नियोग ही परंपरा असलेला समाज आणि विकी डोनर सिनेमा ची गरज !

विकी डोनर सिनेमा

विकी डोनर या चित्रपटात असे पात्र दाखविले आहे की ज्याचा व्यवसाय पैसे घेउन वीर्य विकणे हा आहे. आणि त्याच्या वीर्याचा वापर अपत्यहीन जोडप्यांना मुल व्हावे यासाठी केला जातो.या चित्रपटाद्वारे एक संदेश देण्यात आला आहे की अशा प्रकारे आपले वीर्य विकणे यात काहीही गैर नाही आणि याने अपत्यहीन जोडप्यांच्या आयुष्यात मुल यायचा मार्ग मोकळा होतो आणि त्यांचे जीवन आनंदी होते. चित्रपटाच्या शेवटी सर्वजण यातील नायकाच्या या कामाचे कौतुक करतात व त्याचा स्विकार करतात व चित्रपट वीर्यदान कशी चांगली गोष्ट आहे हे त्याचा अंगिकार केला पाहीजे हे ठसवितो.

वीर्यदान आणि नियोग एक तुलना

आता विसंगती अशी आहे की आपल्या संस्कृती त तर या साध्या निरुपद्रवि वीर्यदान पेक्षा ही अधिक प्रभावी व व्यावहारीक अशी नियोगा ची विलक्षण परंपरा होती. व तिला मुख्य म्हणजे धर्म व जन मान्यता ही होती. तिचा वापर होत होता त्या संदर्भात धर्मशास्त्रांनी व्यवस्थित नियम ही घालुन दिलेले होते. तर असा जो समाज एके काळी नियोगा चा सरळ स्वच्छ अवलंब करीत होता जो नंतरच्या काळात अनेक कारणांनी बंद होत गेला. ( त्यातील एक महत्वाचे म्हणजे कलिवर्ज्य या योजनेनुसार इतर अनेक गोष्टींसोबत नियोगा वर ही बंदी घालण्यात आली ) अशा समाजाला वीर्यदान या नियोगा च्या तुलनेत अत्यंत साध्या आणि अजिबात COMPLICATED नसणार्‍या विषयावर एज्युकेट करण्यासाठी एक सिनेमा काढावा लागतो.आणि गंमत म्हणजे त्यातील नायकाचे असे वीर्यदान करणे आजही बर्‍याच जणांना आवडत- रुचत- पचत नाही कुठेतरी सांस्कृतीक धक्का बसल्यासारखे वाटते हा मला काळाने केलेला एक मोठा विनोद वाटतो. म्हणुन या निरुपद्रवी वीर्यदाना पेक्षा कैक पट व्यापक असलेली नियोग पध्दती नेमकी कशी होती हे मांडावेसे वाटते.

प्राचीन भारतीय संस्कृती त नियोग ही एक नियमबद्ध, धर्मशास्त्र संमत, सर्ववर्णीयांस परवानगी असलेली एक परंपरा होती. या द्वारे ज्या स्त्रीला विधवा झाल्यावर मुल झालेले नसल्यास अथवा पति जिवंत असतांना त्याच्या नपुसंकते ने अथवा असाध्य आजाराने पुत्र प्राप्ती संभव होत नसल्यास.पति च्या संमतीने अथवा ज्येष्ठांच्या/ गुरुंच्या संमतीने एखाद्या दुसर्‍या पुरुषाची नेमणुक करुन त्याच्याशी रीतसर नियमांचे पालन करुन संभोग करुन पुत्र प्राप्ती करुन घेण्याचा हक्क देण्यात आला होता. यात कुठ्ल्याही चमत्काराने अथवा शक्तीने पुत्र प्राप्ती करुन देणे असे कधीच नव्हते.रीतसर मान्यताप्राप्त संभोगाने पुत्र प्राप्तीची ही एक धर्मसंमत आणि व्यावहारीक अशी परंपरा होती.

नियम कायदा बनविणारे धर्म साहीत्य व त्याचे ढोबळ वर्गीकरण

सर्वसाधारणपणे प्राचीन धर्म साहीत्यात श्रुती (मुळ वेद साम-अथर्व-रुग्वेद-यजुर्वेद ) ,स्मुर्ती ( उदा.मनुस्मृती, नारद्स्मृती इ.) धर्मसुत्रे ( बौधायन. आपस्तंब इ.) पुराणे ( विष्णुपुराण,मत्स्य्पुराण इ.) अशी विभागणी असते. त्यानंतर विवीध टीकाकारांच्या टीका जशी (मनुस्मृती वरील मेधातीथी ने केलेले भाष्य,) यात बहुतेक वेळा एका समान मुद्यांवर भरपुर भेद असतात. यात शेवटचा निकाल हा श्रुती त काय आहे यावर होत असतो. पण एखादा विषय घेउन तुम्ही शोध घेतला जसे उदा इथे नियोग या SPECIFIC विषया वर निरनिराळ्या ठिकाणी काय लिहीलेले आहे हे जर बघीतले तर त्या विषयाचे एक निश्चित चित्र बर्‍यापैकी समोर येते. नियमात मतभेद जरी आढळले तरी एकदंरीत शास्त्रकर्त्यांची त्या विषयासंबंधीची भुमिका काय आहे आणि त्यांना नेमके काय अभिप्रेत होते. हे निश्चितच लक्षात येते. त्याहुन महत्वाचे म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात घेतलेली भुमिका काळानुरुप कशी बदलत जाते कुठल्या कारणांनी ही भुमिका बदलते हे पाहणे हा ही एक मोठा INTERESTING भाग असतो.याने परंपरेचे अधिक स्पष्टतेने आकलन होते.

या लेखाच्या सोर्स विषयी

आता आपण नियोगा विषयी निरनिराळ्या महत्वाच्या धर्मशास्त्रां मध्ये काय ,तरतुदी, नियम व तत्वे व व्याख्या होत्या या बघुयात म्हणजे नियोग या परंपरे विषयीचे अधिक चित्र स्पष्ट होत जाईल. ( खालील सर्व नियम मुळ संस्कृत भाषेत मुळ ग्रंथात व्यवस्थित उपलब्ध आहेत हा त्यांचा थोडक्यात मराठी अनुवाद आहे. जाणकार मुळ संस्कृत श्लोक कधीही तपासुन पाहु शकतात) या खालील विवेचना चा मुख्य आधार ( HISTORY OF DHARMSASTRA VOLUME II , PART -1 , CHPTER XIII, ( NIYOGA ) PAGE NO. 599 TO 607 ) हा आहे याचे लेखक आहेत श्री पांडुरंग वामन काणे हे या विषयांतील अत्यंत अधिकारी व्यक्ती मानले जातात आणि माझ्या अल्प सामान्य ज्ञानानुसार हे भारतरत्न हा सम्मान मिळवणारे पहीले मराठी माणुस आहेत. हा ग्रंथ संशोधकीय वर्तुळात प्रतिष्ठा प्राप्त आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की यातील सर्वच मते बरोबर च आहे किंवा चिकीत्सेची गरज च नाही असे सुचविण्याचा हेतु अजिबात नाही. जाणकार मुळ संस्कृत ग्रंथ पडताळुन पाहु शकतात.)

