** शुभशकुन **

शुभशकुन
-------

दहा मिनिटापूर्वीची गोष्ट...

आमच्या मायक्रोवेव्हची bottom plate गेले ७-८ वर्षे अड्कून पडली होती. ती दुरुस्त पण होत नव्हती. अनेक कारणांमुळे मायक्रोवेव्ह टाकुन द्यायला मन धजत नव्हते (इतर कार्ये व्यवस्थित चालु होती).

आत्ता एक चमत्कार झाला...

चहा गरम करत असताना अचानक प्लेट फिरायला लागल्याचे दिसले... विवेकवादी कारण एकच- काल चहा प्लेट्शिवाय गरम करताना उतु गेला आणि सांडला (बायकोने कडकड पण केली). तो खालच्या jam झालेल्या प्लेट-होल्डरमध्ये झिरपला आणि वंगण मिळाल्याने प्लेट फेरायला लागली.

काहींच्या मते हा निव्वळ योगायोग...काहींच्या मते हे व्हायचेच होते.

मला मात्र अड्कून साचुन राहिलेली कामे अचानक मार्गी लागल्याने मनाला जी उभारी मिळते तसे काहीसे झाले आहे.

आजी आणि आई म्हणाल्या असत्या, "अरे, हा शुभशकुन आहे"

काहीही असो. मनाची उभारी महत्त्वाची...

शुभशकुन झिंदाबाद...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त!
अनेकदा खोळंबलेले काम मार्गी झाले की कस मस्त वाटत. आजची गणेशचतुर्थी तुमची मस्त जाणार. आता नव्याने गणपतीचा शोध घ्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आता नव्याने गणपतीचा शोध घ्या

हा हा हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या घटनेवरुन अन्य निष्कर्षही काढता येतील.

जीवनात, प्रत्येक गोष्ट उतु गेलेली चांगली.

वेळीच वंगण घातले तर उतु जात नाही.

समटाइम्स,द बॉटल नेक इज अ‍ॅट द बॉटम.

उतणे, मातणे ही फक्त मानवाचीच मोनोपोली नाही.

प्लेट ही स्त्रीलिंगी असल्याने, पुल्लिंगी चहाने चटका दिल्यावर ताळ्यावर आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लेट ही स्त्रीलिंगी असल्याने, पुल्लिंगी चहाने चटका दिल्यावर ताळ्यावर आली.

हा हा हा हा हा ++++ र्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लेट ही स्त्रीलिंगी असल्याने, पुल्लिंगी चहाने चटका दिल्यावर ताळ्यावर आली.

शोषणाच्या नानाची टांग हा धागा (म्हणजे त्याच्या स्फुरणाची प्रेरणा) वाचला नाही वाटतं. दिवस भरले आहेत का? Blum 3

लक्षात घ्या -
१. कोणतीही स्त्रीलिंगी गोष्ट कधीच ताळ्याबाहेर जात नाही. (तव्याला प्लेट म्हणून वास्तवाचा विपर्यास करताय आपण.)
२. १ मधे काही चूक असेल तर स्त्रीलिंगी गोष्ट स्वबलावर परत ताळ्यामधे येते. (प्लेट फिरणार कि नाही ते चहा बनवणारा 'खल'पुरुष (पुरुष तो खलच) ठरवूच शकत नाही.)

आता जघन्य अपराध केलाच आहेत तर शिक्षेस तयार राहा आणि आपणांस ताळ्यावर आणण्यासाठी जी सूत्रे फिरतील त्यांच्याशी बर्‍याबोलाने कॉप्रेट करा. हे बेणं चेचून मारलं पाहिजे असा 'राजेश घासकडवींनी ..(१४ मार्चच्या) कानात् बोलल्याचा...भास झाला', असं खात्रीलायक सूत्रानूसार कळलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही वाक्य दुसर्‍या अर्थाने लिहीली आहेत का पहिल्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.