अलीकडे काय पाहिलंत? - ८

याआधीचे भाग: |

विकांताला बरेच दिवस बघायचे शिल्लक असलेले दोन - (बालक पालक व दुनियादारी) आणि नुकताच रिलीझ झालेला एक (लंच बॉक्स) असे तीन चित्रपट पाहिले.
पैकी बालक पालक व दुनियादारी हे चित्रपट घरी आणि लंच बॉक्स चित्रपटगृहात जाऊन बघण्याचे निर्णय अचूक असल्याचे बघुन सुखावलो :).

बालक पालक हा एखाद्या गाजलेल्या मल्लांचा सामना झाला व तो खूप रंगला असे ऐकून असावे, पण प्रत्यक्ष बघायला वेळ न मिळाल्याने त्याचे रेकॉर्डिंग मोठ्या उत्साहाने बघावे आणि प्रत्यक्षात त्या मल्लांनी जिल्हापातळीवर खेळतात तितपत खेळावे असे वाटले. वेगळ्या व (म्हणे) धाडसी विषय मांडण्याचा क्षीण प्रयत्न वाटला. संवाद, पटकथा, ध्वनी, संगीत सारेच बेतास बात. पात्रे उभीच राहत नाही, कथा मुद्द्यांना धावता - चोरटा- स्पर्श करून नुसती वाहत राहते. (कथांश सुरू) मुले पिवळी पुस्तके वाचतात, ब्ल्यू फिल्म्स बघतात हे कसे वैट्ट आहे आणि त्यांना त्यापासून रोखण्यासाठी पालकांनी कसे त्यांच्याशी 'मित्रासारखे' बोलले पाहिजे असा (कोरडा) उपदेश करून चित्रपट संपतो (कथांश संपला). एकही पालक मुलांशी त्याविषयावर बोलताना दिसत नाहीत व त्यांच्या लहानपणी हा प्रश्नच नसल्यासारखे वागतात. वगैरे बरेच लिहिता येईल. तुर्तास चित्रपट आवडला नाही - अपेक्षाभंग झाला, एका महत्त्वपूर्ण ( व ताकदीच्या) विषयाचा विविध अंगांनी अभ्यास कमी पडल्याने + रंजकतेच्या मोहापायी चोथा केला आहे असे स्पष्ट मत आहे.

दुनियादारी विषयी फारशा अपेक्षा नव्हत्याच. मुळात सुशि आवडायचे त्या काळात आवडून झाले आहेत. आता त्याप्रकारच्या साहित्यात तितके रमता येत नाही. दुनियादारी पहिल्यांदा वाचले (अकरावीत असेन बहुदा) तेव्हा आवडल्याचे आठवत होते पण तितकेच, त्याच्या प्रेमात वगैरे कधीच नव्हतो. चित्रपटही ठिक, फार आवडला वगैरे नाही, फार मनोरंजनही झाले नाही मात्र मनस्तापही झाला नाही हे ही खरेच.

लंच बॉक्स आवडला - अतिशय आवडला. सर्वात काय आवडले असेल तर मी प्रेक्षक म्हणून पात्रांसोबत वाटचाल करत होतो. (कथांश सुरू) जेव्हा शेखसारखे पात्र फर्नांडिसच्या पत्रवाचनात व्यत्यय आणत होते तेव्हा मीही 'काय हा मधे मधे येतोय' म्हणत बेचैन होत होतो, त्याच्या जाण्याची वाट पाहत होतो. बिल्डींगवरून उडी मारायच्या काल्पनिक प्रसंगाचे चित्रीकरण निव्वळ थोर व अंगार काटा आणणारे होते. मुलीच्या डोळ्यावरील पट्टी व तिने विश्वासाने आईला मारलेली मिठी अजूनही डोक्यातून जात नाहीये.(कथांश समाप्त). ही दोन पात्र केवळ पत्रवाचनाने एकमेकांत गुंतू शकतात हे पटवणारेच नव्हे तर तुम्हालाही तितक्याच जोरकसपणे त्यांच्यात गुंतायला भाग पाडणारे चित्रिकरण आहे. ध्वनी, संवाद, प्रकाश, नेपथ्य, अभिनय आदी तांत्रिक अंगेही अतिशय सफाईदार व चोख. मोजके व प्रभावी संवाद व त्याहून प्रभावी पत्रलेखन हा तर कथेचा जीवच. नक्की बघा अशी शिफारस करायला लावणारा चित्रपट इतकेच म्हणेन.

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

बालक-पालक बद्दल सहमत. मलाही चित्रपट पाहताना कथा मुद्द्यांना धावता-चोरटा स्पर्श करून नुसती वाहत राहते असेच वाटले. पालक आणि मुलांमधला संवाद किंवा एका सकारात्मक दिशेने होऊ घातलेली वाटचाल असा शेवट दाखवता येऊ शकला असता असे वाटले.

दुनियादारी पाहिला नाही आणि पाहीन असे वाटत नाही. लंचबॉक्स मात्र नक्की बघायचा आहे!

मी ह्या विकांताला, औरंगजेब आणि वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा असे भयानक चित्रपट धावते पाहिले. कुणी चुकुनही पाहू नये. केस गळत असतील, तर तुम्हीच ते अजून उपटून घेऊन कमी करण्याची प्रचंड शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

वन्स अपॉन अ टाईम बद्दल ठीक आहे पण औरंगजेब "धावता" अजिबात बघू नका. पेशन्स असेल तर एकदा नीट लक्ष देउन पाहा. आवडेल असे वाटते. पहिली १०-१५ मिनीटे कलाकारांचा परिचय आहे तो चुकवू नका. नाहीतर बराच गोंधळ उडतो. त्यात त्यातील एक दोन जण सुरूवातीला सारखेच दिसतात त्यामुळे जास्तच.

या चित्रपटाबद्दल माझे मत खाली स्वतंत्रपणे देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दस्तुरखुद्द फारेण्ड रेकमंड करताहेत म्हणजे पुन्हा बघणे आले. तशीही माझी सुरवात चुकली होती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

बालक पालक बद्दल पूर्णतः सहमत ..
अलिकडे झी मराठी वाले स्वत:भोवती दिवे ओवाळून घेण्यात फारच सरावले आहेत असे वाटते ..
स्वतःच्या चित्रपटांची अमाप प्रसिद्धी करायची, प्रत्येक मालिकेच्या ब्रेकमध्ये (कधीकधी मालिकांमधेदेखील) स्वतःच्या चित्रपटांची जाहिरात करत, जाहिरातींचा अतिरेक करायचा .. आणि नंतर चित्रपट "सुपरहिट" झाल्याचा डंका वाजवायचा असे साधारण तंत्र दिसते.
बालक पालक च्या बाबतीत तर "मराठीतील पहिला ढिंच्याक ढिंच्याक चित्रपट" म्हणून केलेली जाहिरात पाहुनच चित्रपट बघण्याची फारशी उत्सुकता नव्हती .. त्यातून चित्रपटात ज्या अर्थाने "ढिंच्याक ढिंच्याक" शब्द वापरला आहे ते पाहता झी मराठीवर जाहिरात करणारे मठ्ठ तरी असावेत किंवा अमराठी तरी अशी शंका आली ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

पहिल्या पाच मिनीटांत या चित्रपटाने जे खिळवून ठेवले ते शेवटपर्यंत सोडले नाही. दोन मिनीटे उठताना सुद्धा "पॉज" करून उठावे लागणे हे हिन्दी चित्रपटांच्या बाबतीत फार कॉमन नाही. मात्र यात, त्यातही सुरूवातीला, तुम्ही नीट लक्ष दिले नाहीत तर महत्त्वाचे क्लूज निसटतील. अत्यंत लक्ष देऊन पाहण्याचा चित्रपट आहे हा.

इण्ट्रोला असलेल्यांपैकी दोन जण सुरूवातीला सारखेच दिसल्याने फार गोंधळ झाला. मग पुन्हा मागे जाऊन सर्व कलाकारांची ओळख करून घेतली. तसे इतरांचे होऊ नये म्हणून ही थोडक्यात माहिती:
ऋषी कपूर: डीसीपी रविकांत फोगात
पृथ्वीराज सुकुमारनः एसीपी आर्य फोगात. ऋषी कपूरचा पुतण्या.
सिकंदर बेरी (खेर): देव. ऋषी कपूरचा मुलगा.
अनुपम खेरः विजयकांत फोगात. आर्य त्याचा मुलगा.
सुमीत व्यासः विष्णू. ऋषी कपूरचा जावई
जॅकी श्रॉफः यशवर्धन. गँगस्टर्/माफिया
अर्जुन कपूरः अजय आणि विशाल. जॅकीची जुळी मुले.
अमृता सिंगः नीना. डीलमेकर, जॅकी बरोबर काम करणारी
तन्वी आजमी: जॅकी ची त्याला सोडलेली बायको. यापेक्षा आणखी माहिती न देणे योग्य.

रविकांत, देव व आर्य हे पोलिसखात्याच्या भ्रष्ट पैशाच्या चेन मधले लोक. विष्णू हा इमानदार असल्याने यापासून त्याला लांब ठेवलेला. अनुपम खेरही मूळचा पोलिस ऑफिसर पण जॅकीचे एनकाउंटर करण्याच्या वेळेस गडबड झाल्याने नोकरी गेलेला. मरायच्या आधी तो आर्यला सांगतो की त्याच्या जीवनात आणखी एक स्त्री व मुलगा आहे. त्याच्या पश्चात त्यांची जबाबदारी आर्यवर आहे. त्यानंतर तो मेल्यावर आर्य त्यांना भेटायला जातो व तेथून जे नाट्य सुरू होते ते शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.

सर्वांची कामे जबरदस्त झाली आहेत. अगदी अमृता सिंगचे सुद्धा. ऋषी कपूरतर आजकाल पूर्ण कात टाकूनच आलेला आहे. सर्वात जबरी वाटतो तो यात. त्याचा "Menace" दाखवण्याकरिता की काय पण मान थोडी समोर झुकवून बोलण्याची पद्धत फार परिणामकारकरीत्या वापरली आहे यात त्याने.

खरा हीरो अर्जुन कपूर आहे आणि त्याने काम चांगले केले आहे. थोडा डोक्यात जातो तो, पण एकूण ठीक. अशा रोलच्या मानाने आवाज नाजूक वाटतो त्याचा. जॅकीचा ही रोल मस्त आहे. पृथ्वीराज सुकुमारन हा मल्याळम चित्रपटांत बरीच वर्षे आहे अशी वेब वर माहिती मिळाली. त्याचा रोल मध्यवर्ती आहे यात, त्यानेही चांगले काम केलेले आहे.

गाणी बरीचशी पळवल्याने कळाली नाहीत. पटकथा एकदम सुरेख लिहीलेली वाटते. कथेतील प्रसंग व कलाकार त्यांच्या भूमिकेतून तेथे कसे वागतील याबद्दल खूप विचार करून लिहीलेली असावी. गुन्हेगारीवरचे असे चित्रपट पाहताना नकळत आपण गॉडफादरशी किंवा गाय रिचीच्या चित्रपटांशी(***) काही लिन्क लागते का असे शोधतो, पण हा चित्रपट तेथेही आपल्याला 'पकडू' देत नाही. शेवटी एका मीटिंग मधल्या रेडच्या वेळचा सीन हा फक्त अपवाद (तो गाय रिचीच्या चित्रपटात सहज खपेल). औरंगजेब नावाचा संदर्भ नंतर येतो, तो ही चपखल आहे.

एकूण माझ्याकडून १००% रेकमेण्डेशन. नक्की पाहा. पाहताना पूर्ण लक्ष देऊन पाहा. जबरदस्त थ्रिलर आहे.

(***) गाय रिची म्हणजे Lock Stock and Two Smoking Barrels सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक. या चित्रपटावरून आपल्याकडे हेरा फेरी-२ काढला होता. आपला कमीने सुद्धा याच दिग्दर्शकाच्या धाटणीचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही आवडला...अजिबात कहि आशा नसताना बघितला म्हणुन असेल...अर्जून कपूरला रानटीच म्हणावे लागेल, पण कदचित तिच त्याची खसियत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा, पण औरंगजेब हा चित्रपट लिओनार्दॉ दी कॅप्रियो आणि मॅट डेमन अभिनीत 'द डिपार्टेड' इंग्रजी चित्रपटाच्या कथेवरून बेतलेला हिंदी (आणि भारतीय भावनाशील) आविष्कार आहे असे माझे मत झाले. या मताचे खंडन होऊ शकते. पण असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डीपार्टेड पुन्हा बघायला हवा. मी पाहिलेला आहे पण पूर्ण लक्षात नाही. औरंगजेब त्यावर बेतलेला असूही शकेल. चेक करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालक पालक सहकुटुंब पाहिला. ऑलमोस्ट अर्धा पिक्चर होईपर्यंत तो फार एक्स्प्लिसिट आहे असे वाटत राहिले. आणि नंतर एकदम संपल्यासारखे वाटले.

अवांतरः आज मुले कोणत्या वयात या गोष्टी करतात (नीलचित्रपट पाहणे, पिवळी पुस्तके वाचणे वगैरे) याची कल्पना नाही. पण सिनेमातली मुले ते करण्यासाठी फार लहान वाटली. पुस्तके मुलीसुद्धा वाचतात आणि ती वाचल्यावर त्यांना चित्रपट पाहण्याची इच्छा राहते हे पटले नाही. आणि मुलगे चित्रपट मुलींना बरोबर घेऊन पाहतात हे तर अगदीच कैच्याकै वाटले.

चित्रपटातला संदेश "मुलांना मोकळेपणाने माहिती द्या" असा असण्यापेक्षा "पुस्तके आणि चित्रपट यात जे दाखवलेले असते ते चुकीचे आणि अतिशयोक्त असते" असा होता असे वाटले. [अर्थात दोन्ही संदेश बरोबरच आहेत].

दुनियादारी ठीकठाक वाटला. स्वप्निल जोशी मिसफिट वाटला. आणि जितेंद्र जोशी फार लाउड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> मुलगे चित्रपट मुलींना बरोबर घेऊन पाहतात हे तर अगदीच कैच्याकै वाटले. <<

ही प्रतिक्रिया चित्रपटाविषयी नाही; फक्त वर उद्धृत केलेल्या वाक्याविषयी आहे. आजच्या मुली आणि मुलं ह्या बाबतीत (एकत्र पाहणं) चांगलीच उत्साही आहेत असं दिसतं. माझ्या माहितीत अशी उदाहरणं आहेत. शिवाय, शाळा-कॉलेजात शिक्षकांनी विश्वासात घेऊन विचारलं तर मुलं हे बिनधोकपणे सांगतात. घोर असलाच तर तो पालक आणि शिक्षकांना असतो; मुलांना नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एक गोष्ट आमच्याबरोबर योग्य वेळेत होईल तर शपथ! आमचा जन्म सुद्धा चुकिच्या पिढीत झालेला दिसतो!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आज मुले कोणत्या वयात या गोष्टी करतात (नीलचित्रपट पाहणे, पिवळी पुस्तके वाचणे वगैरे) याची कल्पना नाही. पण सिनेमातली मुले ते करण्यासाठी फार लहान वाटली. पुस्तके मुलीसुद्धा वाचतात आणि ती वाचल्यावर त्यांना चित्रपट पाहण्याची इच्छा राहते हे पटले नाही. आणि मुलगे चित्रपट मुलींना बरोबर घेऊन पाहतात हे तर अगदीच कैच्याकै वाटले.

असे चित्रपट आम्ही मुलींसोबत बघितले नसले तरी आमच्या लहानपणी सुद्धा तशा मुली होत्या. आमच्या वर्गातील मुलांचे या बाबतीत माहिती होण्याचे सरासरी वय काढले तर चित्रपटाइतकेच निघावे. इतकेच काय आठवीमध्ये दिवाळी सुट्टीनंतर मुलींना वेगळे घेऊन जाऊन त्यांना शाळेने शारीरिक बदलांवर फिल्म दाखवली होती, त्यामुळे सुरू झालेल्या चर्चेत तर उरल्या सुरल्यांनाही मौलिक ज्ञान मिळाले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि मुलगे चित्रपट मुलींना बरोबर घेऊन पाहतात हे तर अगदीच कैच्याकै वाटले.

सहमत. आमच्या परिचयात तरी असे उदाहरण पाहिले नाही अजूनपर्यंत. चिंजं म्हणतात त्याप्रमाणे असतीलही उदाहरणे, पण मध्यमवर्गीय समाजात नसावीत असे वाटते. असल्यास रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलं-मुली बघतात एकत्र. मला ठाऊक आहेत उदाहरणं. म.म.व.सुद्धा. मला वाटतं, सहसा मित्रांचं लिंग महत्त्वाचं ठरायला लागण्याच्या अगदी अलीकडच्या टप्प्यावर भक्त प्रल्हाद पाहिला जातो. त्यानंतर ग्रुप्स निरनिराळे होतात. अर्थात सगळ्याच मौलिक गोष्टी उशिरा करणारी भाबडी मंडळीही असतात. अशी मंडळी केवळ मैत्रिणी वा केवळ मित्रांच्या सोबत ज्ञान मिळवतात असं दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हम्म. पण

मला वाटतं, सहसा मित्रांचं लिंग महत्त्वाचं ठरायला लागण्याच्या अगदी अलीकडच्या टप्प्यावर भक्त प्रल्हाद पाहिला जातो.

