'चांदण्यांचा रस्ता 'आणि 'अमलताश'

'चांदण्यांचा रस्ता 'आणि 'अमलताश' ही दोन्ही पुस्तके फार अपेक्षेने घेतली गेली पण अपेक्षाभंग झाला . चांदण्यांचा रस्ता हे ललित लिखाण आहे . लंपन च्या अपेक्षेने आपण ते वाचयला घेतो इथेच चूक होते . सगळेच लेख थोडे वर वरचे वाटतात . काही एकदम त्रोटक वाटतात . लंपन ची संवेदनशीलता , इंटेसिटी , लोभसपणा इथे सापडत नाही . प्रकाश संतांची सुंदर सुंदर चित्रं आणि मुखपृष्ठ हे मात्र नक्कीच जपून ठेवावे असे आहे .

'अमलताश' हे प्रांजळ लिखाण आहे . लेखकांच्या पत्नीचे आत्मवृत्त नेहमीच फार चौकस नजरेने पाहिले जाते . इथे तर चक्क लंपनची सुमी लिहणार म्हणल्यावर जरा जास्तीच उत्सुक होऊन वाचायला घेतले . प्रकाश संतांसारखी समजूतदार , सुरेख, रसिक सोबत असल्यावर कुणाचं आयुष्य कसं फुलून आलं असेल अशी अपेक्षा असते . वास्तवात खुद्द स्वतःचे आणि प्रकाश संतांचे अतिशय शारिरीक आजारांनी आणि मानसिक ताण तणावांनी भरलेलं आयुष्य बघून वाईट वाटतं . इंदिरा संतासारखी संवेदनशील कवी असलेली स्त्रीही सासू म्हणून डॉक्टर सुनेला काम करायला पाठिंबा देऊ शकत नाही हे बघून आश्चर्य वाटते .
लंपनचा शोध , त्याचा प्रवास कसा चालू झाला आणि तब्बल तीस वर्षांच्या विश्रांतीनंतर परत कसा सापडला याचे कुतूहल फार होते . ते शमते . इतकी शारिरीक आजारपणं सोसून इतकं ताजं तवानं , संवेदनशील , तरल लिखाण कसं करू शकतो माणूस . शेवटी श्री . पु. भागवतांचं वाक्य लक्षात राहण्यासारखे वाटते ''प्रतिभा ही स्वतःच्या आनंदाने भरलेली असते . तिला कोणताही नियम नसतो . ती कुणाच्या हुकुमावर चालत नाही की थांबतही नाही '' . http://www.flipkart.com/chandanyacha-rasta-marathi/p/itmdh39yhrne98jn?pi...
http://www.flipkart.com/amaltash-1st-edi-marathi/p/itmdh34c4wrkxvrq?pid=...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अमलताश बद्दल उत्सुकता वाढली आहे.
परिचयाबद्दल आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एका व्यापारी संकेतस्थळाची जाहीरात केल्याबद्दल निषेध.
बाकी पुस्तक परिचय जास्त विस्ताराने हवा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

कुठल्याशा प्रस्तावनेत स्वतः संतांनी लेखनाच्या दुष्काळाबाबत लिहिलं आहे. प्रत्येक लेखकाच्या आयुष्यात थोड्याफार काळासाठी Writer's block येतच असावा. हा कृष्णकाळ अनेक वर्षं चालल्याची उदाहरणंही आहेत. सहज आठवणारं म्हणजे To kill a Mockingbird लिहिणारी हार्पर ली. तिने उर्वरित आयुष्यात एकही पुस्तक लिहिलं नाही म्हणे.

असो. पण अमलताश वाचणं आलं. परिचयाबद्दल धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

माफ करा.. पण मी म्हणेन चांदण्यचा रस्ता लंपनच्या दृष्टिकोनातुन वाचाल तर ते पुस्तक इतके खास वगैरे काही वाटणारच नाही... संतांच्या इतर कोणत्याही पुस्तकाइतकेच मला हे ही आवडले फक्त हे लंपन मधुन बाहेर येउन वाचले...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

manaamanasi.wordpress.com

परिचय आवडला. अशाच चांगल्या पुस्तकांच्या समीक्षा अजून लिहीत जा. मात्र अधिक विस्ताराने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक अजिबातच आवडले नाही.
असामान्यांच्या सामान्य गोष्टी ह्या स्वरूपाचे वाटले. content कमी असला, तर लेखनशैली मजबूत हवी- पण तेही दुर्दैवाने तिथेही इल्ला !पुस्तकातील माणसांचे, घटनाक्रमांचे उल्लेख अनेकदा संदर्भहीन म्हणावेत तसे आले आहेत. सपशेल निराशा - २०१४ मधील सर्वात नावडते पुस्तक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0