वटहुकूम!

चला... आला बौ वटहुकूम!
( इत्का लग्गेच? कुणी काय पेटवलं, काय सारलं, काय टांगलं इत्यादी काय न्येमकं झालं कोण जाणे? समजंल आजउद्याले.)
तर यात जे आहे, त्याची ही यादी...
( पण जे वगळलंय, त्यासाठी ढोल - किंवा ढोलासारखं वाजवणं हे आता आपलं खरं काम... )
तोवर काय कलमं आहेत तडजोडी करून ठेवलेली ती पाहू...
( मग मनात येईलच की, इतक्यासाठी कुणाला खरंच जीव गमवावा लागतो का? आणि यासाठी अजूनही भगव्यांना चर्चा हवीच आहे का? )

१) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील. (भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.)
२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल.
३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा.
४) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे.
५) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे. हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही.
६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे.
७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.
८) भूत पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती घालणे, भुताच्या कोपामुळे शारीरिक इजा झाली, असे सांगणे.
९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार
करणे.
१०) बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे. गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे.
११) स्वत:ला विशेष शक्ती असल्याचे सांगून अथवा गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून लैंगिक संबंध ठेवणे. अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्वासन देत लैंगिक संबंध ठेवणे.
१२) एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा, व्यवसायासाठी करणे.

नमूद केलेल्या गुन्ह्यांबद्दल कमीत कमी सहा महिने आणि पाच हजार रुपये दंड ते जास्तीतजास्त ७ वर्षे कारावास आणि ५0 हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

तपशिलाबद्दल धन्यवाद. प्रत्येक कलमाला ठेचा लागत आहेत. सध्या त्यावर लिहीणं शक्य नाही.

बाकी यात काही वैद्यकीय पद्धतींवर प्रतिबंध आला आहे. त्यामधेच अशास्त्रीय चिकित्सांची मोठी लिस्ट (बाराक्षार, होमिओपथी, चुंबकचिकित्सा, होलिस्टिकच्या नावाखाली काहीही, रत्न/खडे थेरपी, आरोमाथेरपी वगैरे) घालावी अशी सूचना करावी का?

औषधाचे अणुइतके अस्तित्वही नसलेल्या होमिओपथीमधे मूळ (औषधी) पदार्थाचे गुण केवळ द्रावणात जोराजोराने विशिष्ट पद्धतीने हलवल्याने उतरुन ते "स्पिरिट-लाईक" इफेक्टने शिल्लक राहतात (द्रावणाची विरळता कितीही वाढवली तरी). हाही एक प्रकारच्या यातुवादाचा स्पर्शच आहे.

Since Hahnemann believed that large doses of drugs that caused similar symptoms would only aggravate illness, he advocated extreme dilutions of the substances; he devised a technique for making dilutions that he believed would preserve a substance's therapeutic properties while removing its harmful effects.[8] Hahnemann believed that this process aroused and enhanced "the spirit-like medicinal powers of the crude substances".[46] He gathered and published a complete overview of his new medical system in his 1810 book, The Organon of the Healing Art, whose 6th edition, published in 1921, is still used by homeopaths today

संदर्भः (विकिपीडियाद्वारे मूळ संदर्भ) : Hahnemann S (1833), The Organon of the Healing Art (5th ed.), aphorism 269, ISBN 0-87983-228-2. Hahnemann S (1842), The Organon of the Healing Art (6th ed.) (published 1921), aphorism 270, ISBN 0-87983-228-2

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता जरा वेळ मिळाल्याने पुन्हा लिहीतो:

१) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील. (भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.)

भूत उतरविण्याच्या बहाण्याने हे शब्द काढून टाकल्यास उरलेला भाग : "एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये"

ही भूत उतरविण्याखेरीज अन्य कारणाने केली तरी गुन्हाच आहेत ना? कोणत्या ना कोणत्या कलमाखाली गुन्हेच ना हे? की भूत नव्हे पण मला केवळ अत्यंत राग आल्याने मी एखाद्याला मारहाण केली, चटके दिले किंवा मूत्रविष्ठा खायला लावली तर सध्या अलाउड आहे?

२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल.

चमत्काराचा प्रयोग म्हणजे काय? कलमातच "चमत्कार" असा शब्द आल्याने व्याख्येची बरीच मोठी समस्या उभी राहतेय. चमत्कार भासेल अशी हातचलाखी असा अर्थ घेऊ. आर्थिक प्राप्ती करणं हे सरळ डिटेक्टेबल आहे. पण फसविणे / ठकवणे हे नेमकं काय आहे? "ठकवणे" याबाबत फिर्याद कोण करणार? "ठकलेल्या" व्यक्तीला ती ठकली आहे असा प्रकाश पडणं हाच तर मुख्य रोडब्लॉक आहे ना.

३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा.

पुन्हा तेच. कोणतीही जखम पोटेन्शियली जीवघेणी असते. इन्फेक्शन, मुख्य शीर कापली जाणे, रक्त न गोठण्याची आधी माहीत नसलेली मेडिकल कंडिशन अशा अनेक कारणांनी कोणतीही जखम जीवघेणी ठरु शकते. शिवाय जीवघेण्या नसलेल्या पण वेदनादायी जखमांबद्दल काय? सुया टोचून आजार बरे करतो असं म्हणतात काही "तज्ञ". आजार बरा होण्याची खात्रीपूर्वक कायदेशीर मान्यता नसताना सुया टोचण्याची वेदना ही जीवघेणी नाही म्हणून वेदनाही नाही का?
पुन्हा "अघोरी" म्हणजे कायद्याने काय? खूपच भावना-बेस्ड शब्द असतात हे (अघोरी, अशुभ, अघटित, अपशकुनी, अभद्र)

४) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे.

अमानुष, अनिष्ट, अघोरी.. वरीलप्रमाणेच..

५) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे. हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही.

एखाद्याच्या केवळ अंगात आल्यानेच समोरचे अनेकजण घाबरतात आणि अंगात आलेल्या देवीचं न ऐकल्यास वाईट परिणामांची भीती बाळगतात. त्यात त्या अंगात आलेल्याने थेट एक्स्क्लुजिव्ह धमकी दिली किंवा नाही हे कसं ठरवायचं. घुमता घुमता प्रश्नोत्तरे करणे आणि समाधान झाल्यावर किंवा आपोआप अंगातले उतरणे हे सर्व "अंगात येणे" या प्रक्रियेचे अविभाज्य भाग आहेत. अंगात येऊन नुसते गप पाच मिनिटे घुमला / घुमली आणि परत ठीकठाक झाला असं कधी होत असल्यास ऐकण्यात नाही.

६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे.

असं जाहीर करण्यापेक्षा, त्यावर विश्वास ठेवणं जास्त गुन्हासदृश मानलं गेलं पाहिजे ना? कारण जाहीर करणं म्हणजे काय? त्या जाहीर करणार्‍याला तितपत ऑथॉरिटी असेल तरच गावगाड्यात ते मान्य होतं. कोणीही उठून कोणालाही जाहीर नोटीशीद्वारे चेटकीण / सैतान घोषित करु शकत नाही. एखादी व्यक्ती करणी करते हे मान्य करणं हाच गुन्हा नव्हे काय? अन्यथा "तसं माझं प्रामाणिक मत आहे" असं म्हणून मतस्वातंत्र्याच्या आड हे कलम येत असल्याची ओरडही लवकरच आणि नक्कीच होईल.

७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.

क्र. १ प्रमाणेच. धिंड काढणे इटसेल्फ इज क्राईम. चेटूक सोडून अन्य कोणत्याही कारणाने काढली तरी. ती बळजबरीच आहे. आत्ताही त्याला शिक्षा करता येईलच. वेगळ्या कायद्याने काय नवीन होणार? जास्तीची शिक्षा का? मग आहे त्याच कायद्यात वाढवावी. नाहीतर धिंड काढल्याबद्दल अटक झाली की ती धिंड चेटकासाठी नव्हती ही सोपी पळवाट काढून शिक्षा कमी होईल का? अंतिम गुन्हा "धिंड" असताना तो चेटकी समजून केला की व्यभिचारी समजून केला की चोर समजून केला याने शिक्षेत मोठा फरक पडावा का?

९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार
करणे.

वैद्यकीय उपचार म्हणजे कोणते? कुत्रा चावल्यास अंगारा किंवा भाकरतुकडा उतरवणे ही अंधश्रद्धा, कारण त्याचा उपयोग होत नाही असं कायदेशीर मत आहे. पण त्याऐवजी कोणी आयुर्वेदिक मुळी, युनानी लोशन, होमिऑपथीक गोळ्या यापैकी काही घेतलं तरी रेबीजवर त्याचा उपयोग होत असल्याचं नि:संशय सिद्ध झालेलं नाही. तेव्हा आधुनिक वैद्यकीय उपचारांची व्याख्या हवीच. कावीळ झाल्यावर गळ्यात माळा घालणे किंवा तत्सम उपायही यापैकीच. आता तर रोज वर्तमानपत्रात होलिस्टिक आणि अन्य गोलमाल शब्द वापरुन डायबेटिसवर, किडनी फेल्युअरवर, कॅन्सरवर उपचार होतात हेही म्हटलं जातं. त्यावर बंदी येणार का? की या मात्र खर्‍या वैद्यकीय थेरपीज - (कारण त्यावर अमुक लाख लोक विश्वास ठेवतात आणि त्या अमुक हजार वर्षे चालत आलेल्या आहेत) - ?? अमुक लाख लोकांचा विश्वास आणि अमुक शे / हजार वर्ष अस्तित्व या कंडिशन्स तर गंडेदोरे, मंत्रतंत्र, अंगारा, उतारा, यांनाही लागू पडतात. मग "उपचार" याचा "तर्काधारित" अर्थ कोणता? की हे कलम हा देखील एक उपचारच?

मुळात कायद्याने अंधश्रद्धा दूर होतील का या अत्यंत मूलभूत प्रश्नाविषयीच माझ्या मनात मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. अशा कायद्याने केवळ कारवाईसाठी हत्यार म्हणून आणखी एक कायदा अस्तित्वात असणे, याखेरीज काय साध्य होईल?

प्रसूतिपूर्व लिंगचाचणी, अंधश्रद्धा हे कायदा करण्याचे विषय आहेत का? सरकारने "अंधश्रद्धा" अशा अत्यंत "अ‍ॅम्बिग्वियस" शब्दावर आधारित कायदा बनवावा का? सरकारचा हस्तक्षेप लोकांच्या आयुष्यात कितपत असावा? की अंधश्रद्धांचे घातक आउटपुट्स हे कोणत्याही इतर शोषणाच्या / पिळवणुकीच्या / फसवणुकीच्या घातक परिणांमासारखेच असतात हे मान्य करुन आणि चालू कायद्याच्या केवळ अंमलबजावणीने त्याला आळा घालण्याची इच्छाशक्ती दाखवणं इतकंच योग्य ठरेल??