नियोगा संबधी सर्वात जुने धर्मशास्त्र गौतमधर्मसुत्र चे विवेचन बघा

१-अशी स्त्री जीचा पति मरण पावलेला आहे, आणि जीला मुल व्हाव अशी इच्छा आहे ती आपल्या पतीच्या भावा कडुन पुत्र प्राप्ती घरातील ज्येष्ठांच्या संमतीने करुन घेउ शकते.
२-आणि मासिक पाळीचे पहीले चार दिवस वगळुन त्यानंतर च्या दिवसांत ती पतीच्या भावाशी पुत्र प्राप्तीसाठी संभोग करु शकते..
३-जेव्हा पतीचा भाउ अस्तीत्वात/ ऊपलब्ध नसेल तेव्हा ती सपिंड, सगोत्र ,सप्रवरा कींवा स्व-वर्णिय पुरुषाशी पुत्र प्राप्तीसाठी संभोग करु शकते.( काही शास्त्रकारांच्या मते केवळ दीर च हे काम करु शकतो इतर कोणी नाही यात पुष्कळ मतभेद आहेत)
४-या नियोगा चा वापर स्त्रीला केवळ दोन पुत्रां पुरताच करता येउ शकतो. त्याहुन अधिक नाही.
५-जेव्हा पति जिवंत असेल आणि पुत्र निर्मीती साठी सक्षम नसेल आणि त्याच्या परवानगीने जेव्हा नियोग घडवला जाउन जर पुत्र निर्मीती झाली तर असा पुत्र हा त्या पति चा मानला जाईल.
६- वरील प्रमाणे झालेला पुत्र क्षेत्रज म्हणुन ओळखला जातो. वरील स्त्री क्षेत्र म्हणुन ओळखली जाते.अशा स्त्रीचा पती हा क्षेत्रिन आणि ज्याची नेमणुक या कार्यासाठी केली जाते त्याला बिजिन (जो बीजारोपण करतो ) अथवा नियोगीन असे म्हटले जाते.

वसिष्ठ धर्मसुत्रा चे नियोगा संबंधी नियम बघा

१-विधवा स्त्रीचा पिता अथवा भाउ यांनी गुरुंची बैठक बोलाविली पाहीजे आणि त्यांच्या संमतीने च मग बिजीन ची नेमणुक पुत्र प्राप्तीसाठी केली पाहीजे.
२-यात काही प्रतिबंध घातलेले आहेत. जर विधवा स्त्री पति वियोगाने वेडी अथवा मानसिक संतुलन हरवलेली असेल, अथवा म्हातारी असेल अथवा रोगग्रस्त असेल तर मात्र नियोग करण्यास मनाई आहे.
३-बिजीन ने प्रजापती मुहुर्त ( हा जसा ब्रम्ह मुहुर्त आहे तसा एक मुहुर्त आहे ) बघुन , पतिसारखी भेट घेउन, मात्र कोठल्याही प्रणय क्रिडा न करता, तिला शिवीगाळ न करता तिचा धिक्कार न करता च पुत्रप्राप्ती साठी विधवे शी संभोग केला पाहीजे.
४-संपत्ती त सहभाग मिळेल या हेतुन बिजीन नियोग करीत असेल तर त्याला प्रतिबंध केला पाहीजे. बिजीन ने कर्तव्य भावनेने निस्वार्थ भावनेने हे सर्व केले पाहीजे ही शास्त्रकाराची अपेक्षा आहे.

बौधायन धर्मसुत्राने केलेली क्षेत्रज ची व्याख्या

असा पुत्र जो
अ-जो विधवे च्या परवानगीने
ब-नपुंसक पुरुषाने आपल्या स्त्रीशी संभोग करण्यास दीलेल्या परवानगीने
क-असाध्य आजाराने ग्रस्त अशा पुरुषाने आपल्या स्त्रीशी संभोग करण्यास दिलेल्या परवानगीने
करण्यात आलेल्या परपुरुषा बरोबर च्या ( बिजीन ) संभोगाने झालेला आहे. असा पुत्र जो या वरील संमत संभोगाद्वारे झालेला आहे तो क्षेत्रज म्हणुन ओळखला जातो.

मनुस्मृती त आलेले नियोगा संबधी चे नियम

( नियोगा विषयी मनु दोन परस्पर विरोधी भुमिका घेतो काही श्लोकांत तो नियोगा चा पुर्णपणे विरोध ही करतो व काहीत समर्थन करतो ) तर मनुस्मृती नुसार ,
एखादी विधवा जेव्हा नियोगासाठी पतीचा भाउ अथवा पती च्या सपिंड पुरुषाशी संभोग करते आणि जर तिला त्यानंतर ही पुत्रप्राप्ती झाली नाही तर ती दुसर्‍या एखाद्या पुरुषाचा वापर नियोगासाठी करु शकते मात्र मनुस्मृती त्यासाठी दोन नियम लावते.
१-अशा बिजीन ने अंधारात च स्त्रीशी संभोग केला पाहीजे
२-अशा बिजीन चे शरीर भरपुर तुप व तेलाने माखले पाहीजे.
३-आणि याने केवळ एक च पुत्र या विधीने जन्माला घातला पाहीजे.(इथे वरील धर्मशास्त्रांशी मनु विरोध दर्शवितो दोन एवजी एकच पुत्राची परवानगी देतो.)

कौटील्याचे नियोगा संबधीचे नियम

१-जो राजा म्हातारा अथवा असाध्य व्याधी ने ग्रस्त आहे अशा राजाने अशा मातृबंधु ची ज्यात त्याच्या स्वत: सारखेच चांगले गुण आहेत अशा पुरुषाची नेमणुक नियोगासाठी करुन त्याद्वारे राणी कडुन पुत्र प्राप्ती करुन घेतली पाहीजे.
२-जो ब्राम्हण पुत्रा शिवाय च मेला आहे. त्याच्या पत्नी साठी ही मातृबंधु अथवा सपिंड पुरुषाची बिजीन म्हणुन नेमणुक करुन पुत्र प्राप्ती करुन घेतली पाहीजे.
आता वरील नियोगाच्या विधी संबंधातील कौटील्याचे नियम पहा कुठल्या कंडीशन्स मध्ये नियोग होउ शकतो वगैरे संबधीचे नियम व अटी.

१-नवरा जिवंत अथवा मृत असो त्याला अगोदरचा पुत्र असेल तर नियोग करता येत नाही.
२-नियोगासाठी नेमलेला बिजीन हा नवर्‍याचा भाउ अथवा सपिंड अथवा सगोत्र ( पतिचा) अथवा स्वजातीचा (पतिच्या) च असला पाहीजे अन्य पुरुष अलाउड नाही.
३-कुटुंबातील गुरुंनी बसुन चर्चा करुन च नियोगाचा निर्णय घेतला पाहीजे.
४-या कामासाठी नेमलेल्या बिजीन ने वासने ने प्रेरीत होउन संभोग न करता कर्तव्यभावनेने च याला अंमलात आणले पाहीजे.
५-बिजीन ला अगोदर तुप व तेलाने व्यवस्थित मर्दन केले पाहीजे.( जेणेकरुन कर्तव्यभावना शाबुत राहील वासना निर्माण होणार नाही हा हेतु आहे)\
६-बिजीन ने या स्त्रीशी मधुर संभाषण किंवा चुंबन किंवा अथवा प्रणय ( फ़ोर प्ले –कोर्टशिप –) न करता संभोग उरकला पाहीजे.( जेणेकरुन कुठलाही बॉन्ड दोघांत उत्पन्न व्हायला नको)
७-हा संबध फ़क्त एक अथवा दोन पुत्र होइ पर्यंत च अलाउड आहे.
८-स्त्री ही बिजीन पेक्षा वयाने लहान हवी आणि निरोगी हवी.
९-एकदा नियोगाद्वारे पुत्र प्राप्ती झाली की नंतर मात्र बिजीन आणि स्त्री यांनी परस्परांशी संबंध सासरा व त्याची सुन असे ठेवले पाहीजेत.
१०-असा नियोग जर ज्येष्ठांच्या संमती विना झाला तर तो पाप मानण्यात येईल.
११-जरी ज्येष्ठांची संमती असेल मात्र पत्नीला जर स्वत:च्या पती पासुन अगोदरच पुत्र प्राप्ती झाली असेल तर वरील ज्येष्ठांची संमती असुनही हा नियोग पाप मानण्यात येईल.