याबद्दल साशंक आहे. "ती" जाणीव अंमळ दृढमूल झाल्याखेरीज भक्त प्रल्हादापर्यंत मजल जात नाही, असे निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उपलब्धता, 'एक्स्पोजर' (मराठी शब्द सांगा बॉ कुणी) आणि मूळचा कल यावर हे अवलंबून असावं असं दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१ डेमोग्राफीसुद्धा काम करत असावी.
मी लिहिलंय ते मुंबई उपनगरातील ९०च्या दशकातील स्थिती आहे. गावे, निमशहरे त्या बाबतीत पुढारलेली असु शकतात असे निरिक्षण आहे Wink

आमची आमच्याच वयच्या आसपासच्या मात्र लहान शहरांत राहणार्‍या भावंडांना माहिती उशीरा झाली असावी (फारसे बोलायचे प्रसंग नव्हते) पण एकदा झाल्यावर त्या त्या वयात आमच्यापेक्षा अधिक 'पुढे गेली' असल्याचे आठवते. (मात्र त्यांना तरी वाटत असे आम्ही काय मुंबईत रहातो म्हंजे या गोष्टी सहज बघायला मिळत असतील Blum 3 (शिवाय बॉलिवूड तिथेच असल्याने नट-नट्या तर चित्रपटासारखे उत्तान कपडे घालून फिरतानाही दिसू शकतात असाही काहिंचा समज होता) आणि आम्ही धूर्तपणे त्यांच्याहून शहाणे असल्याचा आव आणत असू Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकीच्या मोठ्या शहरांतून काय असतं माहीत नाही, पण निदान मुंबई नि उपनगरांमधे तरी आई-वडील दोघेही नोकरी करतात. पोरांना रिकामं घर मिळण्याची शक्यता मुंबईत तरी चांगलीच जास्त असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मोठे शहर-शहर-गाव-खेडे या स्थानांच्या वर्गवारीप्रमाणे मुलामुलींचे एकत्र वाढणे - वागणे बदलत जात असावे. तसेच पालकांच्या आर्थिक वर्गवारीवरूनही यात फरक पडतो. मुला-मुलींनी एकत्र चित्रपटास जाणे कदाचित शक्य आहे पण ब्लू फिल्म एकत्र पहाणे सरसकट शक्य आहे असे वाटत नाही. (शिवाय पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणांवरून इतर सर्व भारताचा अंदाज लावणे चूक आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुला-मुलींनी एकत्र चित्रपटास जाणे कदाचित शक्य आहे पण ब्लू फिल्म एकत्र पहाणे सरसकट शक्य आहे असे वाटत नाही. (शिवाय पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणांवरून इतर सर्व भारताचा अंदाज लावणे चूक आहे.)

+१०१००!.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> शिवाय पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणांवरून इतर सर्व भारताचा अंदाज लावणे चूक आहे <<

पुण्या-मुंबईची मुलं वेगळं वागतात का, हा मला वाटतं प्रश्न नाही. इंटरनेटची उपलब्धता पाहिली तर ती मध्यमवर्गाकडे आहे, मग तो कोणत्या का गावात असेना (मी महाराष्ट्रापुरतं बोलतोय, इतर भारताविषयी मला अंदाज नाही.) इंटरनेटवरून मुलं काय काय पाहतात त्याचा अंदाज आला तर अनेक पालकांचे डोळे पांढरे होतात. इतकंच काय, आता इंटरनेटवर भारतभरातल्या ज्या MMS clips उपलब्ध आहेत, त्या पाहता मुलं-मुली नुसत्या पाहण्यावर थांबत नाहीत हेही दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे स्वतः काही क्लिपा दिग्दर्शित करतात असे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> म्हणजे स्वतः काही क्लिपा दिग्दर्शित करतात असे का? <<

दिग्दर्शन, छायालेखन, संकलन, अभिनय, संवाद, ध्वनिलेखन, वगैरे सबकुछ. आणि वर पब्लिसिटी स्टिल्स वगैरेसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> म्हणजे स्वतः काही क्लिपा दिग्दर्शित करतात असे का? <<

दिग्दर्शन, छायालेखन, संकलन, अभिनय, संवाद, ध्वनिलेखन, वगैरे सबकुछ. आणि वर पब्लिसिटी स्टिल्स वगैरेसुद्धा.

तत्त्वतः अशक्य नाही, पण...

...या सांस्कृतिक चळवळीमध्ये समाजातील साधारणतः किती टक्के होतकरू उमेदवारांचा सहभाग आहे, याबद्दल काही खात्रीलायक विदा उपलब्ध आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(शिवाय पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणांवरून इतर सर्व भारताचा अंदाज लावणे चूक आहे.)

'स्वतःवरून जगाची पारख करू नये' असे विधान अधिक रोचक-दिलखेचक वगैरे वाटते. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या परिचयात तरी असे उदाहरण पाहिले नाही अजूनपर्यंत.

तुमचं लक्ष केव्हा होतं म्हणून तुम्हाला माहित असेल? तुमचं डोकं नेहमी पुस्तकांत, आजूबाजूला काय चाल्लंय याची तुम्हाला काय माहिती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अरेरेरे, स्वतःचे गुणधर्म इतरांना लावू नका बरे निळे ब्यानर्जी Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवांतरः आज मुले कोणत्या वयात या गोष्टी करतात (नीलचित्रपट पाहणे, पिवळी पुस्तके वाचणे वगैरे) याची कल्पना नाही. पण सिनेमातली मुले ते करण्यासाठी फार लहान वाटली. पुस्तके मुलीसुद्धा वाचतात आणि ती वाचल्यावर त्यांना चित्रपट पाहण्याची इच्छा राहते हे पटले नाही. आणि मुलगे चित्रपट मुलींना बरोबर घेऊन पाहतात हे तर अगदीच कैच्याकै वाटले.

अनेक वर्षापुर्वी मुले ७वी/८वीत हे प्रकार(नीलचित्रपट पाहणे, पिवळी पुस्तके वाचणे वगैरे) सर्रास करत होती ('अ' आणि 'फ' तुकडीतली), आजची मुले करत असल्यास नाविन्य वाटत नाही. एकत्र चित्रपट बघणे सहसा शक्य होत नाही म्हणून ते वेगळे वाटते पण अशक्य वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरचे प्रतिसाद वाचुन मी फारच वेळ वाया(??) घालवला वाटायला लागलय Sad
आत्ता एक दोन वर्षच झाली हो... आणि ते पण अजुन कार्टुनच पाहतेय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज मुले कोणत्या वयात या गोष्टी करतात (नीलचित्रपट पाहणे, पिवळी पुस्तके वाचणे वगैरे) याची कल्पना नाही. पण सिनेमातली मुले ते करण्यासाठी फार लहान वाटली. पुस्तके मुलीसुद्धा वाचतात आणि ती वाचल्यावर त्यांना चित्रपट पाहण्याची इच्छा राहते हे पटले नाही. आणि मुलगे चित्रपट मुलींना बरोबर घेऊन पाहतात हे तर अगदीच कैच्याकै वाटले.

सगळ्या पालकांना असंच वाटतं! म्हणून तर आम्ही जे काय केलं ते करू शकलो ना त्या वयात!!

आमच्या पालकांच्या ओळखीचे कोणी वाचत असल्यासः हायपोथेटील फिलॉसॉफीकल वाक्य आहे, फारसे मनावर घेऊ नये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'ब्रेकिंग बॅड' आणि 'द वॉकिंग डेड' या मालिका मी आधी जवळजवळ बरोबरच पाहत असे. वॉकिंग डेडचे मागच्या वर्षीचे भाग नेटफ्लिक्सावर आलेले दिसले आणि निम्म्याहून अधिक पाहून टाकले. जगात सगळीकडे झाँबी लोक फिरत आहेत, काही काहीच लोक जिवंत आहेत आणि हे काही लोक झाँबी व इतर शिल्लक न-झाँबींच्या ओबडधोबड अराजकात कसे नॅविगेट करतात असे साधारण कथासूत्र आहे. यात नाविन्यपूर्ण काहीच नाही पण कंटाळवाणेही नाही. अमेरिकन समाजजीवनाविषयी अनेक निरीक्षणे नोंदवण्याच्या शक्यता असतांना मालिकेत त्यांना फारसे स्थान नाही. प्रत्येक भागात थोडाफार हिडीस रक्तपात आहे पण तो सहन करण्याजोगा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेल्यानंतरही अस्तित्व असणार्‍या अन जीवंत लोकांना सतत छळणार्‍या झाँबीज् तुम्हाला आवडतात हे वाचून अजिबात आश्चर्य वाटले नाही! Wink

(हा प्रतिसाद फक्त अभ्यासूंकरिताच!) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

आत्ताच दो आँखे बारा हाथ पाहिला. एरवी मी नेहमी सिनेमा पाहताना दिलेला वेळ किंवा दिलेले पैसे सत्कारणी लागले का असा प्रथम विचार करतो. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर पहिल्यांदाच ज्या भावनांनी ज्यांनी हा चित्रपट बनवला त्यांच्या त्या भावना 'पाहण्यास' आपण पात्र तरी आहोत का असा विचार मनात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नुकताच रिलीझ झालेला ग्रॅव्हिटी सिनेमा पाहिला. ३डी-च पहावा असा सिनेमा आहे. सिनेमातील काही फ्रेम्स अफलातून आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे सिनेमात स्टोरीला रोमांचक करायचे म्हणून कोठेही भौतिकशास्त्राच्या नियमांना तिलांजली दिलेली आढळली नाही. उलट काही ठिकाणी कथानकांत न्युटनला गृहित धरले आहे असे जाणवते. स्पेसवॉक वगैरे गोष्टी 'खोट्या' वाटल्या नाहीत (किमान माझ्यासारख्या एअरोस्पेस इंजिनीअरला तरी ;-)). स्पेसमध्ये आवाज ऐकू येत नाही हे सुरवातीलाच सांगितले आहे, पण आपल्याला मात्र अनेक आवाज येत राहतात, हा परिणाम सुरुवातीलाच आपण अ‍ॅस्ट्रोनॉट्सचे माईकमधून होणारे संवाद ऐकतो आहेत अशी योजना करून साधले आहेत. स्पेसशटल, रीएंट्री कॅप्सुल वगैरे अचुक घेतले आहेत, स्पेशल इमॅजिनेशन्स कुठे वाटली नाहीत. सॅन्ड्रा बुलकचा अभिनय चांगला आहे. क्लूनीचा छोटाच पण आकर्षक रोल. काही ठिकाणी 'गीक' लोकांना आवडतील अशी माहिती आहे (आणि ती सुस्पष्ट करून सांगितलेली नाही, म्हणून नर्ड लोकांनाही आवडेल).

एक खटकण्यासारखी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी कॅमेरा म्हणजे आपले डोळे आहेत असा इफेक्ट अकारण दिल्यासारखा वाटतो. विशेषतः जिथे कथानकात कोणीतरी एकटं आहे अशी परिस्थिती असताना मी कॅमेर्‍यात आहे ही जाणीव रसभंग करते. एकूणात बघण्यासारखा चित्रपट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बंबई का बाबु पाहिला. त्याकाळाच्या मानाने बोल्ड विषय वाटला. काहीही करुन ओढुनताणुन आनंदी शेवट करतील वाटलेल, पण नाही केलाय.
आता हावडा ब्रिज पाहतेय. खूप स्टायलीश आणि खर्चिक चित्रपट वाटतोय.
आणि हो दबंग २ पाहिला. एक दिड वर्षापुर्वी दबंग पाहिलेला तेव्हा 'काय फालतु पिक्चर आहे' वाटलेल. पण आता दबंग २ बरा वाटला. बहुतेक माझ्या अपेक्षा खालवल्या आहेत किँवा मीच खालवलेय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जालावर सहज उचकपाचक करताना सापडलेला व्हिडीओ.
रिचर्ड फाइनमनबद्दल तुम्हाला बहुधा माहीत असेल. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार याला मिळाला आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावा, याबद्दल त्याचे मत आपल्याला कळून येते. ७:०५ मिनिटानंतर शंका घेणे का महत्वाचे आहे याबद्दल विचार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकावर मिळालेला व्हीडीओ: First Man To Wear A Sanitary Napkin Has An Epic Story To Tell

या माणसाचं शिक्षण, विनोदबुद्धी, साधेपणा, गोडवा आणि मुख्य म्हणजे तळमळ पहाता हा व्हीडीओ इथे शेअर केल्याशिवाय रहावलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हिडिओ फ़ेसबुकवर पाहिलाच होता.

त्याच्या घरच्या महिलांनी (तसेच इतरही महिलावर्गाने) त्याच्याशी असहकार* पुकारलेला ऐकून दु:ख वाटले.

*अर्थात हे त्याचे व्हर्शन आहे. त्या महिलावर्गाचे व्हर्शन आपल्याला ठाऊक नाही**.