वेगळी चर्चा अपेक्षित असली तर वेगळा धागा काढला तरी उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंचे मुद्दे हे कायद्याच्या प्रारुपाच्या चर्चेमधे या अगोदरही येत असत. वरील प्रकारच्या कृत्या या अंधश्रद्धा या कारणाशिवायही गुन्हे आहेतच हे मान्यच आहे. परंतु गुन्ह्याचा हेतु हा या ठिकाणी बदलत असल्याने गुन्हा तोच असला तरी त्याच्या सोशल डॉक्युमेंटेशन वेगळे होते. नरबळी हा खून असला तरी अंधश्रद्धेतुन दिलेला नरबळी हा इथे खुनापेक्षा वेगळा होतो.
काही तज्ञांच्या मते अंधश्रद्धेमुळे होणारी हानी ही समाजविघातक आहे हे मान्य पण त्या साठी प्रचलित असलेले कायदे जरी प्रभावीपणे राबवले तरी देखील अंधश्रद्धांच्या दुष्परिणामांवर वचक बसू शकतो. त्यासाठी स्वतंत्रच कायदे केले पाहिजेत असे नाही.
मुद्दा असा येतो कि कायदा करुन अंधश्रद्धा कमी होतील का? त्यावर काही लोक म्हणतात त्या कायदा न करुन ही कमी होतील असे नाही. प्रबोधन हा भाग अपरिहार्य आहे हे मान्यच आहे. पण केवळ प्रबोधनाने समाज बदलेल असे नाही. त्याला दंडशक्तीची जोड असावीच लागते. सतीची प्रथा ही काही केवळ प्रबोधनाने दूर झाली नाही. सशक्त कायदा केला व त्याची अंमलबजावणी केली तेव्हा ती वेगाने आटोक्यात आली. कायद्याचा दुरुपयोग होईल या आक्षेपा वरही हा धोका प्रत्येक कायद्याबाबत लागू होतो असे उत्तर देण्यात येते. अंधश्रद्धा या शब्दाची काय व्याख्या करायची हा प्रश्न अनुत्तरीत असल्याने ज्या निखालस अंधश्रद्धा आहेत अशा बाबतीतच यादी केली आहे. मसुद्याच्या प्रारुपात अनेकवेळा काटछाट झाली आहे. मसुद्यात श्रद्धा अंधश्रद्धा धर्म देव असे शब्द कुठेही आलेले नाहीत. कारण हा कायदा एखाद्या धर्माविरुद्ध वा देवाविरुद्ध आहे अशी हाकाटी होउ नये.
अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन होणे ही गोष्ट अशक्य आहे. मानवी मेंदुत भावभावना यांचे स्थान जोपर्यंत अबाधित आहे तो पर्यंत हे घडणे अशक्य. तरीपण त्यातून होणार्‍या समाजविघातक गोष्टींवर काही नियंत्रण ठेवता यावे म्हणुन चाललेला हा खटाटोप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सहमत आहेच
अजून दोन मुद्दे
१. वरील मुद्दे हा सारांश असावा. यातील काही 'टर्म'च्या व्याख्यात मूळ प्रस्तावात अधिक विस्ताराने व नि:संदिग्धपणे दिल्या असतील असे अपेक्षित आहे.
२. कायदा होण्याचा वेगळा फायदा म्हणजे समाजाच्या नजरेत ही कृत्ये एक "गुन्हा" म्हणून गणली जातात. ही कृत्ये वाईट आहेत, करणे मूर्खपणाचे आहे किंवा त्याने तुम्हालाच त्रास होईल असे म्हणून सगळेच जण ते टाळतील असे नाही पण सदर गोष्ट करणे हा कायदेशीर गुन्हा आहे म्हटले की त्या मार्गाने जाणार्‍यांवर वेगळा परिणाम होऊन त्यात घट होईल असा तर्क अगदीच चुकीचा ठरू नये!

मागे एका धाग्यात म्हटले तसे खून, फाशी व दयामरण म्हटले तर सारखेच - दुसर्‍याने जीव घेण्यासारखे आहे पण तरी वेगवेगळे आहे. त्यातील दोन गोष्टींना कायद्याची मान्यता नाही, फाशीला आहे. उदाहरण अगदी चपखल नसले तरी समांतर ठरावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अंधश्रद्धा या शब्दाची काय व्याख्या करायची हा प्रश्न अनुत्तरीत असल्याने ज्या निखालस अंधश्रद्धा आहेत अशा बाबतीतच यादी केली आहे.

निखालस वगैरे असे शब्द वापरल्याशिवाय आपण या बाबतीत पुढे जाऊच शकत नाही. आणि अशा शब्दांना काही अ‍ॅबसोल्यूट अर्थ नसतो.

मसुद्यात श्रद्धा अंधश्रद्धा धर्म देव असे शब्द कुठेही आलेले नाहीत. कारण हा कायदा एखाद्या धर्माविरुद्ध वा देवाविरुद्ध आहे अशी हाकाटी होउ नये.

हेच तर.. हे टाळायचे, ते टाळायचे आणि अधलेमधले काहीतरी प्रोहिबिट करायचे अशा स्वरुपाचा "कायदा" मूळ कसे धरणार? आत्तापर्यंत धरले नाही याचंही कारण इथेच असेल का हा विचार केला पाहिजे.. कायद्यात पळवाटा अपरिहार्य असतीलही पण पळवाटांनाच कायदा म्हणायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही टिपणे असावीत. प्रत्यक्ष कायद्यातील शब्द, तरतुदी अधिक तोलून मापून ठरवल्या असाव्यात असे समजतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वटहुकूम काढणे योग्य नव्हते असे वाटते. वटहुकूम म्हणजे सहा महिन्यांपुरताच. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इतक्यासाठी कुणाला खरंच जीव गमवावा लागतो का?

आपण लिहिलेल्या १२ कलमांमधे १२ मुख्य व्यवसाय आणि कितीतरी उपव्यवसाय आहेत. (सत्यनारायण, वास्तूशांती, इ यांना निरुपद्रवी मानले गेले आहे म्हणून अपेक्षाभंग झाला आहे) संदिग्ध आणि बुळबुळित कायदा असता तर या व्यवसायांना फरक पडला नसता. या इंडस्ट्रीची एकूण उलाढाल खूप नसणार असे मला वाटते पण जिथे वीस रुपयात खुनाची सुपारी दिले जाते तिथे काहीही होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तपशिलांबद्दल धन्यवाद. सर्व कलमांचा हा सारांश वाचला की एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. यात कुठेही अमुक तमुक पूजा, मंत्र, तंत्र वगैरे करायला बंदी नाही. स्वांतसुखाय हवं ते करा. मात्र लोकांमध्ये असलेल्या या गोष्टींच्या शक्तीविषयक विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांना नुकसान पोचवण्यावर बंदी आहे. छळ, शोषण, लुबाडणुक हे अपराध आहेत. म्हणजे सुरी वापरून स्वतःसाठी कांदा कापायला काहीच हरकत नाही. पण ती वापरून इतरांना धमकावणं, जखम करणं किंवा खून करणं हा अपराध आहे. हे व्यवधान पाळलेलं दिसतं.

इतक्या स्पष्टपणे 'फसवणूक हा अपराध, लैंगिक शोषण हा अपराध, खोटं बोलणं हा अपराध, नरबळी देणं हा अपराध' असं प्रत्येक कलमात लिहिलेलं असतानाही नक्की कुठच्या सुधारणा आवश्यक आहेत हे कळलं नाही. या सुधारणांचा पाठपुरावा करण्यासाठी जीव का गमवावा लागतो ही पुढचीच गोष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनही भगव्यांना चर्चा हवीच आहे का?

चर्चा आधीतरी हवी होती का?

"आमचा या कायद्याला विरोध आहे" असं म्हणताना या एवढ्या तपशीलात काय पटलेलं, आवडलेलं नाही याबद्दल एकही अक्षर नाही. फक्त विरोध. फेसबुकावर, प्रत्यक्षात ऐकलेल्या गोष्टींमधेही काहीतरी ऐकून, अर्धवट माहितीवर आधारित ब्रेनवॉशयुक्त विरोध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वास्तु, नांवाचे शास्त्र आहे असे सांगून पैसे मिळवणे हे पण त्यांत घालायला हवे होते.
झालंच तर, नांवाचे स्पेलिंग बदलून देणे, 'अमुकाय' नमः असे लिहून भक्तांकडून वह्या भरवून घेणे, अ‍ॅक्युप्रेशर नांवाखाली ,लोकांचे शरीर काळेनिळे करणे, स्त्रियांना नको तिथे हात लावणे, इत्यादि इत्यादि गोष्टी पण त्यांत आणल्या पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिपणे वाचणे उपयोगी वाटले.

वटहुकूम हा तात्पुरता असतो, विधिवत कायदा हवाच हवा - नितिन थत्त्यांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वटहुकूम काढल्याने हुरळून जायला नको असे वाटण्याचे कारण म्हणजे या वटहुकुमास सहा महिन्यात विधीमंडळाची मंजूरी न घेतल्यास तो आपोआप रद्द होईल. विधीमंडळाच्या मंजूरीसाठी सहमती हवी (जी सतरा अठरा वर्षात बनली नाही ती सहा महिन्यात कशी होणार?)

अवांतर: वटहुकुम काढण्याचा दुसरा धोका असा की अण्णा हजारे टाइप लोकांना बळ मिळण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

विधीमंडळाच्या मंजूरीसाठी सहमती हवी (जी सतरा अठरा वर्षात बनली नाही ती सहा महिन्यात कशी होणार?)

पुर्र्वार्ध सत्य आहेच. कंसातील उत्तरार्धाबद्लः
सद्य घटनेनंतर विरोध करणे तितकेसे सोपे रहाणार नाही. अश्यावेळी जर मुख्यमंत्री चतुर राजकारण खेळत असतील तर ते तितके निषेधार्ह ठरू नये. वटहूकूम काढल्यावर हे विधेयक हिवाळी अधिवेशनात चर्चेला घेणे घटनात्मकदृष्ट्या गरजेचे होईल. जर ते मंजुर झाले (आहे तसे किंवा सभागृहाने मंजूर केलेल्या सुधारणांसहित) तरी सरकारला मार्क मिळतील आणि मंजूरच होऊ शकले नाही तर सरकारला पुढिल निवडणुकीसाठी मुद्दा मिळेल.

