तुम्हाला आवडलेली कोणतीही दोन पुस्तके

ऐसी अक्षरे या मराठी संस्थळावर आल्यापासून आणि सदस्यांचे लेखन वाचताना असं वाटलं कि इथला सदस्य वाचनप्रेमी आहे. वाचनाची आवड असलेल्या प्रत्येकाला कोणते ना कोणते एक पुस्तक सगळ्यात जास्त आवडतेच, मला आवडलेली दोन पुस्तके 'स्मृतिचित्रे' आणि 'बहार' अशी आहेत.
'स्मृतिचित्रे' अर्थातच लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र आहे, मी हे पुस्तक पहिल्यांदा नववीत असताना वाचले, फारसे काही कळले नाही पण काहीतरी वेगळे आहे असे त्यावेळी वाटल्याचे स्मरते. त्या नंतर अनेक पारायणे झाली या पुस्तकाची, आत्ता पर्यंत वाचलेल्या सगळ्या पुस्तकात मला सगळ्यात जास्त हे पुस्तक आवडते.
५-६ वर्षापूर्वी मेनकाच्या दिवाळी अंकात शुभा येरी या लेखिकेची 'बहार' हि कादंबरी आली होती. म्हटलं तर आंतरजातीय प्रेमकथा पण बरेच घटक येतात आणि कादंबरी रंगत जाते. श्रीमंत नायिका आणि गरीब नायक (दोघेही चित्रकार) अशी नेहमीच्या पठडीतली सुरुवात असूनही लिहिण्याच्या रंगतदार शैलीमुळे तोच तोच पणा जाणवत नाही. प्रेम जुळल्यानंतर अशा काही घटना घडतात कि नायिकेला तिच्या मनाविरुद्ध लग्न करावे लागते, लग्न ज्याच्याशी होते त्याने व्यावसायिक दुश्मनीमुळे केलेले लग्न, एखाद्या चित्रपटाची कथा असावी इतका माल मसाला पण लिखाणात नक्कीच काही तरी नवीन आहे, छोट्या छोट्या गोष्टी पण विचार करायला लावणाऱ्या. काहीसा अनपेक्षित शेवट. लिखाणातला मोकळेपणा सगळ्यात जास्त जवळचा वाटतो.
माझ्या कडचा हा दिवाळी अंक कोणीतरी वाचायला नेला परत आलाच नाही. नंतर मेनका प्रकाशन ने हि कादंबरी पुस्तक रुपात छापली त्यामुळे परत हे पुस्तक संग्रही ठेवता आले.
एखादे अनवट पुस्तक कोणाला आवडत असल्यास त्याची माहिती द्यावी जेणेकरून ते पुस्तक इतर सदस्य वाचू शकतील. तसेच आवडणाऱ्या दोन पुस्तकाची नवे हि सांगावीत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

छ्या 'दोन' हा अन्याय आहे! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या मनावर कोरली गेलेली कादंबरी - "शिवप्रिया" नावाची आहे. लेखिकेचे नाव दुर्दैवाने आठवत नाही. पार्वती ही या कादंबरीची नायिका आहे. शिव-पार्वती विवाहाचे तर अतिशय रम्य आणि सुरस वर्णन पुस्तकात येते.

दुसरे पुस्तक इंग्रजी, लहान मुलांचे आहे - "Rainbow Crow" हे "Nancy Van la"" यांचे. ही नेटीव्ह अमेरीकन लोककथा आहे. ज्यामध्ये "फार पूर्वी असलेला, कावळ्याचा सप्तरंगी रंग काळा ठिक्कर कसा पडला" यासंदर्भात एक रोचक कहाणी येते. या पुस्तकातील वर्णन जादूमय आहे. येथे याबद्दल माहीती वाचता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन(च) का?...मला आवडणाय्रा व इतरांनीही वाचावी अश्या वाटणाय्रा पुस्तकांची यादीच देतो... Smile

आचार्य अत्रे यांची-झेंडुची फुले,हशा आणी टाळ्या,पु.ल.चं-मराठी वांङ्मयाचा गाळीव इतिहास,शेषराव मोरे यांची-विचारकलह,अप्रीय पण...,नरहर कुरुंदकरांची-शिवरात्र,आकलन,डॉ.आ.ह.साळुंखे यांची-आस्तिकशिरोमणी चार्वाक,विद्रोही तुकाराम Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

अ‍ॅटलास श्रग्ड, फाऊंटनहेड.
सगळा जेम्स हेरियट.
सगळा हॅरी पॉटर.
मराठी:
१९८०-८५ पर्यंतचे सगळे लेखक. नंतर भाषांतरकारांची अचानक गर्दी वाढली...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दोन्हीही पुस्तके शाळकरी वयात वाचलेली आहेत आणि दुर्दैवाने त्यांची नावे / लेखक यांच्याबद्दल काहीही आठवत नाही.यातलं पहिलं पुस्तक एका लहान मुलीबद्दल आहे. महायुद्धामुळे पोरक्या झालेल्या मुलीला एका शेजारच्या देशातले एक शेतकरी कुटुंब दत्तक घेते. देश - भाषा सगळ्याच बाबतीत सांस्कृतिक संघर्ष करावा लागत असणारी ही पाच सहा वर्षांची मुलगी रोज एका खिडकीत बसून मातृभाषेत आपल्या आईला पत्र लिहिते. नव्या घरी शेतावर खूप गजबज असते. बरीच भावंडे असतात आणि शेळ्या - मेंढ्या - कोंबड्या यांची गर्दी असते. या भावंडांमधली एक दहा बारा वर्षांची मुलगी सगळ्यांची ताई असते. आई बाबा कामासाठी शहरात जाताना सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवून जातात. तीही या नव्या बहिणीसहट सगळ्यांची काळजी घेते. तिला बरं वाटावं म्हणून अंडं घालून केलेला केक करते. पुढे या दत्तक मुलीचे आईबाबा तिला परत मिळतात अशी काहीशी गोष्ट होती.
हे शेतकरी कुटुंब स्वीडिश होतं एवढंच मला आठवतंय. पण अनेक कडू गोड प्रसंगांतून पुढे जाणारी ही कथा तेव्हा खूपच आवडली होती असं आठवतंय.

दुसरं पुस्तक म्हणजे एकोणिसाव्या शतकात आफ्रिकेच्या अंतर्भागात जाऊन राहिलेल्या आणि तिथल्या लोकजीवनाचा अभ्यास करणार्‍या एड्रियन बोशियर या ब्रिटिश गोर्‍या माणसाचं चरित्र आहे. हा माणूस तिथल्या लोकजीवनाशी एकरून झाला होता असं म्हणतात. तो रहात असे त्या भागात साप मोठ्या संख्येने सापडत असत. त्यामुळे सापांना इजा न करता कसं पकडायचं याची कला तो तिथल्या लोकांकडून शिकला होता. तो सापांना पकडून दूर नेऊन सोडत असे. साप पकडण्यातलं त्याचं कौशल्य तक जबरदस्त होतं की कितीही मोठा साप असला तरी बोशियर त्या सापाला पकडल्याशिवाय रहात नसे. अशाच एका मोठ्या अजगराला पकडल्यावर बोशियरला 'राडिनोगा' म्हणजे सापांचा बाप अशी पदवी देण्यात आली होती.

या दोन्ही पुस्तकांबद्दल जास्त माहिती मी सध्या शोधते आहे. कुणाकडे अशी माहिती असल्यास कृपया कळवावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

दुसर्‍या पुस्तकाचे नाव 'निसर्गपुत्र' अनुवादकः निरंजन घाटे, पुण्याच्या मेहता प्रकाशनचे आहे. (मूळ पुस्तकः द लायटनिंग बर्ड, ले. लायल् वॉटसन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

मी दोन पुस्तके नियमितपणे वाचतो आणि त्यावर विचारही करत राहतो.

१) पासबुक
२) चेकबुक

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पडघवली, शितु.
अर्थातंच पु.ल., अत्रे वगैरे आहेतंच. ठणठणपाळ हे अजुन एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आवडतील अशीच पुस्तके वाचतो आणि शक्यतो फिक्शनच वाचतो. त्यातली कोणतीही दोन हवी असल्यास नुकतीच वाचलेली सांगतो.
१. The White Tiger - Arvind Adiga
२. निशाणी डावा अंगठा - रमेश इंगळे- उत्रादकर

सर्वात जास्त आवडलेली हवी असतील तर सांगणे अवघड आहे. बहुतेक वाचलेली पुस्तके तेव्हा तेव्हा खूप आवडलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडीची दोनच पुस्तके सांगणे हा खरोखर अन्यायच आहे.
तरी
तुंबाडचे खोत- श्री.ना. पेंडसे आणि गॉडफादर- मारियो पुझो ही सर्वाधिक आवडीची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

टाईमपास करण्यासाठी वाचलेली पण अनपेक्षितरित्या अतिशय आवडून गेलेली दोन पुस्तके (अदिती यांनी वर उल्लेख केलेले 'निसर्गपुत्र' हे तिसरे):

अनंत सामंत यांनी अनुवादित केलेले 'लांडगा' (मूळ लेखक जॅक लंडन याचे 'व्हाईट फँग')
"कथा एका शायराची"- लेखिकेचे पहिले नाव इंदुमती इतकेच आठवते आहे. मिर्जा गालिबवरील असले तरी मोंगलाईचा, दिल्लीचा पडता काळ जिवंत करणारे नि त्याला अनुलक्षून विविध प्रश्नांचे अतिशय अनपेक्षित पैलू समोर ठेवणारे अप्रतिम पुस्तक (कादंबरी).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तशी बरीच आहेत पण त्यातली काही ..

तांबडफुटी, पडघवली, मोगरा फुलला - (गो. नि. दांडेकर)
माणसे - अरभाट आणि चिल्लर - (जी. ए. कुलकर्णी)
मर्मभेद - (शशी भागवत)
अनुवादित पुस्तके

चीपर बाय दी डझन (अनु.मंगला निगुडकर)
एक होता कार्व्हर (अनु. वीणा गवाणकर)
एका कोळियाने ...(अनु. पु.ल. देशपांडे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

फास्टर फेणे (भागवत), टारझन (टिकेकर), मुक्काम पोस्ट शेंडेनक्षत्र आणि धूमकेतूवर स्वारी (अनुवादितःभागवत), श्यामची आई, चिमणराव भाग (चिंवि), खोगीरभरती(पुलं), हसवणूक (पुलं), व्यक्ती आणि वल्ली (पुलं), बटाट्याची चाळ (पुलं), रामनगरी , सत्तर दिवस (अनुवादित), खेकडा (मतकरी), गर्द (अवचट) , संभ्रम(अवचट), धार्मिक(अवचट), कोवळे दिवस (व्यंकटेश),........... , शाळा (बोकिल), अलाईव्ह (अनुवादित).....

दोनच म्हणाल तर १) शाळा आणि २) शाळा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0