आगामी निवडणूकीत कोणते सरकार यावे?

१. सर्वात पहिला प्रश्न आहे तो हा कि हा प्रश्न आपणांस महत्त्वाचा वाटतो का?
याचे उत्तर किंवा नाही असे असावे. सांगता येत नाही असे म्हणू नये कारण किमान इतका स्वतःबद्दलचा अभ्यास अपेक्षित आहे.

२. कोणते सरकार यावे आणि कोणते येणार असे वाटते हे वगवेगळे प्रश्न आहेत. त्यांचा परस्परांवर परिणामही होत असू शकतो. परंतु यांत गल्लत करू नये.
तर दुसरा प्रश्न असा आहे कि आपणांस काय व्हावे असे वाटते त्यापासून काय होणार हे फारच दूर आहे असे आहे का? कारण असे असेल तर काय व्हावे यावर परिणाम व्हायचा जास्त चान्स आहे.

३. आपण किती दृढ विचारांचे आहात? किती अडेल आहात? असे असेल तर आपले मत बदलण्यासाठी काय घडून यावे लागेल? कि अगदी कणकेसारखे आहात? मग काय झाले तेव्हा आपले मत स्थिर होते आणि दिले जाते?

४. आपण कशाला मत देता? राजकीय, आर्थिक, इ विचारसरणींना? पक्षांना? प्रांत, धर्मादि अस्मितांना? उमेदवाराला, म्हणजे त्याची पार्श्वभूमी, चारित्र्य, ज्ञान्, काम करण्याची क्षमता, लोकप्रसिद्धी, स्वीकार्यता? त्याने स्वतःच्या म्हणून सांगीतल्या नसलेल्या अस्मितांना (म्हणजे माझ्या जातीचा, इ) आपल्या मानून? पक्षाच्या नेतृत्वाला? मेनिफेस्टोला? पक्षांच्या युतीला? एखादा त्याचा विरोधक हरावा म्हणून? लोकशाहीचा सन्मान करायला? स्वतःला (उमेदवार म्हणून वा ह्याला माझ्या वळणावर आणलाय असे म्हणणार मतदार म्हणून)? मिळालेल्या लाचेला जागायला? कि अदितीय (lacking sound logic and relevance) मतदान करता? सर्वात प्रभावी नात्याच्या व्यक्तिच्या सांगण्याला?

५. कि मतच देत नाही? का? लॉगिस्टिक्स (वेळ, पैसा)? काही फरक पडत नाही म्हणून? मलाच किंवा कुणालाच? सरकार कोणते आहे याचा व्यक्तिगत जीवनात कोणताच फरक पडत नाही? सामाजिक, देशाचे जीवन महत्त्वाचे नाही म्हणून?

६. मतदान करण्यापूर्वी कोणती काळजी घेता? कि बेधडक एका फॉर्म्यूल्याप्रमाणे जाऊन मतदान करून येता?

७. चांगले लोक राजकारणात नाहीतच असे वाटते का? कि अजून थोडे बरे असायला पाहिजे होते? आपण बरे कि (चांगले) राजकारणी बरे मधे कोणाच्या बाजूने पारडे झुकते? (तुमच्या) विपक्षातला चांगला माणूस पाहून काय वाटते? तो हरावा? चांगले लोक सर्व पक्षात थोडे थोडे आहेत हे बरे कि ते सर्व एकाच पक्षात राहिले असते तर ते बरे?

८. सक्रिय प्रचार करता का? सहज घरेलू प्रचार करता का? सर्वांगांनी (अर्धांगाचे अनेकवचनी, अनेकलिंगी रुप) आपल्याच माणसाला मतदान करावे असा आग्रह असतो? कि त्याचे ऐकता? ज्यांच्यावर प्रभाव टाकता येतो त्यांच्यावर टाकता का? टाकून घेता का?

९. निकालाचे सुख दु:ख होते का? कसे साजरे/शोकरे करता?

१०. लोकशाही नावाच्या प्रकाराने दिलेला विभक्त सत्ताधिकार, आपला नि सर्वांचा, गाजवण्यात यशस्वी झाला आहात या भावनेत पुढची निवडणूक येईपर्ञंत राहता का?