अर्थात, एखादे विधेयक (कितीही चांगले असले तरी) लगेच मंजूर झाले पाहिजे ही अपेक्षा ठीक पण ते विधेयक केवळ एखाद्या (कितीही महत्त्वपूर्ण व आदरणीय) व्यक्तीच्या जाण्यामुळे लगेच मंजूर व्हावे (हा दुर्विलास असला तरी) लोकशाही तत्त्वाला फारसे धरून वाटत नाही हे खरेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्यात वारकार्‍यांच्या विरोधाचे नेमके कारण काय हे अजूनहि कळले नाही, कुणी सांगू शकेल काय?
झालेली घटना वाईटच आहे पण "आहे तरी काय ह्या कायद्यात?' हे उत्सुकतेपोटी तरी बघणार्‍यांची संख्या गेल्या दोन दिवसात वाढलेय, त्यावर चर्चा होतेय.. हे खरं!
व्यक्तिस्वातंत्र्याच्या संदर्भात ह्या कायद्याचे परिणाम जाणून घेण्यास उत्सुकता आहे, उदा.
दशक्रीया विधी किंवा सत्यनारायणाची पूजा ह्यावर माझा विश्वास आहे. एक गुरूजी आहेत ते भजन, किर्तन, प्रवचन ह्या माध्यमातून अशा गोष्टी कराव्यात ह्याची जाहिरात करतात, प्रसंगी आग्रह करतात, अगदी भीतीही दाखवतात (न केल्यास काय होईल वगैरे!) आता मी व्यक्तिशः त्यांच्यावरील विश्वासामुळे/ पूर्व अनुभवामुळे त्यांना किंवा त्या गोष्टी करणार्‍यांना पैसे देऊन त्यामोबदल्यात पूजा किंवा विधी करवून घेऊन, माझे समाधान/ मनःशांती विकत घेतो आहे, हे सगळं मी स्वेच्छेने करतो आहे. तर ह्या सगळ्या व्यवहारात फसवणूक आहे की नाही ते कसं ठरवणार? कोण ठरवणार? आणि हाच तर्क बाबा, भोंदू वगैरेंच्या बाबतित कसा लावणार? बाबांच्या नादी लागणारे लोक सदसदविवेक बुद्धी गमावलेले असतात (बहुतेकवेळी) त्यामुळे फसवणूक करणारा आणि होणारा हे दोघेही राजी खुषीच्या मामल्यात राहाणार. तसंही, फ्सवणूक झालेल्याला जेव्हा जाणवतं की आपण नागवलो गेलोय तो आजही पोलिसात जातोच मग हा कायदा वेगळं काय करतोय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- प्रशांत उपासनी

फ्सवणूक झालेल्याला जेव्हा जाणवतं की आपण नागवलो गेलोय तो आजही पोलिसात जातोच मग हा कायदा वेगळं काय करतोय?

आधी पोलिसात गेल्यावर पोलिस एका पातळीहून अधिक काही करू शकत नसत. आता हा कायदा पोलिसांना कारवाई करण्याचा, न्यायालयांना अश्या गुन्ह्याबद्दल ७ वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावण्याची अनुमती देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कालच रात्री आईबीएन लोकमतवर श्याम मानवांनी हा कायदा आणि त्याची ११ कलमे समस्त महाराष्ट्राच्या जनतेला आणि अनुषंगाने च्यानेलच्या प्रेक्षकांना वाचून दाखविली.(अशी माहिती देण्याचा प्रकार ह्या आधी त्यांनी का केला नाही असा प्रश्न पडला. असो)

ह्या कार्यक्रमात वागळे ह्यांनी शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार ह्यांना बोलाविले होते पण ते येऊ शकले नाहीत कारण चर्चा करायची तर कायद्याचा मसुदा काय आहे तो माहित असणे अपेक्षित असते पण त्या दोन्ही आमदारांना तो मसुदा माहीत नसल्याने चर्चा कशी करणार.
मग गेली अनेक वर्षे जी चर्चा आणि विरोध झाला ते काय होतं...

ह्या कलमांना श्याम मानवांनी अधिक स्पष्ट केले

ह्या संपूर्ण कायद्यात कोठेही कोणत्याही धर्माचा उल्लेख केलेला नाही. हा कायदा धर्माला नाही तर व्यक्तींना लागू होतो.

ह्यात ट्रस्टना वगळण्यात आलेले आहे. बऱ्याच जणांना असे वाटायचे की आमच्या धर्मादाय ट्रस्टना बेकायदेशीर ठरवले जाईल पण ते कलम आता नाही. पण ट्रस्ट मधील व्यक्ती मात्र इतर कलमान्वये गुन्हेगार ठरू शकतील.

२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल.

>> किंवा त्या व्यक्तीचा आणि किंवा चमत्काराचा प्रचार किंवा प्रसार करणे गुन्हा ठरेल. <<

ह्या कलमाला वारकऱ्यांचा विशेष विरोध होता. त्यांचे म्हणणे असे की आमच्या संतानी जे चमत्कार केले, मग ते तुकाराम असोत किंवा ज्ञानदेव असोत किंवा गोरा कुंभार असोत, त्यांच्या चमत्कारांचा प्रसार किंवा प्रचार केला म्हणून आम्हालाही हे गुन्हेगार ठरवतील.

पण असं नाहीये. कायदा जेव्हा पासून लागू होतो त्या काळापासून होणाऱ्या चमत्कारांनाच आणि त्या द्वारे होणाऱ्या प्रचार आणि प्रसारांनाच तो लागू होतो, त्या आधीच्या नाही. अश्या व्यक्ती किंवा चमत्कार केवळ आपल्या धर्मातच नव्हे तर इतर धर्मात देखील आहेत. मग ते चमत्कार साई बाबांचे, इतर बाबांचे असतील किंवा आपल्या इतर संतांचे. त्यांचा प्रसार किंवा प्रचार करणे हा गुन्हा ठरत नाही.

३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा.

ह्यात स्वतःच्या शरीराला चाबकाने मारणे ज्यात जीवघेणा जखमा होत नाही, स्वतःच्या छातीवर मोठ मोठ्याने हात मारणे ज्यात जीवघेणा जखमा होत नाही, गुन्हा ठरत नाही.

४) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे.

ह्या आधी पोलिसांना खुनाचा मग तो नरबळी का असेना त्याच्या गुन्हेगारांना पकडू शकत होते, पण ज्या व्यक्तीने नर बळीसाठी उद्युक्त केले तो गुन्हेगार ठरत नव्हता. कारण त्याने फक्त नरबळी द्यावा लागेल किंवा द्या असे सांगितले असेल पण ह्या व्यक्तीचा अमुक व्यक्तीचा बळी द्या असे सांगितले नसावे. हा संशयाचा फायदा त्याला मिळत असे.
पण आता नरबळीसाठी उद्युक्त जरी केले मग त्यासाठी कोण्या अमुक व्यक्तीचे नाव सांगण्याची गरज नाही, तो गुन्हेगार ठरणार आहे.

६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे.
>> ह्यात सैतान हा शब्द मुद्दाम वापरला आहे कारण हा हिंदू धर्मेतर शब्द आहे. इतर धर्मात अश्या प्रकारे एखाद्याला सैतान ठरविणे आता गुन्हा ठरणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

श्याम मानवांनी हा कायदा आणि त्याची ११ कलमे समस्त महाराष्ट्राच्या जनतेला आणि अनुषंगाने च्यानेलच्या प्रेक्षकांना वाचून दाखविली

बाकी सगळे ठिक पण कायद्याला शाम मानवांनी लावलेला अर्थ अपेक्षित असेलच असे नाही. कायद्याचा अर्थ कोर्ट लावेल तोच अंतिम ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि यासाठी अजूनही भगव्यांना चर्चा हवीच आहे का?

विरोधी पक्षाचे काम विरोध करणे आहे. सरकारने विरोधी पक्षासोबत या बिलाकायद्यासंबंधी आजतागायत एकही चर्चा केली नाही. अध्यादेश काढून हा कायदा अंमलात आणावा हे दुर्दैव आणि मूर्खपणा दोन्ही आहे.

या बिलाचे स्वरुप पाहता याला विरोध होणे गरजेचे नव्हते. ज्यांनी केला त्यांनी 'बिल माहीत नव्हते' म्हणून केला. वारकर्‍यांनी नक्की कशाला विरोध केला ते पून्हा वाचा. 'आमचे चमत्कार करणारे संत भोंदू होते. आम्ही त्यांना मानतो म्हणून आम्ही गुन्हेगार ठरवले जाणार. तेव्हा बिल काय आहे ते नीट सांगा.' हा आणि हाच विरोध वारकर्‍यांचा होता.

इथला भगवा हा शब्द सगळ्या हिंदुना लागू पडतो, जे नेहमी भाजपला निवडणूकीत पाडतात. कृपया योग्य शब्द वापरा.

हल्ली स्वत्व नसलेली सरकारे भारतात आहेत. समाजावर दूरगामी परिणाम असणारे विधेयके अध्यादेशावर लागू केली जात आहेत. सरकारांना धमक नावाचा प्रकार नाही. १६ वर्षे झोप घ्यायची मग खाडकन उठून मॅगी बनवून द्यायची याची सवय करून घ्यावी लागणार. कसे ते पहा -
१. निर्भया केस - १-२ महिन्यात जस्टीस वर्मांनी नवा कायदा बनवला.
२. शेतकर्‍यांच्या आत्महत्यचे आकडे प्रसिद्ध झाले - १ महिन्यात कर्ज माफ
३. कुपोषणाचे आकडे प्रसिद्ध झाले - अन्न सुरक्षा अध्यादेश
४. दाभोळकरांची हत्या - दुसर्‍या दिवशी अध्यादेश
५. अण्णा उपोषण - १३ दिवसात लोकपालाला १३ पट गती

अंधश्रद्धा बिलामधे केवळ अपराधासमान कुप्रथांची यादी आहे. 'निर्मूलनासाठी' अजून खूप काही लागतं. आरोपीवर आरोप लावताना अजून एक कोड उपलब्ध करून दिल्याने फार फरक पडत नाही. निर्मूलन करण्यासाठी सवती प्रशासकीय संस्था लागते. बाबा माझ्यापुढे चमत्कार करणार आणि मी त्याला पैसे देणार हे यात तिसरा कोणी घुसला नाही तर असेच चालू राहणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गवि आपल्या ह्या प्रतिसादात जे मांडतात त्याची थोडक्यात मांडणी करायची झाली, तर ती अशी होईल - ह्या कायद्यानुसार गुन्हा मानल्या गेलेल्या कृती इतर कायद्यांनुसार अगोदरच गुन्हा आहेत. मग वेगळा कायदा कशासाठी?

