थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १

सत्य कल्पना करु शकाल त्याहून थरारक, विचित्र असतं असा एक वन लायनर फार पूर्वीपासून ऐकत आलोय. त्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत असे पूर्वी वाटे. पण एक सत्यकथा हाताला लागली आणि काहीही तिखट मीठ न लावता जे जसं आहे ते तसं मांडलं तरी ते किती थरारक, रोमांचकारक, विचित्र आणि धम्माल गंमतीशीरही असू शकतं हे अनुभवलं. एक बरचसं अनवट, अल्पपरिचित किंवा अपरिचित असलेलं भूतकाळातलं पान जे जसं आहे ते जवळपास जशाला तसं भाषांतरीत करतोय विकिपिडियातून.
.
कल्पना करा. दुसरे महायुद्ध सुरु आहे आणि तुम्ही जर्मन सैन्याच्या pay roll वर आहात. ब्रिटनवगलता इतर युरोपमेनलँडवर नाझींचा ताबा आलेला आहे. फ्रान्स, पोलंड, बेल्जिअम, झेक कुठेहीए जा सर्वत्र जर्मन बलाढ्य सैन्य विस्तारलेलं आहे. तुम्ही नाझींना थापा मारण्याचा विचार कराल? आख्ख्या जर्मन यंत्रणेशी एकट्याने पंगे घेत आगीशी खेळ कराल? ज्यूंचे ते तसले हाल हाल करणारे जर्मन, त्यांच्या हाती आपली बदमाशी लागली तर काय होइल ह्या विचार करुनही आपले उद्योग सुरुच ठेवाल? "हो.मी असे करेन" असे म्हणणारा एक प्राणी आहे; जोन पुजोल गार्शिया (किंवा ज्झों/योन पुयोल्/प्योल गाsssअशिअ ) हे त्याचे नाव. दुसर्‍या महायुद्धातील डबल एजंट.
.
संक्षिप्त/लेखाचा सारांशः-
जोन पुजोल गार्शिया(१४ फेब्रुवरी १९१२ - १०ऑक्टोबर १९८८) हा जाणीवपूर्वक डबल एजंट बनला. त्याचे ब्रिटिश टोपणनाव(संकेताक्षर) होते गार्बो आणि जर्मनांसाठी तो होता अराबेल. दोघाम्ना तो आपलाच गुप्तहेर वाटे. त्याला त्याच्या हेरगिरीबद्दल दोन्ही बाजूंनी उच्चा पुरकार मिळाले! ब्रिटिशांनी दिला Most Excellent Order of the British Empire हा पुरस्कार तर जर्मनांनी "आमच्यासाठी हेरगिरी करणारा" समजून दिला iron cross. स्पॅनिश यादवी युद्धातील कम्युनिस्ट अन् फॅसिस्ट दोन्ही पक्षांवर तो नाराज होता. म्हणून दोस्त राष्ट्रांच्या बाजूने त्याची मनोभूमिका बनत गेली.(स्पॅनिश यादवी युद्ध दुसर्‍या महायुद्धाच्या थोडेसेच आधी झाले. हिटलर - मुसोलिनी मैत्री अक्ष उदयास येउ लागल त्या काळात.)
पुजोल व त्याच्या पत्नीला ब्रिटन व अमेरिका अशा दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनांनी सामावून घेण्यास नकार दिला. तरी त्याने हार न मनता कट्टर नाझी समर्थक व (नाझींच्या मदत्/सहानुभूतीने सत्तेवर आलेल्या) स्पॅनिश सरकारचा हस्तक अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली व तो जर्मन हेर म्हणून नियुक्त झाला.
त्यास ब्रिटनला जाउन इतर हेरांची भरती करण्यास सांगण्यात आले. पण तो ( पोर्तुगालची राजधानी) लिस्बन इथे गेला. गंमत म्हणजे चक्क असले थापाडे रिपोर्ट बनवूनही तो धरला गेला नाहिच; उलट जर्मनांच्या नजरेत विश्वासार्ह बनला.
मग त्याने स्वतःसारखेच इतर काही सब्-एजंट बनवण्यास सुरुवात केली; फक्त त्या सब एजंटाचे अस्तित्व त्याच्या कल्पनेत होते, इतकीच गडबड होती. :)ह्या काल्पनिक एजंटांवर तो पुढे चुकांचे , उशीरा खबर देण्याचे खापर फोडणार होता. अशा कामगिरीमुळे दोस्तांनाही शेवटी पुजोलचा मैत्रीचा हात स्वीकारावाच लागला. त्याला आता दोस्तांतर्फे ( ह्यावेळी खरोखरच) सहकुटुंब ब्रिटनला पाठवण्यात आले. त्याचा बॉस/सहकारी टॉमस हॅरिस आणि तो स्वतः अशा दोघांनी उर्वरित युद्धकालात गुप्तहेरांचे काल्पनिक जाळे सुरुवातीस पत्राने आणि मग रेडियोमार्गे वाढवत ठेवले.
पुजोलची खरोखर मोलाची ठरलेली कामगिरी म्हणजे ऑपरेशन फोर्टिट्यूड. ह्या ऑपरेशनचे उद्दिष्ट एकच. जर्मनांना दोस्तांच्या नॉर्मंडीवरील आक्रमणाबद्दल अनभिज्ञ ठेवणे व जमेल त्या मार्गाने त्याबद्दल जर्मनांची दिशाभूल करणे.(दुसर्‍या महायुद्धाबद्दल माहिती असणार्‍यांना नॉर्मंडीवरील युद्ध हे कसे निर्णायक ठरले, तो एक आख्ख्या युद्धाचा महत्वाचा turning point कसा ठरला हे सांगायला नकोच. कारण नॉर्मंडीवरील विजयानंतर आख्ख्या युद्धाचे पारडे सरळसरळ, अगदि स्पष्टपणे दोस्तांच्या बाजूने झुकले. इथे काही गडबड झाली असती तर युद्ध इतक्यातच संपण्याची काही शक्यताच नव्हती.) पुजोलने मुद्दाम दिलेल्या चुकिच्या माहितीमुळे जर्मन Pas de Calais इथे खरा मोठा हल्ला होणार आहे असे समजत होते. त्यांनी नॉर्मंडीवरील लढाईदरम्यान २ चिलखती डिव्हिजन्स, तब्बल १९ पायदळाच्या डिविजन्स भलतीकडेच , Pas de Calais मध्ये अडकवून ठेवल्या.
.
.
अंक १ |

--मनोबा

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

ग्रॅहम ग्रीनचे 'अवर म्यान इन हवाना' वाचले आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांचे आभार. अंक २ चा दुवा :- http://www.aisiakshare.com/node/1971
.
.
@न वी बाजू :- अवर म्यान इन हवाना वाचलेले नाही. ह्या पुस्तकाबद्दल गुगल्यावर ते ह्याच माणसापासून प्रेरित होउन लिहिले आहे असे वाचण्यात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या लेखाचं व याच्या उत्तरार्धाचं विकीकरण पूर्ण झालं आहे.
विकीपान इथे उपलब्ध आहे:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!