" चिऊ चिऊ चिडकी - "

बाळ दिसला
हळूच हसला
"ये ये" म्हणाला
खाऊ घे म्हणाला -

चिऊ चिऊ चिडकी
बंद खिडकी
चोच आपट
काचेवर टकटक -

बाळाने उघडली
चिऊ चिऊ आली
लाडूचा खाऊ
चोचीने घेऊ -

बाळाने मुठीत
लाडू लपवला
बाळ हळूच
खुदकन हसला -

चिऊ चिऊ चिडली
खाऊसाठी रडली
खिडकी बाहेर
"चिऊचिऊ" ओरडली !
.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला तालात म्हणता येत नाहिये.. त्यामुळे तितकी आवडली नाही(

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाळ मोठा दुष्ट दिसतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं