कुरळे केस सोनेरी...

कुरळे केस सोनेरी
बाहुली माझी सोनपरी

लुकलुक लुकलुक डोळ्यांची
इवल्या इवल्या नाकाची
गुब्रे गाल फुलापरी
बाहुली माझी सोनपरी

हिला न येतो राग कधी
नेहमी असते आनंदी
कधी न कुठला हट्ट धरी
बाहुली माझी सोनपरी

खूप मला ही आवडते
जवळ सदा माझ्या असते
मैत्रिण माझी खरीखुरी
बाहुली माझी सोनपरी

- ग्लोरी

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

फार छान! सुरेख! आवडली!
Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

तुमची बाहुली आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

चला, लहान मुलांच्या तरी कविता मला १००% कळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.