समाजसुधारणेविषयीच्या इतर कायद्यांबाबतीतदेखील मग असंच पाहता येईल -
एखाद्या पत्नीला सती जायला लावणं हा एक प्रकारचा खून आहे. मनुष्यवधासाठी कायदा असताना सतीविरोधात वेगळा कायदा कशाला?
हुंडा मागणं म्हणजे एक प्रकारचं खंडणी उकळणं आहे. त्यासाठी कायदा आहे. मग हुंड्याविरोधात वेगळा कायदा कशाला?
जातिविषयक शिव्या देणं ही एक प्रकारची नालस्ती/बदनामी आहे. मंदिरात प्रवेश नाकारणं हा घटनेनं दिलेल्या संचारस्वातंत्र्याचा भंग आहे. विशिष्ट जातीच्या लोकांचा छळ झाला किंवा त्यांना मारहाण वगैरे झाली, तर छळ्/मारहाण वगैरेंसाठी कोणत्याही नागरिकाला जे कायद्याचं संरक्षण उपलब्ध आहे तेवढंच पुरेसं आहे. ह्या सगळ्यासाठी वेगळे कायदे कशाला?

मला वाटतं ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, तर त्यात आपल्या वरच्या प्रश्नांचीही उत्तरं मिळावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपली कारणमिमांसा आवडली गेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपण उद्धृत केलेल्या इतर उदाहरणांत स्पेसिफिक केसिससाठी स्वतंत्र कायदे मेरिट करत असतीलही किंवा नसतीलही - प्रत्येक उदाहरणाचे वेगवेगळे विवेचन / उहापोह करून त्या प्रत्येक स्पेसिफिक केसमध्ये स्वतंत्र कायदा वॉरंटेड होता किंवा नव्हता हे पाहणे शक्य आहे, परंतु तो स्वतंत्र चर्चेचा विषय असू शकतो - परंतु या सर्व केसिसमध्ये स्वतंत्र कायदे वॉरंटेड होते असे जरी तूर्तास चर्चेच्या सोयीकरिता मानले, तरीही, त्यामुळे याही केसमध्ये स्वतंत्र कायदा हा (प्रघाताने) आपोआप वॉरंटेड ठरतो, असे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)

त्या इतर उदाहरणांमधून जर काही प्रघात पडत असेलच, तर तो इतकाच, की जनरलाइज़्ड कायदा उपस्थित असतानासुद्धा, जर का काही विशेष गरज किंवा कारणमीमांसा असली, तर त्याकरिता स्पेसिफिक केसमध्ये स्वतंत्र कायदा करणे हे वॉरंटेड / रास्त / पर्मिसिबल असू शकते. मात्र, अशी काही विशेष गरज किंवा कारणमीमांसा आहे, हे आपोआप गृहीत धरता येईलसे वाटत नाही; ते दाखवून देणे गरजेचे राहील, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या. माझ्या अल्पमतीप्रमाणे लिहिले आहे.)

सबब, त्या इतर उदाहरणांचे बाबतीत स्वतंत्र कायदे केले गेले, हा दाखला येथे उपयुक्त ठरेलसे वाटत नाही. या ठिकाणी असा स्वतंत्र कायदा वॉरंटेड असेलही, किंवा नसेलही; परंतु तसा तो असल्यास, तो का आहे, हे स्पष्ट करणे इष्ट आहे, असे वाटते; केवळ 'त्या उदाहरणांत स्वतंत्र कायदे केले होते ना, तसेच इथेही' असे म्हणून पुरेलसे वाटत नाही. अशी विशेष गरज कोणास स्पष्ट होत नसल्यास (आणि ती मलाही स्पष्ट झालेली नाही हे येथे प्रामाणिकपणे कबूल करतो), ती विशेष गरज मानण्याचा वा दाखवून देण्याचा चेंडू हा शंका उपस्थित करणार्‍याच्या न्यायालयात नसून, प्रकरण पलीकडच्या न्यायालयात प्रविष्ट आहे (मराठीत: 'द बॉल इज़ इन द अदर कोर्ट') असे नम्रपणे सुचवू इच्छितो.

सबब, गविंनी उपस्थित केलेला प्रश्न अवाजवी/फ़िज़ूल नसावा, असे मत नोंदवितो.
===============================================================================================

बाकी, आपण उद्धृत केलेल्या उदाहरणांपैकी किमान एका उदाहरणात विशेष कायद्याची गरज मला माझ्या अल्पमतीनुसार दिसते.

मंदिरात प्रवेश नाकारणं हा घटनेनं दिलेल्या संचारस्वातंत्र्याचा भंग आहे.

मंदिरात प्रवेश हे घटनेने दिलेल्या संचारस्वातंत्र्याच्या अँबिटमध्ये कितपत बसते, याबाबत साशंक आहे.

पारशांच्या अग्यारीमध्ये बिगरपारशांना बहुतकरून मज्जाव असतो. तेथे घटनादत्त संचारस्वातंत्र्यास बाधा पोहोचते, असे वाटत नाही.

तेव्हा, दलित हे हिंदू आहेत, असे साधारणतः मानले जात असतानासुद्धा जर त्यांना हिंदूंच्या मंदिरात प्रवेश नाकारला जात असेल, तर 'घटनादत्त संचारस्वातंत्र्या'चा दाखला त्यांना तो प्रवेश हक्काने मिळवून देण्यास पुरेसा आहे, याबद्दल साशंक आहे. तेव्हा, त्या परिस्थितीत, दलितांचा तो हक्क अधोरेखित करण्याकरिता असा स्वतंत्र कायदा बनवणे हे कदाचित आवश्यक असू शकते.

अन्यथा, असा स्वतंत्र कायदा करणेचे नसेल, तर घटनादत्त संचारस्वातंत्र्याच्या अलिखित / अंडरस्टूड मर्यादांचा (अंमलबजावणीने) विस्तार करणे शक्य असावे. परंतु मग त्या परिस्थितीत पारशांना आपल्या अग्यारींत इतरांना प्रवेश नाकारण्याच्या अधिकारास (जो असावा, की नसावा, हा भाग अलाहिदा; मला माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यात काही गैर असे आढळत नाही.) चाट द्यावी लागते.

मात्र, या स्पेसिफिक इन्स्टन्समध्ये काही विशेष कारणांमुळे/उपस्थित कायद्यांच्या अपुरेपणामुळे विशेष कायदा वॉरंटेड आहे, याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी सरसकट विशेष कायदे वॉरंटेड असावेत, असा होऊ नये. अन्य परिस्थितींत काही विशेष कायदे वॉरंटेड असल्यास तशी विशेष कारणमीमांसा / उपस्थित कायद्यांचा अपुरेपणा दाखवून देता यावा, ही अपेक्षा अनुचित नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंनी उपस्थित केलेला कायद्याच्या आवश्यकतेचा प्रश्न, चिंतातुरजींनी प्रश्न सोडवण्यासाठी मांडलेली समान उदाहरणाची पद्धत आणि नवी बाजू यांनी दिलेले मंदिर आणि अग्यारीचे उदाहरण !!!

गुन्ह्यांचं विभिन्नीकरण करताना कुठे थांबायचं, घटनात्मक मूलभूत हक्कांची अंमलबजावणी आणि तीच करताना इतरांच्या मूलभूत हक्कांत लूडबूड या सीमारेखा कशी शोधायची???

चर्चा आवडली आहे पण समाधानकारक उत्तर अजून मिळालं नाही. वाट पाहतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> या सर्व केसिसमध्ये स्वतंत्र कायदे वॉरंटेड होते असे जरी तूर्तास चर्चेच्या सोयीकरिता मानले, तरीही, त्यामुळे याही केसमध्ये स्वतंत्र कायदा हा (प्रघाताने) आपोआप वॉरंटेड ठरतो, असे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.) <<

असा, म्हणजे स्वतंत्र कायदा हवाच, असा माझा दावा नाही. माझ्या मते दोन वेगवेगळे राज्यव्यवहारप्रवाह आहेत. त्यातल्या एकामध्ये समाजातल्या अनिष्ट रुढींविरोधात कायदे करून सरकार समाजाला सुधारू पाहतं; आणि एकात मूलभूत मानवी हक्क अबाधित राहतील, इतपतच कायदे सरकार करतं आणि बाकी सगळं त्या कायद्यांच्या चौकटीत बसवतं. कोणाला कोणता राज्यव्यवहारप्रवाह योग्य वाटेल हे सापेक्ष आहे. जर सती, अस्पृश्यता, हुंडा वगैरे प्रथांच्या विरोधात समाजघटकांना संरक्षण देण्यासाठी कायदे हवेत, पण जादूटोणा, करणी वगैरेंसाठी नकोत असं मत असेल तर त्या मतामागचं, म्हणजे कोणत्या रुढींविरोधात कायदे असावेत आणि कोणत्या रुढींविरोधात ते नसावेत, ह्या मागचं तर्कशास्त्र जाणून घ्यायला मला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जर सती, अस्पृश्यता, हुंडा वगैरे प्रथांच्या विरोधात समाजघटकांना संरक्षण देण्यासाठी कायदे हवेत, पण जादूटोणा, करणी वगैरेंसाठी नकोत असं मत असेल तर त्या मतामागचं, म्हणजे कोणत्या रुढींविरोधात कायदे असावेत आणि कोणत्या रुढींविरोधात ते नसावेत, ह्या मागचं तर्कशास्त्र जाणून घ्यायला मला आवडेल.

(१) सती, अस्पृश्यता, हुंडा वगैरे प्रथांच्या विरोधात समाजघटकांना संरक्षण देण्यासाठी कायदे आवश्यक होतेच, असा दावा मी केलेला नाही. (आवश्यक नव्हते, असाही दावा केलेला नाही.) हे कायदे (जेव्हा बनवले तेव्हा, आणि/किंवा कदाचित आताही) आवश्यक असतीलही अथवा नसतीलही, आणि जेव्हा ते बनवले गेले, तेव्हा त्यांच्या आवश्यकतेबद्दल उहापोह कदाचित झाला असेलही, किंवा नसेलही. (मला कल्पना नाही.) आणि आजही त्या प्रत्येक कायद्याची आवश्यकता तपासून पाहता येईलही, आणि अशी तपासणी ही उद्बोधक ठरेल, याबाबत निदान मला तरी शंका नाही. (कदाचित अशा तपासणीत असा एखादा कायदा हा अनावश्यक होता/अनावश्यक आहे, असे लक्षात आल्यास, तो रद्द करणे आवश्यक आहे किंवा कसे, आणि/किंवा अशा रद्दीकरणाचे फायदे/तोटे/आवश्यकता/अनावश्यकता/तातडी/मूट असणे वगैरे बाबींचाही उहापोह होऊ शकेल, आणि त्याहीपुढे, असा उहापोह हा उपस्थित सज्जनांऐवजी पॉवर्स-द्याट-बींमध्ये झाला, तर त्यामुळे काही सकारात्मक बदल - आवश्यक असल्यास - घडण्याची शक्यताही मी नाकारू शकत नाही.)

