आज्जीच्या गोष्टी

पूर्वी गावातून एखादी गोष्टीवेल्हाळ आजी फेमस असायची. माझ्या गावी समोरच्या घरातली हीरा ही आज्जी न म्हणवता येईल अशी चिरतरुण आणि उत्साही आजी गोष्टी सांगण्यासाठी प्रसिद्ध होती. तर आजोळी आइची आई गोष्ट सांगायला लागली कि आजूबाजूच्या बाया पोराटोरांना घेऊन ओसरीवर येऊन बसत. आजोबा पण गोष्टी सांगायचे, पण आजीच्या ढापलेल्या.

आजीची सुखीदुखीची गोष्ट, ओनाम्या, गुलबकावलीचं फूल अशा गोष्टी रात्र रात्र रंगायच्या. अगदी अलिफ लैला सारख्या. सुखी दुखी सारख्या गोष्टी लहान मुलांसाठी संस्कारक्षम होत्या. मुलांना त्यांचे दोष न दुखावता जाणवून देणा-या अनेक गोष्टी तिच्याकडे होत्या. आता बाल मानस शास्त्र हेच सांगतं, नाही का ? मुलांवर थेट आरोप करू नका, लेक्चर दिल्यासारखी माहिती देऊ नका. पण या गोष्टीतून कितीतरी शहाणपण यायचं. पूर्वी भले लोक आताइतके उच्चशिक्षित, गुग्गुळाधिष्ठीत, वरकाय प्रणालीधारक (What's up App) नसतील पण व्यवहार ज्ञान, शहाणपण हे या सर्वांच्या अभावीही उत्कृष्ट असायचं. गोष्टी सांगण्याचा उद्देश मुलांना शहाणे करणे, नीतीशास्त्राचे धडे देणे, आजूबाजूच्यांशी कसं वागावं हे सांगणे याचबरोबर मनोरंजन हा ही असायचा. करमणुकीची साधनंही मर्यादीत असल्याने गोष्टीवेल्हाळ व्यक्तीला महत्व असायचं. मागच्या दोन तीन पिढ्यात ही कला लोप पावत चालली आहे. सीडी, टीव्ही, संगणक यांच्या आक्रमणाने पालकांनी मुलांना गोष्ट सांगणे हे राहीलंच नाही. पालकांनाच गोष्टी येत नाहीत. लहानपणी ऐकलेल्या आता आठवत नाहीत. मुलांना कार्टून लावून दिलं जातं म्हणजे तो त्रास देत नाही.

पण कार्टून पाहील्याने त्याच्या विचारक्षमतेला चालना मिळत नाही. गोष्ट ऐकताना मूल जे व्हिज्युअलायझेशन करतं त्यामुळे त्याचा बौद्धीक विकास होतो. कार्टून मध्ये रेडीमेड चित्रमालिका समोर येत असल्याने ही प्रक्रिया घडत नाही. चुकभूल देणे घेणे. अशा वेळी आजीच्या गोष्टींचं महत्व वादातीत आहे असं वाटतं. हा ठेवा काळाच्या उदरात लुप्त होउ नये यासाठी आपल्याला काही करता येईल का ? एक सुचवावंसं वाटतं कि, आपल्याला आवडलेल्या, माहीत असलेल्या गोष्टी इथे टंकूयात, जेणेकरून आपल्या मुलांना सांगण्यासाठी आजीच्या गोष्टींचा खजिना वाढवत नेता येईल. बघा पटतंय का ?

मग करताय ना सुरूवात ?

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

हा धागा कुठे उघडावा हे न समजल्याने मौजमजा या सदरात सुरू केला होता. संचालकांना विनंती आहे कि योग्य त्या ठिकाणी हलवणे शक्य असल्यास कार्यवाही करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

धागा सध्या मौजमजेतच योग्य आहे. कथांचे संकलन झाल्यावर 'ललित'मधे हलवायचा विचार करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शाळेला जाताना
मुलांनी वाटेत
तमाशा पहात
थांबू नये

अश्या स्वरुपाच्या ओळी आजी म्हणायची. शाळेला जाताना वाटेत लफडा दिसला तर थांबायचे नाही आणि त्याचे निरखून, दीर्घकाळ,गर्दीच्या टांगेखालून घुसत सर्वात पुढच्या फळीला भेदून रसभरित दर्शन घ्यायचे नाही ही कल्पना आचरणात आणणे फार कठीण असल्याने मी ते फारसे मनावर घेत नसे.

बाकी आठवेल तसे. माझ्या बाबतीत आजोबा जास्त गोष्टीवेल्हाळ होते. त्यांच्याही गोष्टी चालाव्यात. आजी हे एक प्लेसहोल्डर सर्वनाम आहे असं मानतो.

ता.क. - वरकाय प्रणालीधारक हे व्होट्सअ‍ॅपचे नामकरण थोबाडपुस्तकाच्या थोबाडीत मारणारे आहे.

द. ही. - Viberला थरथराट म्हणावे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या बाबतीत आजोबा जास्त गोष्टीवेल्हाळ होते. त्यांच्याही गोष्टी चालाव्यात

. >> होय. आजीच्या गोष्टीत काका-काकू, मामा-मामी असे सगळेच यावेत ही अपेक्षा. धन्यवाद गवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

(ही गोष्ट पहा बरं माहीत आहे का ?)

एका गावात एक गरीब विधवा राहत असते. तिला दोन नाती असतात. एकीचं नाव सुखी तर दुसरीचं दुखी. सुखी काहीच काम करत नसे. ती आजीला रोज मला काय हवं याचं फर्मान सोडत असे. आजीने तिला काम सांगितलं आणि तिनं ते केलं अस व्हायचंच नाही. तिला स्वतःचं काम सुद्धा जमायचं नाही. दुखी मात्र खूप गुणी मुलगी होती. ती आजीला स्वतःहून मदत करायची. गाईला पाणी पाजणे, शेळ्यांना चारा टाकणे, घर, घराभोवतीची ओसरी झाडून पुसून लख्ख करणे ही कामं ती आनंदाने करायची. याशिवाय सुटीच्या दिवशी आजीबरोबर घरातले कपडे घेऊन नदीवर धुवायला जायची. आजीला ती आवडायची. पण दोन्हीही तिच्याच नाती असल्याने सुखीच्या वागण्याकडे ती काणाडोळा करायची. सुखी यामुळं शेफारत चालली. त्यातून ती गोरी आणि सुंदर असल्याने येणारे जाणारे तिचीच चौकशी करत. दुखी रंगाने सावळी होती आणि दुखीसारखी सुंदर नव्हती. तिच्याकडे कुणी फारसं लक्ष देत नसत. सुखी मात्र दिवसेंदिवस गर्विष्ठ आणि उर्मट होत चालली.

एक दिवस आजीने बाहेर कापूस सुकायला घातला होता. पण अचानक वा-याला खोडी काढायची लहर आली आणि तो सगळा कापूस घेऊन पळाला. ते पाहून आजी माझा कापूस असं ओरडू लागली. सुखी ऐकत होती पण ती आपल्याच नादात होती.

दुखी आतून पळत आली आणि कापूस उडताना पाहून वा-याच्या मागे पळू लागली. कापसाच्या मागे पळत असताना तिला कापसाच्या झाडाने हाक मारली. झाड म्हणालं मला पानी हवंय. माझ्या भोवती थोडी सफाई कर. दुखीने आपल्या स्वभावाला अनुसरून झाडाची सफाई केली. त्याला पाणी घातलं. तेव्हां झाडाने पळण्याचं कारण विचारलं. दुखीने मग सगळं सांगितलं. झाडाने तिला आशिर्वाद दिले आणि येताना माझ्याकडे ये असं बजावून सांगितलं. दुखी पुन्हा वा-याच्या मागे पळू लागली. एव्हांना कापूस बराच लांब गेला होता.

तिला असं पळताना कपिला गायीने पाहीलं. तिने दुखीला पाहून तिला हाक मारली. दुखी लगेच तिच्याकडे गेली. गायीने तिला विचारलं माझा गोठा खूप घाण झालाय, मालक लक्ष देत नाही. मला आता बाळ होणार आहे. तू माझा गोठा साफ करून शेणाने सावरून ठेवशील का ?
दुखीला सर्वांना मदत करायला आवडायचं. तिने कापूस सोडून कपिला गायीचा गोठा साफ केला. शेणाने सारवला. पाणी बदललं. तिला चारा टाकला आणि तिला विचारलं अजून काही हवंय का ? गाय म्हणाली नको. पण तू कुठे चाललीस ? मग दुखी हसतच म्हणाली अग माझा कापूस वा-याने नेला. मग गाय हसतच म्हणाली.. अगं मग आधी पळ. पण येताना माझ्याकडे नक्की ये.

दुखी आता पुन्हा कापूस परत मिळवण्यासाठी धावू लागली. वाटेत भेटलं एक केळीचं झाड. केळी म्हणाली दुखी मला पाणी पाज. पाटाचं पाणी बंद झालंय. मला पाणी मिळत नाही. दुखीने पाहीलं केळी सुकून चालली होती. तिने पाहीलं तर केळीकडे येणा-या पाटाचं पाणी बांध घालून बंद केलं होतं. मग दुखीने हाताने बांधाची माती बाजूला केली. मग पाटाचं पाणी केळीच्या वाफ्यात पोहोचलं. केळी हसली आणि म्हणाली, जाताना माझ्याकडे ये.

दुखी पुन्हा धावू लागली. आतापर्यंत ती खूप लांब पोहोचली होती. तिला थकल्यासारखं वाटत होतं. पण तिने कंटाळा केला नाही. इतक्यात तिला एका जवळच्या घरातून कुणी तरी हाक मारली. तिने पाहीलं तर एक म्हातारी रडवेली होऊन हाक मारत होती. दुखी तिच्या जवळ गेली आणि म्हातारीची विचारपूस केली. त्यावरून तिच्या लक्षात आलं कि म्हातारी दोन दिवसांपासून भुकेलेली आहे. तिला स्वतः काही करणं अशक्य होतं. म्हणून म्हातारीने तिला विचारलं कि मला भात वरण लावून दे आणि मला खायला घाल. दुखी लगेचच तयार झाली. तिने तांदूल निवडले. डाळीतले खडे निवडून ठेवले. चूल पेटवली. भांडी घासली. पाणी भरलं आणि भात लावला, वरण केलं. भाताचा सुवास घमघमला तशी म्हातारी म्हणाली मुली त्या विहीरीत आंघोळ करून ये आणि माझ्याबरोबर दोन घास खा. दुखीला भूक तर लागली होती पण संकोच आणि विनयाने ती नको म्हणाली. तेव्हां म्हातारीने तिला निर्वाणीचं सांगितलं कि मी सांगते तसं करावंच लागेल, तरच मी जेवीन. मग दुखीने विहीरात स्नान केलं. बाहेर आली आणि काय..

तिला धक्काच बसला. तिचे हात पाय तिला गोरेपान दिसू लागले. तिने घाईत अंग पुसलं. कपडे केले आणि आरशात पाहू लागली तर काय ती खरोखर गोरीपान आणि सुंदर मुलगी झाली होती. तिने वळून पाहीलं तर म्हातारी हसत होती. दुखीला आश्चर्य वाटलं. तिने घाईघाईत म्हातारीला जेवण वाढलं. तर म्हातारी हसून तिलाच दोन घास खा म्हणू लागली. तेव्हां दुखीने मला कापूस आणायला जायचंय हे सुरुवातीपासून सगळं सांगितलं. म्हातारी म्हणाली तू घरी जा, तुझा कापूस तुला परत मिळेल. पण जाताना दोन घास खावून जा. दुखीने मग म्हातारीच्या आग्रहाखातर दोन घास खाल्ले. आणि काय आश्चर्य ! ती पूर्वी अशक्त दिसायची. पण आता बाळसं धरल्यासारखी ती छान द्दिसू लागली. तिचा स्वतःच्या रुपावर विश्वासच बसेना. मग म्हातारीने तिला ते पातेलं घेउन जायला सांगितलं. तुला आणि तुझ्या आजीला कधीच कमी पडणार नाही असं ते अक्षयपात्र आहे असं सांगितलं. दुखी म्हातारीच्या पाया पडली आणि घरी निघाली.

इतक्यात तिला केळी दिसली. केळीला घड लागले होते. केळीने तिला हाक मारली. म्हणाली अगं दुखी तू माझी सेवा केलीस ना म्हणून माझी तब्येत सुधारली. असं कर हा घड उतरवून घे तुला कधीच काही कमी पडणार नाही. दुखीने मग केळीचा घड उतरवून घेतला. केलीला तिने नमस्कार केला आणि ती निघाली. आता तिला कपिला गाय दिसली. तिला बाळ झालं होतं. कपिला गायीने तिला हाक मारली. तशी दुखी तिच्याजवळ गेली. कपिला गाय म्हणाली आतून एक तांब्या घे. मी तुला दूध देईन ते घरी ने. तुला कधीच दूधासाठी वणवण फिरावं लागणार नाही. दुखीने तांब्या आणला, थोडं दूध घेतलं. कपिला गायीच्या पाया पडली आणि निघाली.

आता तिला भेटलं कापसाचं झाड. त्याला कापसाची बोंडं लागली होती. झाडाने दुखीला हाक मारली. म्हणालं, बघ दुखी, तू मला मदत केलीस ना, बघ किती कापूस मिळाला या वर्षी. तू तुला जमेल तितकी कापसाची बोंडं तुझ्या घरी ने. दुखीने मग फक्त दोन बोंडं तोडून घेतली. कापसाच्या झाडाला नमस्कार केला आणि ती निघाली.

एकदाची दुखी घरी पोहोचली तर तिची आजी तिची वाटच पाहत होती. दुखीला पाहताच तिने तिला मिठी मारली आणि कुठं गेली होतीस हे विचारलं. दुखीने मग सगळी कथा सांगितली. मिळालेल्या भेटी दाखवल्या. मग म्हणाली आजी चल आज केळी पण आहेत, दूध पण आहे. तर शिकरण बनवूयात. आजी हसली. मग दुखीने केळीच्या घडातून केळी तोडली, दूध तांब्यातून ताटात ओतलं. पण काय आश्चर्य !

क्रमशः

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

सुखी दुखीची कथा छान आहे. ही स्वतंत्र धागा म्हणून यावी अशी इच्छा आहे. या धाग्यावर संकलन करण्याचं तुम्ही म्हटलं आहे, पण अनेक कथा एकाच धाग्यात ठेवणं तितकं बरोबर वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक स्वतंत्र कथेला योग्य तो न्याय मिळणार नाही. त्यापेक्षा ही कथा स्वतंत्र धागा म्हणून काढू व त्याचा दुवा इथे देऊ. तुम्हाला पटलं तर सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही ही कथा आवडली आहे. (छोट्यांसाठी?)स्वतंत्र धागा म्हणून यावी याला अनुमोदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याबाबतीत मला स्वतःला काहीच मत देता येत नाहीये. ही कथा परंपरागत चालत आलेली आहे. मला पूर्ण करायला अक्षम्य उशीर होतोय त्याबद्दल आधी माफी मागतो. माझा विचार असा होता, कि या (ज्या आपण स्वतः रचलेल्या नाहीत अशा) परंपरागत पण हरवत चाललेल्या गोष्टींचा ठेवा पुढच्या पिढीसाठी एकत्र ठेवावा. लेकाला गोष्ट सांगताना आठवाव्या लागतात अशा गोष्टी. आपलं स्वतःचं सृजन नसल्याने प्रतिसाद किंवा अभिप्राय यांची कल्पना केलीच नाही. फक्त संकलन असावं असं वाटलं. एक धागा उघडला कि त्यात हवी ती गोष्ट निवडावी, मुलांना सांगायला व्हावी इतकाच माफक हेतू.

यात जे काही योग्य असेल तसं सुचवावं ही विनंती. तसंच व्हावं ही इच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

एकाच धाग्यात गोळा व्हाव्यात हे उत्तम. एखादी कथा जर तितकी सबस्टेन्शियल वाटली तर वेगळा धागा.

कारण प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीचे धाग्याइतके पोटेन्शियल असेलच असं नव्हे, आणि पूर्ण पहिले पान बालगोष्टींनीच भरुन जाईल. पुन्हा प्रत्येक नोंद ही पूर्ण आकाराची कथाच असेल असं नव्हे. एखादा छोटा श्लोक, एखादं वचन, सुविचार असंही काही असेल. चार युक्तीच्या गोष्टीही (कथा अशा अर्थाने नव्हे तर युक्ती याच अर्थाने) असतील. कधीकधी एका वाक्याचा उपदेशही असेल किंवा एक शब्दही न बोलता केवळ आचरणाने आयुष्यभरासाठी शिकवलेलं अमूल्य मूल्य असेल. यात "कसे वागावे" आणि "कसे वागू नये" अशी दोन्ही टोकाची उदाहरणं असतील. सर्वच पॉझिटिव्ह असेलच असं नव्हे.

राघांनाही बहुधा ही एक पर्टिक्युलर गोष्टच फक्त (सुखी- दुखी) वेगळ्या धाग्यात अपेक्षित आहे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी एक आजी वारांच्या गोष्टी सांगायची. पण मला त्या आता आठवत नाहीत.कुणाला माहित असतील तर नक्की लिहा.
आठवणार्‍यांमध्ये नेहमीची लाकूडतोड्याची गोष्ट आहे. सगळ्यांनाच माहित असते ती. आणखीन एक गोष्ट होती ' एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती आणि दुसरी नावडती....' अशी सुरुवात असलेली. पुढचे फार स्पष्ट आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहीत असली तरी द्या. कारण ही गोष्ट ऐकलेली नाही असेही असू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....