(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल. काही अगदी जुजबी बदल केलेले आहेत. ते शक्य तिथे कंस इत्यादी वापरून दाखवून दिलेले आहेत.

लेखाचं शीर्षक कंसात टाकलं आहे, कारण एखादा लेख, कविता आधारभूत घेऊन नवीन लेखन केलेलं आहे हे दर्शवण्यासाठी ती प्रथा आहे. हे जर कोणाला विडंबन वाटलं तर ती जबाबदारी वाचकाची.

--------------
यु. जी. कृष्‍णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्‍यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्‍म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्‍यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे.
हा फरक म्हणजे नेत्रपटलांवरील चित्र आणि त्यातून (मनात) निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर नेत्रपटलांवरील चित्रांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.

थोडक्यात जगाला जाणून घेण्‍यात किंवा जगाबद्दल समजाऊन सांगण्‍यात नेत्रपटलांवरील चित्रांवर त्यांची भिस्त नाही. अर्थात युजी आणि लोकांच्यातला संवाद हा नेत्रपटलांवरील चित्रांच्या (सहाय्यानेच) झाला आहे. पण युजींचे नेत्रपटलांवरील चित्र हे फक्त ते ज्या अवस्‍थेत आहेत तिची झलक त्यांना ऐकणारांच्या मनात उभी रहावी यासाठी मारलेले कुंचल्याचे फटकारे आहेत. पण युजी हे काही नेत्रपटलांवरील चित्रांचे फटकारे मारुन रजनीशांप्रमाणे सुंदर-सुंदर, लोभस चित्रे उभे करु शकणारे निष्‍णात चित्रकार नाहीत. युजींनी केलेला नेत्रपटलांवरील चित्रांचा वापर हा यांत्रिक आहे, तर रजनीशांनी केलेला नेत्रपटलांवरील चित्रांचा वापर हा नितांत कलात्मक आहे - त्यातून सृजनशीलता डोकावते आणि ती आ‍कर्षित करते.

एरव्ही नेत्रपटलांवरील चित्र म्हणजे काय तर, जे आपल्या आजूबाजूला अफाट विस्‍तारलं आहे आणि ज्या अफाट विस्‍ताराची एकच एक, एकसंघ, महाप्रचंड प्रतिमा आहे, त्या प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्‍या किंवा ती प्रतिमा उभी राहण्‍यासाठी आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे! (मानवाला फक्त मर्यादित रंग दिसतात. त्यामुळे त्याच्या नेत्रपटलांवरील चित्र अर्थातच संपूर्ण विश्व सामावायला अपुरे आहेत)
त्या महाप्रचंड प्रतिमेला उभं करण्‍यासाठी आपण जोडत असलेली नेत्रपटलांवरील चित्ररुपी ठिगळे आणि चिंध्‍या याच माणसांनी साठवलेलं लेंढार आहेत - या नेत्रपटलांवरील चित्रांच्या लेंढारातून सहज मोकळं होता येत नाही, व ही नेत्रपटलांवरील चित्ररुपी ठिगळे पाहिल्या शिवाय आपल्या मनात कसलंही चित्र उभं राहू शकत नाही.
हा नेत्रपटलांवरील चित्रप्रतिमांचा व्यापार विचारांच्या माध्‍यमातून मनातही अखंड सुरु असतो, बाहेरुनही आपल्यावर त्याचा मारा सुरु असतो आणि आपणही लोकांच्या नेत्रपटलांवर चित्रप्रतिमा फेकत असतो - थोडक्यात आपण सर्वचजण लाक्ष‍णीक अर्थाने नेत्रपटलांवरील चित्रावडंबर माजवात जगत राहणारे लोक आहेत, आपण नेत्रपटलांवरील चित्रजीव आहोत. नेत्रपटलांवरील चित्रप्रतिमांच्या ठिगळांशिवाय आपलं चालु शकत नाही. नेत्रपटलांवरील चित्रप्रतिमांची ही ठिगळे विशिष्‍ट पद्धतीने जोडणे ही झाली (चित्र)भाषा. पण मुळात नेत्रपटलांवरील चित्र म्हणजे काय त्याच्या खोलात शिरण्‍याचं कारण नाही. कारण नेत्रपटलांवरील चित्र हे फक्त चिन्ह-प्रतिमा आहेत. त्या प्रतिमांचं अस्तित्त्व हेच नेत्रपटलांवरील चित्रांचं अस्तित्व आहे. मनातून प्रतिमा पुसून टाका, नेत्रपटलांवरील चित्र पुसलं जातं. नेत्रपटलांवरील चित्राचा गळा दाबा, मनात कसलीही प्रतिमा उमटू शकत नाही. प्रात्यक्षिकासाठी कुठलाही नेत्रपटलांवरील चित्र घ्‍या. उदा. मुलगा. (तुम्ही एखाद्या मुलाकडे पहाताना) मुलगा या नेत्रपटलांवरील चित्रातून जी प्रतिमा मनात येते ती फाडून टाकली, ती नष्‍ट करुन पाहिली तर (एक विचित्र आकाराचं) निरर्थक, विनोदी नेत्रपटलांवरील चित्र शिल्लक रहातो! प्रत्येक नेत्रपटलांवरील चित्र असा मनात नष्‍ट करुन नलीफाइड, व्हॉईड केला तर हे लक्षात येऊ शकेल.