११. इतर

प्रतिक्रिया

मला थेट रिझल्ट दिसत आहे.. मी मतदान कसे करू?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रश्न मला विचारताय? चला, मी सर्वांना विचारतो, मी काय चूक केली आहे जी सुधारली म्हणजे सर्वांना मतदान करता येईल?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रश्न मला विचारताय? चला, मी सर्वांना विचारतो, मी काय चूक केली आहे जी सुधारली म्हणजे सर्वांना मतदान करता येईल?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी बराच प्रयत्न केला, पण नै जमले
सगळ्यांनाच रिझल्ट दिसताहेत का मला मोडरेटर राईट्स असल्याने दिसताहेत?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला रिझल्ट दिसत नाहीत.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता मत दिल्यावर रिझल्ट दिसत आहेत.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आँ? मला तर रिझल्ट दिसताहेत.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मंजे इथे लोक रँकिंग पोल खेळत नाहीत तर! मला तर काहीच कळत नाहीय. कोणाला काय दिसतयं, आणि ते % काय आहे? त्याची टोटल १०० का नाही. ते कंसातले आ़कडे काय आहेत? घासकडवीसाहेब, लवकर त्यांचा काहीतरी अर्थ काढा.

अमेरिकन संस्थळ आहे हे, त्या सरकारबंदीचा काही परिणाम तर नाही झाला ना? (लटकी स्मायली)

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बग शोधण्याबद्दल अरूण जोशींचे आभार. मलाही थेट निकाल दिसत आहेत. काय गडबड आहे ते शोधायचा प्रयत्न करते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता पोल नीट काम करत आहे का?
२१ मतदाने झाली आहेत.
कुठे थांबून रिझल्ट काढायचा?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही सहभाग नसलेले सरकार' असा ऑप्शन नसल्याने मत देऊ शकत नाही.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

काय की ब्वॉ, मला सर्व पर्याय दिसले आणि मतदान केल्यावर निकालही दिसला. दोन इतर संपादकांपेक्षा वेगळा अनुभव मला आल्याने माझेच संपादकीय अधिकार काढून घेतले आहेत की काय असा संशय यायला लागला आहे.

1. शुद्ध काँग्रेस add >
2. शुद्ध भाजप add >
3. इतर कोणताही पक्ष add >
4. एन डी ए add >
5. यु पी ए add >
6. थर्ड फ्रंट add >
7. इतर कोणतेही कडबोळे add >
८. लटकलेली लोकसभा add >
९. ५0% पेक्षा जास्त
'कोणताही उमेदवार नाही'
अशा लोकसभा जागा add >
१० अपक्ष add >
११. राष्ट्रपती शासन, इ add >
१२. इतर add >
Your Vote
मत

मला हे असं काहीतरी दिसतय. शुद्ध काँग्रेस आणि add> दोन्ही लिँक आहेत. लिँकवर क्लिक केलं की तो पर्याय Your Vote मधे येतोय आणि मत बटन एक्टिवेट होतय.

Your vote was registered.
4. एन डी ए
26% (61)
5. यु पी ए
20% (47)
1. शुद्ध काँग्रेस
14% (32)
2. शुद्ध भाजप
12% (28)
८. लटकलेली लोकसभा
11% (26)
6. थर्ड फ्रंट
6% (15)
7. इतर कोणतेही कडबोळे
5% (11)
3. इतर कोणताही पक्ष
4% (10)
९. ५0% पेक्षा जास्त
'कोणताही उमेदवार नाही'
अशा लोकसभा जागा
1% (3)
१० अपक्ष
1% (2)
११. राष्ट्रपती शासन, इ
0% (1)
१२. इतर
0% (0)
Total voters: 12

हा निकाल. ते ब्रेकेटमधे काय आहे?

अहो अरुणसर, लैच भारी झांगुडगुत्ता करून राह्यले राव तुम्ही. मजा येतेय.

....


हामी सोताचे मत टाकले तवा १२ पर्याय दिसले आणि तैच्यासमोर add लिवले व्हते. आमी समदे add अगोदर क्लिक केले. मंग ते पर्याय उजवीकडे आले. प्रत्येक पर्यायाच्या डाव्या बाजूला माऊस नेला कि कि कर्सरचे अधिक चिन्ह व्हायचे. त्याला पकडून आम्ही पर्याय अक्षरशः वर खाली हलवले आणि योग्य क्रमाने लावले.मंग vote मनुनसनी बटन दाबले.
ऐसीचे आपण संपादक इ नसाल तर तर आपण असे आरामात करू शकता.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छुपे रुस्तुम....
ऐसीचा सदस्यवर्ग सुशिक्षित कनिष्ठेतर मध्यमवर्ग आहे असे गृहीत धरले तर त्याही वर्गातून एनडीए / भाजपला मार्जिनलच आघाडी दिसते हे रोचक आहे.

लोक जे विचार/मते व्यक्त करतात तसे मतदान करीत नाहीत काय?

ताज्या ओपिनिअन पोलचा निकाल मात्र वेगळेच चित्र दाखवतो.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कनिष्ठेतर

रोचक शब्द आहे. सन्मानाबद्दल धन्यवाद.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय करणार? मध्यमवर्ग या शब्दाची व्याप्ती कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंट* पासून छोट्या दुकानातल्या कारकुनापर्यंत असते ना...

*त्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसचे भाव वाढले की यांचेपण कंबरडे मोडते.

कनिष्ठेतर = कंबरडे मोडले नाही तरी ते मोडले असल्याचा कांगावा करणारा Smile

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अशीच सहज आणि सोपी मतदान पद्धत आपले शासन का अंगिकारू शकत नाही लोकसभा आणि विधानसभेच्या किंवा इतर निवडणुकांसाठी?

एखादी युआरएल लिंक किंवा एखाद्या टेक्स्ट मेसेजने जे शक्य होऊ शकते ते का नाही?

लोकांना रांगेत, उनात, अवघडलेल्या परिस्थितीत उभं करण्यापेक्षा हे बरं नाही का?
कॉस्ट वाचेल कितीच्या किती. तो संपूर्ण दिवस वाया जाणार नाही.
अर्थात काही लोक मतदान न करून तर काही लोक मतदान करून तो दिवस वाया घालवितात ते वेगळं.

शासनाला आधुनिक व्हायचं आहे. हे ठीक पण त्या आधुनिकीकरणाच्या साहाय्याने काय वेगळं करता येऊ शकतं तो मार्ग मात्र चोखाळायचा नाही?

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

खिक्
सायबर कॅफेपुढे रांगा लावयच्या इतकाच काय तो फरक.
बाकी वीजच नसली की मतदान बोंबलले Wink

बाकी समस वगैरे ओळख पटवण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहेत.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरेतर क्लिक करण्याचे तरी कष्ट कशाला घ्यायचे. तशीही मातीच खाते हरेक सरकार.
उगी आपले वर करुन पडून रहावे घरात.
मतदान करणे ही फार मोठी कटकट आणि गुंतागुंत आहे आणि सध्याची नुसते बटन दाबायची पद्धतही "सहज आणि सोपी " नाही ह्याच्याशी सहमत.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>अशीच सहज आणि सोपी मतदान पद्धत आपले शासन का अंगिकारू शकत नाही लोकसभा आणि विधानसभेच्या किंवा इतर निवडणुकांसाठी?

सध्याच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या पद्धतीत काय टीडियस किंवा कठीण आहे?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बटण दाबणे.
भयंकर कष्टाची बाब.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बाकी तांत्रिक दोष नाहिसा होईपर्यंत जाहिर मतदान करतो:

एन्डीए किंवा युपीए चे सरकार स्वबळावर यावे असे वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

It is strange that so for hung parliament is a better choice than third front, any other front, any other party.
This poll, in whole, doesn't even 25% (due apologies from number seekers) match with Indian aspirations.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरूणराव, आधी नवा ब्राऊझर इन्स्टॉल करून घ्या बघू.
इथे विंग्रजी वाचाया अगदी नको वाटतं Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Of course! My PC is under repair. I don't have any admin rights to this PC to make any installations.
And yes, respecting the tradition here, I have always used Marathi on aisi.

By the way, I always thought aisi is equally oriented to Marathi and English. When I go to write a new article I change the setting from 'language neutral' to Marathi. There is one more option of English which I thought might be historically in vogue. I was grieving about Hindi not being there!!

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इंग्रजी देवनागरीतून आले तर त्याबद्द्ल ऐसी काही अंशी न्यूट्रल आहे असा एक समज आहे माझा झालेला.

