'बंबसूत्र भाष्य': प्रस्थापित भाषा व ज्ञान बंबात घालणारा ग्रंथ

'जिज्ञासा' म्हणजे जिनगानीचा सा. प. पू. गुरुवर्य ऊसमहाराज काकवे यांनी गाळीव कृतीतून लिहिलेल्या बंबसूत्र भाष्य (बंबसूत्र - भावोन्माद - दुर्बोधचंद्रिका - लवणरस -पाश्चात्यमधुशालासहित) या ग्रंथाचे प्रकाशन आज रोजी दि. १९/६/२०१३ ला सायंकाळी ११ वाजता लातूर येथील संध्यानंद कॉलेज मागील मदिरालयात संपन्न होत आहे. या निमित्ताने या दुर्मिळातल्या दुर्मिळ वाचकवर्ग असलेल्या ग्रंथाच्या रूपातून अजाण वाचकांची, झोपलेल्या श्रोत्यांची, रिकामटेकड्या अभ्यासकांची, उटपटांग साधकांची, 'बंबरूपसाधनाने दादाजी कोंडके यांजप्रमाणे बेंबाट्याचा साक्षात्कार व्हावा', ही जिज्ञासा नक्कीच तृप्त होणार आहे. महाराज लिहितात, 'जिज्ञासा' या शब्दातील 'जि' म्हणजे विच्छा, तिला साक्षात्कारापर्यंत लागलेली ढास हे कर्म होय. कारण विच्छा ही नेहमी छपरीपलंगाची अपेक्षा धरते. विच्छेचे जे फल, तेच त्या विच्छेचे कर्म होय. महाराज म्हणतात, अज्ञानाची इच्छा आणि त्यातून झालेला साक्षात्कार म्हणजेच अज्ञान. हेच फल या ठिकाणी असल्यामुळे अज्ञान हेच कर्म होय. कारण हातभट्टी लागताना बंबाचा साक्षात्कार हाच पुरुषार्थ. आणि हा पुरुषार्थ एवढय़ाच करिता की, याच्याच योगाने सकल संसाररूपी गळवाची बी जी 'बंबविद्या', तिचा व तिच्यामुळे होणार्‍या सार्‍या अनर्थाचा बलात्कार होतो. जे बंबज्ञानाने अगड म्हणजे उघडे होते ते बहुधा एखादा 'महाराज' असते. म्हणजेच संसार व त्याचे बीज अज्ञान, हे बंबज्ञानाने अनावृत होतात. 'बंबसूत्र भाष्य' हा ग्रंथ, आपली जिज्ञासा जागृत करतो आणि तृप्तही करतो. दि. २९/७/२०१० रोजी शके १९३२, शनिवार मिती माहे आषाढ कृष्ण तृतीया, पहाटे १ वाजून ४0 मिनिटांनी जड डोळ्यांनी गुरुवर्य साखरे महाराज यांनी या पवित्र ग्रंथाच्या लेखनकामासाठी नकळत प्रारंभ केला आणि शनिवार मिती माहे पंचमी - आश्‍विन कृष्ण - पंचमी, दिनांक २८ ऑक्टोबर २०१० या दिवशी अचानक रात्रौ १२ वाजून ३५ मिनिटे यावेळी तिसर्‍या आचमनांनंतर तो लिहून शिद्ध केला. दोन्ही दिवशी शनिवार होता आणि सोडा संपला होता. हा योगायोग! पृष्ठ उघडताच आपल्याला निद्रादेवीचे विशाल सर्वांगसुंदर असे दर्शन घडते आणि ग्रंथ अवलोकन करून नशिबाने मध्ये झोप लागली नाही तर मिटतानादेखील पुनश्‍च एकवार निद्रादेवीचेच दर्शन होते. हा देखील योगायोग म्हणता येईल. दुर्योधन प्रकाशन, बाधकाश्रम, आळंदी(चोराची) यांनी प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे निर्मितीमूल्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे किंवा त्याहून अधिक आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. (कारण साहित्यमूल्य शून्याच्या जवळपास जाणारे आहे.) प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हा ग्रंथ असणे ही बाब प्रकाशकांसाठी नक्कीच लाभस्पद ठरेल. ग्रंथगौडबंगाल श्री बाबामहाराज तंतरकर सत्संग मंडळ, शाखा भिवंडी (मधली आळी) यांनी म्हटल्याप्रमाणे लेखक गुरुवर्य काकवे महाराज यांनी प्रचंड परिश्रम घेऊन हा ग्रंथ सिद्ध केला आहे आणि त्याची प्रचीती या ग्रंथाच्या नुसत्या फोटोकडे पाहताक्षणीसुद्धा आपल्याला येते. तब्बल १९२८ पृष्ठांचा हा ग्रंथ असून वेद, उपनिषदे, शास्त्रे, पुराणे, श्रूति, ज्ञानेश्‍वरी, तुकारामाची गाथा, निळोबारायांचे अभंग, कबिराचे दोहे, शांता शेळकेंच्या कविता, ह मो मराठे यांचे स्फुट, दादा कोंडकेंचे विनोद आणि रॉबिन शर्माचे समग्र साहित्य, या ग्रंथात कशाचा विचार झालेला नाही वा काय काय नाही, याच्यावरदेखील विचार केला तरी मती धुंद होते, डोके गरगरू लागते आणि दुसर्‍या दिवशी कडक ह्यांगओव्हर बसतो.

