सॉरी...

सॉरी फॉर डायरी रायटिंग हिअर.
पण भेंचोत फार त्रास होतो आजकाल कुणाला जॉबसाठी नाकारताना.
माझ्या दुप्पट तिप्पट अनुभव असलेली प्रोफाइल. त्याचा इंटरव्यू घ्यायला सांगितला.
काहीही धड येत नव्हतं म्हणून नाकरावं लागलं.
पण त्या उमेदवाराच्या चेहर्‍यावरचे दीनवाणे भाव बघून फार वाईट वाटतं.
त्यात पुन्हा "त्याला फार गरज आहे (शक्यतो सिलेक्ट कर)" अशी सौम्य शिफारस कधी सिनियर्स कडून केली जाते.
पण काम येत नसेल तर निवड कशी करणार.
पुन्हा मनोबा फार मोठ्ठे तांत्रिक एक्सपर्ट आहेत हा ह्या हापिसातला भ्रमाचा भोपळा तूर्तास फुटलेला नाही (की झाकली मूठ अजून उघडली नाही?).
त्यामुळे तांत्रिक मुलाखत (technical interview) घ्यायचे काम आल्यापासून माझ्याच गळयात पडते आहे. त्यातून सुटका नाही.
.
माझं ट्वीटिंग झालं. तुमच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व.

--मनोबा

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

आता विषय निघालाच आहे तर मीपण माझे २ ४ शब्द बोलते.
'त्याची बायको मुलं आहेत' असली कारणं देउन पुरुषांना रिसेशन असताना नोकरी टिकवण्यात मिळवण्यात झुकत माप मिळत का?
लग्नाचे वय असलेल्या, लग्न झालेल्या, प्रेग्नंट असलेल्या, मुलं असलेल्या स्त्रिया लेऑफ लिस्टमधे जास्त दिसतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा विचारच कधी केला नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>लग्नाचे वय असलेल्या, लग्न झालेल्या, प्रेग्नंट असलेल्या, मुलं असलेल्या स्त्रिया लेऑफ लिस्टमधे जास्त दिसतात का?<<

होय, पण फक्त तेवढचं कारण नसतं, ह्या स्त्रिया 'जर' वेळ(८+ आवर्स) देऊ शकत नसतील तर हा निर्णय घेतला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रोडक्ट कंपनीत ८+ तास वगैरे काही नसतं पण तिथेही माझं निरीक्षण तेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त 'अशाच' महिलांना टार्गेट करण्यात इतरही काय हेतू असतील असे आपणास वाटते?, त्याबद्दल आपले काही निरिक्षण आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या "लिमीटेड" निरीक्षणात (गृहिणी आई आणि बायको असलेल्या) मेनेजरने, इक्वल परफॉर्मर असणार्या २ मुले २मुलीत, मुलीँनाच डच्चु दिलाय. निरीक्षण हे आहे की 'हिचा नवरा कमवतोय की, तो सांभाळेल', 'ही तर आता लग्नाच्या वयाचीच आहे मिळेलच कोणीतरी सांभाळणारा' असा विचार त्यामागे होता. नंतर SI ना फेवर करतो म्हणुन त्या मेनेजरलापण डच्चु मिळाला. आणि टिममधले २ ३ जण म्हणाले 'अरेरे उसकी बीवी बच्चे है ना ऐसे कंप्लेन नही करनी चाहीये थी'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे SI म्हणजे काय? आम्हाला हे SI माहितीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साउथ इंडीयन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यू मीन मद्रासी Wink ROFL गाटिट, थ्याङ्क्स Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

८+ तास देणारे लोकच कंपनीसाठी सर्वाधिक उपयुक्त असतात हा विचार मजेशीर वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile भारतीय आयटी कंपन्या आणि त्यांचे कामकाज हाच मुळी मजेशीर प्रकार आहे, ऑनसाइट कॉल्स/सपोर्ट/कोऑर्डिनेशन वगैरे प्रकारांना काळ/वेळ नसते, फारच कमी केसेस मधे हे सगळे व्यवस्थित जमते, इतर केसेस मधे वेळेच्या बाबतीत फ्लेक्सीबल असलेले लोक गरजेचे असतात, काही ठिकाणी इतर सहकर्मचारी कामाचे योग्य वाटप करुन घेउन महिला कर्मचार्‍याला मदत करतात पण ते प्रत्येक वेळेस होईलच असे नाही, ते योग्य आहे असेही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते billing hours प्रकाराबद्दल बोलत असावेत. काही प्रोजेक्ट्स म्ध्ये जितके तास रिसोर्स उपस्थित असेल तिक्या तासांचे पैसे मिळतात.
(fixed billing वगैरे वगैरे प्रकार असतात, नीटशी कल्पना नाही.)
.
सरासरी आठ* तास उपस्थिती असावी ह्यात काय चूक आहे समजले नाही.
तो फक्त भारतात किंवा आयटीमध्येच नॉर्म आहे असे नाही.
सरासरी आयक्यू, सरासरी कार्यक्षमतेच्या थोडीशी अल्याड पल्याड बव्हंशी पब्लिकची क्षमता असते. त्यानुसार सरासरी तासिका ठरल्या गेल्या असव्यात आरंभी.
.
*आठ चे कुठे साडे सात तर कुठे आडे आठ नऊ तासही होउ शकतात. तितके डेव्हिएशन सोडले तर कर्मचर्‍याच्या नियमित उपस्थितीची अपेक्षा जगभरात सर्वत्र कचेर्‍यांमध्ये दिसतेच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

८+ तास देणारे लोकच कंपनीसाठी सर्वाधिक उपयुक्त असतात हा विचार मजेशीर वाटला.>>
मजेशीर असला तरी ते ढळढळीत वास्तव आहे. भारतीय आयटी इंडस्ट्री ही जॅनिटर जॉब्स तासावर उक्ते घेणार्‍या लोकांची व्यवस्था आहे. जितकी जास्त ढोरमेहनत तितके अधिक कामाचे. एखादा काटेकोरपणे काम करत असेल नि इतरांपेक्षा अधिक काम दिवसाच्या आठ तासात देऊन वेळेवर घरी जात असेल तर त्याची 'कमिटमेंट' नाही असे त्याला सांगितले जाते. ('हायर अँड फायर' तत्त्वावर काम करणार्‍यांनी बांधिलकीची भाषा करावी हा आधी मोठा विनोद) याउलट रात्री उशीरापर्यंत बसणारा/री, शनिवारी-रविवारी ऑफिसला येणारा/री हमखास एम्प्लॉई ऑफ द मन्थ्/क्वार्टर्/ईयर घेऊन जातो/ते असाच अनुभव आहे. गुणवत्ता मोजण्याची कोणतीही यंत्रणाच अस्तित्वात नसते. दोनच वर्षात अगदी स्ट्रेस-कंट्रोल पासून सारे काही ५- ५% शिकून अधिकारीपदावर बसलेल्यांकडून ती कधीकाळी विकसित केली जाईल याचीही शक्यता नाही. तथाकथित अप्रेजल नावाचा जो काही प्रकार असतो तो आणखी एक विनोद. अनेकदा या अप्रेजलचा नि तुमच्या वेतनवाढीचा/प्रमोशनचा काहीच संबंध नसलेला दिसून येतो. आमच्या पहिल्या कंपनीत तर उशीर झाला म्हणून इन्क्रिमेंट लेटर्स आधी दिली नि मग अप्रेजलची फॉर्मॅलिटी पुरी करण्यात आली. मिड-मॅनेजमेंटमधला मी हे पाहून हतबुद्ध झालो नि पुन्हा या फंदात पडणार नाही अशी खूणगाठ बांधून ठेवली. थोडक्यात भारतीय आयटी इंडस्ट्री ही स्वतःला हुशार समजणार्‍या, असणार्‍या वा होऊ पाहणार्‍यांकडून सफाई कर्मचार्‍याचे काम करून घेणारी नि त्याबद्दल डॉलर देणार्‍याला लाचार सलाम ठोकणारी जमात आहे. फार उदात्त अपेक्षा वगैरे ठेवू नका तिच्याकडून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्नाचे वय असलेल्या, लग्न झालेल्या, प्रेग्नंट असलेल्या, मुलं असलेल्या स्त्रिया

ह्या यादीत सगळ्याच स्त्रिया कव्हर होतात, नै का? तुम्हाला एकंदर सगळ्याच स्त्रिया ले ऑफमधे टारगेट होतात असं म्हणायचं आहे का?

मी ज्या ऑफिसमधे काम करायचो तिथे कामाच्या दर्जावरून आणि किती गरज आहे हे लक्षात घेऊन ले ऑफ झाले होते असे म्हणू शकतो. ऑफिसमधे एकाच पोस्ट्वर कार्यरत असलेल्या नवरा-बायको पैकी नवर्‍याला काढून बायकोला ठेवलेले, तेही ती प्रेग्नंट असताना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

नाही. लग्नाचं वय नसणाऱ्या आणि लग्न न केलेल्या/करणाऱ्या स्त्रियाही असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लग्नाचं वय नसणाऱ्या आणि लग्न न केलेल्या/करणाऱ्या स्त्रियाही असतात.

