अथातो प्राकृत जिज्ञासा। - १

आज पर्यंत आपण अनेक समूहांवर, ब्लॉग्जमध्ये, 'संस्कृत' भाषेसंबंधी लिखाण वाचले आहे. अनेक ठिकाणी "संकृत भाषा किती महत्त्वाची आहे?", "संस्कृत भाषेची आज खरोखरच गरज आहे का?", "संस्कृत भाषा का शिकावी?" असे प्रश्न उपस्थित करून जोराजोराने वाद घातले गेले आहेत. या वादांना पुढे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे वळणही लागलेले दिसून आलेले आहे. अशा वेळी सोयिस्कररीत्या संस्कृत ब्राह्मणांची भाषा आहे आणि आमची ती प्राकृत भाषा असा मुद्दा काढल्याचेही अनेक ठिकाणी दिसून आलेले आहे. प्राकृत सन्दर्भातील मुद्दा निघाल्यावर एक गोष्ट फार लगेचच लक्षात आली आणि ती म्हणजे मुद्दलात 'प्राकृत' भाषा हे काय प्रकरण आहे तेच अनेकांना ठाऊक नसतं. संस्कृतेतर सगळ्या भाषा प्राकृत किंवा मराठी, हिन्दी वगैरे भाषा प्राकृत असा एक ढोबळ समज झाला असल्याचंही जाणवलं. तेव्हा विचार केला की या 'प्राकृत' भाषेवर काही लिखाण करता येतंय का ते बघावं म्हणून हा टंकन-प्रयोग.

लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की इथल्या या लिखाणात संस्कृत श्रेष्ठ की प्राकृत? किंवा संस्कृत आधी की प्राकृत? संस्कृत माझी आणि प्राकृत त्यांची किंवा प्राकृत माझी आणि संस्कृत त्यांची असल्या निरर्थक प्रश्नांना आणि मतांना काडी इतकंही महत्त्व नाही. माझ्या भाषा विषयातल्या थोड्याफार अभ्यासाचं सार किंवा त्याद्वारे तयार झालेली माझी स्वतःची काही मतं इथे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.

या विषयावर अनेक जणांनी आपली लेखणी झिजवलेली आहे. कृपया त्यांच्या मतांचे संदर्भ स्वतःचे किंवा मला मान्य आहेत म्हणून या ठिकाणी चिकटवण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यासाला वाढवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती इथे करून ठेवत आहे.

हा प्रयोग एकूण विषय-विस्तार बघता, कदाचित एक सलग असणार नाही. पण म्हणून तसा प्रयत्नच न करणं अयोग्य ठरेल. माझ्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे सुरूवात करायला काय हरकत आहे? बाकी आपली बुद्धीमान आणि सूज्ञ मंडळी आवश्यक तिथे योग्य ती भर टाकतीलच, याची खात्री आहे. सदर माहितीचा स्रोत प्रामुख्याने Introduction to Prakrit हे A. C. Woolner लिखित पुस्तक आणि विश्वविद्यालय प्रकाशन, वाराणसीने प्रकाशित केलेले डॉ. कपिलदेव आचार्यांचे 'लघु सिद्धांत कौमुदी' हे पुस्तक आहे. याशिवाय जिथे शक्य होईल तिथे संदर्भासाठी घेतलेल्या पुस्तकांची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईलच.

आज आपण ज्याला प्राकृत भाषा असं संबोधत आहोत, ती 'एक' भाषा नसून तो म्हण्टलं तर अनेक भाषांचा बनलेला एक भाषा समूह आहे. म्हणजेच अनेक भाषांच्या समुदायाला सामायिकपणे (collectively) आपण 'प्राकृत' हे नाव दिलेलं आहे. याचा अर्थ असाही होतो की या एकमेकांपासून भिन्न भाषा आहेत.

भाषा समूह निर्माण होण्यासाठी आधी तशा भाषेचे प्रयोग करणारे मानव समूह निर्माण होणं आवश्यक असतं. म्हणून या संदर्भात असंही म्हणता येईल की ज्यांना आपण प्राकृत म्हणतो त्या भाषा बोलणारे अनेक मानव समूह आपल्या इथे उपस्थित होते. मग हे मानव समूह भौगोलिक दृष्ट्या एकमेकांपासून लांब होते का? तर हो, बर्‍यापैकी लांब होते. म्हणजे त्यांच्या भाषा, त्यातील शब्द, त्या शब्दांचे उच्चार, त्या शब्दांतून ध्वनित होणारे अर्थ या गोष्टी एकमेकांपासून भौगोलिक दृष्ट्या दूर असल्यामुळे भिन्न असतील, तरी मग त्या सगळ्या भाषांना वेगवेगळं न गणता त्यांचा केवळ 'प्राकृत' या एकाच प्रकारात अंतर्भाव होतो. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करूनही त्यांचं वर्गीकरण या एकाच प्रकारात होतं, हा संदर्भ नक्कीच महत्त्वाचा आहे.

सामान्यत: वाङ्मयीन दृष्ट्या या प्राकृत भाषांशी आपली ओळख होते संस्कृत नाटकांच्या माध्यमातून. संस्कृत नाटकांमध्ये स्त्रिया आणि जनसामान्यांची भाषा म्हणून प्राकृत भाषांचा वापर झालेला दिसून येतो. यात सामान्यतः शौरसेनी, महाराष्ट्री आणि मागधी प्राकृतांचा प्रयोग झालेला आढळून येतो.

या प्राकृत भाषांच्या संदर्भात विवेचन करण्यापूर्वी एकूणच भाषा विषयाबद्दल प्राचीन संदर्भ कसे सापडतात, त्यांचं विश्लेषण कसं करता येतं याचा विचार यापुढे करण्याचा प्रयत्न करू.