शुद्ध भाजप, शुद्ध काँग्रेस यांना मत देणा-यांना आकर्षक उपहार.
पहिले बक्षीस - कोरेगाव पार्क येथे ड्युप्लेक्स फ्लॅट
दुसरे बक्षीस - एक किलो सोने
तिसरे बक्षीस - बीएमडब्ल्यू कार
उत्तेजनार्थ बक्षीसे - ड्रीम हॉलिडेज तर्फे बसरा, बगदाद, काबूल टूर

....

अहो, मी शुद्ध काँग्रेसला पहिले आणि शुद्ध भाजपला दुसरे मत दिले आहे. बक्षिस वितरण समारोह कुठे आहे? कोणते ओळखपत्र घेऊन येऊ?
त्या चॉइसांपूर्वी जे नंबर लिहिले आहेत तेच माझे सोताचे प्राधान्य (सध्याला तरी) आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि मी कित्ती प्रश्न विचारलेत, एकाने एका तरी प्रश्नाचे उत्तर दिले तर धन्य होईन.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो, ती ढेकणाची (मराठीत- बगची) चर्चा फार झाल्याने प्रश्नांची उत्तरे राहून गेली.

देतो लवकरच.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

The last comment I made, before 2 minutes, was in Marathi. Now again not able to type Marathi even after refreshing the page. I am using IE 9

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे तुमच्यासाठी वर्क होतय का बघा. म्हणजे तिथे टंका आणि इथे कॉपी करा.

धन्यवाद. मला आता अ‍ॅडमिन हक्क आहेत. ऑफलाईन गमभन इनस्टॉल केले आहे पण ते काम नाही करतंय.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

क्रमचयनाचे मूल्यमापन

बारा पर्यायांना २१ जणांनी मते (क्रम) दिली आहेत. जेव्हा १२*२१ मतांचे स्टॅट उपलब्ध असेल तेव्हा प्रत्येक क्रमासाठी प्रत्येक पर्यायाला किती मते मिळाली आहेत याचा तक्ता बनवावा लागेल. यात प्रथम क्रमाला १२, मग ११, असे करत वेट द्यावे लागेल. समजा भाजप शुद्धला २ क्रमासाठी ५ मते मिळाली तर ११*५ =५५ असा त्याचा उपस्कोर काढावा लागेल. अशा सर्व स्कोरांची बेरीज करून त्याचा एकूण स्कोर काढावा लागेल. मग सगळ्या पर्यायांचा क्रम लावावा लागेल आणि निकाल घोषित करावा लागेल.

यापेक्षा १२, ११, १०,...१ ऐवजी स्थानाला १/१, १/२, १/३ असेही वेट दिले तर तोच निकाल येईल.

इथे दोन प्रकारचे लोचे संभव आहेत.

१. मतदार अ ब क ड यांनी केवळ तीनच लोकांची रँकिंग केली तर? असे मानता येईल कि हे या चार लोकांच्या मते ही तीन पहिली प्राधान्ये आहेत. पण उरलेली ९ कोणत्या क्रमाने लावायची? १०, ९, ८, ...१ वेट कोणत्या क्रमाने द्यायचे. त्यांची भूमिका 'काहीच नाही' व 'इतरांच्या एकत्र मतांसारखी आहेत' हे भिन्न दृष्टीकोन आहेत. हे कसे हाताळायचे?

२. समजा हे मतदान स्थान क्रमांक १ २ ३ नसते व कॄषि, गृह, रक्षा, अर्थ, इ इ खात्यांसाठी असते तर मग निकाल कसा देणार? इथे बहुधा कोणत्या व्यक्ति-पद काँबोला किती मते पडली ते मोजून असे काँबो त्यांना मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार सॉर्ट करावे लागतील.

३. वर २ मधील निकष जर मूळ निकालाला (१ च्या अगोदर सांगीतलेली पद्धत) लावला तर निकाल वेगळाच येवू शकतो. अशा वेळी कोणता निकाल खरा?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उत्तर द्या

एकट्या भाजपाला २७२+ जागा जिंकत सत्तेत येणे शक्य नाही असे मला वाटते

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरुणराव, तुम्ही प्रश्न मात्र फस्क्लास विचारलेले आहेत. खरोख्खर ग्रेट्ट. विशेषतः १, ४, ६.

माझ्या एकाही प्रश्नाचं कोणीही उत्तर दिलेलं नाही. काय फायदा?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला वाटते, हा धागा काढला तेव्हा केजरीवालांची "आप" कुणाच्या जिम्मेस नव्हती. आता आगामी लोकसभेसाठी ते ३००+ जागा लढविणार आहेत. हे लक्षात घेऊन सदर धागा संपादित करावा काय?

मायावतींनी गेल्या निवडणूकीत महाराष्ट्रात सगळ्या ४८ जागा लढवल्या होत्या. त्यांचाही नै म्हणायला प्रभाव होताच की!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मायावती आणि अरविंद केजरीवाल यांच्या मध्ये मुलभूत फरक आहे.

मायावतींचे अपील - "दलित" - शोषित वगैरे होते.

सध्यातरी तरूण पिढीला अरविंद केजरीवाल जास्त अपील होत आहेत. (सुशिक्षित, भ्रष्टाचाराला विरोध करणारे , ROI, लोकपाल सारख्या गोष्टींसाठी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याची पर्वा न करता लढणारे अशी त्यांची प्रतिमा आहे)

त्यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा मी पण हाच विचार केला होता, आंदोलन करणे वेगळे आणि निवडणुक जिंकणे वेगळे, त्यामुळे मी पण "आप"ला सिरियसली घेतले नव्हते. पण दिल्ली निवडणूकी नंतर चित्र पूर्ण पालटले आहे. "आप" सारखा नवीन पक्ष सुद्ध घवघवीत यश मिळवू शकतो हे सिद्ध झाल्याने "आप" या नावाच्या करिष्म्याने एखादा स्वच्छ प्रतिमा असलेला पण फारसा माहित नसलेला उमेदवार जिंकू शकेल अशी परिस्थिती आहे.

मला विचाराल तर श्री श्री कलमाडीच्या जागेवर दिपक मानकर वगैरेनी देशाच्या पातळीवर पुण्याचे प्रतिनिधित्व करावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. आपने एखादा बरा पर्याय दिला तर माझे मत नक्कीच त्याला जाईल.

तसे तर राज्य पातळीवर पण "अजितदादा पुण्याचे कारभारी" - अशी विशेषणे आणि त्यांना गरिबासारखे पुण्याच्या विकासाच्या कामांची विनवणी करणारे लेख पाहिले की मला चीड येते पण ते नंतर बघू.

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

तसे तर राज्य पातळीवर पण "अजितदादा पुण्याचे कारभारी" - अशी विशेषणे आणि त्यांना गरिबासारखे पुण्याच्या विकासाच्या कामांची विनवणी करणारे लेख पाहिले की मला चीड येते पण ते नंतर बघू.

वस्तुस्थिती आहे. त्यांच्या पाया पडून, त्यांची क्रुपादृष्टी मिळवून, त्यांच्यासमोर आपण केविलवाणे आहोत आणि आपले ते तारणहार आहेत हे मान्य करुन लोकांनी इतरांची कामे होताना पाहिली आहेत.
उच्चपदस्थ सरकारी अधिकारी , सामान्य नागरिक अशा विविध प्रकारच्या लोकांनी त्यांच्या पायी लोळण घेतलयस लोळण घेणार्‍अयचा उद्धार होतो, कामे पटापट होतात अशी उदाहरणे आसपास दिसली की लोक हे करायला तयार होतात. अशा तयार झालेल्या लोकांमुळे अशी अजून अधिक उदाहरणे बनतात आणि अजित पवार अधिक मजबूत कारभारी आणि पुण्याचे मालक बनतात.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मायावतींचे उदा फक्त यासाठी दिले होते की किती उमेदवार उभे केले आहेत त्यावरून त्या पक्षाला किती किंमत द्यायला हवी यात फरक पडू नये.
बाकी आआप हा स्थानिक घटक नसला तरी लोकसभेच्या जागांचा भौगोलिक विस्तार, एकेका सीटवर मतदारांची एकूण संख्या, करावी लागणारी इन्व्हेस्टमेंट, वगैरेंची आआपच्या सध्याच्या रचनेशी तुलना केली तर काही शहरी जागांबाहेर त्यांना प्रभाव टाकणे मुश्किल आहे. मोठे पक्ष हेलिकॉप्टर पासून इतर अनेक माध्यमांचा वापर करून देश पिंजून काढू शकतात. आआपला अजून तरी ते कठीण आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!