मुक्तचक्र

शून्य असे मी ओढुनताणुन
नुसता पोकळ रिक्ताकार
पोकळीत कण भरण्यासाठी
पांघरली मी भगवी छाटी!

रिक्त भासते परी तिथे मग
राजस तामस नूतन तगमग
कशास पुनरपि रेटा द्यावा
नव्या दमाने प्राणच ओतुन?

शून्य म्हणुनी का व्यर्थ जगावे
का शून्यातच विरूनि जावे
शून्यभावनें राख कुडीची
व्योमाकाशी विखरत जावे?

पण..
क्षुद्र तृणावर सावरलेला
दवबिंदू जणु प्रकाशयात्री
अस्तित्वाचे अगम्य उत्तर
नित्य वसतसे त्याच्या गात्री

आणि अनाहत शंखामधला
नाद सनातन दक्षिणवर्ती
गुरुत्व की भ्रूमध्यामधले
प्रकाशते जे तिमिरावर्ती..

भिडेन मग मी त्या न्यूनाला
व्यापुन टाकिन त्या शून्याला
शून्य नव्हे, ते नित्य निरंजन
पूर्ण चक्र मम जीवन-चिंतन

~मुक्ता

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

आव‌ड‌ली. म‌स्त‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क‌विता फार आव‌ड‌ली.

ही २०१३ साली निस‌ट‌ली याचं वाईट वाट‌त‌ंय कार‌ण आता तुम्ही इथे दिस‌त नाही, त्यामुळे काही विचार‌ल‌ं त‌र तुम‌च्याप‌र्य‌ंत पोहोचेल‌ की नाही, श‌ंकास‌माधान होईल‌ की नाही याची खात्री नाही.
त‌री विचार‌तो.
नाद सनातन दक्षिणवर्ती या ओळीत 'द‌क्षिणव‌र्ती' या श‌ब्दातून‌ तुम्हांला मृत्यू/मुक्ती सुच‌वाय‌ची आहे का? कार‌ण द‌क्षिण दिशा ही य‌माची नि प‌र्यायाने मृत्यूची दिशा मान‌ली गेली आहे.

--
ही कविता व‌र काढ‌ल्याब‌द्द‌ल शुचिचे आभार‌!
--
या निमित्ताने उत्ख‌न‌न‌स‌म्राट/स‌म्राज्ञी असा पुर‌स्कार ऐसीत‌र्फे म‌नोबा आणि शुचि यांना देण्यात यावा अशी शिफार‌स ऐसीसंचाल‌कांना क‌र‌तो आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्ख‌न‌न‌स‌म्राट/स‌म्राज्ञी असा पुर‌स्कार ऐसीत‌र्फे म‌नोबा आणि शुचि यांना देण्यात यावा अशी शिफार‌स ऐसीसंचाल‌कांना क‌र‌तो आहे. Wink

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता खूपच आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क‌विता अतिश‌य उच्च‌ द‌र्जाची आहे. आज प्र‌थ‌म‌च‌ वाच‌ली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0