहेच त्यामुळे त्याला असा अनुभव येणं साहाजिकच आहे आणि तो अनुभव मराठीच काय तर 'मराठी' माणसाकडूनही आलाच असेल.. त्यात फार आश्चर्य नाही)

सध्याची त्यांचीच झी-मराठी वरची 'मालिका' ....ती तर क(कि)ळस आहे ... (एक 'कपल' हनीमून ला गेलं आहे.. ते नाचतात, गातात त्याचं 'शूटींग'ही करतात इथपर्यंत ठीक आहे... अहो पण लगेच त्याच दिवशी ते कोणी असं आपल्या घरी पाठवेल का?.. आणि घरचेही लगेच ते शेजारच्यांना बोलवून दाखवतील का? कैच्याकै)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेजारच्यांना बोलवून दाखवतील का????
हे हे कहर असावी म्हणजे ती ( लोक आणि मालिका हि) Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

भारी लिहीलय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षक : "पिच्चर"

चांगला सिनेमा अशी बोंब मारून पब्लिक म्हणालं
सिनेमाला जाऊ हो सिनेमाला
पैशे वाचवू असा सूर काढून लेखक म्हणाला
प्रभातला जाऊ प्रभातला
नाराज होऊन मित्र म्हणाला
कुठेही आणता मला तुम्ही कुठेही

पेटून टकला हिरो म्हणाला
रिस्पेक्ट द्या हो रिस्पेक्ट
आयटम साँग पाहून मित्र म्हणाला
फुकट तीस रुपये घालवले फुकट तीस रुपये
खाली बसवून पब्लिक म्हणालं
मराठीचं स्फुरण चढलंय मराठीचं स्फुरण

ह्याकिंग पाहून मित्र म्हणाला
सिम्पली रीडीक्युलस च्यायला सिम्पली रीडीक्युलस
पाच सहा टेक्निकल शब्द टाकून मित्र म्हणाला
ह्याने हे होते का ह्याने हे
गाड्या पकडून मित्र म्हणाला
तीस रुपये परत द्या तीस रुपये

लेख वाचून एक वाचक म्हणाला
कसलं भारी लिवलंय कसलं भारी
लेख वाचून एक वाचक म्हणाला
मार्मिक श्रेणी द्या मार्मिक
लेख वाचून एक वाचक म्हणाला
पिच्चर देखता नहीं क्या मादरचोद देखता नहीं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Biggrin Biggrin
याची प्रेरणा (कोलटकरांची कविता) कुठे वाचायला मिळेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गंजा' अंकलची सर्वजण टर उडवतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यावरून लक्षात आले.

"टकल्याची अ‍ॅक्शन-पब्लिकला घाम" असे शीर्षक या पिच्चरला लागू पडेल.

प्रेरणा:

https://www.facebook.com/photo.php?fbid=479731752111150&set=a.1655845601...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"टकल्याची अ‍ॅक्शन-पब्लिकला घाम"
यातली 'पब्लिकला घाम' हे ठीक पण तो टकला 'अ‍ॅक्शन' पण नव्हता करत हो Smile
थोडा वेळ (डायरेक्टर ने सांगितल्यामुळे) लाचार झाला, मग वेडा झाला, मग भक्त झाला, मग भाई झाला आणि मग राजकारणी झाला.
आणि उरलेल्या वेळेत भिकार डायलॉग मारत बसला. बाकी सर्व प्रसंगात डायरेक्टर स्वतःच ( रात्रीची जरा जास्त(च) झाल्यासारखे डोळे करून आणि शेरवानी घालून समोरच हंटर घेऊन बसला होता ) Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

हाहाहा तेही खरंच म्हणा बाकी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin

टकला काय! एवढ्या वाईट शब्दात या पिच्चरची मापं काढलेली वाचली/ऐकली नव्हती. मज्जा आली. स्वतःच सूड उगवल्यासारखा आनंद मिळाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्वतःच सूड उगवल्यासारखा आनंद मिळाला.>>>>
तुमच्याही ह्याच भावना होत्या का पिच्चर बघताना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

थोड्या बहुत फरकाने अशाच.

मी थेट्रात जाऊन पाहिला नाही. कामासाठी नारायणगावच्या ऑफिसला गेले होते. तिथल्या टेक्निकल स्टाफशी कामाचं बोलून झाल्यावर त्यांनीच "नवा पिक्चर आणलाय. मराठी आहे. मॅडम तुम्ही येणार का बघायला?" असं विचारलं. मराठी पिक्चरकडून किती अपेक्षा ठेवायच्या, पण तिथे मराठी जनतेसमोर नाही म्हणणं कठीण गेलं. माझ्या बरोबरचे, प्रकारातले बाकीचे बहुतेकसे लोक अमराठी किंवा अभारतीयच.

मग पिक्चर पहाताना झोप काढणं, लोकांचे चेहेरे पहाणं, शिवसेना-मनसेला पब्लिकचा पाठिंबा कसा मिळतो याचं निरीक्षण-विचार करणं यात वेळ घालवला. 'शिवाजी'ची एंट्री झाली तेव्हा अगदीच रहावलं नाही. "हा ड्रग अ‍ॅडीक्ट सोडून इतर कोणी मिळालं नाही का?" असं मोठ्याने बोलले. मग तिथून सटकण्याची संधी मिळाली, ती सोडली नाही. या लोकांनी माझं मत नंतर विचारलं नाही ते बरंच झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या मीशिभोबो चा पुढचा भाग कोस्थ आणी त्याचा पुढचा भाग देशस्थ नंतर सारस्वस्थ चालुद्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाईट्ट सोललाय मी शिवाजीराजे भोसले बोल्तोय ला.
२०१३च्याच दिवाळी अंकात मराठी पिच्चर प्रगल्भ वगैरे बद्दल लेख आलाय.
हा त्याची पुरवणी म्हणून जोडावा इतका उच्च आहे.
फार एण्ड वगैरेंची परिक्षणं आवडतात. पण त्यांनी जुन्या, आणि सर्वच अंगांनी भिकार पिच्चरला सोललाय.
तुम्ही म्हणजे मिपावर एकदा कोअलबेरनं जोधा कबर ला फोडलंण होतं, किंवा भडकमकर मास्तरांचं DDLJ वाचून हहपुवा झाल्तं; अगदि त्या स्टाइलचं लिहिलत.
हिट्ट पिच्चरला फोडाणं सोप्प नसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars