झुक्या चे अभंग

खेळ मांडीयेला फेसबुके घाई, नाचती फेसबुके भाई रे
क्रोध अभिमान भिने त्यांच्या मनी, एक एका पकडती गळा रे

कुणी धर्माभिमानी कुणी पुरोगामी. द्वेषाच्या माळा, लाईक्स मिरविती गळा
शिव्या शापाची घाई गाली वर्षाव, अनुपम्य फेसबुक सोहळा रे

वर्ण अभिमान मिरवति जाती, एक एका लोटांगणी जाती
भेसळ चित्ते झाली नवसागर, पाषाणा हृदयी कलहती रे

होतो जयजयकार गर्जत फेसबुक, मातले हे फेसबुके वीर रे
झुक्या म्हणे सोपी केली पायवाट, समाजाला नेई स्मशान घाट रे..

अवि

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

संतांचा असा अवमान करू नका. कोणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास नसती आफत ओढवेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0