मात्र, हे सर्व कायदे हे आता fait accompli आहेत, आणि त्याउपर पश्चाद्दृष्टीने त्यांमुळे फार मोठा असा काही तोटा झालेला मला तूर्तास दृग्गोचर होत नाही, सबब अशा तपासणीची, त्यांबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची, तातडी, तीही तूर्तास, मला जाणवत नाही, इतकेच.

(२) जादूटोणा, करणी यांसाठी स्वतंत्र कायदे नकोत, असा दावा मी (अद्याप तरी) केलेला नाही. (याविषयी स्वतंत्र कायदे हवेत, असाही दावा केलेला नाही.) मात्र, तूर्तास या विशिष्ट कायद्याचा प्रश्न ऐरणीवर असताना त्याच्या आवश्यकतेबद्दलची शंका उपस्थित करणे (त्यामागील तर्कशास्त्र काहीही असो) मला अवाजवी वाटत नाही.

(बाकी, गरज नसताना, केवळ वाटते म्हणून, कायदे बनवण्यासाठी म्हणून कायदे बनवणे - आणि त्यायोगे कायद्याचे जंजाळ आवश्यकतेबाहेर वाढवणे - हेही मला पोषक वाटत नाही. अन्यथा, एखाद्या स्पेसिफिक अन्यायाच्या निवारणार्थ इतर पर्यायांच्या अभावी अथवा इतर उपलब्ध पर्याय / प्रस्थापित कायदे हे निष्प्रभ ठरले असता अथवा होणार्‍या अन्यायाच्या तुलनेत योग्य तो न्याय देण्यास अपुरे पडत असता असे स्वतंत्र कायदे बनवणे हे आवश्यक ठरू शकते, हे अमान्य असण्याचे काही कारण नसावे. मात्र, अशी आवश्यकता गृहीत धरली न जाता अगोदर तपासली जाण्याची अपेक्षा अवाजवी नसावी.)

तूर्तास इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> एखाद्या स्पेसिफिक अन्यायाच्या निवारणार्थ इतर पर्यायांच्या अभावी अथवा इतर उपलब्ध पर्याय / प्रस्थापित कायदे हे निष्प्रभ ठरले असता अथवा होणार्‍या अन्यायाच्या तुलनेत योग्य तो न्याय देण्यास अपुरे पडत असता असे स्वतंत्र कायदे बनवणे हे आवश्यक ठरू शकते, हे अमान्य असण्याचे काही कारण नसावे. <<

आधी सांगितल्याप्रमाणे माझा प्रश्न असा आहे -
काही अनिष्ट प्रथांविरोधात सरकारनं कायदे करणं योग्य आहे, पण काही अनिष्ट प्रथांविरोधात कायदे करू नयेत असं कुणाचं मत असेल, तर त्या मागचं तर्कशास्त्र जाणून घ्यायला मला आवडेल. वरच्या प्रतिसादात एक मुद्दा दिसतो तो असा -
'होणाऱ्या अन्यायाच्या तुलनेत प्रस्थापित कायदा निष्प्रभ किंवा अपुरा पडत असला तर अशा प्रथांविरोधात नवा कायदा करता येईल.'

इतर मुद्द्यांच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला वाटते,'न'वी बाजूंना म्हणायचे आहे की, 'ह्या नवीन कायद्याची आवश्यकता काय' या प्रश्नाला 'सती,हुंडाबळी वगैरेसाठी वेगळे कायदे का बनविले' हा प्रतिप्रश्न योग्य उत्तर ठरू शकत नाही. (कदाचित) असे ही असू शकेल की त्याकाळी नवीन कायद्याची आवश्यकता नसतानाही (म्हणजे आधीच्या कायद्यांमधूनच कारवाई करता येणे शक्य असताना) हे कायदे बनविले गेले. त्या कायद्यांबाबत (कदाचित) तसे झाले असले, म्हणून हा कायदाही तशाच प्रकारे बनविण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक कायदा बनविताना त्याची आवश्यकता विचारणे ह्यात मला चुकीचे वाटत नाही.
तुम्ही तुमच्या मूळ प्रतिक्रियेत हे आधीचे कायदे वेगळे का बनविले गेले याचा विचार करावा असे म्हटले आहे. त्या कायद्यांमधील आणि ह्या कायद्यातील साम्य (म्हणजे आवश्यकतेच्या दृष्टीने) तुम्ही सांगितलेत, तर पुढचे (आलेले आणि येणारे) प्रश्न टळतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तुम्ही तुमच्या मूळ प्रतिक्रियेत हे आधीचे कायदे वेगळे का बनविले गेले याचा विचार करावा असे म्हटले आहे. त्या कायद्यांमधील आणि ह्या कायद्यातील साम्य (म्हणजे आवश्यकतेच्या दृष्टीने) तुम्ही सांगितलेत, तर पुढचे (आलेले आणि येणारे) प्रश्न टळतील असे वाटते. <<

मला वाटलं होतं की ते साम्य उघड आहे, पण तरीही :

  • समाजात प्रचलित अनिष्ट रुढींना अटकाव घालण्यासाठी ते कायदे आहेत.
  • ह्या रुढींमुळे काही लोक इतरांचं शोषण करतात.
  • शोषित लोकांचं शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक नुकसान होतं.
  • ह्या नुकसानाकडे निव्वळ एका पीडित व्यक्तीची व्यक्तिगत हानी म्हणून पाहिलं, तर ते घटनेनं दिलेल्या मूलभूत मानवी हक्कांचा भंग होईल अशा प्रकारचं नुकसान असतं. त्यामुळे ते राज्यघटनेतल्या इतर, म्हणजे स्वातंत्र्य, समता, मालमत्तेचा हक्क वगैरे इतर कलमांखाली बेकायदेशीर ठरू शकतं.
  • परंतु ते व्यापक सामाजिक हानी करणारं नुकसान म्हणूनदेखील पाहता येतं. उदा : पुरुषप्रधान व्यवस्थेत बायकांचं होणारं नुकसान, किंवा जातिबद्ध समाजात निम्न जातींचं होणारं नुकसान, किंवा धर्मबद्ध समाजात धार्मिक नियमांचं पालन करण्याच्या दडपणामुळे होणारं नुकसान, किंवा परंपराबद्ध समाजात विशिष्ट परंपरा पालन करण्याच्या आग्रहामुळे होणारं नुकसान, वगैरे.
  • असं पाहिलं तर एक राज्यव्यवहारप्रवाह असा मांडता येतो - समाजाला ह्या हानिकारक गोष्टींपासून वाचवण्याचा विशेष मक्ता सरकारनं घ्यावा; त्यांविरोधात विशेष कायदे करावे; आणि पीडितांना अन्यायाविरुद्ध दाद मागताना विशेष संरक्षण, पोलीस तसंच न्यायव्यवस्थेचं विशेष सहकार्य मिळेल अशी व्यवस्था त्या कायद्यांद्वारे करावी.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

असं पाहिलं तर एक राज्यव्यवहारप्रवाह असा मांडता येतो - समाजाला ह्या हानिकारक गोष्टींपासून वाचवण्याचा विशेष मक्ता सरकारनं घ्यावा; त्यांविरोधात विशेष कायदे करावे; आणि पीडितांना अन्यायाविरुद्ध दाद मागताना विशेष संरक्षण, पोलीस तसंच न्यायव्यवस्थेचं विशेष सहकार्य मिळेल अशी व्यवस्था त्या कायद्यांद्वारे करावी.

समाजाला ह्या हानिकारक गोष्टींपासून वाचविण्याच्या दृष्टीने, तसेच पीडितांना अन्यायाविरुद्ध दाद मागताना विशेष संरक्षण, पोलीस तसेच न्यायव्यवस्थेचे विशेष सहकार्य पुरविण्याच्या दृष्टीने, विशेष कायद्याच्या(/कायद्यांच्या) अभावी, उपस्थित प्रस्थापित कायद्यांच्या फ्रेमवर्कात सरकारचे हात (तूर्तास) नेमके कोणत्या प्रकारे बांधले जात आहेत (कायदा-बाय-कायदा बेसिसवर, किंवा, उदाहरणादाखल या ठिकाणी, लाईन-आयटम-बाय-लाईन-आयटम बेसिसवर), की जेणेंकरोन विशेष कायद्याची(/कायद्यांची) आवश्यकता भासावी, ही पृच्छा अवाजवी नसावी.

(या प्रश्नाचे उत्तर "आम्हांस ते योग्य वाटते म्हणून" अथवा "पण... पण... पण... विशेष कायदा करण्यामागील आमचा उद्देश तर चांगला आहे ना?" अशा स्वरूपाचे नसावे, अशी आशा.)
=============================================================================================
म्हणजे नेमके कोणास?
म्हणजे नेमक्या कोणाचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरर्थक टंकले गेल्याने प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. घटना प्रत्येक नागरिकाला जिवंत राहण्याचा अधिकार देते. तसेच संपत्ती बाळगण्याचा अधिकार देते.

त्यामुळे एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीचा खून करणे किंवा एखाद्याची संपत्ती चोरणे हे घटनाविरोधी कृत्य होय. घटनाविरोधी वर्तन केल्याबद्दल टेक्निकली खुन्यावर/चोरावर देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकेल. बहुतेक सर्व गुन्हे घटनादत्त अधिकाराच्या भंगाशी सांधा जोडून दाखवता येऊ शकतील. म्हणून देशद्रोहाचा एकच कायदा असायला हरकत नाही. सर्व गुन्हे देशद्रोहच. तरीही खून, चोरी वगैरेसाठी वेवेगळे कायदे असतात.

२. काही मुद्दाम केलेले कायदे सामान्य न्यायप्रक्रियेला वेगवान बनवण्याच्या दृष्टीने, काही सामान्य प्रक्रियेला फाटा देण्याच्या दृष्टीने येतात. म्हणजे तोच गुन्हा कुठल्या अस्तित्वात असलेल्या कायद्याखाली गुन्हा धरला जात असला तरी त्याचा खटला चालताना न्यायालयांनी काही विशेष दृष्टी ठेवावी अशा हेतुने खास कायदे बनवले जातात. उदा. पोटा कायद्यात दहशतवादी कृत्यांसाठीचे खटले वेगळ्या प्रकारे हाताळण्याची तरतूद असते. किंवा कधी कधी एखादा पुरावा नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे ग्राह्य धरला जावा अशा तरतुदी असतात (ज्या सामान्य पुरावा कायद्याच्या विपरित असतात). कधी जामीन देण्यासंबंधीच्या तरतुदी अधिक कडक केल्या जातात. अर्थात अशावेळी घडलेला गुन्हा त्या विशेष कायद्याच्या कक्षेतला गुन्हा आहे असे आधी सिद्ध व्हावे लागते.

