(जंगलातला) आजोबा !!

सुजय ढाके हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'!

आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे.

आजोबाला बघा आणि अनुभवा !!

'आजोबा' हे कसले बिबट्याचे नाव..पण हाच बिबट्या वाघ महाराष्ट्राच्या जंगलचा राजा होता. जसा राजा आपल्या प्रजेपासून अंतर ठेवून राहतो तसा तो ऐटीत जंगलात राज्य करायचा पण नंतर हीच प्रजा मारुतीच्या शेपटी सारखी वाढत गेली आणि राजाचे राज्य कमी होऊ लागले. मग या महाराष्ट्राच्या जंगलात फारीस्टची लोकं (वळू!), लाकूड व्यापारी इ. असे स्वघोषित राजे राज्य करायला लागले. पहिल्यांदा या राजाचा रुबाब गेला नंतर राज्य गेले. नंतर तर त्याला खायची प्यायची ददात पडायला लागली.

मग त्याचा राजाचा याच फारीस्ट लोकांनी आजोबा करून टाकला. 'आजोबा करणे' म्हणजे स्वतःहून एखाद्याला व्ही.आर.एस. देऊन टाकणे. त्याचे फक्त अस्तिव ठेवायचे पण त्याच्या मताला किंमत शून्य ! त्याला कुठल्या जंगलात राहायचे, त्याने काय खायचे, कुठे जायचे अश्या प्रश्नांची उत्तरे फक्त फारीस्टची लोकं त्यांच्या डोक्याने देणार आणि सरकारी भाषेत आमलात आणणार.

जंगलातील हरणे-काळवीटे सलमान खान सारख्या बड्या लोकांची भक्ष झाल्यामुळे बिबट्याला गावात येउन कुत्री, कोंबड्या, किंव्हा बकऱ्या यावर आपली भूक भागवावी लागत आहे. भूकेपाई बिबटे गावात शिरतात आणि कुत्री, कोंबड्या पळवतात, खर तर म्हणता हे खूप धाडसाचे काम आहे, पट्टेरी वाघ पण गावात शिरताना दोन वेळा विचार करतो. पण बिबट्या हा चतुर आणि धाडसी असल्यामुळे त्यालाच हे जमू शकते.

अश्याच एका भक्षाच्या शोधात बिबट्या २००९ च्या एप्रिल महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर या गावात आला आणि बिचारा विहरीत पडला. पण हाच बिचारा बिबट्या नंतर मोठा इतिहास घडवणार होता. त्या बिबट्याच्या नशिबाने त्याला विद्या अथ्रेया भेटली.(फुल जोशी -शिरोडकर लव्ह स्टोरी ;)).

विद्या (बिद्या नाही विद्या !!) अथ्रेया ही बिबट्याबरोबर राहून बिबट्यांचे प्रश्न सोडवणारी एक पर्यावरणतज्ञ. अन्नाच्या शोधात बिबटे- जुन्नरची उसाची शेते, ठाण्याची
टीकोजीनी वाडी, पवईची याय.याय.टी आणि शेवटी कोथरूड पर्यंत सगळी कडे फिरतात आणि मग त्यांचा या मानवजाती बरोबर संघर्ष सुरु होतो. याच निवासस्थानावरून होणाऱ्या संघर्षाचा २००३ पासून विद्या अथ्रेया अक्षरशः जंगलात फिरून अभ्यास करत आहे. तिच्या कामाचे नाव म्हणजे प्रोजेक्ट वाघोबा !!

विहारीतला बिबट्या खूप शांत असल्यामुळे त्याचे नामकरण झाले ते: " आजोबा ". या आजोबाच्या गळ्यात रेडीओ पट्टा टाकला आणि पायामध्ये मायक्रो चकती (क्रमांक:00006CBD68F)टाकली. हा रेडीओ पट्टा बिबट्या जिकडे जाईल त्याच्या संदेश उपग्रहाला पाठवत असतो, त्यामुळे तो कुठे आहे याचा साधरण पणे अंदाज लावता येतो. थोडक्यात गाडीचे जि.पी.एस. काम करते त्याच पद्धतीने हे काम करते पण जास्त क्षमता असल्यामुळे जंगलातून, डोंगर-दऱ्यातून पण संदेश पाठवू शकते.