नियोगा संदर्भात मनात निर्माण होणारे काही प्रश्न व शंका ( जाणकारांनी प्रकाश टाकावा ही अपेक्षा )

१- शास्त्रकर्त्यांचा बिजीन आणि स्त्री दरम्यान जो भावबंध निर्माण न होउ देण्याचा प्रयत्न आहे तो खरच प्रत्यक्षात यशस्वि होत असेल का ? ( याच मुद्यावर अमोल पालेकरांचा एक चित्रपट येउन गेला आहे यात एका राणीला नियोगासाठी राजा पाठवितो सुरुवातीला फ़ारशी उत्सुक नसलेली राणी मात्र नंतर बिजीन ने दिलेल्या संभोगसुखाने बदलत जाते, त्याच्यात मनाने गुंतत जाते अस काहीस त्यात फ़ार तरलतेने दाखविलेल आहे)
२- अंगाला तुप तेल लावुन एक प्रकारे बिजीन विषयीचे आकर्षण कमी करण्याचा प्रयत्न कीतपत यशस्वि होत असावा?
३- ज्येष्ठ च सर्व ठरवित असत त्यांची संमती ही अट जवळजवळ प्रत्येक च धर्मशास्त्र घालते. तर ती जी काय स्त्रि आहे तीच्या संमती विषयी तर काही कुठे फ़ारसा नियम वगैरे दिसत नाही की नेहमीप्रमाणे स्त्रीची संमती गृहीत च धरलेली दिसतेय.
४- पुत्र प्राप्ती हाच शब्द सर्वत्र स्पष्टपणे वापरला आहे कन्या प्राप्ती हा काही उद्देश दिसत नाही. कन्येसाठी काही नियोगाचा अवलंब केलेला दिसत नाही. पण उद्देश जरी पुत्र असला आणि झालीच कन्या तर काय बर करीत असावेत ? एक संधी अधिक देत असणार काय? उल्लेख तर काही आढळला नाही असा.
५- आजच्या काळात या नियोग परंपरेचे पुन्हा एकदा पालन करणे सुरु केले तर त्याचे काय सामाजिक नैतिक परीणाम होतील? कारण आजही कृत्रीम पध्द्त आय़.व्ही.एफ़. ही खार्चीक आणि गुंतागुंतीची आहे. त्यामानाने नियोग ही फ़ारच सोपी आणि व्यवहारीक आहे.
६- आणि मुख्य म्हणजे स्त्रीयांच या नियोग परंपरेला समर्थन असेल की विरोध आणि असेल तर नेमक्या कुठल्या मुद्यावर ?
७- कृत्रीम पध्द्तीने गर्भधारणा हे तुलनेने अतिशय आधुनिक तंत्र आहे. मग हे जेव्हा उपलब्ध ही नव्हते तेव्हा ही युटीलीटी व्हॅल्यु शाबुत असलेली परंपरा बंद करण्याचे प्रयत्न का झालेत ?
८- कलिवर्ज्य हे नियोगा बरोबरच पुनरविवाहा वर ही बंदी आणते.( जो त्या पुर्वी च्या धर्मशास्त्रांनुसार ५ कारणं असतील तर अलाउड होता उदा.पति नपुंसक असेल तर इ.इ.) हे मर्यादीत स्त्री स्वातंत्र्य देखील काढुन घेण्य़ामागची सोशियो-इकॉनॉमिक कारण काय असावीत.? इथुन स्त्री-स्वातंत्र्याचा संकोच होत असताना का दिसतो?.
९- सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या नियोग प्रकाराला जी एक सर्वस्वी मानवी अशी परंपरा आहे तीला आताच्या काळात डीव्हाइन टच का दिला जातो ? या परंपरेच्या तिरस्कारातुन हे होत असावे का ? भैरप्पा हे व्यासंगी लेखक याच्या विरोधात आहेत ते पर्व या महाभारतावरील आधारीत कादंबरीत नियोगाचे मानवी पातळीवरुन रेखाटन करतात.(लहानपणी टी.व्ही. सीरीयल महाभारत मध्ये असाच दैवी नियोग बघितल्याचे अस्पष्ट आठवते) यामागची सोशियो-कल्चरल कारण काय असावित ?
१०- या परंपरे संदर्भात अगदी प्राचीन ते अवार्चीन धर्मग्रंथ नियम बनवितात यावरुन ही समाजात खोलवर रुजलेली मुरलेली अशी प्रचलित परंपरा होती. त्याशिवाय इतके नियम बनविण्याची गरज पडली नसती व इतका उहापोह झाला नसता. मग या परंपरेला कुठल्या फ़ोर्सेस ने (कलिवर्ज्य च्या काळी अस्तित्वात असलेल्या) विरोध केला असेल ? आणि त्याची कारणे काय असावित? कारण एखादी परंपरा सांधा बदलते तो काळ फ़ार महत्वाचा असतो.तिथे फ़ोकस केल्यास अनेक बाबी स्पष्ट होतात.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

एका महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन.

< युटीलीटी व्हॅल्यु शाबुत असलेली परंपरा बंद करण्याचे प्रयत्न का झालेत ?>

ही परंपरा परवा-परवा पर्यंत अस्तित्वात होती. मी एक अनुभव http://aisiakshare.com/node/1690 इथे सांगितला आहे.