३. जात पाळणे हा घटनेनुसार गुन्हा असला तरी जातीवरून शिव्या देणे यासाठी वेगळा कायदा केला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जात पाळणे हा घटनेनुसार गुन्हा असला तरी जातीवरून शिव्या देणे यासाठी वेगळा कायदा केला जातो.

या वाक्याच्या पूर्वार्धावरुन मनात नेहमी येणारा एक प्रश्न आठवला. मॅट्रिमोनियल जाहिरातीत:

- स्वतःच्या जातीचा उल्लेख करणे (९९% जाहिरातींत असतो.)
- आंतरजातीय चालेल - SC /ST क्षमस्व असा स्पष्ट (आणि नम्र..!!) उल्लेख करणे (निदान ७५ % आंतरजातीय चालणार्‍यांपैकी जाहिरातींत असतो)
- उच्चांतर्जातीय चालेल असा उल्लेख करणं (प्रमाण वरीलप्रमाणेच) - बादवे "उच्चांतर्जातीय चालेल" या दोनशब्दी वाक्याइतका राजरोस पॅरेडॉक्स क्वचितच वाचण्यात येतो.

- अमुक एका जातीसाठीच मॅट्रिमोनियल सर्व्हिस (रजिस्टर्ड कंपनीतर्फे) चालवणे.

या सर्व किंवा त्यातील काही गोष्टी या कायद्यानुसार अमान्य ठरत नाहीत का? की कोणी फिर्याद घातली तर होईल कारवाई? कोणाकोणावर हा एक प्रश्नच आहे.

शिवाय जातीवाचक शिव्या देण्याला शिक्षा आहे, तशी जातीची स्तुती करण्याला आहे का? कारण त्यामुळेही जातीची कन्सेप्ट मानण्याला पाठिंबाच दिलेला असतो. म्हणजे कोंकणस्थ ब्राह्मण फार टापटिपीचे असतात असं म्हणणार्‍यावर फिर्याद टाकता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय जातीवाचक शिव्या देण्याला शिक्षा आहे

हे अर्धसत्य आहे.

अनुसुचित जातीवरून शिवी घालणे हा गुन्हा आहे. अन्यथा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छ्या! आजच 'जागर' वाचायला घेतले (त्यातही फक्त एकच लेख) आणि ठाई ठाई कुरुंदकरच आठवत आहेत Smile
या विषयी त्यात आलेली दोन-तीन पाने म्हणजे मार्मिकतेचा कळस आहेत!
त्यातील एक छोटे उद्धृत देतो:
जातीव्यवस्था कुणालाच नको आहे, पण तिच्या विरूद्धची टिका योग्य मार्गाने करायची कुणाचीही तयारी नाही. इतरांच्या जातीवर टिका करून जाती मोडत नसतात, त्या पक्क्या होत असतात. कारण प्रत्येक जातीत तिचे अभिमानी लोक असतातच. जातिव्यवस्था ही वरून लादलेली नाही. ती अर्थव्यवस्थेतून उगवलेली व्यवस्था आहे. विकेंद्रित अर्थव्यवस्थेत परंपरागत उद्योग स्थिर असतात. हे उद्योग त्या त्या धंदेवाईकांची सुरक्षितता निर्माण निर्माण करीत असतात. तिच्यातून हजारो वर्षांच्या ममत्वाने जाती निर्माण झाल्या आहे. आपापल्या जातिंचा धिक्कार करून आपल्या जातींचे नाव पुसून टाकायचा प्रयत्न त्या-त्या जाती-जमातीच्या लोकांनी नकेला, तर जातीव्यवस्था मोडत असते. हा प्रयत्न करणे भारतीय बुद्धीजीवींना शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपापल्या जातिंचा धिक्कार करून आपल्या जातींचे नाव पुसून टाकायचा प्रयत्न त्या-त्या जाती-जमातीच्या लोकांनी नकेला, तर जातीव्यवस्था मोडत असते. हा प्रयत्न करणे भारतीय बुद्धीजीवींना शक्य नाही.

कौल्दन्त अग्री मोरे!!! जातिव्यवस्थेच्या नावाखाली एकाच जातीला शिव्या देण्यानेही काही साधत नाही. कारण त्या जातीवर प्रखर रडार धरला तरी अन्य जातीय लोकांच्या वर्तनावर सहजीच पडदा पडतो. तस्मात जर तसे काही करायचे असेल तर सर्वांनीच त्या कामाला लागले पाहिजे. पण मुळात सर्व जातींत अशी परिस्थिती येणेच शक्य नाही, कारण जातीव्यवस्थेसंबंधी अतिशय क्लिशे र्‍हेटॉरिक सगळीकडे दृढमूल झालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरे आहे. मूळ लेखात उच्चवर्ग 'जातीव्यवस्था नको' असे का म्हणू लागला आहे? किंवा 'अडाण्यांच्या हाती सत्ता गेली' वगैरे उच्चवर्गीयांचे म्हणणे याचा खरपूस समाचार घेतला आहेच त्याचबरोबर "अनेकवर्षे सगळे ज्ञान ठराविक जातीनी आपल्याकडेच बंदीस्त करून ठेवले होते" वगैरे बोभाटा कसा फोल आहे हे ही दाखवले आहे. जर वाचले नसशील तर पुस्तक विकतच घे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनेकवर्षे सगळे ज्ञान ठराविक जातीनी आपल्याकडेच बंदीस्त करून ठेवले होते"

या बोभाट्यातला फोलपणा तर जबरीच उलगडून दाखवलाय. म्हटले तर साधे पण आजपर्यंत कुठे न वाचलेले अर्ग्युमेंट आहे ते. ते पुस्तक घेतलेय अन वाचलेयसुद्धा!!!
कुरुंदकर द ग्रेट हे बाकी खरेच आहे. त्यांच्या विचारांचे इंग्रजीत भाषांतर होणे लै गरजेचे आहे. तशी मांडणी अन्य कोणी केलेली आजपर्यंत वाचली नाही.

अवांतरः कुरुंदकरांची शिवाजी महाराजांवरची लेक्चर्स ऑनलाइन उपलब्ध आहेत. लिंक सध्या गावत नाहीये. गावली की दावतोच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवांतरासाठी देव तुझे भले करो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१ शोध शोध लवकर शोध! Smile (आमचे कष्ट वाचतील तेवढेच ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमच्याकडे डाऊनलोडवलेली आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्याकडेही आहेत डौन्लोडवलेली. पण लिंक काय मिळायला तयार नै. मिपावरील आयडी "इष्टुर फाकडा" यांनी ती मूळ अपलोडविलेली आहेत नेटवर. ते बहुतेक इथेही आहेत, आयडी भौतेक "सागर.." असा कैतरी असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धाडा की राव मला. मी इपत्ता धाडते थांबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्या बोभाट्यातल्या फोलपणातली रोचक विसंगतीही खास आहे.

ब्राह्मणांनी ज्ञान कोंडून ठेवले म्हणून समाज मागासलेला राहिला या म्हणण्यात ब्राह्मणांकडे ज्ञान होतं हे प्रतिपक्ष मान्य करतो आहे.
आणि दुसरीकडे आपल्याकडे सगळं ज्ञान होतं/आहे हे ब्राह्मणांनाही वाटतं आहे.

दोघांचाही समज चुकीचा आहे. कोंडून ठेवल्याने समाज मागासलेला राहील असं कोणतंच ज्ञान ब्राह्मणांकडे नव्हतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दोघांचाही समज चुकीचा आहे. कोंडून ठेवल्याने समाज मागासलेला राहील असं कोणतंच ज्ञान ब्राह्मणांकडे नव्हतं.

जागर वाचलं आहे, कुरुंदकरांचं मत खोडून काढावं असं नाही, तर, ज्ञान नाही तर शिक्षण घेण्याची/त्याअनुषंगाने विकासाचा विचार करण्याची पद्धत सवर्णांत(प्रामुख्याने ब्राह्मणात) का आढळते ह्याबद्दल कुरुंदकरांचे विचार वाचायला मिळाले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमके!!

समाज मागासलेला ठेवण्यालायक कुठलेच ज्ञान ब्राह्मणांकडे नव्हते. ब्राह्मण नेमके काय करतात म्हणून त्यांना प्रतिष्ठा द्यायची हे बाकीच्यांना माहिती नव्हते आणि खुद्द ब्राह्मणांतही या "ज्ञाना"ची कल्पना कमीच लोकांना होती. एक मात्र सांगता यावे- विशेषतः दख्खनमधील ब्राह्मणांबद्दल - ते म्हणजे मुसलमान सत्ता जसजशा पसरल्या तसतसा तिथल्या प्रशासकीय यंत्रणेत त्यांनी चांगला शिरकाव करून घेतला आणि आपला दबदबा वाढवला. हे काम उत्तरेत मुख्यतः कायस्थांनी केले. त्यामुळे ब्राह्मण म्हंजे मुख्यतः पौरोहित्यवाले असे समीकरण दक्षिणेत पेशव्यांच्याही अगोदर तितकेसे उरले नव्हते. केरळ-तमिळनाडूमध्ये काय परिस्थिती होती याची कल्पना नाही, परंतु महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र येथील ब्राह्मणांत हे नक्कीच बघावयास मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> समाज मागासलेला ठेवण्यालायक कुठलेच ज्ञान ब्राह्मणांकडे नव्हते. <<

त्याची गरजदेखील नव्हती. ब्राह्मणांकडे ज्ञानसत्ता होती. त्या आधारे इतरांचं ज्ञान खालच्या दर्जाचं मानणं आणि त्यांना प्रतिष्ठा न देणं हे इतरांच्या खच्चीकरणासाठी पुरेसं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रोचक विसंगतीचं विश्लेषण आवडलं.