ब्रह्म म्हणजे बंब होय आणि बंब म्हणजे किक होय. प्रत्येक प्राणिमात्राला 'मी आहे' पण 'बंब नाही', दात आहेत पण चणे नाहीत, टमरेल आहे पण पाणी नाही अशा रूपाने ज्ञान आहेच. परंतु प्रत्येक मदिरेप्रमाणे त्याच्या विशेष स्वरुपाविषयी फार मतभेद आहेत. 'किक आहे' असा अनुभव जरी सर्वांना आहे तरी ही 'किक' म्हणजे कोण? का देह, की इंद्रिये, का मन किंवा दुसरेच काही? हे मात्र माणसाला समजत नाही. याकरिताच मनुष्याच्या मनात 'टाईट व्हावे, गटारी लोळावे' असे जर असेल तर त्याला खरी किक कोण व त्याचे ज्ञान कसे होते, ते समजले पाहिजे. म्हणून त्यासाठीच, सकल मानवजातीच्या कल्याणाचा विचार करून काकवे महाराजांनी हा ग्रंथ लिहिला आहे. लेखकांनीच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे सुमारे अर्धशतक इतका म्हणजे सतत पन्नास वर्षे दिवसरात्र करीत असलेल्या विचारांचेच हे मंथन आहे. काकवे महाराज नम्रपणे लिहितात, संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग उक्ती समोर ठेवून,

पुरविले पेगि ।
जि जि प्याली ती ती काळी ।।१।।
झिंग तरी ऐसी सांगा ।
खुब झाला काल दंगा ।।धृ।।
न मिळे मुतरी ।
भडाभडा भिंतीवरी ।।२।।
'काका' म्हणे मधुपिपास ।
मुखी लावी बंबरस ।।३।।

सर्व श्रेय त्या बंबाचेच, असे महाराज म्हणतात. ह.भ.प. तसेच खवळलेले पित्त गुरु भक्त मा. अँड़. एन. डी. ए. आघाडिवीर (खिल्लारीकर) यांनी गुरूंच्या स्मरणार्थ या ग्रंथाच्या प्रकाशनार्थ सहाय्य केले याचा उल्लेख लेखकांनी केला आहे. हा अनमोल ग्रंथ प्रत्येक मराठी माणसाने विकत घेऊन वाचावा आणि बंबात घालण्याजोगे अतीव ज्ञान प्राप्त करावे. 'मुखशुद्धी' म्हणजे काय, एवढे तरी समजून घेण्यासाठी हा ग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असलाच पाहिजे. म्हणजे प्रत्येक फेरीनंतर रित्या होत गेलेल्या मदिरेच्या पिंपाप्रमाणेच असल्या अवजड ग्रंथाग्रंथाने भरत चाललेल्या मराठी भाषेच्या अभिजाततेची चिंता करण्याचे कारणही किक उतरण्याआधीच नष्ट होईल.