१ मे, २००९ ला 'आजोबाला' माळशेज घाटात सोडून देण्यात आले. विद्या अथ्रेया चा कयास होता की हा बिबट्या, अहमदनगरच्या आजूबाजूला फिरेल, जास्तीत जास्त जुन्नर ला जाईल, आणि आपण त्याचा अभ्यास करू शकू. पण 'आजोबा' हा सगळ्यांचा आजोबा होता हे ती विसरली. १ ते ७ मे पर्यंत त्याने माळशेज च्या घाटात टंगळमंगळ केली आणि मग तो सुटला. १५ मे ते २२ मे च्या दरम्यान त्याने बेक्कार रहदारीचा मुंबई-आग्रा महामार्ग (NH४)ओलांडला आणि तो डहाणू जिल्ह्यामध्ये 'वाडा' गावात पोहचला. त्यानंतर आजोबा वसई औद्योगिक वसाहतीच्या जवळून गेला तरी त्या खूप लोकसंख्येच्या प्रदेशात पण कोणाला त्याने त्रास दिला नाही. आजोबाला शोधताना खूप वेळा रेडिओ संदेश नाहीसा होत होता, तरी त्या वरून विद्या अथ्रेयाने अंदाज लावत लावत आजोबाचा पाठलाग चालू ठेवला. त्यानंतर आजोबाला खूप मानवी वस्तीच्या प्रदेशातून जावे लागले तरी तो आपला मार्ग अनुभवी आणि शांतपणे कापत होता. मे २२ ते २९ मध्ये आजोबा ठाणे जिल्ह्यातील शिरसाड गावात दिसला आणि नंतर मग त्याचा माग भिवंडी मध्ये लागला. तुंगारेश्वर-अभय जंगलातून शेवटी त्याने संजय गांधी उद्यानाच्या नागला- जंगलात प्रवेश केला. आजोबा खूप चतुर होता, कुठल्याही प्ररीस्थितीत तो माणसांच्या संपर्कात आला नाही,त्याने लपून छपून- शांतपणे हा १२० किलोमीटर चा प्रवास केला. नंतर त्याने कमालच केली, वसईची खाडी पोहून, आजोबा बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानाच्या मुख्य जंगलात शिरला.

वरती दिलेला नकाशा बघाल तर समजेल की आजोबाचा प्रवास काय भन्नाट होता ते. विद्या अथ्रेया ने अनुमान काढले की 'संजय गांधी उद्यान' हे आजोबाचे मूळ वसतीस्थान असेल आणि फारीस्ट लोकांनी त्याला त्याच्या लहानपणी माळशेज जवळ सोडून दिले असेल. संजय गांधी उद्यानाच्या चारही बाजूने कॉंक्रीट चे जंगल वाढत आहे म्हणून तिथल्या काही प्राण्यांची दुसऱ्या जंगलात सोय(निर्वासित छावणीत !) केली जाते. हा मूळ-निवासस्थानाचा खडतर प्रवास आजोबाने कसा केला हे एक मोठं कोडे आहे.

१ मे ते जुलै १७ पर्यंत विद्या अथ्रेया आजोबाचा माग ठेवत होती पण नंतर जुलै च्या शेवटच्या आठवड्यात, आपल्या आजोबाचा संजय गांधी उद्यानाच्या बाजूने जाणाऱ्या महामार्गावर ट्रकखाली दुखःद शेवट झाला.

काय दिले या आजोबाने ? त्याचा हा फक्त १२० किमी चा प्रवास नव्हता तर तो 'आम्हाला पण जगू द्या- आम्हाला आमचे जंगल परत द्या- आम्हाला निर्वासित करू नका' असा आक्रोश होता.

मी कात्रजच्या वन्यजीव अनाथालयात कार्यकर्ता असतना असाच एक जुन्नर चा बिबट्या उपचारासाठी आणला होता. त्याच्या डोळ्यातले भाव बघून मला ग्याडीयेटर मधला रसेल क्रो आठवला. तो भाव अनेक लोकांच्या मते हिंस्त्र असेल पण माझ्यासाठी 'स्वतः ची चूक नसताना कुठल्यातरी लोकांच्या स्वार्थासाठी कैदेत टाकलेल्या' शूर राजाची आठवण करून देणारा होता.

आजोबा हा सिनेमा कसा असेल मला माहित नाही. पण मला वाटते की त्यानिमित्ताने 'लोणावळा -खंडाला- महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण ' आणि बिबट्याला फक्त हिंस्त्र जनावर मानणाऱ्या लोकांना थोडी खऱ्या बिबट्याची ओळख होईल.

म्हणूनच फक्त उर्मिलासाठी 'आजोबा' हा सिनेमा बघू नका.( रंगीला, दौड बघा ..!!)

'आजोबा' फक्त हा शूर आणि समंजस बिबट्यासाठी बघा. त्याची जगण्याची धडपड बघा. त्या आजोबाचा मूक आक्रोश विसरू नका.

या निसर्गाने आपल्याला काय दिले आणि आपण त्याचे काय करणार आहोत याची नेहमी जाण ठेवा.

field_vote: 
4.142855
Your rating: None Average: 4.1 (7 votes)

प्रतिक्रिया

विषय आवडीचा असल्याने लेख आवडला
'आम्हाला पण जगू द्या- आम्हाला आमचे जंगल परत द्या- आम्हाला निर्वासित करू नका' असा आक्रोश होता.
हे सगळे आता 'क्लिशे' झाले आहे. पण प्रश्न बदलत नाहीत तोवर उत्तरे कशी बदलणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख छान आहे.

