मुलॉं रूज

'मुलॉं रूज ' हे हेन्री तुलूस लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावर आधारित पुस्तक वाचले . जयंत गुणे यांनी पिअर ल मूर यांच्या मूळ कादंबरीचा अनुवाद केला आहे.

हेन्री तुलूस लोत्रेक या चित्रकाराचे आयुष्य बऱ्याच चित्रकारां प्रमाणे वेदनांनी भरलेले . विन्सेंट व्हान गॉघ ची हटकून आठवण होते आणि विन्सेंट इथे हेन्री चा मित्र या रुपात भेटतोही . हेन्रीच्या बाबतीत बऱ्याच वेदना या नशिबाने दिलेल्या . बालपणीच झालेला दुर्धर आजार . शरीराचा पायापासून खालचा भाग न वाढणे , लहानपणी अनेक वर्ष आलेला पांगळेपणा , असह्य वेदना , खुजेपणा , आयुष्यभरासाठी व्यंगामुळे आलेली कुरूपता , हा सर्व भाग वाचताना वाईट वाटते . या वेदनांच्या पोटी असलेली प्रतिभा , चित्रकलेची देणगी , सृजनशक्ती यांचे दर्शन इथे होतेच .

हेन्री उमराव घराण्यात जन्माला आल्यामुळे सामान्य चित्रकारांना भोगावा लागलेला गरिबी, कलेसाठी उपासमारीचा त्रास त्याच्या नशिबी आला नाही .
परंतु बरेचदा होते तसे कलाकाराच्या कला गुणांची किंमत आईवडिलांना, घरच्यांना नसण्याची वेदना नशिबी आहेच . तसेच नैसर्गिक कलेची उर्मी दाबून त्या काळाप्रमाणे घोटून घोटून निर्जीव् केलेल्या चित्र कलेचे शिक्षण घ्यावे लागते. अनेक वर्ष त्यात घालवल्यावर स्वतःचा सूर सापडल्यानंतर मात्र हेन्रीने मागे वळून पहिले नाही .

मुलॉं रूज या हॉटेल च्या पोस्टर ने हेन्री प्रथम पॅरिस च्या कला विश्वात जम बसवला . त्याने भरपूर काम केले . पैशाची आच नसल्याने भरपूर काम तसेच वाटून टाकले . पॅरिस चे रंगीबेरंगी जग आतून बाहेरून इथे दिसते .पॅरिसच्या वेश्या आणि वेश्यागृह , दारूचे गुत्ते , सर्कशी आणि डान्सबार हेन्री च्या माध्यमातून चित्रकलेत अमर झाले . या रंगीन पॅरिसची कुरूप , काळी बाजू मारी शार्लेट या व्यक्तिरेखेने अजून स्पष्ट होते .

हेन्री आयुष्यभर स्त्री च्या प्रेमासाठी तडफडत राहिला . व्यंग आणि कुरूपता या मुळे वेश्याही साथ द्यायला तयार नाही या कटू सत्याचे पचन हेन्री ने आयुष्यभर जबरदस्त मद्यपानाने केले आणि मध्यम वयातच मृत्यूने त्याची सुटका केली . मागे राहिली त्याची चित्रं आणि उशिरा मिळालेले सन्मान .

काही त्रुटी सोडल्यास कादंबरी वाचनीय आहेच . अनुवाद करणे हे नेहमीच कठीण काम . एका भाषेतला आत्मा दुसऱ्या भाषेत आणणे हे स्वतःच्या भाषेत लिह्ण्यापेक्षाही कधी कधी कठीण होऊन जाते . इथे मध्ये मध्ये फ्रेंच भाषेत येणारे संवाद विचित्र वाटतात . तसेच मारीचे गावठी मराठीमध्ये असलेले संभाषण विचित्र वाटते . तसेच पेंटिंगचे उल्लेख ''अमुक पेंटिंग अमुक ठिकाणी आहे '' असे कथनाच्या ओघात वाचयला नकोसे वाटतात . तळटीप म्हणून दिले असते तर अधिक योग्य झाले असते . तरीही अश्या चित्रकारांविषयी पुस्तके मराठीत येणे गरजेचेच आहे . माधुरी पुरंदरे यांच्या विन्सेंट आणि पिकासो नंतर चित्रकारावर आलेले हे पुस्तक प्रत्येक कलाप्रेमीने वाचावे अशी सदिच्छा .
असेच पुस्तक कुणी अम्रिता शेरगिल सारख्या भारतीय चित्रकारावर मराठीत लिहावे असे वाटते .
http://www.bookganga.com/eBooks/Books?BookSearchTags=Mula+Rooja&BookType=1

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

व्यंग आणि कुरूपता या मुळे वेश्याही साथ द्यायला तयार नाही या कटू सत्याचे पचन हेन्री ने आयुष्यभर जबरदस्त मद्यपानाने केले आणि मध्यम वयातच मृत्यूने त्याची सुटका केली .

कालच दुपारी बसमध्ये १८-२० वर्षाचा एक अतिशय कुरुप, मंदबुद्धीचा तरुण पाहीला. त्याच्या चेहर्‍या/अंगावर भाजल्याच्या खुणा होत्या तसेच दोन्ही हात प्लास्टरमध्ये होते. मनात नाना विचार आले. आपणहून तो आगीशी खेळला की कोणी आणी का भाजलं? हातात प्लास्टर का लावलं आहे? त्याची कृती/हालचाल सीमीत करायला की जेन्युइन कारण आहे? मनात केवळ देवाचा विचार येऊन गेला की अशा जीवांचे रक्षण त्याने करावे.
अन काय योगायोग कालच नंतर काही तासांनी संध्याकाळी, एक व्यंग असलेले जोडपे दिसले. दोघांचे चेहरे अतिशय विद्रूप होते पण एकमेकांची साथ होती, खूष दिसले. मनाला समाधान वाटले.
या २ घटनांना , त्यातील समान धाग्याला योगायोग म्हणायचे की अन्य काही?- हा प्रश्न पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0