मी शब्दांचा जादूगार...

मधुर शीळ मी वार्‍याची
पावसाची मी सन्ततधार
सडा पाडतो गीतांचा
मी शब्दांचा जादूगार...

चिव-चिवत्या कवितांच्या ओळी
नभी थव्यांची मी रांगोळी
उधळण रंगांची मी सायंकाळी
क्षितिजी धमकता मी अलंकार
मी शब्दांचा जादूगार...

मी बोचतो पहाटेशी
मौक्तिकांपरी मी चमक दवात
मी हिमकण, दाटतो धुक्यात
मी किरण शुभ्र आरपार
मी शब्दांचा जादूगार...

मी सागर गहरा
मी गगनाई निळी
मी गाली मोहक खळी
मी खळाळता हास्यतुषार
मी शब्दांचा जादूगार...

मी प्रवासी, चालतो अथक
सोबतीला गीत काव्य-पथक
रमवीन मना-मना बेशक
आजमावूनी पहा एकवार
मी शब्दांचा जादूगार...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काय विचार करके इधरकु कविता डालया! ये शाने; हूशार आऊर दिमागवाले लोकोंका अेरिया लगता हाये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...