**हा डिस्क्लेमर सहज रावांशी झालेल्या चर्चेतून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दिग्दर्शक तारसेम सिंग यांच्या द फॉल मध्ये हात फ्रेक्चर झालेली लहानशी गोड मुलगी अलेक्झांड्रा आणि अपघात झालेला स्टंटमॅन
यांची कथेतून कथा सांगणारा हा एक अनोखा चित्रपट आहे . फँटसी, अॅडव्हेंचर आणि वास्तव यांची व्हायब्रंट , रंगतदार सिम्फनी जमली आहे .
कथेतली पात्रे त्यांचे चित्र विचित्र पोशाख आणि वागणे सगळेच अदभुत आहे .संथगतीने सरकणारा सिनेमा शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवतो .
जगातल्या विविध अप्रतिम लोकेशन्सवर चित्रित झालेला हा सिनेमा डोळ्याचे पारणे फेडतो . विशाल राजवाडे , गुंतागुंतीचे राजस्थानी किल्ले ,
विहिरी , सोनेरी वाळवंट , गडद निळे आकाश आणि हिरवेकंच झगमगते पाचूचे बेट मंत्रमुग्ध करतात . अलेक्झांड्राचे काम करणारी चिमुकली
आणि तिचा जिवलग दोस्त झालेला स्टंटमॅन यांचा अभिनय लाजवाब आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या नवीन आलेल्या नाटकातलं बर्‍याच जाहिरातीत दिसणार "गेट वेल सून" पाहिलं.
कसं वाटलं म्हणताय? खर सांगतो, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी , लेखक प्रशांत दळवी , रंगभूमीवर क्वचितच दिसलेला स्वप्निल जोशी, संदिप मेहता
ही आपापल्या क्षेत्रातली स्टार, यशस्वी मंडळी एकत्र आहेत म्हटल्यावर जरा जास्तिच अपेक्षा ठेवून गेलो.
नाटक एकूणात चांगलं. एकदा तरी पहावं असं.
पहिला अंक अत्यंत संथ वाटत होता. म्हणजे अगदिच नाकासमोर गाडी जावी तसा अपेक्षित घटनांचा पट संथ गतीनं समोर येतो.
कंटाळा यायला लागतो. पण एवढ्यात धमाकेदार ट्विस्ट येतो आणि पहिला अंक संपतो.
दुसर्‍या अंकापासून कथा बरीच पकड घेते, वेगवान होते. कंटाळा येत नाही. उत्कंठा वाढवत ठेवते.
शेवट छानच.(समीक्षकीय चष्म्यातून त्यातही बर्‍याच उणीवा जाणवण्याची शक्यता दिसते.पण मला आवडला.)
अनिल अवचटांचं लिखाण किंवा इतरत्र काउन्सिलर लोकांशी बोलणं झालेलं असल्यास पहिल्या अंकात आपल्याला तेच ते पुन्हा पुन्हा पाहिल्यासारखं नि ऐकल्यासारखं वाटू शकतं.
.
अवघड असलेला भाग कोणता? नाटकात बराच भाग पत्रव्यवहाराचा आहे. पण तो कंटाळवाणा होत नाही. पात्रे समोरच्याशी बोलावीत तशी पत्रे लिहितात, बोलतात.
त्यातून प्रतिक( स्वप्निल जोशी ) चा प्रवास मस्त दाखवलाय. त्याच्या डोक्यात काय चाललय ते मस्त दाखवलय.
व्यसनी माणसाच्या डिनायल मोडपासून ते सकारात्मक, बढाईखोर ते निश्चयी आणि मॅच्युअर्ड हा बदल हळूहळू होताना छान टिपलाय.
.
डॉक्टरचे काम संदिप मेहतांनी चांगले केले आहे का? हो. केले आहे. पण तरी अजून काहीतरी हवे होते. त्या भूमिकेवर त्यांचा ठसा जाणवायला हवा होता.
म्हणजे नक्की ते कसे हे सांगता येणार नाही; पण हीच भूमिका अशोक सराफ, विक्रम गोखले किंवा दिलिप प्रभावळकर ह्यांनी काहीतरी वेगळी केली असती असे वाटत राहिले.
"ठसा असणे" म्हणजे काय? तर त्या त्या भूमिकेसाठी दुसरे नावच विचारात न येणे.
आज गंगाधर टिपरे ह्यांच्या भूमिकेसाठी इतर कुणाची कल्पनाही करवत नाही प्रभावळकरांशिवाय.
किंवा "गब्बर" हा अजून कुणी केला असता तर???
नाही, गब्बर म्हटला की अमजद खानच डोळ्यासमोर येतो. मी तसं काहीतरी म्हणतोय.
(आता त्या पात्राच्या,संहितेच्याच मर्यादा आहेत हे मान्य. डॉ बहुतांश वेळ समजावणीच्या सुरात काउन्सिलर सारखे बोलणारे पात्र आहे हे मान्य. पण तरीही "अजून काहीतरी हवे होते.")
.
अगदि अल्पांशाने का असेना " एकच प्याला" शी तुलना मी मनातल्या मनात करु लागलो होतो.(एकच प्याला पाहिलेले नाही; वाचलेले आहे.)
पण नाटकाचा वास्तववादी पण सकारात्मक शेवट आवडला.
व्यसन म्हटलं, त्यातही दारुचं की बटबटीतपणाचा ऊत येइल का काय किंवा प्रचारकी थाटाचं काहीतरी ऐकावं लागेल का काय अशी भीती होती.
ती भीती खोटी ठरल्यानं आनंद झाला.
.
राहून राहून पहिल्या अंकात अजून काहीतरी हवं होतं असं वाटलं. पण नेमकं काय हवं होतं; ते सांगता येणार नाही.
.
.
संजोपरावांनी उळ्ळागड्डी पाहिल्याचं लिहिलय. त्यांच्यापाठोपाठ आठवडाभरात आम्हीही पाहून घेतले.
खरं तर उळ्ळागड्डी "पाहिलं" असं म्हणण्यापेक्षा उळ्ळागड्डी "अनुभवलं" असं म्हणणं योग्य ठरेल.
प्रयोग पाहताना वारंवार पडलेला प्रश्न हाच की ह्या साल्यांनी ह्याच्या तालमी कशा केल्या असाव्यात?
मुळात असा काही प्रकार सुचलाच कसा असावा?
असेही काही आपण मांडू शकतो, तेही रंगभूमीच्या तांत्रिक मर्यादांची जाण ठेवून हे ह्यांना वातलच कसं असावं?
.
एवरेस्ट प्रथमच चढून गेलेल्या व्यक्तीबद्द्ल मला हेच कुतूहल वाटतं.
"आपण हे करु शकतो" किंवा "हे असं करुयात" हे त्यांना वाटलच कसं?
.
.
.
मला नक्की काय आणि का आवडलं?
विषय, आशय आवडला. मांडणीसुद्धा बरीचशी आवडली.( नेपथ्यातील सफाई सरस.)
कमर्शियल नाटक म्हणजे प्रशांत दामले ह्यांची नाटकं असं समीकरण पूर्वी घट्ट होतं; आजही बरचसं आहे.
मलाही ती पहायला आवडायचीच. पण सतत तेच ते पाहून कंटाळा आल्यासारखं झालं.
एका लग्नाची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, शूsss कुठे बोलायचं नाही वगैरे वगैरे. ही सारी पैसावसूल आहेतच.
पण त्याशिवायही काहीतरी हवं होतं. ते अशा संहितातून मिळतं.
वेगळ्या शब्दांत म्ह्णजे बॉलीवूडी मनोरंजनपट वाईट असतो का ?
अजिबात नाही. अवश्य पहावा. पण सतत रेडी, दबंग्ग , बोड्डीगार्ड, रब ने बना दी जोडी, सिंघम हे फॉर्म्युलापट बघून हैराण झालेल्या प्रेक्षकाला
मग "भेजाफ्राय", "अंग्रेज", "काबूल एक्स्प्रेस", "कहानी" हे चित्रपट आवडतात.
कित्येकदा "काबूल एक्स्प्रेस", "कहानी" हे जागतिक दर्जाच्या चित्रपटांच्या तुलनेत कुठे बसतात? ह्याची चर्चा जाणकार समीक्षक करतात. पण सुदैवाने आपली बुद्धीमत्ता इतकी उच्च नसल्याने
आपल्याला फॉर्म्युला मूव्हीमधून, पठडीबाजसिनेमातून सुटकेचा निश्वास टाकायला हे सिनेमे पुरेसे असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कामाच्या ताणावर उतारा म्हणून एक तद्दन गल्लाभरू, मसालेदार, आतार्किक घटनांनी ठासून भरलेला, साउथ स्पेशल नॉनसेन्स अ‍ॅक्शन आणि जोक्स असलेला असा बिनडोक शिणुमा बघायचं ठरवलं आहे. असे सिनेमे बघणे ही देखील एक कला आहे. त्यात एक वेगळी मजा असते. बहुतेक बॉस कडून या सर्व अपेक्षा पूर्ण होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