मुख्य म्हणजे अशा प्रथांनी वंशशुद्धी कशी टिकणार हा प्रश्न काही केल्या सुटत नाही. शिवाय भारतात निर्माण झालेल्या अनेक संकर-जाती नियोगाशिवाय किंवा अन्य तशाच मार्गांनी निर्माण झाल्या असणार हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्याच्या पॅराग्राफ्स चे शीर्षक बोल्ड करुन दिल्यास फार बरे होईल. त्याने वाचन करणे सुलभ होईल. मी अनेक प्रयत्न केले परंतु माझ्या संगणकातील तांत्रीक त्रुटींमुळे बहुधा ते शक्य होत नाही त्यामुळे ही नम्र विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही पॅरॅग्राप्फ्सचे शीर्षक बोल्ड केले आहे.
संपादन टॅबमध्ये जाऊन ते कसे केले आहे ते पहावे आणि उर्वरीत शीर्षकांना गरजेनुसार बोल्ड करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बरेच दिवस माझ्या मनात एक विचार घोळतोय. उच्चवर्णीय आणि निम्नवर्णीय यांच्यात विवाह-संबंध होत नाही आणि त्यामुळे जाती-भेद संपत नाहीत. निम्नवर्णीयांनी उच्च्वर्णीयांचे स्पर्मस घेऊन आपली प्रजा वाढविली तर जाती-भेद संपतील का? कदाचित....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फरक फक्त रक्ताचा नाही.
राहणीमानातील फरक हा सुद्धा मुद्दा भारतीयांच्या मनात घट्ट बसलय.
कितीही डोके आपटले तरी झाट उपयोग नाही.
जसंजसं भारतात मेट्रोकरण वाढेल तशी तशी जातीची बंधने काहीशी सैल होतील अशी आशा आहे थोडीशी.
बास. त्याउपर काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उलटं झालं तर हर्कत काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तर्कतीर्थांचा प्रतिसाद खालील तर्कावर आधारित असावा.
खालचे - वरचे संकल्पना जे मानतात त्या लोकांसाठी:-
तो खालच्या लोकांच्यात वाढला असला तरी शेवटी रक्त "आपल्यातलच" आहे.
ही भावना वरच्यांना येउ शकते.
म्हणजे वरच्यांना खालचे वर्ज्य राहणार नाहित.
खालच्यांना वरचे सध्याही वर्ज्य नाहितच. हे त्यात गृहितक आहे.
.
.
.
अनुलोम, प्रतिलोम हे शब्द आपणास ठाउक असतीलच.
.
.
माझे मतः-
जातीनिर्मूलन करण्याचा उत्तम उपाय जातीनिर्मूलन करणे हाच आहे. आडवळणे नकोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ते कळालं, तो तर्क तिथे अध्याहृतच होता. बाकी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१- शास्त्रकर्त्यांचा बिजीन आणि स्त्री दरम्यान जो भावबंध निर्माण न होउ देण्याचा प्रयत्न आहे तो खरच प्रत्यक्षात यशस्वि होत असेल का ? ( याच मुद्यावर अमोल पालेकरांचा एक चित्रपट येउन गेला आहे यात एका राणीला नियोगासाठी राजा पाठवितो सुरुवातीला फ़ारशी उत्सुक नसलेली राणी मात्र नंतर बिजीन ने दिलेल्या संभोगसुखाने बदलत जाते, त्याच्यात मनाने गुंतत जाते अस काहीस त्यात फ़ार तरलतेने दाखविलेल आहे)

- राणी मनाने गुंतली आहे असे दाखवले नाहीये, तर संभोगसुख कसे असते हे नपुंसक राजाकडून तिला कधी कळलेलेच नसते, जे तिला या नियोग प्रकारातून गेल्यावर कळते आणि ते वारंवार मिळावे अशी तिला इच्छा होते. मनाने गुंतणे तिचे अजूनही राजामध्येच आहे.

१. या चित्रपटात जो नियोग दाखवला आहे त्यात वरती सांगितलेला नियोगाचा नियम तोडला गेला आहे असे दिसते (नो फ़ोर प्ले –कोर्टशिप)
२. राणीला तेच फार आवडले असावे असेही चित्रपट पाहिल्यावर वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

विषयाची प्रस्तावना, मुख्य माहिती, नाना अंगे, उपांगे आणि विशेषतः तत्संबंधीच्या पृच्छा फारच सुंदरपणे मांडल्या आहेत.

नियोगाबद्दल मला पूर्वी माहिती नव्हती. वाचून भारताच्या प्राचीन परंपरांबद्दल आदर वाढला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या अशा डेंजर डेंजर गोष्टी नक्की कधीपर्यंत प्रचलित होत्या?
मह्णजे वात्सायन वगैरे कालाचा उल्लेख केला जातो लैंगिक चिकित्सा हा विषय टॅबू नसण्याबद्दल.
कीम्वा ह्या नियोग वगैरे पद्धती.
किंवा स्त्रियाही कमरेवरील भाग मोकळासोडूनच कित्येकदा हिंडत वगैरे उल्लेख वाचले, की हे असं नक्की अक्धीपर्यंत सुरु होतं?
कोणत्या काळात आणि का थांबलं?
आणि जेव्हा सुरु होतं तेव्हाही सर्रास सुरु होतं की आपला एक माय्नॉरिटी करंट चे पी एन पी जंक्शन मध्ये कोपर्‍यात अस्तित्व असवे तसे अस्तित्व होते.
(स्त्री सत्ताक राज्य पद्धती आजही आहे, पण ती मणिपूर पुरतीच आहे. कीम्वा इतर काही जमातीत उर्वरित भारतात आहे.
तो मेन स्ट्रीम चा भाग नाही. तर ह्या पद्धती मेन स्ट्रीम चा भाग होत्या का?)
आज प्रचलित असलेल्या समजुती नक्की कधीपासून आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

परंपरेची माहिती समजली. पण त्यात थोर काये हे नै समजले.
तत्कालीन काळात समाजमान्य असेलही आताच्या काळात हे अगदीच निरुपयोगी (प्रसंगी घृणास्पद) कृत्य वाटते.

मुळात अपत्यप्राप्तीसाठी कोणत्याही मार्गाने इतका आटापिटा का करावा हे मला कळत नाही.
अगदी जनुकीय इच्छा जरी धरली तर वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करून पाहणे एकवेळ योग्य वाटावे पण इतका अट्टाहास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परंपरेची माहिती समजली. पण त्यात थोर काये हे नै समजले.

+१
.
.
तत्कालीन काळात समाजमान्य असेलही आताच्या काळात हे अगदीच निरुपयोगी (प्रसंगी घृणास्पद) कृत्य वाटते.
इच्छेविरुद्ध असलं तर नक्कीच घृणास्पद.
अन्यथा आवड ज्याची त्याची.
.
.
मुळात अपत्यप्राप्तीसाठी कोणत्याही मार्गाने इतका आटापिटा का करावा हे मला कळत नाही.
कुणाला अपत्याची ओढ , अतीतीव्र आकांक्षा असण्यात काहीच चूक वाटत नाही.
उलट एखाद्या स्त्रीला स्वतःला अपत्य हवे असेल तर निव्वळ नवरा मृत आहे, ह्या दुर्दैवामुळे तिला
मातृत्वापासून दूर ठेवण्याचा सध्याचा समाज आटापिटा करतो असे म्हणता यावे.
त्यापेक्षा तशी ओढ असणे, आणि त्याच्या पूर्णत्वासाठी आडकाठी नसणे बरेच की.
.
.
प्रतिसादातील आवडलेला मुद्दा :-
तुम्ही अपत्य हा शब्द वापरलात. पुत्र हा शब्द वापरला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नियोगात थोर प्रकार हा की दे मेड अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी. हे चांगलंच असतं- नॉटविथस्टँडिंग अदर रादर रिपग्नंट डीटेल्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्षमस्व.. तुम्ही आनि मनोबाने प्रतिसाद दिलेला समजेपर्यंत मी मुळ प्रतिसाद वाढवला आहे.
मनोबा व बॅट्याची प्रतिक्रीया केवळ पहिल्या वाक्यावर आहे हे नमुद करतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

७- कृत्रीम पध्द्तीने गर्भधारणा हे तुलनेने अतिशय आधुनिक तंत्र आहे. मग हे जेव्हा उपलब्ध ही नव्हते तेव्हा ही युटीलीटी व्हॅल्यु शाबुत असलेली परंपरा बंद करण्याचे प्रयत्न का झालेत ?

नियोग/अपत्यासाठी इतर प्रयत्न बर्‍याच प्रमाणात चालुच आहे फक्त त्यासंदर्भात विदा सध्या उपलब्ध नाही हे सांगु इच्छितो. शहरीभागातील सुशिक्षीतांमधे त्याबद्दल सकारात्मक वातावरण नसले तरी ग्रामीण भागात त्यामानाने 'अपत्य'-हट्टापायी बर्‍यापैकी सकारात्मक मत आहे असे ग्रामीण भागात खुपच कार्य केलेल्या गायनाकोलॉजिस्ट कडुन एकदा ऐकले आहे.

साहित्यामधे नियोगाबद्दल काही संदर्भ आढळतात, उदा. श्री.ना.पेंडसेंच्या कादंबर्‍यांमधे स्पष्ट उल्लेख आहेतच, त्याशिवाय इतरही काही साहित्यामधे त्याकडे अप्रत्यक्षरीत्या निर्देश केल्याचे जाणवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नियोग पद्धतीची स्त्रीला असलेली गरज' या मुद्द्याचा उहापोह झालेला नाही.
मूळ उल्लेखित सर्व धर्मग्रंथांमध्ये या विषयाबाबत विचारच झालेला नसेल का? की तो विषय काही कारणांमुळे अध्याहृत ठेवलेला असेल?( अध्याहृत ठेवला असेल तर आश्चर्याची बाब आहे कारण आपले धर्मग्रंथ लैगिक संबंधांबाबत मोठ्या प्रमाणावर उघड बोलताना दिसतात.)

परंतु, स्त्रीचा पती तिला कोणत्याही कारणाने शरीरसुख देऊ शकत नसेल/जिवंत नसेल आणि तिला अपत्य नसेल* तर तिच्या मातृत्वसुलभ इच्छांचा (मॅटर्नल इन्स्टिन्क्ट) कोंडमारा होत असेल. हा कोंडमारा किती दु:ख/त्रासदायक असू शकतो याची कल्पना आज फर्टिलिटी क्लिनिक्सवर होणार्‍या लक्षावधी रुपयांच्या खर्चावरून येते. केवळ वंशसातत्य/पिंडदान - तर्पण/आत्म्यास मुक्ती हाच आणि इतकाच नियोग क्रियेचा उद्देश होता असे वाटत नाही. (अट्टाहासाचा मुद्दा.) यादृष्टीने (मातृत्त्वाची गरज या दृष्टीने) नियोग अयोग्य वाटत नाही. कारण अन्यथा *अशा प्रकारात अपत्यप्राप्तीचा इतर कोणताही मार्ग स्त्रीला मिळत नव्हता.

लेखाच्या लेखाने विचारलेल्या शंका/प्रश्नांबाबत सहमत. (प्रश्नांमध्येच त्यांची लेखकाला अपेक्षित उत्तरे दडलेली आहेत असे गृहितक.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
मी ऋषिकेशला दिलेल्या उपप्रतिसादात तेच लिहिलय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मातृत्त्वाची इच्छा असणे, त्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करणे हे समजु शकतो.
पण हे प्रयत्न किती टोकाला जाऊन करावेत याबद्द्ल दुमत आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे जेव्हा इतर उपाय अस्तित्त्वात नव्हते तेव्हा हे गरजेचे (निरुपायाने आवश्यक) असेलही पण आताच्या काळात असे उपाय करणे कितपत योग्य आहे?

(बाकी इतक्या टोकाच्या अट्टाहासाने मी स्तिमीत होतो हे खरेच. कितीही समजून घ्यायचे म्हटले तरी एका मर्यादेपुढे अशा गोष्टीचा अट्टाहास समजून घेण्यात मी नेहमीच कमी पडतो. यात आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांशी कसे संबंध ठेवायचे वगैरे मुद्दे अंतर्भूत नाहित. या अशा कारणासाठी स्वतःच्या मनाला इतका त्रास करून घेण्यासारखे त्यात काय आहे हे समजत नाही. आधी "अपत्य नै तर नै इतका का त्रास करून घ्यावा?" असे विचारल्यावर "स्वतः बाप झालास की समजेल' असे उत्तर मिळायचे. आता बाप झाल्यावरही मला ( व पत्नीलाही) एका मर्यादेपुढे आटापिटा करणारे लोक बघुन आश्चर्यच वाटते.)

याला वैयक्तिक पदर असा की माझ्या अगदी जवळील परिचितांपैकी जे जे विनाअपत्य आहेत ते सारे जण अत्यंत मजेत जगत आहेत. त्यातील काहींचे जोडिदार निवर्तले आहेत परंतू त्या स्त्रीया/पूरूष एकटे खंतावत पडले आहेत असेही कधीच दिसलेले नाही. अल्पपरिचित/निव्वळ तोंडओअळख असणार्‍यांमध्ये मात्र असे काही लोक आहेत पण त्यांना इतके खाजगी प्रश्न विचारण्याइतकी जवळीक नसल्याने हे कुतुहल म्हणा/आश्चर्य म्हणा अजूनही तित्केच टिकून आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'स्वतः बाप झालास की समजेल' पेक्षा 'स्वतः बाप होऊ शकला नाहीस तर समजेल'! Sad - जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे.
अपत्यजनन ही ज्यांच्या आयुष्यात अत्यंत साधारण बाब असते त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. पण ज्यांना ते सहजशक्य नसते त्यांना ते किती त्रासदायक असते ते ज्यांचे त्यांनाच माहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा प्रश्न त्यांना त्रासदायक जात नाही असा नाहिच्चे. त्याबद्दल वाईटही वाटते.
किंबहुना अश्या व्यक्तींना डिस्क्रिमिनेटिंग वागणूक दिल्याबद्दल मी काहीवेळा भांडलोही आहे.

प्रश्न हा आहे त्यांना 'इतक्या मोठ्या प्रमाणात' नक्की कसला त्रास होतो? त्रास होतो हे मान्यच आहे. पण किती? कारण काय?
आयुष्यातली इतर सारी सुखे/आनंद बाजुला सारून याच्याच मागे लागलेले दिसते तेव्हा यात इतके काय महत्त्वाचे आहे असा प्रश्न पडतो. त्यासाठी त्या परिस्थित जायलाच हवे असे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असा त्रास व्हायला नको. पण 'आपल्याला मूल होणार नाही' हे सत्य मान्य होईपर्यंत आणि झाल्यानंतरही बराच काळ (सत्याशी मन ग्वाही होईपर्यंत) अगदी मनाचा तोल जाईपर्यंत (अ‍ॅक्यूट डिप्रेशन) त्रास होऊ शकतो. त्यात लोक काय म्हणतील हा मुद्दा बर्‍याच खालच्या पातळीला आहे. कधीकधी अगदी मूल दत्तक घ्यायलाही मानसोपचार तज्ञाकडून मनाची तयारी करून घ्यावी लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याची कल्पना आहेच. प्रश्न परिणाम काय होतात हा नसून ते इतके का असतात अश्या स्वरूपाचा आहे
म्हणजे ही इतक्या टोकाची प्रबळ इच्छा केवळ जनुकीय रचनेमुळे होते की त्याला सामाजिक, कौटुंबिक/शैक्षणिक वगैरे कारणे आहेत की केवळ अ-जनुकीय कारणेच आहेत (कारण अशी टोकाची दु:खे इच्छा वगैरे सगळ्या विनापत्य जोडप्यात दिसत नाही, त्यामुळे त्याची कारणे जनुकीय नसावीत असा कयास) वगैरे अंगाने उत्तरे अपेक्षित आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विसुनाना जी
असा स्त्री च्या भावनांचा विचार वा तीच्या मतांची दखल घेतली गेली असे नियोग या विषयाच्या चौकटी तच बोलायचे झाले तर धर्मशास्त्रांत अजिबातच झालेला नाही असे दुर्दैवाने दिसुन येते. नियोगाची परवानगी कोंडमारा नजरेसमोर ठेवुन दिली असेल असे वाटत नाही. त्याची प्रेरणा वंश सातत्य पुत्र प्राप्ती अशी प्रथमदर्शनी तरी दिसते. अन्यथा मग स्त्री-केंद्रीत नियम- उल्लेख -कथा -रुपके काही प्रमाणात तरी आढळली असती. म्हणजे मला तरी तसे आढळले नाही ( नियोग या विषयाच्या चौकटीत ) हे नमुद करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी प्रतिक्रिया भडकाऊ का वाटावी हे कळलं नाही.

