कसं काय पाटील, बरं हाय का? - विडम्बन

सोशल मिडीयाचा वापर करून काँग्रेसची बदनामी केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल - इती सतेज पाटील, गृहराज्य मंत्री. त्याला माझं उत्तर!

कसं काय पाटील, बरं हाय का?
आज काय वाचलं ते खरं हाय का?

आवं लकवावालं तुमी
आवं चकवावालं तुमी
आवं घड्याळवालं तुमी
आवं हातवालं तुमी

सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?

काल म्हनं तुमी दिल्लीला ग्येला
दिग्गीच्या तालमीत तयार होवून आला
सोशल मिडियाची कशी, वाट लावलीत अशी
आता काय शिलकी ऱ्हायलंय का?

सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?

आता म्हनं तुमी, कायदाच क्येला
फेसबुक, ट्विटरवरी घातलात घाला
सरकारवरती टीका, तुरुंगात फ्येका
आनिबानीचं दिस परत आनलंय का?

सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?

कसं काय पाटील, बरं हाय का?
आज काय वाचलं ते खरं हाय का?

Shefali Vaidya

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

याला प्रत्युत्तर म्हणून आडकित्ता यांच्या महाविडंबनाच्या प्रतिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इडंबन बिडंबन नाय जमायचं. फार्तर गृहराज्यमंत्र्यांच्या पीए ना ऐ.अ. चे अकाउंट उघडून देतो. Wink ज्यांच्या नावाने पत्र लिवलंय थितं पोचिवनार्‍या पोष्टमनाचा दर्जा आमास्नी द्या हवा तं. आमची काय छाती ओ प्रहसनं आन विडंबनं लिवायची? त्ये काम जालिय बालकांनीच करावे Wink
आमाला येका प्रश्नाच्या उत्तरादाखल अल्लग धागं बी खोल्ता येईनात राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पण एक सांगा, हे गुन्हा दाखल करणं, छळ करणं फार आधीपासूनच चालू आहे नैका? शिवसेना-मनसे, सीपीएम, काँग्रेस, बीजेपी, इ. या सर्व पक्षाच्या लोकांनी किमान एकदातरी असे केलेच आहे. सतेज पाटलांचे वक्तव्य काय वेगळे आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होऊन जाऊ दे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'जालीय वयात' (म्हन्जे काय कोण जाणे) अजुन अज्ञान आहे हो मी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गल्ली चुकली वाट्टं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिग्गीच्या तालमीपेक्षा कपिल सिब्बल च्या तालमीत असे म्हणावे लागेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

पूर्वी एकदा तहलकाने भाजप अध्यक्षांची लाच घेतानाचा व्हिडो काढला म्हणून तहलकाच्या मागे पोलीस, इन्कमटॅक्स वगैरेचा ससेमिरा लावला गेल्याचं अंधुक आठवतंय ब्वॉ. अर्थात पब्लिक मेमरी शॉर्ट असते असं कायतरीसुद्धा म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.