कोंडून ठेवल्याने समाज मागासलेला राहील असं कोणतंच ज्ञान ब्राह्मणांकडे नव्हतं

हे खरं असलं तरी आक्षेप आहे तो 'कुठच्याच प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी शूद्र लायक नाहीत' असा अट्टाहास केल्याने ज्ञानाचा विकास झाला नाही हेही तितकंच खरं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कुठच्याच प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी शूद्र लायक नाहीत' असा अट्टाहास केल्याने ज्ञानाचा विकास झाला नाही

खरे आहे पण पूर्णांशाने किंवा तस्सेच नव्हे. शूद्र म्हंजे फक्त मजूर नव्हे. आपापल्या व्यवसायधंद्याची व्यवस्थित माहिती सर्व कारूनारूंना होती. पण स्टँडर्डायझेशनमध्ये आपण गंडलो. जिथे थिअरी आणि प्रॅक्टिस एकत्र येते ते काँबिनेशन प्रचंड घातक असते. आपल्याकडे ते गंडले असे दिसते. हे विशेषतः युद्धासंबंधीच्या उद्योगधंद्यांना जास्त लागू पडते. अठराव्या शतकात भारतातल्या सर्व सत्तांनी युरोपियन इंजिनियर आणि सेनापती ठेवले होते. त्यांच्या बळावर इंग्रजांना यशस्वी तोंड देता आले काहीकाळ तरी त्यांच्याकडच्या नवनव्या गोष्टी शिकण्यात आपण तेव्हा कमी पडलो म्हणून गंडलो.

हेच गुप्तकाळात पाहिले तर ग्रीकांचे खगोलशास्त्र, त्यांचे नाटक आणि अजून बर्‍याच गोष्टी आपण मोकळ्या मनाने स्वीकारल्या होत्या म्हणून आपण तेव्हा जगद्विख्यात झालो. माझ्या मते या सर्व गोष्टींसाठी अनादिसिद्ध कारणे फारशी नाहीत- तात्कालिक जास्त आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरोबर. माझा युक्तिवाद हा लेखन-वाचन-चिंतन-गणित या बुद्धीवादी गोष्टी अगदी मोजक्या लोकांसाठी कंपार्टमेंटलाइझ करण्याबाबत होता. त्याचा कितपत वाईट परिणाम झाला हेही सांगता येत नाही. कारण अगदी अठराव्या शतकापर्यंतदेखील भारताचं जीडीपी जगाच्या मानाने किंचित अधिकच होतं. कदाचित समाजमनावर दूरगामी परिणाम झाले असावेत.

त्यांच्या बळावर इंग्रजांना यशस्वी तोंड देता आले काहीकाळ तरी त्यांच्याकडच्या नवनव्या गोष्टी शिकण्यात आपण तेव्हा कमी पडलो म्हणून गंडलो.

याबद्दलही खात्री नाही. युद्धांमधल्या हारजीती, आणि त्यातून झालेली सत्तांतरं (विशेषतः मराठेशाहीचा विनाश आणि इंग्रजाची सत्ता येणं) हे तांत्रिक ज्ञान, शस्त्रांची लांबीरुंदी वगैरेपेक्षा तत्कालीन राजकारणापायी जास्त झाली असं नंदा खरेंचं मत आहे. ते बरंचसं पटतं.

त्यामुळे या कंपार्टमेंटलायझेशनचा तोटा अप्रत्यक्षपणे झाला असं मला वाटतं. नक्की कुठे तोटा झाला यावर बोट ठेवता येण्याइतका अभ्यास नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच, राजकारणात उणे पडलो हे मुख्य कारण आहेच-तदुपरि तांत्रिक प्रगतीतील डिस्पॅरिटी अधोरेखित करण्यासाठी ते उदाहरण दिले इतकेच.

बाकी कंपार्टमेंटलायझेशनबद्दल बोलायचे झाले तर सहमत आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय घडते आहे त्याचा अन्वयार्थ लावण्यात आपण कमी पडलो असे असेल.

खैबर खिंडीतून आलेले पूर्वीचे जेते हे जिंकल्यावर इथेच राहिले आणि इथे केलेली लूट त्यांनी इथेच भोगली आणि मरताना मागे सोडली. येथे स्थापन झालेल्या युरोपीय सत्ता या पहिल्या सत्ता अशा होत्या ज्या संपत्ती आपल्या मायदेशी नेण्यासाठी आल्या होत्या.

अवांतर: जेव्हा त्या सत्ता इथे आल्या तेव्हा व्यापार करून पैसा कमावणे हा एकच उद्देश असू शकेल. व्यापार चालू असतानाच इथल्या राज्यकर्त्यांना विविध मार्गांनी अंकित करून घेण्याची कल्पना रुजली असावी. कोणीही येऊन इथे राज्य करू शकतो हेही लक्षात आले असावे. (बाबराचे आगमन पोर्तुगीजांच्या आगमनाच्या नंतरचे आहे).

अवांतर २: युरोपीयपूर्व सत्ता (देशी आणि परकीय) या "लाला कंपन्या" होत्या. जे काही मिळवायचे ते स्वतःसाठी स्वतःच्या आप्तांसाठी. ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातले कर्मचारी मात्र इंग्लंडातल्या शेअरहोल्डरांसाठी पैसा कमावत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

येथे स्थापन झालेल्या युरोपीय सत्ता या पहिल्या सत्ता अशा होत्या ज्या संपत्ती आपल्या मायदेशी नेण्यासाठी आल्या होत्या.

अवांतर २: युरोपीयपूर्व सत्ता (देशी आणि परकीय) या "लाला कंपन्या" होत्या. जे काही मिळवायचे ते स्वतःसाठी स्वतःच्या आप्तांसाठी. ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातले कर्मचारी मात्र इंग्लंडातल्या शेअरहोल्डरांसाठी पैसा कमावत होते.

पूर्ण सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'SC/ST क्षमस्व' म्हणायला एक प्रचंड निलाजरेपणा लागतो. मी जन्माने ब्राह्मण आहे आणि मी कोणत्याही समाजकार्यात पडत नाही. पण मी जन्माने SC/ST असतो, असा क्षमस्व कॉमनली आढळला असता तर मी स्वतंत्र दलित राष्ट्राच्या खाली कशालाच काँप्रोमाईज केलं नसतं. कदाचित सक्रिय समाजकार्य केले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. घटना प्रत्येक नागरिकाला जिवंत राहण्याचा अधिकार देते. तसेच संपत्ती बाळगण्याचा अधिकार देते.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीचा खून करणे किंवा एखाद्याची संपत्ती चोरणे हे घटनाविरोधी कृत्य होय. घटनाविरोधी वर्तन केल्याबद्दल टेक्निकली खुन्यावर/चोरावर देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकेल. बहुतेक सर्व गुन्हे घटनादत्त अधिकाराच्या भंगाशी सांधा जोडून दाखवता येऊ शकतील. म्हणून देशद्रोहाचा एकच कायदा असायला हरकत नाही. सर्व गुन्हे देशद्रोहच. तरीही खून, चोरी वगैरेसाठी वेवेगळे कायदे असतात.

या विधानाविरोधात बरेच मुद्दे मांडता येतील. पैकी काही रिडीक्युलसली ऑबवियस आहेत (आणि म्हणूनच हे विधान ऑबवियसली रिडीक्युलस आहे) असे वाटते, परंतु तूर्तास ते माझे पर्स्पेक्टिव (आणि म्हणूनच सब्जेक्टिव) म्हणून सोडून देऊ. (तसेही इथल्या आड्यन्समध्ये हे विधान सहज खपून जाईल, चारपाच 'मार्मिक'ही मिळतील, असे वाटते, सबब बिनधास्त खपवून द्यावे. बिकता है, तो बेशक बिकने दो.)

- मुळात 'घटनाविरोधी कृत्य' ही 'देशद्रोहा'ची व्याख्याच नव्हे. प्रत्येक 'घटनाविरोधी कृत्य' हे ऑपॉप 'देशद्रोह' ठरत नाही. (जसे, 'कायद्याचे उल्लंघन' हा प्रत्येक वेळी, ऑपॉप 'गुन्हा' होत नाही, तद्वत.) (बहुधा थत्तेचाचांनी हे विधान एक तर टंग-इन-चीक स्वरूपात, किंवा नाहीतर मग गूगली म्हणून केले असावे, अशी अटकळ मांडून ते सोडून देऊ.)

- घटना ही कायद्याची मूलतत्त्वे, फ्रेमवर्क, त्यामागील मूलभूत उद्दिष्टे मांडते; गुन्ह्यांची यादी मांडत नाही, कायद्यांची यादी मांडत नाही आणि गुन्ह्यांकरिता शिक्षा सुचवत तर नाहीच नाही. कायदे कोणते आणि किती करावे, याबाबतही घटना काही बोलत नाही. फक्त, जे काही कायदे बनवायचे, ते कोणत्या फ्रेमवर्कमध्ये बनवायचे, तेवढेच सांगते.(फॉर द्याट म्याटर, खुद्द 'देशद्रोह' या प्रकाराबद्दल घटना (व्याख्येपासून) चकार शब्दही काढते किंवा कसे, याबाबत साशंक आहे. (चूभूद्याघ्या. काढत असल्यास कृपया कोठे ते दाखवून द्यावे.) ती व्याख्या वेगळ्याच कायद्यान्वये ठरते, असे वाटते.)

सबब, घटनेचे येनकेनप्रकारेण उल्लंघन करणारे प्रत्येक कृत्य हे 'देशद्रोहा'च्या पर्व्ह्यूमध्ये बसत नाही, हे एकदा म्हणून झाल्यावर, अशा वेगवेगळ्या कृत्यांच्या संदर्भात
(तसेच, घटना ही गुन्ह्यांची यादी बनवत नाही हे लक्षात घेता, 'घटनेचे उल्लंघन' या सदरात न मोडणार्‍या परंतु तरीही नियंत्रणयोग्य अथवा निर्बंधयोग्य कृत्यांच्या संदर्भात) त्यांचे 'गुन्हे', 'गुन्हे-नव्हेत-पण-दंडनीय-अपराध' आदि वर्गीकरण करण्यासाठी आणि त्यांकरिता आवश्यक तेथे शिक्षा ठरवण्यासाठी, गरजेप्रमाणे लागतील तेवढे कायदे करण्याची घटनेनुसार मुभा राहतेच, आणि प्रसंगी तशी आवश्यकताही असू शकते.

- (थत्तेचाचांच्या आर्ग्युमेंटाप्रमाणे जायचे तर, 'गधेगाळ' हा एकमेव कायदा पुरेसा ठरावा. म्हणजे, एकीकडे घटना, आणि दुसरीकडे एकच कायदा: 'हे शासन जो न मानी तेहाची...' इ.इ.)

- तसेही, एखाद्या साधारण कायद्याच्या उपस्थितीत, तशीच काही विशेष गरज असेल तर विशेष कायदे तरीही करता येतात, हे तत्त्व मुळात येथे प्रश्नांकित नाही. ते सामान्य तत्त्व म्हणून बहुधा सर्वमान्य असावे. येथे प्रश्न आहे तो 'या स्पेसिफिक परिस्थितीत ती 'विशेष गरज' नेमकी काय होती' असा, स्पेसिफिक जस्टिफिकेशनचा आहे, जो अस्थानी अथवा अवाजवी नसावा.