असतात पण अत्यल्पसंख्य असतात. फुटबॉल खेळणार्‍या स्त्रियाही असतात तसेच.
पण तरीही ढोबळमानानं स्त्रियांना फुटबॉलवेड पुरुषांइतकं नाही असच आख्ख्या युरोपात मानतात.
( विदा देत नाही ज्जा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विदा देत नाही ज्जा >> अदितीला कुणीतरी असं एकदा ठणकावून सांगायलाच हवं होतं. किती दिवस असे भीत भीत काढायचे म्हणतो मी. मनोबा आप लडो, हम ताली बजाते हैं (अंबुलंस भी बुलाके रख्खा हय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

लग्नाचं वय नसणाऱ्या आणि लग्न न केलेल्या/करणाऱ्या स्त्रियाही असतात.

हो, पण म्हणून त्या प्रेग्नंट किंवा मुले असलेल्यांच्या कॅटेगरीत येऊ शकत नाहीत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

शक्यतो ज्युनिअर लेवलच्या कमी पगार असलेल्या मुली टिकतात. रिसेशनमधले लेऑफ मिडलेवला जास्त होतात आणि त्यात मुली टारगेट होतात असं माझं लिमीटेड निरीक्षण Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेलिफोन अॉपरेटर, सेक्रेटरी वगैरे स्त्रियांच्या नोकऱ्या टिकत असतील आणि जिथे या स्त्रियांची पुरुषांना स्पर्धा जाणवते तिथे कुऱ्हाड चालत असावी. तपशील तुलाच अधिक प्रमाणात माहित असतील. फार हुशार, कर्तबगार स्त्रियांना असा त्रास बहुदा कमी होत असेल; पण मेरी क्यूरीएवढी बुद्धीमत्ता नसेल तर हे discrimination सगळ्या क्षेत्रांमधे होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जे लोक नोकरीवर ठेवतात किंवा काढतात त्यांच्या दृष्टीने नसतात. उलट लग्न न केलेल्या, घटस्फोटित किंवा विधवा स्त्रिया, "आता आपल्याच" आहेत असं मानून त्यांना झुकतं मापही मिळू शकतं. आणि या स्त्रियांना त्याचा त्रासही होतो.

अशा प्रकारची तक्रार काही फिजिक्स पोस्टडॉककडून, भारतीय पुरुषांबद्दल ऐकलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या प्रोसेसमध्ये मी गेले काही वर्षे सामील होतो- आहे त्यावरून हे विधान उडवून लावण्यालायक नाही. पण त्यात महिलांना कमी लेखायचा वाटा आहे असे म्हणता येईल का याविषयी शंका आहे.

कसे आहे की, समजा कर्मचार्‍यांची १ ते ५ (१ सर्वोत्तम) या प्रकाराने वर्गीकरण करायचे आहे व '१' व '५' दर्जाचे ५%, '२' व '४' चे १०% व उर्वरीत ७०% '३' दर्जाचे अश्या प्रकारे विभाजन करणे अनिवार्य आहे. अशावेळी सर्वाधिक कठीण असते '५'च्या गटातील व्यक्ती ठरवणे.

त्यावेळी जर ९५% व्यक्तींनी वर्षातील १२ महिने - कसेही चांगले/वाईट - काम केले आहे व काही कर्मचार्‍यांनी ३/४ ते ८ महिनेच काम केले आहे तर अश्या कर्मचार्‍यांना कमी रेटिंग दिले जाते.

प्रेग्नंट बायकाच नाहीत तर दिर्घकालीन आजारी पुरूष किंवा वर्षातील बहुतांश काळ फ्लोटवर असणारे पुरूषही यातून वगळले जात नाहीत. किंबहुना फ्लोटवरील पुरूष व प्रेग्नंट महिला यात तुलना करायची वेळ आल्यास - व महिलेची आधीची कामगिरी चांगली असल्यास - तिला झुकते माप मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रेग्नंट बायकाच नाहीत तर दिर्घकालीन आजारी पुरूष किंवा वर्षातील बहुतांश काळ फ्लोटवर असणारे पुरूषही यातून वगळले जात नाहीत. किंबहुना फ्लोटवरील पुरूष व प्रेग्नंट महिला यात तुलना करायची वेळ आल्यास - व महिलेची आधीची कामगिरी चांगली असल्यास - तिला झुकते माप मिळते.