(सभासदांना या विषयात रस असल्यास पुढचे भाग टाकण्याचा विचार आहे.)

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

पार्श्वभूमी छान मांडलेली आहे. भाषा आणि बोली हा नेहमीच अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे प्राकृत या शब्दाच्या छटा, त्यांनी निर्देष होणाऱ्या भाषा, त्यांची व्युत्पत्ती, इतिहास याबाबत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्यातल्या कुठल्या भाषांना स्वतंत्र भाषांचा दर्जा प्राप्त झाला - कसा आणि कधी - याविषयीही चर्चा होईल अशी आशा आहे.

पुढचे भाग जरूर येऊ द्यात. नमन तर झालं, आता पुढचा गाभ्याचा भाग होऊन जाऊदेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिले २ पॅरा छान आहेत. नंतर थोडं गुंडाळलं आहात. तुम्ही सांगितलेली पुस्तकं मी वाचलेली नाहीत. पण पूर्ण लिहा. मजा येइल याविषयी बोलायला.
मी कोण? इतरांशी संवाद कसा साधतो? भाषेने? भाषा म्हणजे काय? कुठून आली? कशी जन्मली कशी वाढली? विचार करणार्‍यांना पडलेले प्रश्न. तुमचे म्हण्णे नीट मांडलेत तर छान चर्चा होईल.
(पहिला काही चष्मा आहे का? आधीपासूनचा? असल्यास 'हा माझा चष्मा, असं सांगून टाका आधीच.. मग जास्त मज्जा येईल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्राकृतची ओळख म्हणून वुलनरचे पुस्तक मलाही आवडले. वुलनरच्या पुस्तकातला "सम्राट अशोकाचा शिलालेख क्रमांक ४", त्याच्या पूर्वी आणि पश्चिमी प्राकृतातील आवृत्त्या, संस्कृतच्छाया, मराठी भाषांतर या दुव्यावर बघता येईल.

शौरसेनी, माहाराष्ट्री आणि मागधी नावावरूनच वेगवेगळ्या प्रदेशातल्या भाषा-बोली. प्राकृत भाषा या सगळ्या सरमिसळ एक वाटतात. या गैरसमजाचा एक स्रोत म्हणजे संस्कृत-प्राकृत सरमिसळ नाटके. पण संस्कृत नाटकांमध्ये एकाच कुटुंबातील आणि गावातील लोक ही सर्व प्राकृते बोलतात : उच्चवर्णीय पुरुष संस्कृतात बोलतात, उच्चवर्णीय स्त्रिया शौरसेनी बोलतात, नीचवर्णीय आणि वाईट नीयतीचे लोक मागधी बोलतात, आणि गाणी माहाराष्ट्रीमध्ये असतात. उच्चारांचे ठळक फरक सोडले, (मागधीमध्ये "स"ऐवजी "श") तर शौरसेनी आणि मागधी यांच्यात फारसा फरक जाणवत नाही. व्याकरण-क्रियापदे वगैरे खडी-हिंदी<->बिहारी इतकासुद्धा फरक नाही. यामुळे संस्कृतामार्फत प्राकृतांची ओळख झालेल्यांनी "एकच भाषा, तीन-चार बोली" असे वाटत असावे.

बौद्धांच्या आणि जैनांच्या वाङ्मयात "प्रमाणीकृत" अशा वेगवेगळ्या प्राकृतांत पूर्ण ग्रंथ लिहिलेले दिसतात. यांच्यात बघता वेगवेगळी प्रमाणीकृत प्राकृते म्हणजे वेगवेगळ्या भाषा होत, असे जाणवते.

मूळ पैशाची भाषेतला कुठलाच ग्रंथ बहुधा सध्या उपलब्ध नाही. (पैशाची बृहत्कथेपासून बनवलेला संस्कृत कथासरित्सागर उपलब्ध आहे.) ही पैशाची भाषा संस्कृत-प्राकृत कुटुंबातील होती की द्रविड कुटुंबातील होती, हेसुद्धा आता ठाऊक नाही.

या लेखमालेसाठी प्रास यांना अनेक शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमालेसाठी शुभेच्छा!
या अनवट विषयावरील माहिती वाचण्यास उत्सुक आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरं तर ही लेखमाला लिहिल्यावर कुणी वाचेल का हीच मनात शंका होती. काहीसा रुक्ष विषय असल्याने तसं वाटत असावं पण एकूण प्रतिक्रियांचा रोख बघता बरं वाटलं आणि अधिक लिहिण्याचा हुरूप आला.
भाषेचे जाणकार आणि अभ्यासू लोकांमध्येही प्राकृताच्या मूळाकडे जाण्यात मतभिन्नता आढळते. ही मतभिन्नताच पुढे जाऊन या पहिल्या भागात म्हंटल्याप्रमाणे वादांना कारणीभूत ठरते.
याचा विचार करून सर्व समावेशक आणि सर्वमान्य तोडगा काढण्याच्या हेतुने हे लिखाण झालं आहे.
यात निघालेला निष्कर्श सगळ्यांना मान्य होईलच असं निश्चितपणे म्हणता येणार नाही पण त्या दृष्टीने अभ्यासूंना विचारप्रवण करण्यात जरी यशस्वी ठरला तरी या लेखमालेचं सार्थक होईल असा विचार आहे.
पुढील भाग लवकरच टाकला जाईल.
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी

उत्तम विषय. पुढले भाग किंचित मोठे टाका. Wink (फार मोठेही नकोत पण इतके लहानही नकोत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान..अजून वाचायला अवडेल. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक वाटते आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0