राग!

काल माझ्या शाळेतल्या मित्राने मला एका व्याख्यानाचा व्हिडीओ (http://youtu.be/U0S9179jgRc)बघायला सांगितला म्हणुन डाउनलोड करुन आवर्जुन बघितला.
या व्याख्यानाच्या शैलीने आमची पिढी घडवली
या शैलीला नाव काय द्यायचं सुचत नव्हतं
पण आता सुचलं - हे होतं "गद्यगायन"...

आवर्जुन बघायचं कारण
ते दोन गायक होते
पु. ल. देशपांडे आणि वाजपेयी
त्यांनी दोघांनी आळवला "राग सावरकर"
एकाची ग्वाल्हेर गायकी तर दुसर्‍याची गंधर्व गायकी
एकांनी आपली बंदीश कागद (नोटेशन) बघुन मांडली
तर दुसर्‍याने उत्स्फूर्तपणे...

हा "सावरकर" राग उत्तरांगप्रधान,
आलापी फारशी नाही. जयपुरसारखी एकदम उडी मारून बंदीशीला सुरुवात...
"सशस्त्र क्रांति" हा वादी सूर
"राष्ट्रवाद" हा संवादी
"नास्तिकता" "बुद्धीवाद" हे अनुवादी सूर
(सहिष्णुता समभाव हे विवादी सूर...!)

पु लंनी अनुवादी सुरांचे सौंदर्य खुलवले
तर वाजपेयीनी वादी-संवादी
असे पकडले होते...
तर अंदमानतल्या हालअपेष्टांचे सूर तानपुर्‍यावर
असे जुळले होते
अहाहा!

एक मात्र खरं
अशी गद्यगायकी
आजकाल ऐकायला मिळत नाही...
राग सावरकर पण
फारसा कोणी गात नाहीत...

मला मात्र "राग तिलक" फारफार आवडतो...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

याआधी हे भाषण ऐकलं नव्हतं.. इदे दुवा दिल्याबद्दल आभार! माझे एक ज्येष्ठ परिचित पुलं आणि वाजपेयींच्या पुण्याच्या एकत्रित सोहळ्याबद्दल याआधी काही वेळा बोलल्याचे आठवते आहे. दुर्दैवाने ते परिचित हयात नाही, पण ती सभा हीच असावी असे वाटते.

अशी गद्यगायकी
आजकाल ऐकायला मिळत नाही...

खरंय! गायकी बदलली, गायक बदलले गायनाचे सूरही बदलले आहेत.

राग सावरकर पण
फारसा कोणी गात नाहीत...

हीच गंमत वाटली. याच भाषणात शेवटी वाजपेयी म्हणतात "मी हिंदू आहे मात्र माझे हिंदुत्त्व संकुचित नाही." मात्र त्या वाक्याचा त्यावेळी गहजब होत नसे.वाक्य्जेव्हा मोदी "मी हिंदु आहे" म्हणताच, त्यांच्यावर १०० माईक-शस्त्रे रोखून मिडीया उभा असतो.

हा काळाचा महिमा की व्यक्तींच्या इमेजमधले अंतर हे ठरवणे फारसे कठीण नसावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!