तद्दन कमर्शिअल, कलामूल्य वगैरेचा संबंध नसलेली मेंटॅलिस्ट ही माझी अतिशय आवडती मालिका. सायमन बेकर तर फारच आवडता. या मालिकेचा सहावा सीझन सुरु झाला आहे. त्यातले पहिले दोन भाग पाहिले. 'आयकिया' फर्निचरच्या एका जाहिरातीत डोके बाजूला काढून ठेवण्याची 'आयडिया' दाखवली होती, त्याची आठवण झाली. तासभर फार मजेत गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सायमन बेकर जरा जास्तच स्टायलिश वाटत नाही का? पात्रं फारच ऑब्विअस असल्यासारखं बोलत असतात, केसेस फारच आरामात सॉल्व्ह होतात, हे सगळं ओशन्स् इलेव्हन च्या धर्तीवर वाटतं, स्मार्ट डायलॉग्स, स्मुथ विश्लेषण आणि ऑब्विअस रिझन्स्. त्यात रॉबिन टनीचा जबडा एका साईडने थोडा पंच केल्यासारखा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टू मच अमेरीकन. यू सेड इट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

काल 'भाग मिल्खा भाग' पाहिला. या वर्षीच्या उत्तम चित्रपटांपैकी एक नक्कीच आहे. लोकांकडून फरहान त्याची ही भुमिका जगलाय हे ऐकलं होतं, ते काल पाहण्यात आलं. त्याच्याशिवाय दिव्या दत्तासुद्धा तिची भुमिका जगली आहे असेच म्हणावे लागेल. ह्या अभिनेत्रीला अजून चांगले आणि मोठे रोल मिळावेत असे वाटते. चित्रपट छान असला तरी थोडा लांबल्या सारखा वाटला. विमानातला प्रसंगं अनावश्यक वाटला. शिवाय धावण्याच्या पुर्वतयारीचे प्रसंगं (मध्यंतरानंतरचे) लदाखमधे का घेतले ते समजले नाही. थोडाफार वगळता माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला पाहण्याआधी रटाळ असेल असे वाटू शकणारा चित्रपट खूप आवडला. प्रत्येकाने जमल्यास (कायदेशीर /बेकायदा हे ज्याचे त्याने ठरवावे) एकदा जरूर बघावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

My life as a dog नावाचा स्वीडीश चित्रपट पाहिला.

दुसरं महायुद्ध संपून काही वर्ष गेली असावीत. खट्याळ इंगमारच्या उद्योगांनी त्याची आई त्रस्त झालेली आहे. इंगमार आणि त्याचा मोठा भाऊ यांना सहन करण्यापलिकडे तिची तब्येत ढासळली आहे. आई मरणशय्येवर आहे याचा इंगमारला पत्ता नाही. इंगमारची रवानगी त्याच्या मामाकडे आणि मोठ्या भावाची आणखी एका नातेवाईकाकडे होते. इंगमार सतत दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करून, आपली दु:ख काहीच नाहीत, या विचारात अडकलेला असतो. स्पुटनिकवरून अवकाशात पाठवलेली कुत्री, लायका, हिच्याबद्दल त्याला विशेष सहानुभूती आहे.

अखेर त्याची आई मरते आणि त्याच्या लाडक्या कुत्रीलाही दयामरण दिलं गेलं या दोन बातम्यांमुळे तो ढासळतो. पण मामा आणि मामाच्या गावातले इतर लोक यांच्या मदतीने तो पुन्हा सावरतो. इंगमार, त्याचं मित्रमंडळ, मामा-मामी, त्या गावातले लोक, त्यांचं फुटबॉलप्रेम, हे सगळे प्रकार बघण्यासारखे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लव्ह इन द टाईम ऑफ कॉलरा :~ :O हा विचित्र नाव असलेला सिनेमा , लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेज यांच्या वन ऑफ द क्लासिक्स अश्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे .कादंबरी वाचलेली नसल्याने उत्सुकतेने सिनेमा पाहिला आणि साफ निराशा झाली . पहिल्याच दृश्यात मेकअपचे थर लावून वृद्ध केलेले प्रमुख कलाकार इतके खटकले की पुढचा सगळा खटाटोप कृत्रिम आणि व्यर्थ वाटला .दगडी चेहेर्याची नायिका आणि बुभुक्षित दिसणारा तिचा प्रेमिक पाहून यांना एकदाचा तो कॉलरा होऊन हे मरत का नाहीयेत म्हणून अपार खिन्नता आली . प्रेमपत्र लिहून झुरणारा आणि रडणारा हिरो नंतर झुरण्याच्या दुख्खावर उतारा म्हणून म्हातारा होईपर्यंत फक्त ६२२ स्त्रियांशी संभोग करतो आणि ते सगळे लिहून ठेवतो . यातले निवडक आपल्याला बघावे सुद्धा लागतात . येनकेन प्रकारेण स्त्रियांचे अनावृत्त स्तन दाखवण्याची संधी साधलेली आहे . शेवटी सत्तर वर्षांच्या वृद्ध प्रेयसीशी ती विधवा झाल्यावर एकदाचा संभोग करतो आणि आपण सुटतो .याच साठी केला होता अट्टहास (चित्रपटातला ) शेवटचा सम्भोग गोड :O व्हावा , असले कैच्या कै वाटले ब्वा !! हुश्श् !
कादंबरी वाचली नाही ते बरेच झाले कारण तिचे किती वाटोळे केले आहे कळले नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया वाचून आता हा चित्रपट बघावाच असं वाटायला लागलंय. नावं ठेवतानाही एवढी आकर्षक शैली का वापरावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही किमान शब्दांत कमाल तारिफ केलिये.
हा चित्रपट साक्षात "गुंडा"ला टक्कर देउ शकेल असे वाटू लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गुंडाशी टक्कर देऊ शकेल असा पिच्चर गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुढच्याही दहा हजार वर्षांत होणार नाही. त्यामुळे हे ब्लास्फेमस शब्द मनोबांनी मागे घ्यावेत.

"जगात एकच पिच्चर आहे तो म्हंजे गुंडा आणि त्याचा डिरेक्टर आहे कांती शाह".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं