ककल्ड/प्रतिस्पर्धी

ककल्ड (जारिणीचा यार ) या किरण नगरकर यांच्या कादंबरीचा रेखा सबनीस यांनी केलेला अनुवाद 'प्रतिस्पर्धी' वाचला .
ऐतिहासिक कादंबरी असूनही भाषा सुदैवाने नेहमीची मराठीच आहे .
कमल देसाई यांची उत्तम प्रस्तावना आहे . नेहमी प्रस्तावना न वाचणार्यांनीही ती आवर्जून वाचावी .
संपूर्ण कादंबरी युवराजच्या नजरेतून आपल्याला वाचयला मिळते . कादंबरीच्या कथनाची तिरकस विनोदी शैली रंजकता वाढवते .

संत मीराबाई , तिचा नवरा चितोडचा युवराज भोज आणि मीरेचा प्रियकर कृष्ण यांचे अजब नाते दाखवणारी ही कादंबरी आहे .
अगदी पहिल्या पानापासून शेवटापर्यंत खिळवून ठेवते .

युवराज आधी आवडता आणि आदर्श देव म्हणून कृष्णाच्या प्रेमात , (अप्राप्य पत्नी ) मीरेच्या प्रेमात आणि मीरा कृष्णाच्या प्रेमात . असा हा त्रिकोण .
युवराज हा माणूस म्हणून , पुरुष म्हणून आणि युवराज म्हणूनही अतिशय गुणसंपन्न व्यक्ती आहे . त्याच्या आयुष्यात तीन बायका
महत्वपूर्ण आहे . दाई कौसल्या , पत्नी मीरा आणि मैत्रीण लीलावती . तिन्हीबरोबर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रेमसंबंध आहेत .
त्या काळातले राजांच्या आणि जनतेच्या जगातले लैंगिक वैषयिक जगाचे उघडे दर्शन हे कादंबरीचा अविभाज्य भाग आहे .
मीरेसाठी युवराज तिरस्काराने कितीही विशेषणे वापरली ( हिरवे डोळेवाली , नाची ) तरी तिच्यावरचे प्रेम कधीच उणावलेले नसते .
उलट दिवसेंदिवस ते वाढत जाते . एक प्रकारे हे प्रेम त्याला उध्वस्त करते आणि समृध्दही .
बाबरची रोजनिशी हा या कादंबरीतला एक धमाल विनोदी भाग आहे .

सत्ता आणि स्त्री या दोन्हीचं प्रेम हे या कादंबरीचा कणा आहेत . कादंबरीचा धुसर शेवट योग्य वाटतो . यापलीकडे दुसरा शेवट होऊही शकला नसता .
कमल देसाई यांच्या प्रस्तावने मधली काही वाक्य फार महत्वाची वाटतात .
''युद्धात जमिनीच्या मालकीसाठी सत्ता संघर्ष असतो आणि ही मालकी कुणाकडे राहावी यासाठी कुटुंबा कुटुंबातून संघर्ष होत राहतो . पण जमीन कुणाच्याही मालकीची असूच शकत नाही . त्यामुळे माणसेच आपसात लढतात आणि मरतात . जमीन तिथेच तशीच राहते , कधी ती सूड पण घेते .
प्रेमात स्त्रीच्या मालकीसंबंधी सत्तासंघर्ष असतो . आणि स्त्री देखील कुणाच्या मालकीची असू शकत नाही .ती माणूस असल्याने स्वतःच स्वतःच्या मालकीची असते . पण हा सत्तासंघर्ष सनातन कालापासून आजवर घडत आला आहे आणि स्त्री ही पुरुषाला कधी सापडू शकलेली नाही . ''http://www.bookganga.com/eBooks/Book/4786108156490606668.htm?Book=Pratis...

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

> ककल्ड (जारिणीचा यार ) या किरण नगरकर यांच्या कादंबरीचा रेखा सबनीस यांनी केलेला अनुवाद 'प्रतिस्पर्धी' वाचला.

माझी समजूत वेगळी आहे. समजा अशोक आणि हेमा हे नवराबायको असतील, आणि हेमाने सुभानरावाशी प्रकरण सुरू केलं तर अशोक हा cuckold ठरतो. (यातदेखील अशोक मूर्ख असल्यामुळे त्याला हा प्रकार माहिती नाही, किंवा तो इतका बुळा आहे की माहिती असूनही थांबवू शकत नाही; अशासारखा काहीतरी वास या शब्दाला येतो.) या उदाहरणात सुभानराव हा 'जारिणीचा यार' ठरेल. इतरांना काय वाटतं?

'प्रतिस्पर्धी' हा cuckold ला प्रतिशब्द नाही, पण यावर माझा काही आक्षेप नाही. कादंबरीच्या भाषांतराचं नाव हे कादंबरीच्या नावाचं भाषांतर असलं पाहिजे असं काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सहमत. अर्थात हे नेहमीच जारकर्म अशा रंगातच असेल असं नाही. साधारण राधेचा पती (अनय मला वाटतं) याच्या टाईपच्या केसेसमधे असा शब्द वापरतात. ज्याची पत्नी शारिरीक किंवा मानसिक पातळीवर अन्य कोणाचीतरी झालेली आहे त्याला ककल्ड म्हणतात असं वाटतं. यावर मराठीत खूप पूर्वी एक नाटकही पाहिल्याचं आठवतं. टीव्हीवर लागायचं वरचेवर. त्यात एका माणसाची पत्नी अन्य एका गुरुतुलल्य म्हणा किंवा फादर फिगर म्हणा (तपशील आठवत नाही) अशा व्यक्तीच्या आहारी गेलेली असते. दिवसरात्र त्याच व्यक्तीचे संदर्भ, क्वोट्स, विचार.. अशामधे हा पती ककल्ड ठरतो. ती प्राणपणाने पटवू पाहात असते की तिने शारिरीक पातळीवर कोणताही व्यभिचार केलेला नाही. पण ते मान्य असूनही पतीला स्वतःची तुलना अनयाशी करावीशी वाटते.

चुभूदेघे.

बादवे ककल्डला योग्य मराठी शब्द कोणता असावा?

गूगल ट्रान्सलेटरमधे Cuckold शब्द टाकून पाहिला असता छिनाल स्त्रीचा पती असा अर्थ मिळाला.. छिनाल... आयायाया..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अरविंद गोखल्यांच्या कथेवर आधारीत नाटक होतं ते!!! मला वाटतं, नाटकाचं नाव पण तेच होतं- अनय!! बायको समाज सेविका असते, आणि त्यापायी नवर्याच्या आवडिंकडे दुर्लक्ष करते. शेवटी नवरा बायकोला म्हणतो, मला अनय व्हायचं नाही!!!, मग ती स्व्तःच्या वागण्याचा विचार करायला लागते, असं काहीसं काथानक होतं!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परीचय रोचक आहे.
बिईँग सायरस मधला नसिरुद्दीन शाह आठवला. आणि शतरंज के खिलाडी मधला सईद जाफरी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दे दनादन" मधला परेश रावल .. ??! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दे दनादन पाहीला नाही पण आमचा अत्यंत आवडता मिर्च पण आठवला Smile
अजुन एक नविन प्रतिसाद न करता मूळ लेखाबद्दल इथेच लिहीतेय.
खरंतर अशा पात्रांना आपण हसतो वगैरे. पण माझ्या १० ते १३ वयातले आमचे शेजारी, अशी एक केस पाहीली आहे. ते नवरा, बायको, त्यांची ४ अडल्ट मुलं... Sad आयुष्य आवघड आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ककल्ड ह्याला स्टँड-अलोन मराठी प्रतिशब्द आहे असे वाटत नाही. समासप्रक्रियेने निर्मिलेले खालील शब्द दिसतातः जारिणीपति, कुलटापति, बन्धकीभार्य (आपटे इंग्लिश-संस्कृत कोश) जारिणीपति, कुलटापति (मोल्सवर्थ इंग्लिश-मराठी कोश). मोल्सवर्थमध्ये मराठीच्या प्रकृतीला अधिक जवळचा पर्याय सुचविला आहे - छिनाल बायकोचा भ्रतार/ढवा. ह्यातील 'ढवा' हा शब्द संस्कृत 'धव' (पति) ह्याचा अपभ्रंश दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही प्रश्न मनात आले. विवाहित स्त्रीला अन्य पुरुषाविषयी आकर्षण असेल, किंवा संबंध असतील तर तिला छिनाल असा प्रचलित शब्द आहे, आणि नवरा ककल्ड होतो, एका अर्थाने सहानुभूती मिळवतो. पण हेच उलटे असले की नवरा छिनाल होत नाहीच, स्त्रीलाही ककल्ड वगैरे सहानुभूती मिळत नाही. आणि हे जवळपास सर्वच काळांत सर्वच समाजांत दिसते. असे नेमके कशामुळे होत असावे?

द्रौपदीच्या केसमध्ये पाच पांडवांपैकी कुणाला ककल्ड म्हणता येईल का? म्हणजे असे - मुळात जिंकली तिला अर्जुनाने, पण इतर चारांनीही हक्क सांगितला. मग अर्जुन ककल्ड झाला का? किंवा, पाचांची पत्नी असूनही (युधिष्ठिराने स्वर्गारोहणावेळी भिमाला सांगितल्याप्रमाणे) द्रौपदीने कायम अर्जुनावर "अधिक" प्रेम करुन पाचांमध्ये भेदभाव केला, तर इतर चारजण ककल्ड होतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> नवरा ककल्ड होतो, एका अर्थाने सहानुभूती मिळवतो. <<

पुरुषप्रधान संस्कृतींमध्ये ककल्ड नवरा हा परंपरेनं सहानुभूतीचा नव्हे, तर चेष्टेचा विषय असतो. 'काय हे, साधी एक बाईलसुद्धा सांभाळता येत नाही!', अशा अर्थानं. अरेबियन नाईट्स, शुकबहात्तरी, डेकॅमेरन अशा अनेक साहित्यांत ह्याची उदाहरणं सापडतात. त्याउलट नवरा हा रतिसुखातला जोडीदार असण्यापेक्षा कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी आणि कुलदीपक देण्यासाठी गरजेचा मानला गेल्यामुळे तो बाहेरख्याली असणं विशेष नाही; तो सांसारिक जबाबदारी नीट पार पाडतो का, हे अधिक महत्त्वाचं मानलं जात असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्हारे खतमें, नया इक सलाम किसका था
न था 'रकीब' तो आखिर वो नाम किसका था|

हे म्हणणारा ककल्ड असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जारिणीचा यार नव्हे, तर पती, असा तो अर्थ आहे.
पतीची उघड फसवणूक करून व्यभिचार करणारी पत्नी असेल, तर तो पती 'कलल्ड' म्हणवितो.
'उघड' महत्वाचे. पतीस ठाऊक असते की पत्नी व्यभिचार करीत आहे. व ते त्याला केवळ मान्यच नसते, तर त्या मान्यतेतून त्याला उत्तेजना मिळत असते.
"Since the 1990s, the term has also been widely used to refer to a sexual fetish in which the fetishist is stimulated by their committed partner choosing to have sex with someone else.[2]" हे कलल्डचे विकी.
तत्पूर्वी, 'पत्नीने' (कमिटेड पार्टनर) कुण्या दुसर्‍या नरापासून उत्पन्न केलेल्या प्रजेचे आपली स्वतःची अपत्ये म्हणून ममतेने संगोपन करणारा नर/पती असा या शब्दाचा अर्थ होत असे.

लेखातील कृष्णप्रियेचा पती ककल्ड म्हणविला जाईल. कारण पत्नीचे परपुरुषावरील (कृष्णावरील) प्रेम त्याला ठाऊक आहे, व तो 'समहाऊ' त्या प्रेमामुळे उत्तेजित देखिल आहे. भलेही तिथे कृष्ण हायपोथेटिकल गॉड आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

समलैंगिक विवाहामध्ये सदर शब्द कोणासाठी वापरावा? का अश्या जोडप्यांसाठी वेगळा शब्द निर्माण झाला आहे? का जो/जी पिडित असेल तो ककल्ड.
बाकी बहुभार्या व बहुपतीत्त्व पाळल्या जाणार्‍या समाजातही असाच प्रश्न उद्भवत असावा. Smile (म्हणजे समजा ४ बायका आहेत त्यातील एक छिनाल आहे तर पती ककल्ड आहे की नाही?)

बाकी, मुळ लेखन आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समलैंगिक विवाहामध्ये सदर शब्द कोणासाठी वापरावा? का अश्या जोडप्यांसाठी वेगळा शब्द निर्माण झाला आहे? का जो/जी पिडित असेल तो ककल्ड.
बाकी बहुभार्या व बहुपतीत्त्व पाळल्या जाणार्‍या समाजातही असाच प्रश्न उद्भवत असावा. (स्माईल) (म्हणजे समजा ४ बायका आहेत त्यातील एक छिनाल आहे तर पती ककल्ड आहे की नाही?)

गरज ही शोधाची जननी आहे. सबब, ज्यांच्या आयुष्यात या समस्या आहेत, अशी मंडळी यथावकाश त्यांसाठी योग्य त्या संज्ञा अवश्य शोधून काढतील, नि तेव्हा आपल्याला त्या समजतीलच. तोवर, या समस्यांच्या उकलींवर एका मर्यादेपलीकडे डोकेफोड आपण करण्यात कितपत हशील आहे, याबद्दल साशंक आहे.

शेवटी, घाई काय आहे? एवढ्या उतावीळपणाची काय गरज आहे? तसाही आपल्याला काय फरक पडतो?

पण शंका रोचक आहेत, एवढे मात्र खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरज ही शोधाची जननी आहे. सबब, ज्यांच्या आयुष्यात या समस्या आहेत, अशी मंडळी यथावकाश त्यांसाठी योग्य त्या संज्ञा अवश्य शोधून काढतील

तसे सहमतच.

ज्याअर्थी ककल्डला मराठीत समानार्थी शब्द नाही (स्टॅन्ड-अलोन, घडवलेला नव्हे) त्याअर्थी मराठी भाषक समाजात असे पुरुष नव्हतेच, असे समजावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याअर्थी ककल्डला मराठीत समानार्थी शब्द नाही (स्टॅन्ड-अलोन, घडवलेला नव्हे) त्याअर्थी मराठी भाषक समाजात असे पुरुष नव्हतेच, असे समजावे काय?

असे मराठीभाषक पुरुष मी पाहिलेले नाहीत, परंतु म्हणून मराठीभाषक समाजात असे पुरुष नाहीत, असे समजणे (गृहीत धरणे / अशा निष्कर्षावर उतरणे) निदान मला तरी धाडसाचे वाटते. फार फार तर 'असे मराठीभाषक पुरुष माझ्या ओळखीत नाहीत,' एवढेच मला म्हणता यावे.

'ककल्डला मराठीत समानार्थी शब्द नाही' हे गृहीतक अथवा हा निष्कर्ष (जे काही असेल ते) अशाच धर्तीवर तपासून पाहणे आवश्यक आहे, असे वाटते.

(फार कशाला, 'ककल्ड' हा इंग्रजी शब्द आज मला नव्याने कळला. म्हणजे तो इंग्रजी भाषेत नव्हताच काय? नि तसे पुरुष इंग्रजीभाषक समाजात नव्हतेच काय?)

आणि हो, गरज ही शोधाची जननी आहेच मुळी! इंग्रजीतून ज्यांना ककल्डांविषयी बोलण्यालिहिण्याची गरज असते, त्यांना ककल्ड हा शब्द सहसा माहीत असावा, किंवा कधी ना कधी माहीत पडत असावा. किंबहुना, आधीच्या कोणत्यातरी पिढीत अशाच मंडळींपैकी कोणीतरी तो किंवा तादृश शब्द जन्मास घातला असावा. इतरांपैकी ज्यांस गरज नाही, किंवा ज्यांस त्याबद्दल उत्सुकता नाही (किंवा ज्यांस कोणी कधी काही कारणास्तव तो ऐकविलेला नाही वा ज्यांच्या तो काही कारणास्तव वाचनात आलेला नाही), त्यांस तो माहीत असेलच, असे कोणी सांगावे?

सबब, मराठीतही ज्यांना अशा पुरुषांबद्दल बोलालिहावयाची गरज असेल, अशा गोटांत त्याकरिता काही शब्द नसण्याचे काहीच कारण नसावे. आपणास (म्हणजे तुम्हाला किंवा मला) याविषयी चर्चा करण्याची फारशी वेळ येत नसल्याकारणाने, आपल्या (म्हणजे माझ्या किंवा तुमच्या) तो कदाचित परिचयाचा नसेल, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याअर्थी ककल्डला मराठीत समानार्थी शब्द नाही (स्टॅन्ड-अलोन, घडवलेला नव्हे) त्याअर्थी मराठी भाषक समाजात असे पुरुष नव्हतेच, असे समजावे काय?

तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की मराठी भाषेत असलेल्या अनेक स्टँडअलोन शिव्या असंख्य लैंगिक विकृतींचे वर्णन करतात, म्हणजेच, तसे पुरुष हे मराठी समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

व्यवच्छेदक लक्षण नसले तरी 'तसे पुरूष' मराठी समाजात अस्तित्त्वात आहेत इतके सांगता यावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!