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

दोन्ही दिवशी शनिवार होता आणि सोडा संपला होता. हा योगायोग... मिटतानादेखील पुनश्‍च एकवार निद्रादेवीचेच दर्शन होते. हा देखील योगायोग म्हणता येईल.

_/\_

प्रत्येक प्राणिमात्राला 'मी आहे' पण 'बंब नाही', दात आहेत पण चणे नाहीत, टमरेल आहे पण पाणी नाही अशा रूपाने ज्ञान आहेच.

खतरनाक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली !

राजेश घासकडवी, विक्षिप्तबाई, फार एन्ड, उसंत सखू, किंबहुना सर्वसुखी आणि त्यांच्या दंगा गँगमधे एक नवा चेहरा. ऐसी अक्षरे वर मनःपूर्वक स्वागत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

प्रत्येक प्राणिमात्राला 'मी आहे' पण 'बंब नाही', दात आहेत पण चणे नाहीत, टमरेल आहे पण पाणी नाही अशा रूपाने ज्ञान आहेच. परंतु

हाहाहा ROFL मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा..वा..भव्य आगमन !! Smile जोरदार!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

<'जि' म्हणजे विच्छा, तिला साक्षात्कारापर्यंत लागलेली ढास हे कर्म होय. > ROFL ROFL
< पृष्ठ उघडताच आपल्याला निद्रादेवीचे विशाल सर्वांगसुंदर असे दर्शन घडते> Smile
लैच मद्ध्यात्मिक वाटु लागलय राव ! :~

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दि. २९/७/२०१० रोजी शके १९३२, शनिवार मिती माहे आषाढ कृष्ण तृतीया, पहाटे १ वाजून ४0 मिनिटांनी जड डोळ्यांनी गुरुवर्य साखरे महाराज यांनी या पवित्र ग्रंथाच्या लेखनकामासाठी नकळत प्रारंभ केला आणि शनिवार मिती माहे पंचमी - आश्‍विन कृष्ण - पंचमी, दिनांक २८ ऑक्टोबर २०१० या दिवशी अचानक रात्रौ १२ वाजून ३५ मिनिटे यावेळी तिसर्‍या आचमनांनंतर तो लिहून शिद्ध केला."
म्हन्जे श्रावण आणि चातुर्मासातही आचमने आणि रसपान चालू होते असे दिसते .. शिव शिव ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

हा हा हा ROFL
हा अर्धविराम फारच हसवणारा आहे.. Smile

ऐसीवर स्वागत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अर्धविरामाचे स्वागत. आता लेखनातून अर्धविराम किंवा पूर्णविराम आजिबात घेऊ नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निरूपणाच्या भाषेचा बाज फारच सुंदर आलेला आहे.

काही जबरदस्त वाक्यं इतरांनी उद्धृत केलेली आहेतच, पण

प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हा ग्रंथ असणे ही बाब प्रकाशकांसाठी नक्कीच लाभस्पद ठरेल.

वगैरे काही तरल विनोदही छान जमले आहेत. बंबसूत्राची गाथा, आणि इतरही लेखन मनमुराद येऊ द्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... वेद, उपनिषदे, शास्त्रे, पुराणे, श्रूति, ज्ञानेश्‍वरी, तुकारामाची गाथा, निळोबारायांचे अभंग, कबिराचे दोहे, शांता शेळकेंच्या कविता, ह मो मराठे यांचे स्फुट, दादा कोंडकेंचे विनोद आणि रॉबिन शर्माचे समग्र साहित्य...

हे सगळे एकाच वाक्यात! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.