कामवाल्या पोरीचा वाढलाय तोरा
कामवाल्या पोरीचा वाढलाय तोरा
बायको म्हणाली चढवित पारा
मी म्हटले की काय झाले आता
दांड्या मारते न सांगता सवरता
पुढे म्हणे उद्या मी फ़ैसलाच करते
कालपर्यंतचा पगार हातावर ठेवते
म्हणालो बिनधास्त काढूनच टाक
गेली तर अजूनही मिळतील लाख
दुस-या दिवशी ती आली कामवाली
बायकोच्या अंगाची लाही लाही झाली
आधी मला सांग कुठे होतिस काल?
कशाने इतकी झालीयेस मस्तवाल?
ती म्हणे थोडंसं काम होतं बाई
आवाजात कमालीची होती नरमाई
काम बिम काही नाही खूप झाले तुझे
हिशेब घे सगळा नि घर सोड माझे
असे नका करू माई ऐकुन तर घ्या
कारण पटले नाही तर हाकलून द्या
काय झाले, काल भाऊ दारू पिऊन आला
काम मिळत नाही म्हणून गळफ़ास ल्याला
जीव थोडा बाकी होता,अॅडमिट केला
ते सगळं करता करता माझा दिस गेला
कसला तोरा नि कुठलं काय?
गरीबाची अडचण समजा बाय
गरीबाची अडचण समजा बाय
-----------------------
विजय दिनकर पाटील ’कणखर’
:(
:(