म्हणजे म्हैलेची आधीची कामगिरी त्या पुर्षापेक्षा चांगली असेल तर की फारसा फरक नसेल तरीही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नै कळ्ळं
साधारणतः म्हैलेची आधीची कामगिरी फ्लोटवरील पुर्षापेक्षा चांगली असेल तर तिलाच चांगला बँड मिळतो (जरी तिने त्याहून कमी काळ काम केलं आहे) आणि असा फरक नसेल तर थंबरूल सांगता येणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे योग्य आहे. विचारलं अशासाठी की म्हैलेला झुकतं माप दिलं जातं असं काहीसं वाटलं होतं प्रतिसादावरून. शंकानिरसन केल्याबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही पर्फॉँमस बेस्ड लेऑफबद्दल बोलताय, मी कॉस्ट कटिँगसाठी होणार्या लेऑफबद्दल.

एखादी प्रॉडक्टलाइन/क्लायंट क्लोज झाली तर काय करतात सर्विस कंपनीत? मी ज्या सर्विस कंपनीत होते तिथे पुर्ण उंडगा कारभार होता म्हणुन सिरीअसली विचारतेय Smile

अश्या प्रकारे विभाजन करणे अनिवार्य आहे. > 'अनिवार्य आहे' या शब्दांतच चुक दिसतेय असे वाटत नाही का?

३/४ ते ८ महिनेच काम केले आहे तर अश्या कर्मचार्यांना कमी रेटिंग दिले जाते. >> का? हाइक प्रोरेटेड असतो ना? रेटिँग का असावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>'अनिवार्य आहे' या शब्दांतच चुक दिसतेय असे वाटत नाही का?
कंपनी पॉलिसीनुसार कित्येक गोष्टी अनिवार्य असतात. व कंपनीच्या (आताच्याच नाही तर भविष्यात बदलणार्‍या) पॉलिसीचे आपण पालन करू असे आपण कंपनी जॉईन करतानाच मान्य करतो. त्यापैकीच ही एक.
एखाद्या कंपनीत ५ दिवस वर्किंग असणं अनिवार्य आहे तर काही कंपन्यांमध्ये ६ दिवस त्यात फार चुक असे कशावर म्हणावे?

का? हाइक प्रोरेटेड असतो ना? रेटिँग का असावं?

हाईक प्रोरेटेड असते का नाही ते कंपनी-पॉलिसी झाली शिवाय ते कशावर आधारित द्यावी ही सुद्धा. रेटिंगच का असावं हा प्रश्न म्हणून वैध असला तरी त्या त्या कंपनीची पॉलिसी याव्यतिरिक्त उत्तर देण्यात फार हशील नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फार चुक असे कशावर म्हणावे? >> कंपनी पॉलिसी अमान्य करा म्हणत नाहीय. पण ती चुकीची पॉलिसी आहे हे तरी मान्य करायला हरकत नसावी. 'प्रत्येक वर्गशिक्षकाने कमीतकमी ५% विद्यार्थ्याँना नापास करा' असं म्हणल्यासारख आहे ते.
त्या त्या कंपनीची पॉलिसी याव्यतिरिक्त उत्तर देण्यात फार हशील नाही. >> ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती कर्मचार्‍यांसाठी कदाचित अन्याय्य, गैर वगैरे वगैरे असेलही पण "कंपनी"साठी 'चुकीची' पॉलिसी आहे (विशेषतः आर्थिक दृष्टिकोनातून) असे म्हणता येणे कठीण आहे. Smile
कंपनी शेवटी फक्त फायदा पाहणार! इतर गोष्टी महत्त्वाच्या असल्या-भासवल्या- तरी शेवटी दुय्यमच ठरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कंपनी का काम करते? त्यात कुणाचे हितसंबंध कसे असतत हे एकदा मागे बोलणे झाले होते तेव्हा आनंद महिंद्रंनी townhall with anand mahindra नंतरच्या गप्पांत मस्त खुलवून सांगितले होते.
(name dropping शिकलो की मी पण!
नै पण मी खरच भेटलो होतो आनंद महिंद्रा ह्यांस. )
.
कंपनीचा मालक म्हणून शेअर होल्डर्स व इतर भागधारक,पार्टनर्स ह्यांना नफ मिळवून देणे हे उद्योजकाचे काम आहे.
त्याचेवेळी त्याला नफा मिळ्वण्यासाठी ज्यांच्याकडून काम करवून घ्यायचे आहे त्यांच्याही रास्त अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत किम्वा रोजगार देतेवेळचा करार पाळायचा आहे.
ग्राहकास उत्त्तम सेवा नसेल तर ती कंपनी कसली? त्यास सर्वोत्तम सेवा देणे हे उद्दिष्ट.
कंपनी ही सम्जात चालते. ती समाजाचे देणे लागते. तिने CSR, समाजकल्याणाची कामे करावीत असा कायदा जरी अस्तित्वात नसेल, तरी ते कंपनीचे कर्तव्य असते, व कंपनीकडून ती अपेक्षा असते.
.
शेअर होल्डर, एम्प्लॉयी, ग्राहक व समाज ह्या सर्वांप्रती असलेली सर्वच कर्तव्ये पूर्ण करून त्यास स्वतःही नफा कमावायचा आहे.
.
चांगल्या कर्मचार्‍याला चाम्गली वागणूक देणे हे अंतिमतः कंपनीच्याच हिताचे असते. वशिलेबाजी, इतर गैरप्रकार, हे अंतिमतः कंपनीच्या थेट किंवा अप्रत्यक्ष नुकसानीचे ठरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चांगल्या कर्मचार्‍याला चाम्गली वागणूक देणे हे अंतिमतः कंपनीच्याच हिताचे असते.