२. काही मुद्दाम केलेले कायदे सामान्य न्यायप्रक्रियेला वेगवान बनवण्याच्या दृष्टीने, काही सामान्य प्रक्रियेला फाटा देण्याच्या दृष्टीने येतात. म्हणजे तोच गुन्हा कुठल्या अस्तित्वात असलेल्या कायद्याखाली गुन्हा धरला जात असला तरी त्याचा खटला चालताना न्यायालयांनी काही विशेष दृष्टी ठेवावी अशा हेतुने खास कायदे बनवले जातात. उदा. पोटा कायद्यात दहशतवादी कृत्यांसाठीचे खटले वेगळ्या प्रकारे हाताळण्याची तरतूद असते. किंवा कधी कधी एखादा पुरावा नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे ग्राह्य धरला जावा अशा तरतुदी असतात (ज्या सामान्य पुरावा कायद्याच्या विपरित असतात). कधी जामीन देण्यासंबंधीच्या तरतुदी अधिक कडक केल्या जातात. अर्थात अशावेळी घडलेला गुन्हा त्या विशेष कायद्याच्या कक्षेतला गुन्हा आहे असे आधी सिद्ध व्हावे लागते.

पुन्हा तोच मुद्दा. एक तत्त्व अथवा सामान्य माहिती म्हणून यात नवीन असा कोणताच मुद्दा नाही. (थोडक्यात, या उत्तरामागील प्रश्न मुळात विचारला गेलेला नाही.) प्रश्न असा आहे, की या विशिष्ट ठिकाणी (१) अशी 'विशेष गरज' नेमकी काय होती, (२) असा 'विशेष हेतू' नेमका काय होता, आणि (३) असे 'विशेष फायदे' नेमके कोणते एन्विजन्ड अथवा अपेक्षित होते, की या विशेष कायद्याअभावी, प्रस्थापित कायद्याखाली, (१) त्या 'विशेष गरजे'ची पूर्तता झाली नसती, (२) तो 'विशेष हेतू' साध्य झाला नसता, आणि (३) ते 'विशेष फायदे' दृष्टिपथात आले नसते, जे की, या विशेष कायद्यामुळे, (१) त्या 'विशेष गरजे'ची पूर्तता होणे आता शक्य अथवा सुकर झाले आहे (कसे?), (२) तो 'विशेष हेतू' साध्य होणे आवाक्यात येण्याची अपेक्षा आहे (कशी?), आणि (३) ते 'विशेष फायदे' दृष्टिपथात येण्याची कल्पना रिअ‍ॅलिस्टिकली केली जाऊ शकते (कशी?) ? (आणि हा प्रश्न अवाजवी नसावा.)

३. जात पाळणे हा घटनेनुसार गुन्हा असला तरी जातीवरून शिव्या देणे यासाठी वेगळा कायदा केला जातो.

'जात पाळणे' हा (घटनेनुसार) गुन्हा असण्याबद्दल साशंक आहे. (असल्यास संबंधित कलम कृपया दाखवून द्यावे.) जातीवरून शिव्या देण्याचे बाबतीतसुद्धा कायदा सरसकट लागू नाही, परंतु तो मुद्दा तूर्तास अवांतर म्हणून सोडून देऊ.
==============================================================================================
तळटीपा:

'देशद्रोहा'च्या व्याख्येची मर्यादा ही 'राष्ट्राच्या अस्तित्वास, एकात्मतेस वा सुरक्षिततेस थेट आणि गंभीर धोका' पोहोचविणार्‍या काही विशिष्ट कृत्यांपुरतीच मर्यादित असावी१अ, असे वाटते. त्यापुढे, ही 'विशिष्ट कृत्ये' कोणकोणती, याचीही काही वैश्विक व्याख्या बहुधा नसावी; प्रत्येक राष्ट्राप्रमाणे ती वेगवेगळी असावी१ब, असे वाटते.

उदाहरणार्थ, समजा उद्या मी खचाखच भरलेल्या मुंबईच्या लोकलमधून प्रवास करीत असताना, उदाहरणादाखल, थत्तेचाचा माझ्या मागे उभा राहिले, आणि त्यांनी, पुन्हा उदाहरणादाखल, (१) माझ्या खिशात हात घालून माझे पाकीट मारले, आणि (२) त्यानंतर चालत्या लोकलमधून मला ढकलून दिले. (डिस्क्लेमर: थत्तेचाचा प्रत्यक्षात असे काही करतील, असे मला वाटत नाही - म्हणजे, माझे पाकीट मारणे आणि/किंवा चालत्या लोकलमधून मला ढकलून देणे यांपैकी कोणतेही - किमान, तशी मला आशा आहे - पण तूर्तास, काहीतरी उदाहरण घ्यायचे म्हणून, त्यांनी तसे केले असे, या उदाहरणापुरते, समजू या. किंवा ठीक आहे, थत्तेचाचांचे नाव नको, तर मनमोहनसिंहांनी असे केले असे या उदाहरणापुरते मानू. निदान मनमोहनसिंह तरी प्रत्यक्षात असे काहीही निश्चितच करणार नाहीत, याबद्दल आपल्यापैकी सर्वांनाच खात्री असावी, त्यामुळे हे उदाहरण इतके ऑबवियसली रिडीक्युलस ठरावे, की हे केवळ काहीतरी उदाहरण घ्यायचे, म्हणून घेतले आहे - म्हणजे, 'सोम्या' आणि 'गोम्या' यांऐवजी ''न'वी बाजू' आणि 'मनमोहनसिंह' असे - हे पुरेसे स्पष्ट व्हावे, त्यामुळे यातून कोणत्याही प्रकारे मनमोहनसिंहांची बदनामी होण्याची भीती नसावी. चूभूद्याघ्या. डिस्क्लेमर समाप्त.)

तरः
- माझे पाकीट मारल्याने (मग भले त्यात फक्त दहा रुपये नगद, पोष्टाचे चारपाच अतिशय जीर्ण झालेले ष्टांप, असंख्य जुनाट पावत्या आणि संकीर्ण चिल्लर, एवढाच ऐवज का असेना; प्रश्न तत्त्वाचा आहे!) माझ्या संपत्ती बाळगण्याच्या घटनादत्त अधिकाराचे त्यातून उल्लंघन होते, तसेच
- मला चालत्या लोकलमधून ढकलून दिल्याने माझ्या जिवास धोका उत्पन्न होऊ शकतो, सबब माझ्या जिवंत राहण्याच्या घटनादत्त अधिकाराचे त्यातून उल्लंघन होते. याशिवाय,
- मला चालत्या लोकलमधून ढकलून दिल्याने माझ्या प्रवासास स्थगिती येऊ शकते, सबब माझ्या घटनादत्त संचारस्वातंत्र्याचेही त्यातून बहुधा उल्लंघन होत असावे.

मात्र, या कृत्यांतून माझ्या स्वतःच्या अस्तित्वास, एकात्मतेस अथवा सुरक्षिततेस जरी थेट आणि गंभीर धोका पोहोचू शकत असला (आणि कदाचित म्हणूनच हे गंभीर गुन्हे ठरण्याची शक्यता असली), तरी यातून भारताच्या अस्तित्वास, एकात्मतेस अथवा सुरक्षिततेस कोणत्याही प्रकारे धोका पोहोचण्याची सुतराम् शक्यता नसावी. सबब, यातून देशद्रोहाचा खटला उभा राहण्यास अजिबात जागा नसावी. (मनमोहनसिंहांनी निर्धास्त राहावे. तसेच - उदाहरण लागू असल्यास - थत्तेचाचांनीसुद्धा!)

(शिवाय, मी भारताचा राष्ट्रपती नसल्याकारणाने हा 'हेड ऑफ स्टेट'वरील हल्लासुद्धा ठरू नये; फार फार तर 'हेड ऑफ 'न'वी बाजू'वरील हल्ला ठरावा. सबब, देशद्रोहाच्या डिटर्मिनेशनमध्ये त्यास किंमत शून्य. म्हणजे, त्याही अँगलने काही फरक पडू नये.)

१अ संदर्भ: या दुव्यावरील पहिल्या प्रकरणातील सुरुवातीचे काही परिच्छेद. विशेष करून १.१ आणि १.४ हे परिच्छेद. (पैकी परिच्छेद १.१मधील व्याख्या ही एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामधून उद्धृत करण्यात आली असावी, असे वाटते.)

१ब संदर्भ: वरील १अमधील दुव्यावरील पहिल्या प्रकरणातील १.४ हा परिच्छेद; विशेषतः, त्या परिच्छेदातील शेवटचे वाक्य. तसेच, या दुव्यावरील देशानुरूप व्याख्या.

प्रत्येक गुन्हा हे कायद्याचे उल्लंघन जरी असले, तरी कायद्याचे प्रत्येक उल्लंघन हे (दंडनीय असू शकले तरी) कायद्याने 'गुन्हा' ठरत नाही. (त्यापुढे, कोणते उल्लंघन हे 'गुन्हा' या सदरात मोडावे आणि कोणते त्या सदराखाली येऊ नये, याची बहुधा वैश्विक व्याख्या नसावी; हे बहुधा स्थानिक कायद्यानुसार वेगवेगळे असू शकावे.)

उदाहरणार्थ, मी जर कोणाचा खून केला, तर बहुतांश ठिकाणी तो कायद्याने गुन्हा ठरावा. (याला अपवाद असल्यास कल्पना नाही.) मात्र, मी जर परवान्याविना कुत्रा पाळला (किंवा कुत्रा पाळण्याच्या परवान्याचे वेळच्या वेळी नूतनीकरण केले नाही), तर स्थानिक कायद्यानुसार ते कायद्याचे उल्लंघन असू शकते, दंडनीयही असू शकते; मात्र, बहुतांश ठिकाणी हे उल्लंघन 'गुन्हा' या सदरात मोडू नये. (थत्तेचाचा राहतात त्या ज्युरिस्डिक्शनबद्दल कल्पना नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रचंड मुद्देसूद! आवडले गेले आहे.

कशाचा अर्थ काय काढावा आणि काय नाही यासाठी सबब प्रतिसाद खूप मार्गदर्शक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असा क्षमस्व कॉमनली आढळला असता

प्रचंड म्हणजे प्रचंड कॉमन आहे की...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे ते SC/ST नसल्याने त्यांचं जळत नाही म्हणून ते दलितस्तानची मागणी करत नाहीत असं त्यांनी प्रांजळपणे म्हटलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसादाचे शीर्षक मार्मिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0