नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा....

जैसा जमेल तैसा आणा घरात पैसा
काट्यात शोध पैसा , फुलवा फुलात पैसा!

जेव्हा मनात असतो तेव्हा करात नसतो
असतो करात तेव्हा नसतो मनात पैसा !

असतेच माणसाची पैसाच जात हल्ली
नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा...

उशिरा मला कळाले-ती नाचणार तोवर
जोवर असेल माझ्या नाचत खिशात पैसा..

दु:खात माणसाला लोटून तोच देतो
आणिक हळूच नंतर हसतो मनात पैसा !

दररोज साजरी तो करतो पहा दिवाळी
दररोज काढतो अन् त्याची वरात पैसा

घेईल का विकत तो प्रेमास काय
केव्हा..?
दररोज विकत घेतो जरी चांदरात
पैसा ..

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ही गझल इतरत्र प्रकाशित केली आहे...
ऐसी अक्षरे वर प्रथमच लिहित आहे..चु.भू.द्या.घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचे कडवे (घेईल का ..... चांदरात पैसा) खूप आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीअक्षरेवर स्वागत!
कविता ठिक. पुढील कवितेसाठी शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!