किती मोलाचे 'चांगले' कर्मचारी घ्यावेत? आयमीन समजा काही 'चांगले' कर्मचारी खूप 'महाग' आहेत. भारतीय आयटी कंपन्यांत असे नक्की काय व किती प्रमाणात चालते की जे करायला फार चांगले कर्मचारी हवेत?
तेचा फक्त काम चांगले करता येणे म्हणजे चांगला कर्मचारी हे सुत्र या इंडस्ट्रीला गैरलागू ठरते. इथे मुख्यत: ऑटसोर्सिंग व बॉडीशॉपिंग चालु असल्याने केवळ तुम्ही किती 'स्वस्त' आहात त्यावर तुम्ही किती 'चांगले' आहात हे ठरते Smile

वशिलेबाजी, इतर गैरप्रकार, हे अंतिमतः कंपनीच्या थेट किंवा अप्रत्यक्ष नुकसानीचे ठरतात.

मग तरी कंपन्या कंत्राट मिळवताना वशिलेबाजी किंवा इतर गैरप्रकार करतात असे का ऐकू येत असावे?? का तसे करणे तितकेही नुकसानीचे ठरत नसेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हजारवर्षांपूर्वीचे उत्खनन केले म्हणून सॉरी म्हणताय का काय. असो, काही हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

खणून काढलेल्या मातीत नायल्याला पुरला नाय म्हणून सॉरी म्हणतोय सर्व ऐसीकरांना Wink
ह घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुम्ही नायल्याला काय पुरता, तोच सगळ्यांना पुरून उरतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

निळूपुरणसिंग हे नाव घ्या आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आत्ताच्या तुमच्या कामासाठी महत्त्वाची नसलेली (म्हणजे इथे सांगू शकाल अशी) एक जॉब प्रोफाईल आणि आपण विचारलेले प्रश्न सांगाल का?
यासाठी डावलण्याचा नक्की निष्कर्श काय होता.
१. इतरांनी एक पक्ष घेतल्याने आपण रुका हुआ फैसला मधले पंकज कपूर बनलात
२. सहापैकी कोणत्याही गोम्याने काम चालत असले तरी मी सर्वात स्मार्ट सोम्याच घेणार
३. सबब मनुष्य कधीही हे काम शिकू शकणार नव्हता. खायला काळ कंपनीला भार असाच राहणार होता
४. आपण शक्य ती सहानुभूती दिली, तो तिच्या खालचा निघाला
५. मी फार प्रोफेशनल, मी माझ्या 'कंपनीच्या उच्च हिताप्लिकडे' काही पाहत नाही.
६. तांत्रिक मुलाखतीत आपण इतका इतिहास का पाहिला?
७. कमी मार्क दिले की चक्क व्हेटो लावला? तसे नसेल तर सगळे पाप तुमचे नाही ना.
८. माणसांतली कमी/खामीयाँ भरून काढयला कंपनीत काही उपाय नाहीत का? मंजे सगळे लोक पर्फेक्ट बघूनच घेता का?
९. माणूस निव्वळच वाईट/ अपात्र होता इतका भावनिक ट्वीट योग्य आहे का?
१०. तांत्रिक मुलाखत घेण्यास आपली पात्र्ता एकदम नि:संदिग्ध नाही असे आपण म्हटले आहे त्याचे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आत्ताच्या तुमच्या कामासाठी महत्त्वाची नसलेली (म्हणजे इथे सांगू शकाल अशी) एक जॉब प्रोफाईल आणि आपण विचारलेले प्रश्न सांगाल का?
यासाठी डावलण्याचा नक्की निष्कर्श काय होता. :- competence नव्हता त्याच्याकडे. व्यवस्थित उत्तरे देता आली नाहित कुठल्याच महत्वाच्या प्रश्नांची.

