अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी

२० तासात ६० हजार हिट्स मिळवणारी एकमेव विनोद सांगणारी वेबसाईट बंद पडण्याची ही कदाचित एकमेव घटना असेल.

narendramodiplans.com या संस्थळावर गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा विजयाचा 'व्ही' दाखवणारा उंचावलेला हात असणारा फोटो होता आणि "श्री. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांचा देश चालवण्याबद्दल असणारा प्लॅन आणि २००२ सालच्या दंग्यांसंदर्भातली मतं/परिप्रेक्ष्य अधिक तपशीलात वाचण्यासाठी खालच्या चौकोनात क्लिक करा" (For a detailed explanation of how Mr Narendra Modi plans to run the nation if elected to the house as a Prime Minister and also for his view/perspective on 2002 riots please click the link below) असे शब्द होते. हा दुवा असणार्‍या विवक्षित चौकोनाशी कर्सर नेल्यावर तो चौकोन हलून दुसरीकडे जाणार; कितीही वेळा प्रयत्न केला तरीही तो चौकोन पळून जाणार, एवढंच दाखवणारं हे संस्थळ होतं.

(भारतीय वेळेनुसार) बुधवारी सकाळी या संस्थळावरचा हा विनोद गायब झाला आणि तिथे हा संदेश दिसत होता. "मी माघार घेत आहे. मी हे गृहित धरलं होतं की अभिव्यक्तीस्वातंत्र्य असणार्‍या देशात सकारात्मक राजकीय विडंबन मान्य होईल. निश्चितच माझी चूक झाली. असं दिसतंय की फक्त सत्ताधारी पक्षाची मॉर्फ केलेल्या चित्रांमधून, @फेकिंगन्यूज देऊन, गलिच्छ विनोद करून, व्यंगचित्र किंवा इतर काही प्रकारे टिंगल करता येईल. पण विरोधकांना जावास्क्रिप्ट लिहून हातही लावण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला सोडणार नाहीत" (I quit. In a country with freedom of speech, I assumed that I am allowed to make decent satire on any politician more particularly if it's constructive. Clearly, I was wrong. Apparently, you could make fun of only the leading party like @fakingnews with morphed pics, dirty jokes, cartoon and whatever, but dare you touch the opposition with javascript, they'll haunt you down.)

गंमत म्हणून राहुल गांधींची टिंगल करणारं संस्थळ rahulgandhiachievements.com व्यवस्थित सुरू आहे. आणि रोजच्या रोज अपडेट करण्याची तारीखही तिथे बदलते आहे.

यासंदर्भात आलेल्या बातम्या:
http://www.ndtv.com/article/india/website-mocking-narendra-modi-shuts-do...

http://www.livemint.com/Home-Page/h97SbXMk0aeGpeWgOdJFyO/Spoof-website-o...

http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/internet/Modi-bashing-...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एकुणच सर्व काही संशयास्पद दिसते आहे. राहुल रोशन संपादक फेकिंग न्युज यांनी लिहिलेला लेख रोचक आहे.
http://ibnlive.in.com/news/why-narendramodiplanscoms-motives-seem-suspec...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आहे किंवा कसे हे ठरवण्यास पुरेशी माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुजरातच्या आणि पर्यायानं मोदींच्या प्रसिद्धीचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जात आहे ह्याविषयी एक रोचक लेख वाचला. हे पाहता कसलीच शक्यता नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||