मध्यंतरी मटा मध्ये "ब्राह्मणांच्या" स्पर्म्सना मागणी अशी बातमी होती. शिवाय मागे एकदा (बहुधा सुरभी) एका दूरदर्शन वरील कार्यक्रमात हिमालयातील एका जमातीवर कार्यक्रम झाला होता. ही जमात स्वतःला शुद्ध आर्य अमजते. त्यांचे एक मायक्रोस्टेट सारखे प्रजासत्ताक पण अस्तित्वात आहे असे सांगण्यात आले होते. सर्वात गमतीशीर प्रकार म्हणजे, तिथल्या पुरुषांकडुन अपत्य मिळवण्यासाठी अनेक युरोपिअन स्त्रियांचे लोंढे त्या भागात पर्यटनासाठी जात असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एरवी मी आपल्या व्हिरिलिस्ट विचारांचा फॅन आहे, पण सवर्णांचे य जीन पुढे जावेत आणि इतर नयेत असा 'आपल्या स्वतःचा' विचार म्हणून मला ते अयोग्य वाटले.

माझे असे निरीक्षण आहे की सर्व जातींना आपापल्या जातीचा प्रचंड अभिमान असतो. उदा. आपण एका वंजार्‍याला 'ब्राह्मण वंजार्‍यांपेक्षा श्रेष्ठ आहेत' हे पटवून द्यायला गेलात तर ते अशक्य ठरावे. तीच कथा नाव्ह्यांची. इ. इ. प्रत्येक जातीला आपल्या अस्तित्वाचा जाज्वल्य अभिमान आहे. ब्राह्मणत्वाचे डोहाळे लागलेले लोक वाढत आहेत, पण ते एकूण लोकांच्या मानाने फारच अल्प.

आपल्या विधानांशी जुळती उदाहरणे सांगतो -
पुरुषांकडून अन्याय झालेल्या स्त्रीला -'पुढच्या जन्मी तुला पुरुष म्हणून जन्माला घालू'.

कोणी आपले कनिष्ठत्व, हिनत्व स्वतः मान्य करत वरच्या पदी जावे असा विचार अयोग्य नाही का? समता निर्माण करायची ही पद्धत पुर्विचार करण्याच्या पात्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हणुनच मी सवर्ण असा शब्दप्रयोग केला नाही. उच्च/निम्न या कल्पना सापेक्ष असतात. उच्च म्हणजे ब्राह्मणच असा अर्थ अभिप्रेत नव्हता. लिंगायत, मराठा पण एखाद्याला उच्चवर्णिय वाटतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> ५-बिजीन ला अगोदर तुप व तेलाने व्यवस्थित मर्दन केले पाहीजे.( जेणेकरुन कर्तव्यभावना शाबुत राहील वासना निर्माण होणार नाही हा हेतु आहे)\ <<

तेल आणि तूप हे स्निग्ध पदार्थ असल्यामुळे गुप्तांगाला त्याचं मर्दन केल्यानं (विशेषतः बिना फोरप्ले) संभोगात वंगण (ल्यूब्रिकेशन) म्हणून उपयोग होत असावा. वासना निर्माण होऊ नयेत ह्यासाठी नव्हे.

>> ५- आजच्या काळात या नियोग परंपरेचे पुन्हा एकदा पालन करणे सुरु केले तर त्याचे काय सामाजिक नैतिक परीणाम होतील? कारण आजही कृत्रीम पध्द्त आय़.व्ही.एफ़. ही खार्चीक आणि गुंतागुंतीची आहे. त्यामानाने नियोग ही फ़ारच सोपी आणि व्यवहारीक आहे. <<

आधुनिक विवाहसंस्थेचा पाया जोडीदाराशी प्रामाणिक राहण्यावर आधारित आहे. मैथुन-एकनिष्ठता हा त्या प्रामाणिकपणातला महत्त्वाचा भाग आहे. त्याला ह्यानं धक्का पोहोचतो. विवाहित स्त्री किंवा पुरुषाचे अन्य व्यक्तीशी शरीरसंबंध आले तर सध्याच्या कायद्यानुसार घटस्फोट घेण्यासाठी ते सबळ कारण असतं. म्हणजे कायद्याला विवाहबाह्य संबंध मान्य नाहीत. जर कायद्यातली ही तरतूद काढली तर लग्नसंस्थेत गुंतागुंत निर्माण होईल. विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या मुलाला सध्याच्या कायद्यानुसार आपल्या जैविक आई/बापाच्या संपत्तीत वाटा मागता येतो. जे मूल अजून जन्माला आलेलं नाही ते सज्ञान झाल्यावर ह्या वाट्याचा हक्कदार नसेल अशी कायदेशीर तरतूद त्याच्या जैविक बापाला करता येईलही कदाचित, पण मुलाला नंतर बहुधा असा दावा करता येईल की माझ्यावर ह्या प्रकारात अन्याय झाला आहे.

सबब, आधुनिक काळात ही पद्धत अव्यवहार्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आधुनिक विवाहसंस्थेचा पाया जोडीदाराशी प्रामाणिक राहण्यावर आधारित आहे. मैथुन-एकनिष्ठता हा त्या प्रामाणिकपणातला महत्त्वाचा भाग आहे. त्याला ह्यानं धक्का पोहोचतो. विवाहित स्त्री किंवा पुरुषाचे अन्य व्यक्तीशी शरीरसंबंध आले तर सध्याच्या कायद्यानुसार घटस्फोट घेण्यासाठी ते सबळ कारण असतं. म्हणजे कायद्याला विवाहबाह्य संबंध मान्य नाहीत. जर कायद्यातली ही तरतूद काढली तर लग्नसंस्थेत गुंतागुंत निर्माण होईल. विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या मुलाला सध्याच्या कायद्यानुसार आपल्या जैविक आई/बापाच्या संपत्तीत वाटा मागता येतो. जे मूल अजून जन्माला आलेलं नाही ते सज्ञान झाल्यावर ह्या वाट्याचा हक्कदार नसेल अशी कायदेशीर तरतूद त्याच्या जैविक बापाला करता येईलही कदाचित, पण मुलाला नंतर बहुधा असा दावा करता येईल की माझ्यावर ह्या प्रकारात अन्याय झाला आहे.