पण मला वाटते की त्यानिमित्ताने 'लोणावळा -खंडाला- महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण ' आणि बिबट्याला फक्त हिंस्त्र जनावर मानणाऱ्या लोकांना थोडी खऱ्या बिबट्याची ओळख होईल.

याची खरच गरज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओळख आवडली.
या चित्रपटाविषयी उत्सुकता आहेच प्रोमो पाहिल्यापासुन. पण 'शाळा'च्या बाबतीत भ्रमनिरास झाला तसे इथेही होउ नये असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, तुमचे बरोबर आहे. फक्त ट्रेलर चांगला आहे म्हणून पूर्ण सिनेमा चांगला असेल याची अटकळ बांधता येणार नाही. पण मी लिहिले आहे तसे, बिबट्या बद्दल थोडे जरी लोकांना समजले तरी 'आजोबा' सिनेमा सार्थकी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त माहितीपूर्ण लेख. जरूर बघणार .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुई

सिनेमा पेक्षा प्रोजेक्ट वाघोबावर तासभराचा माहितीपट असेल तर बघायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख माहितीपुर्ण, पण सुजयचे आडनाव डहाके असे आहे, ढाके नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद् !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपुर्ण लेख आणी प्रोजेक्ट वाघोबा च्या लिंक बद्दल जॅकडॅनियल्स धन्यवाद,
जरुर पाहणार "आ़जोबा".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नि३सोलापुरकर

सुरेख लेख. अश्या प्रोजेक्ट वर काम करणारे (विद्या) आणि त्या कामावर प्रकाश टाकणारे (तुम्ही) दोघेह ग्रेटच !
त्याच्या डोळ्यातले भाव बघून मला ग्याडीयेटर मधला रसेल क्रो आठवला. तो भाव अनेक लोकांच्या मते हिंस्त्र असेल पण माझ्यासाठी 'स्वतः ची चूक नसताना कुठल्यातरी लोकांच्या स्वार्थासाठी कैदेत टाकलेल्या' शूर राजाची आठवण करून देणारा होता.>>>
एकदम योग्य उदाहरण दिलेत तुम्ही. या उदाहरणाने त्याच्या डोळ्यातले भाव काय असतील हे जाणवलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

चित्रपटाचा विषय आवडला आणि चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

मुंबईत, वस्तीत बिबट्या सापडला अशा बातम्या अलिकडच्या काळात येतात त्यात मटाच्या बातम्यांमधे अनेकदा विद्याचं नावही दिसतं. तिच्या कामाबद्दल आधीपासून माहिती असल्यामुळे अधिक उत्सुकता आहे.

(एक थोडं छिद्रान्वेषणः अथ्रेया नाही, तिचं आडनाव अत्रेय आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धनयवाद !

vidya athreya असे दिसत असल्यामुळे मी विद्या अथ्रेया लिहिले. माझे चुकले !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाईल्डलाईफ बायोलॉजिस्ट, कॉनझरवेशनिस्ट काम म्हणजे नेमकं काय काय करतात आणि ते कसं वगैरे कळण्याची या चित्रपटाकडून थोडी अपे़क्षा आहे.
'एका रानवेड्याची शोधयात्रा' या कृष्णमेघ कुंटेंच्या पुस्तकातून अशा कामात असलेली जोखीम वगैरेची कल्पना आली होती.

(अवांतर : इटालियन्स सोबत सह्ज कधीतरी विषय निघाला तेव्हा जेव्हा मी म्हटलं की भारतात अजून 'जंगली'('मुक्त' याही अर्थाने) हत्ती, बिबटे, वाघ वगैरे आहेत त्यावेळी त्यांचा विश्वासच बसेना. एका संरक्षित क्षेत्रात आपल्याकडे जंगली प्राणी वगैरे असतात अशी काहीतरी कल्पना होती त्यांची. म्हणजे बंगलोर-ऊटी प्रवासात हायवेवर जंगली हत्ती येतात, मुंबईच्या शहरी भागातही बिबटे येऊ शकतात हे त्यांना फारच धक्कादायक वाटलं. आणि त्यांना तसं वाटलं याचं मला आश्चर्य वाटलं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक ओळख.. चित्रपटाची ओळ्ख करण्याची शैली वेगळी आहे.. आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

२००९ मध्ये वृत्तपत्रांतील बातम्यांत या बिबट्याच्या प्रवासाबद्दल वाचले होते, इतके सविस्तर प्रथमच वाचावयास मिळाले. चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- श्रीरंग जोशी