हेलिकॉप्टर

ध्याकाळी साडेपाचचा सुमार असेल. चहा घेता घेता संगणकावर काहीतरी उद्योग चालु होता. म्हणजे कॉफी बनवायचे वीजेवर चालणारे यंत्र कसे वापरावे याचा शोध तू नळीवर घेत होतो. संगणकावर चित्रपट सुरू होऊन स्वागत आणि स्वगत संपवुन तो बुवा यंत्राविषयी काही सांगणार एव्हढ्यात हेलिकॉप्टरचा घरघराट, मागोमाग पक्ष्यांचा कलकलाट. नेमके जे ऐकायला हवे ते निसटले. असा प्रकार तिनेक वेळा घडला. आता हेलिकॉप्टर म्हणजे काही नवलाई नाही हे खरे पण आवाजावरून ते बरेच जवळ वाटले. खिडकीतुन डोकावायचा प्रयत्न केला पण आकाशात काहीच नव्हते. कदाचित ते इमारतीच्य बरोबर वरून गेले असावे. पुन्हा एकदा आवाज भरभरू लागला आणि अगदी स्पष्टपणे उजव्या बाजुने येताना जाणवु लागला. बघतो तर एक निळे पांढरे हेलिकॉप्टर भिरभिरत होते.

heli1 copy

हेलिकॉप्टर इतके खाली पाहुन मी जरा चक्रावलोच. काहीतरी लोच्या असावा, कदाचित आणीबाणीच्या परिस्थितीमुळे त्याला मधेच उतरणे भाग पडले असावे आणि तो खाली उतरायला मोकळी अशी सोयीची जागा पाहत असावा. सध्या मिपावर विमान अपघाताचा मोसम आहे, हे लखक्न डोक्यात चमकले आणि मी कॅमेरा काढला.

पोरं लहान असताना त्यांना घेऊन बाहेर पडताना, विशेषतः आपल्याला कुठे जाई असताना नेमेकी पोराची चड्डी ओली झालेली असते. मग आधी पोराची चड्डी बदला. अगदी हेच झाले. कॅमेर्‍यावर मॅक्रो होते. बरोबर. शेवटचे उद्योग कर्नाळ्यात केले होते. घाईघाईने ते उपटुन टेली चढवुन कॅमेरा सज्ज होईपर्यंत बेटं भिरभीरत येऊरच्या दिशेने जाताना दिसले. तिथे हवाईदलाचा तळ आहे हे माहित होते. कॅमेरा घेऊन मी बाहेरच्या खोलित कठड्यापाशी पोचे पर्यंत घरघ्रराट पुन्हा ऐकु आला. वर्तुळ फिरुन ते हेलिकॉप्टर परत माझ्याच दिशेने येत होते.
वैमानिक कसलेला दिसत होता. दाटीवाटीने इमारती असलेल्या वस्तीत बिन्धास्त खाली येउन गिरक्या घेत होता बेटा.

heli2 copy

मानिकाने मला फोटु घेताना पाहीले की काय ठाऊक पण बेटा क्षणात माझ्या दिशेने झेपावला व डोक्यावरून भुर्र झाला. त्याचा वेध घेत डाव्या बाजुला कॅमेरा फिरविताना अचानक ते डावीकडच्या ईमारतींआडुन बाहेर आले आणि उजवीकडे सफाईदार गिरकी घेत निघाले. त्याचे स्थान नक्की सांगायचे तर रामदासजींच्या अगदी डोक्यावर.

heli3 copy

heli4 copy
रामदासना साद घातलीच पाहिजे असा विचार आला पण उजवीकडे इमारतींपासुन जेमतेम शे - पन्नास फुटांवर उडताना पाहिल्यावर त्याला टिपणे महत्वाचे, रामदासंना काय? सांगेन नंतर की, की डोक्यांवर हेलिकॉप्टर उतरु पाहत होते. वैमानिक खरोखरच कुशल असावा. अगदी नाका समोरच्या बांधकाम सुरू असलेल्या २२-२५ मजली इमारतीच्या ३/४ उंचीवरून त्याला इमारतीच्या जवळुन जाणारे ते हेलिकॉप्टर पाह्ताना अगदी ९/११ च्या दृश्याचा भास झाला. इतका धोका पत्करून तो वैमानिक खाली उतरुन इमारतींच्या अवती भवती का फिरत असावा असा विचार सुरू असतानाच त्या हेलिकॉटरमधुन पुष्पवृष्टी होतान दिसली. ते टिपेपर्यंत म्हणजे इमारतींना पार करुन ते मोकळ्या जागेत येईपर्यंत बरीचशी पुष्पवृष्टी संपत आली होती. मग लक्षात आले. मागील बाजुस वर्तक नगरातल्या साई मंदिराला २५ वर्षे झाल्यानिमित्त मोठा उत्सव सुरू होता. रस्त्यावर कमानी उभारल्या होत्या, त्या आठवल्या. बाहेरच्या दर्शनी बाजुला पुढार्‍यांची थोबाडे आणि आतल्या बाजुला साईबाबांची चित्रे होती.

heli 5 copy

heli 6 copy

heli7 copy

अखेर तो सोहळा संपला आणि पुन्हा एकदा ते हेलिकॉप्टर भिरभिरत आले आणि दूर निघुन गेले. जाता जाता त्याचा वेध घेत असताना पक्ष्यांचा एक थवा जाताना दिसला. बहुधा मोठ्या आवाजाने ते अस्वस्थ झाले असावेत.

heli8 copyसं

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुरूवातीची फार गोंधळाची स्थिती झाली असेल तेथील रहिवाश्यांची.
असले प्रकार करण्यासाठी स्थानिक अधिकार्‍यांची परवानगी लागते. तशी या हेली. ने घेतली असावी काय? अर्थात नसल्यास आपल्याकडे 'मिटवता' येतेच म्हणा. अन सोहळा पॉवरफुल देवाचा असल्याने कोणी वाटे गेले नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मला नाही पटलं धार्मिक कारणांसाठीचा हेलिकॉप्तरचा वापर. जर ते हेलिकॉप्टर कोसळलं वगैरे असतं तर Sad

>> विशेषतः आपल्याला कुठे जाई असताना नेमेकी पोराची चड्डी ओली झालेली असते. मग आधी पोराची चड्डी बदला.>>
खूप हसले हे वाचून ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच म्हणतो मी. वरील फोटोंतील प्रत्येक फेम मध्ये पॉवर लाईन्स आहेत. हे हेली. फार म्हणजे फारच धोका पत्करून खाली आलेले दिसत आहे. अशा प्रसंगात हे हेली. इतक्या खाली आणण्याची परवानगी/ गृहीतक असते का?

मी राहतो त्या भागाच्या जवळच आर्टीलरी आहे. तेथून दररोज नाही पण एखाद्या दिवसाआड असले मिलीटरीची कॉप्स आमच्या भागात वरून उडत जातात, ती देखील इतके खाली कधीच येत नाहीत. हे खाजगी कॉप. जरी असले तरी त्यांना काहीतरी उंचीचे बंधन जरूर असले पाहीजे व या पायलटने ते पाळलेले दिसत नाही हे नक्की. उद्या काही कमी जास्त झाले असते तर जबाबदारी कोणाची? स्थानिक प्रशासन, एखादे स्थानिक वार्तापत्र या घटनेचा मागोवा घेईल काय?

जरी तसे झालेच तर पुढे काय होईल हे पहिल्या प्रतिसादात दिलेले आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

नाईस फोटोज..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0