मार्मिक निरीक्षण आहे, पण प्रत्येकच वाक्यात काहीशी उणिव आहे. 'आधुनिक विवाहसंस्थेचा प्रामाणिकपणा' म्हणताना अप्रामाणिक त्यालाच म्हटले जाईल जे चोरुन आहे. जर नियोग समाजमान्य असेल तर त्याला अप्रामाणिक म्हणणे थोडे संभ्रमात टाकते. शिवाय इथे मैथून-एकनिष्ठता म्हणजे योनिशूचिता/लिंगशूचिता. अलिकडे लोक थोडे लिबरल झाले आहेत. विवाहापूर्वीची लफडी माफ (?) करणे, नंतरही अन्यथा माणूस ठीक असेल तर समावून घेणे हा प्रकार आहे. शिवाय एकापेक्षा जास्त बायका तर अजूनही आहेत, काही विशिष्ट संदर्भात मुस्लिमांप्रमाणे हिंदूतही कायद्याने मान्य असाव्यात. शिवाय वीर्य दुसरे घेतले म्हणजे शिक्षित लोकांना आपला खरा वंश संपला हे माहीत असते, पण तरीही ते घेतात. म्हणजे मुद्दा वंश नाही, मूल आहे. विवाहसुख न मिळणे, अपत्यसुख न मिळणे हा समाजाच्या सहानुभूतीचा मुद्दा आहे. ते मिळायची सुविधा झाल्यास कोणी विरोध न करावा अशी अपेक्षा आहे. अन्य व्यक्तिशी संबंध हे जसे घटस्फोटाचे कारण आहे तसेच अपत्य न होऊ शकणे, विवाहसुख न देणे हे ही आहेत. एका लोकमान्य मेकॅनिझम द्रारे सिमित सकारण शरीरसंबंध प्रथा म्हणून रुजले तर आश्चर्य वाटू नये.

संपत्तीतील दाव्यासाठी आताचे दत्तक मुलांचे जे नियम आहेत तेच लावले तर हरकत नसावी. जन्मलेले मूल काय आणि जन्मपूर्वीचा शुक्रांणू काय, फक्त वेळेचा फरक आहे, बाकी सगळी गोष्ट सेम आहे.

बाय द वे, आपलेच खानदान चालू राहावे यासाठी नवर्‍याचा खानदानातल्याच पुरुषासाच्या वीर्याने कृत्रिम गर्भधारणा करा असे म्हणता येते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> जर नियोग समाजमान्य असेल तर त्याला अप्रामाणिक म्हणणे थोडे संभ्रमात टाकते. <<

मुद्दा प्रचलित कायद्याचा आहे. सध्याच्या कायद्यानुसार नियोग विवाहबाह्य संबंधांत मोडतील.

>>शिवाय इथे मैथून-एकनिष्ठता म्हणजे योनिशूचिता/लिंगशूचिता. <<

नाही. पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून पत्नीला घटस्फोट मिळू शकतो. म्हणजे इथे बीजदाता विवाहित असला तर तो प्रचलित कायद्यानुसार अप्रामाणिक ठरेल. वीर्यदानात ही मर्यादा उद्भवतच नाही, कारण शरीरसंबंध येतच नाहीत. तद्वत वीर्यदान किंवा दत्तक ह्या पद्धती आजच्या काळातल्या समानतेच्या कल्पनेला अनुषंगून आहेत. नियोग नाही.

>>अलिकडे लोक थोडे लिबरल झाले आहेत. विवाहापूर्वीची लफडी माफ (?) करणे, नंतरही अन्यथा माणूस ठीक असेल तर समावून घेणे हा प्रकार आहे. <<

सांगता येणार नाही. पूर्वी सामाजिक स्थान नीच असल्याकारणानं पतीची लफडी गपचूप सहन करणं बाईला जवळपास क्रमप्राप्त होतं. आज एखादी शिकलेली कमावणारी बाई ते कितपत सहन करेल?

>>अपत्यसुख न मिळणे हा समाजाच्या सहानुभूतीचा मुद्दा आहे. ते मिळायची सुविधा झाल्यास कोणी विरोध न करावा अशी अपेक्षा आहे. अन्य व्यक्तिशी संबंध हे जसे घटस्फोटाचे कारण आहे तसेच अपत्य न होऊ शकणे, विवाहसुख न देणे हे ही आहेत. एका लोकमान्य मेकॅनिझम द्रारे सिमित सकारण शरीरसंबंध प्रथा म्हणून रुजले तर आश्चर्य वाटू नये.<<

पतीला अपत्य होऊ शकणार नाही असं सिद्ध झालं तर पत्नी घटस्फोट घेऊ शकते हे खरंच आहे. पतीच्या घरी परक्या पुरुषाची संतती वाढवण्यापेक्षा आणि त्यातून जी गुंतागुंत निर्माण होऊ शकते तिला तोंड देण्यापेक्षा घटस्फोट घेऊन आवडीच्या पुरुषाबरोबर दुसरं लग्न करण्याकडे काही स्त्रियांचा कल नक्कीच असेल. नियोगपद्धतीत स्त्रीला हे स्वातंत्र्य नाही हे जवळपास अभिप्रेत आहे. तद्वत ती कालबाह्य संकल्पना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे मर्यादीत स्त्री स्वातंत्र्य देखील काढुन घेण्य़ामागची सोशियो-इकॉनॉमिक कारण काय असावीत.? इथुन स्त्री-स्वातंत्र्याचा संकोच होत असताना का दिसतो?.

नियोगाविषयीचे नियम वाचले तर ते पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहेत हे समजून येतं. तेव्हा मर्यादित स्वातंत्र्य काढून घेणं वगैरे पटत नाही.
- स्त्री हे क्षेत्र आणि तिच्यापासून जन्मलेला क्षेत्रज हा त्या क्षेत्राच्या मालकाच्या मालकीचा पुत्र
- मालक पुत्र निर्माण करू शकत नसेल तर त्याच्या भावाला अग्रक्रम (क्षेत्रजाची मालकी कुटुंबातच रहावी)
- हे सर्व पुत्रप्राप्तीसाठी, कन्याप्राप्तीसाठी नाही
- फारच थोड्या लोकांनी विधवेचीही संमती घ्यावी असं म्हटलेलं आहे.

जी एक सर्वस्वी मानवी अशी परंपरा आहे तीला आताच्या काळात डीव्हाइन टच का दिला जातो ? या परंपरेच्या तिरस्कारातुन हे होत असावे का ?

माझ्या मते हे परंपरागत गोष्टींना डिव्हाइन टच देण्याच्या सर्वसाधारण मानसिकतेतूनच होतं. आपला इतिहास गौरवशाली होता, आपले पूर्वज गौरवशाली होते या गृहितकातून ते जे काही करत ते सगळंच 'लै भारी' म्हणण्याकडे कल दिसून येतो.

आधुनिक वीर्यदानात बीजिन या व्यक्तीची त्या स्त्रीशी पूर्णच ताटातूट केलेली आहे. हेच व्हावं अशी अनेक स्मृतींनी अपेक्षा केली आहे. त्याकाळी जर वीर्यदानाची पद्धत असती तर नियोग पद्धती निर्माणच झाली नसती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नियोगाविषयीचे नियम वाचले तर ते पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहेत हे समजून येतं. तेव्हा मर्यादित स्वातंत्र्य काढून घेणं वगैरे पटत नाही.