नेत्रपटलांवरील चित्रांच्या मागील (मनातील) प्रतिमा छाटून टाकून आपण तेवढ्‍यापुरतं नेत्रपटलांवरील चित्रावेगळे, नेत्रपटलांवरील चित्रमुक्त होऊ शकतो आणि याच नेत्रपटलांवरील चित्रातून निपजणार्‍या विचारांच्या वावटळींतूनही वेगळे होऊ शकतो, पण हे फक्त तेवढ्‍यापुरतंच होता येतं. विचारांचा ब्रम्हराक्षस आपण त्याच्या नेत्रपटलांवरील चित्ररुपी अपत्यांची कत्तल करुन मारुन टाकू शकत नाही.

नेत्रपटलांवरील चित्र ही आपली शेवटची मर्यादा आहे. नेत्रपटलांवरील चित्र हीच आपली अंतिम सीमारेखा आहे, आपल्यावर ओढलेलं कवच आहे. नेत्रपटलांवरील चित्रांना जर ओलांडून पुढे जाता आलं तर, नेत्रपटलांवरील चित्रावेगळं रहाता आलं तर कदाचित त्याला मुक्ती किंवा मोक्ष म्हणत असावेत. कदाचि‍त त्यामुळेच आध्‍यात्मात डोळे मिटून राहून पाहिलं जातं असावं.

(काही अज्ञानी लोकं नेत्रपटलावरील चित्रं कायमची नष्ट करण्याला आंधळं होणं म्हणतात. पण तो स्वतःला डोळस समजणाऱ्यांचा दोष असावा.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

राजेश घासकडवी यांनी यशवंत कुलकर्णी यांचाच एक लेख पुनरावृत्त झाल्याने मी अधिकचा लेख समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या दोन्ही लेखांचा आशय आणि त्याखाली असलेल्या डोक्यातल्या इतर अनेक गोष्टी माझ्या मनाच्या आंतरपाटावरून उडल्या. याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. कुलकर्णी यांनी आपले लेखन पुन्हा एकदा मूळ धाग्यात आणावे आणि घासकडवींनी वाटेल त्याची टोपी उडवू नये याकडे लक्ष द्यावे अशी विनंती. नाहीतर धनंजयची टोपी काढल्यावर जरी खाली धनंजयच राहात असला तरी कुलकर्णींची टोपी उडवल्यावर घासकडवी खिखिखि हसताना दिसतात अशी शून्यवादी स्थिती निर्माण होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

. कुलकर्णी यांनी आपले लेखन पुन्हा एकदा मूळ धाग्यात आणावे आणि घासकडवींनी वाटेल त्याची टोपी उडवू नये याकडे लक्ष द्यावे अशी विनंती.

घासकडवींनी काही शब्दांची भर टाकून रिरायटींग करण्यापूर्वीच मी माझा लेख इथून काढून टाकला होता. घासकडवींचं आपण म्हणता तसं विडंब़ण हे त्यामागचे कारण नाही. घासकडवींनीही अन्यत्र ठिकाणच्या लेखाचा दुवा दिलेला आहे.
माझा मूळ लेख टाकलेल्या धाग्यात लेख काढण्याचं कारण दिलेलं आहे.
एकदा काढून टाकलेलं लिखाण पुन्हा एकदा टाकण्यात मजा नाही.
आपल्याला मूळ लेख आणि घासकडवींची रिरायटींग या दोन्ही ठिकाणी दिलगिरी व्यक्त करण्याची तसदी दिल्याबद्दल खेद वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विडंबन वाटले नाही.
यकुंच्या लेखाची खिल्ली उडवण्याचा किंवा त्या लेखात मांडलेल्या विचारांचा अतिरेक करून फोलपणा सिद्ध करायचा प्रयत्न असल्यास माहित नाही, पण तरीही या लेखात थोडासा अर्थ उतरलाच आहे.
"उदा. मुलगा. (तुम्ही एखाद्या मुलाकडे पहाताना) मुलगा या नेत्रपटलांवरील चित्रातून जी प्रतिमा मनात येते ती फाडून टाकली, ती नष्‍ट करुन पाहिली तर (एक विचित्र आकाराचं) निरर्थक, विनोदी नेत्रपटलांवरील चित्र शिल्लक रहातो!"

हे म्हणताना लेखक नेत्रपटलावर उमटलेल्या चित्रासाठी मनात उमटणार्‍या शब्दाबद्दलच बोलतोय अशी शंका आली. फक्त शब्द या शब्दाऐवजी प्रतिमा हा शब्द वापरलेला दिसतोय. Wink
असो. चिमूटभर मीठाबरोबर लेख चांगला वाटला वाचायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विडंबन, खिल्ली हे थोडे टोकाचे शब्द झाले. अतिरेक करून फोलपणा दाखवणं हे जास्त जवळ जातं. धनंजय यांनी दिलेली उपमा वापरायची झाली तर कांद्याची आणखीन एक साल उलगडण्याचा प्रयत्न आहे.
"शब्दांपलिकडे, आतमध्ये कुठेतरी, शब्दांपेक्षा स्वतंत्र असा एक 'मी' असतो, तो खरा. बाकी शब्द म्हणजे चिंध्या, फापटपसारा. तसंच शब्दांनी बांधता न येणारं बाहेर काहीतरी विश्व आहे, आणि ते आपल्याला भिडतं ते या चिह्नांपलिकडे असतं" असा काहीसा मूळ विचारप्रवाह आहे. तो मला पटत नाही. शब्द हे मानवनिर्मित आणि डोळ्यांवर पडणारी प्रतिमा नैसर्गिक हाही भ्रमच आहे. नोम चॉम्स्कीने भाषेचा अभ्यास केला त्यावरून डोळा हे जसं 'इमेज ऍक्वेझिशन डिव्हाइस' आहे तसंच मानवी मेंदूत 'लॅंग्वेज ऍक्विझिशन डिव्हाइस' आहे हे दिसून आलेलं आहे. शेवटी जगाविषयीचं आपलं ज्ञान इंद्रियांतूनच होतं. मग एक एक इंद्रिय नाकारत जात सगळंच इनपुट शून्य केलं तर 'मी' असं कोणी राहील का? जन्मल्यापासून एखाद्या मुलाचे नाक, कान, डोळे, स्पर्श, सगळं बंद करून टाकलं आणि फक्त नळीने अन्न देऊन जिवंत ठेवलं तर त्या वाढलेल्या मुलाला जगाचं ज्ञान असेल का? शून्यवादावर कितीही विश्वास असलेला तत्वज्ञ आपल्या मुलाला असं वाढवेल का?

शब्दांचा अतिरेक नको म्हणणं, काही काळ शांतपणे मौनात असावं म्हणणं वेगळं आणि शब्द हेच शत्रु आहेत अशी टोकाची भूमिका घेणं वेगळं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग एक एक इंद्रिय नाकारत जात सगळंच इनपुट शून्य केलं तर 'मी' असं कोणी राहील का?

ही खरोखर 'मी' हे जे काही असेल ते गमावून बसण्याची भीती आहे, की 'मी' च्या अस्तित्वाला काही शास्त्रीय, विज्ञानसंमत आधार आहे?
'मी' रहाणार नाही असं वाटत असेल तर काय हरकत आहे एकदा प्रयत्न करून बघायला?

शून्यवाद म्हणजे काय हे मला माहित नाही. जाणून घेण्याची इच्छाही नाही हे प्रामाणिकपणे सांगतो.

शब्द हेच शत्रू आहेत अशी भूमिका कुठे घेतलीय? ती आपली मर्यादा आहे, ते आपलं कवच आहे असं म्हटलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार हे लिखाण विनोदी आहे असे समजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सामाजिक इनोद व्हय!
माला वाट्लं का संगीत मानापमान चा फुडचा अंक हाय.
तशी सुरुवात म्या केलिया: ..., ----- अश्या नावाच्या धाग्यांची नवी परंपरा तयार करण्याची.

ओ अ‍ॅड्मिनराव
त्या लिंबाजीरावांना बोलावून काय शांती बिंती करून घ्या साईटीची मंत्र बिंत्र म्हनून. न्हाय्तर त्या जामोप्याना बोलावून कायतरी टांगवून घ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेख थोडाफार समजला आणि आवडलाही. फक्त दृकस्वरूपच नव्हे तर ध्वनि माध्यमातून देखील आपण लोकांच्या कर्णपटलावर तरंग फेकत असतो आणि व्हाइसे व्हर्सा . ध्वनि का बरे नाही घेतला विचारात येथे? तसेच गंध उदाहरणार्थ अत्तर. ते काही कळले नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0