१. इतरांनी एक पक्ष घेतल्याने आपण रुका हुआ फैसला मधले पंकज कपूर बनलात :-
नाय हो. इतरही नाहिच म्हणत होते. मी ही नाहिच म्हणत होतो.
.
२. सहापैकी कोणत्याही गोम्याने काम चालत असले तरी मी सर्वात स्मार्ट सोम्याच घेणार :-
ह्यला काहिच येत नव्हते. हा काहीच करु शकणार नव्हता. पण होय. सर्वात स्मार्ट सोम्या घेणे किम्वा खरं तर मोस्ट सुटेबल उमेदवार घेणं हेच तर माझं काम ठरेल ना अशावेळी.(कामाऐवजी कर्तव्य म्हणणार होतो, पण ते फार उच्चभ्रु वाटतं.)
.
३. सबब मनुष्य कधीही हे काम शिकू शकणार नव्हता. खायला काळ कंपनीला भार असाच राहणार होता
:- मी कमेंट करु शकत नाही. शिकला असताही, नसताही, मी कसे सांगू? पण तत्काळ काहीच कामाचा नव्हता. day1 पासून प्रॉडाक्टिव राहणार नव्हता.
.
४. आपण शक्य ती सहानुभूती दिली, तो तिच्या खालचा निघाला
हो. असेच.
.
५. मी फार प्रोफेशनल, मी माझ्या 'कंपनीच्या उच्च हिताप्लिकडे' काही पाहत नाही.
पास
.
६. तांत्रिक मुलाखतीत आपण इतका इतिहास का पाहिला?
कोणता इतिहास???
.
७. कमी मार्क दिले की चक्क व्हेटो लावला? तसे नसेल तर सगळे पाप तुमचे नाही ना.
"त्याला किती येतं" ह्याला "फारसं काहिच येत नाही" हे मी आणि अजून एका सहकारी मुलाखत्कारानं सांगितलं.
.
८. माणसांतली कमी/खामीयाँ भरून काढयला कंपनीत काही उपाय नाहीत का? मंजे सगळे लोक पर्फेक्ट बघूनच घेता का?
पर्फेक्ट नाही, पण एका विशिष्ट पातळीवरचे तरी लागतील ना. दहा वर्षे क्षेत्रात काढलेल्या माणसाकदून काहीएक अपेक्षा थेवणं चूक नाही वाटत आम्हाला.
.
९. माणूस निव्वळच वाईट/ अपात्र होता इतका भावनिक ट्वीट योग्य आहे का?
अहो तीन चेंडू फुल्टोस दिल्यावर तीन वेळेस क्लीन बोल्ड होत असेल तर काय म्हणायचं बॅट्समनला(म्हणजे ऐसीवरच्या "बॅटमॅन " ला नाही; तो अवघड सामने आले की अंपायर ची भूमिका सोयीनं घेण्याइतका चतुर आहे. क्लीन बोल्ड होणार नाही;) )?
.

१०. तांत्रिक मुलाखत घेण्यास आपली पात्र्ता एकदम नि:संदिग्ध नाही असे आपण म्हटले आहे त्याचे काय?
नि:संदिग्ध नाही वगैरे नाही हो. पण आपण वासरात लंगडी गाय शहाणी आहोत ह्याची जाणीव आहे; किंवा लोक समजतात तितके मोठे डॉन नाही आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जौ दे रे.. इतका ताप करून घ्यायचा नाही
नोकरी करण्यात हीच तर मौज आहे.. आपली/तुझी कंपनी आहे का? नै ना?.. ज्याची आहे तो तुला तुझ्याहून अधिक काळ काम केल्या(सारखे)चे दाखवणार्‍याचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगण्याचे परिणाम बघुन घेईल / भोगेल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!