राजेश जी
अगोदर कलिवर्ज्य च्या अगोदर च्या धर्मग्रंथातील या प्रोव्हीजन्स बघा
एखाद्या स्त्री वर बलात्कार झालेला असेल अथवा तीचे चोरांकडुन अपहरण झालेले असेल.तर या केस मध्ये काय करावे.
१-वसिष्ठ धर्मसुत्राचा नियम- अशा स्त्री चा त्याग न करता तिच्या मासिक पाळी पर्यंत वाट बघितली पाहीजे. तोपर्यंत तीच्याकडुन काही विशीष्ट धार्मीक प्रायश्चित्ते करवुन घेतली पाहीजेत. आणि एकदा का मासिक पाळी येउन गेली की ती स्त्री पुर्वीप्रमाणेच पवित्र बनते.( यानंतर कशाची गरज नाही ती परत नॉर्मल लाइफ़ जगु शकते )
२-मत्स्यपुराण – ज्या पुरुषाने बलात्कार केलेला आहे त्याला मृत्युदंड दिला पाहीजे मात्र बलात्कारीत स्त्री चा यात कुठलाही दोष नाही. (तीचा त्याग करण्याचा प्रश्नच येत नाही)
३-पराशर - बलात्कारीत स्त्री ने प्राजपत्य हे प्रायश्चित्त बलात्कार झाल्यानंतर आलेल्या पहील्या पाळीनंतर केल्यास ती पुर्विप्रमाणे पवित्र बनते.
४-देवल- कुठलीही स्त्री जर म्लेंछा कडुन बलात्कारीत झालेली असेल आणि त्यामुळे ती प्रेग्नंट राहीली असेल तरी ही तीने जर सांन्तपनं हे प्रायश्चित्त घेतले तर ती पुर्वीप्रमाणेच पवित्र बनते.

आता कलिवर्ज्य ने वरील सर्व नियमांना बाद ठरवित एक इरेजर फ़िरवुन असे जाहीर केले की आता कलियुगात जर एखाद्या स्त्री वर बलात्कार झाला अथवा अशा इतर प्रकारांनी जर ती अपवित्र झाली तर तीला जरी तीने पुर्वीच्या शास्त्रानुसार प्रायश्चित्त घेतले तरी ही तीचा त्याग केला पाहीजे तीला सामाजिक अभिसरणास परवानगी नाही. ती आता पवित्र मानली जाणार नाही. कारण आता कलियुग आहे आणि म्हणुन पुर्वीच्या युगातील धर्मसुत्रांनी जी परवानगी दिलेली होती ती आता त्यांच्या नियमांसहीत बाद ठरत आहे. याला च काणे अशा शब्दांत मांडतात
“ This text is harsher on such innocent and unlucky women when it says that they cannot be restored to social intercourse even after undergoing expiation. “

आता मुळातच याला असा व्हॅलीड आक्षेप घेता येतो की
जरी कलिवर्ज्य पुर्व धर्मग्रंथांनी लिबरल भुमिका घेतली होती तरी ते मत्स्य्पुराणा चा अपवाद वगळता मुळात च स्त्री ला प्रायश्चित्त घ्यायला का सांगतात ? कारण बलात्कारीत स्त्री चा तर या घटनेत काहीच दोष नाही मग प्रायश्चित्त तिने घ्यावेच का ?

मात्र तरीही एक गोष्ट निश्चितच आहे की पुर्वीचे शास्त्र्कार अतिरेकी अन्याय न करता त्या स्त्री ला परत समाजात सामावुन घेण्याचा प्रयत्न तरी करतात. हे पुरेसे नाही याने स्त्री चे स्वातंत्र्य ही अधोरेखीत होत नाही मला इतकेच म्हणायचे आहे की ते मर्यादीत का होईना लिबरल भुमिका घेत होते.
मात्र जेव्हा कलिवर्ज्याचा वरवंटा फ़िरु लागतो तेव्हा जे काय थोडेफ़ार मर्यादीत लिबरल व्ह्युज होते तेही पुर्णपणे चिरडले जातात. तर इथुन स्त्री-स्वातंत्र्या चा संकोच जो सुरु झाला त्यामागे काय सोशियो-इकोनॉमीक रीझन्स होती ती एक्स्प्लोअर केली पाहीजे. कारण इथुन गंगा उलटी वाहायला सुरुवात होते असे दिसते. इथे फ़ोकस केल्यास आपले आकलन अधिक वाढु शकते असे मला म्हणावयाचे आहे इतकेच.

असाच दुसरा एक मुद्दा
कलिवर्ज्य पुर्व धर्मसुत्र पुनर्विवाह संदर्भात काय भुमिका घेते बघा
वसिष्ठ धर्मसुत्र अनुसार दोन प्रकारच्या विधवा आहेत
१-बालिका- जीचा विवाह झाला परंतु संभोग नाही झाला म्हणजे पुर्ण पेनीट्रेशन नाही झाले ( whose marriage is not consummated )
2-क्षतयोनि – नावातच स्पष्ट आहे की जीचा विवाह झाला आणि व्यवस्थित संभोग झालेला आहे ( whose marriage is consummated)
तर वसिष्ठ धर्मसुत्र वरील पैकी बालिका जी आहे तीला पुनरविवाहा ची परवानगी देते. मात्र क्षतयोनि ला पुनरविवाहाची परवानगी देत नाही.

आता याला ही व्हॅलिड आक्षेप घेता येतो की क्षतयोनि ला का नाही ? तीला पती इतर काही कारणांनी ही आवडत नसेल तर तीला हे बंधन का ? इथेही काही स्त्री-स्वातंत्र्य पुर्णपणे बहाल केले होते असे मी म्हणत नाही परत इतकेच म्हण्तो की कमीत कमी अगदी मर्यादीत का होईना बालिका जी आहे तीला परवानगी होती.
आता परत कलिवर्ज्या चा इरेजर येतो आणि तो पुर्णपणे दोन्ही ही बालिका आणि क्षतयोनि कुठल्याही विधवा स्त्रीचा पुनरविवाहा चा अधिकार संपवुन टाकतो. पुनरविवाहा वर पुर्णपणे बंदी घालण्यात येते.

तर माझ्या वाकयातला दोष मी मान्य करतो की स्त्री-स्वातंत्र्य असे मी म्हटले मी त्याएवजी मी अशा शब्दात माझा प्रश्न मांडतो की कलिवर्ज्य पुर्व धर्मशास्त्रांची स्त्री संदर्भात घेतलेली भुमिका तुलनेने अधिक लिबरल होती ती कलिवर्ज्य ने अधिक संकोचित केली तर असे होण्यामागची सोशिओ इकॉनॉमिक कारणे काय असावित ?
कारण ते स्त्री च स्वातंत्र्य होत अस म्हणता येत नाही
राजेश जी माझ्या विचारां मधील चुकीचे गृहीतक दाखवुन माझे आकलन अचुक करण्यास दिशा देण्यासाठी मनापासुन धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा मुख्य मुद्दा असा होता की स्त्रीला असलेलं स्वातंत्र्य इतकं कमी होतं की ते कमी केलं म्हणण्याला फार अर्थ राहत नाही. म्हणजे समजा एखाद्या काळी स्त्रीला पुरुषांच्या पाच टक्के स्वातंत्र्य आहे. ते नंतरच्या काळात अडीच टक्के झालं. आता असं म्हणता येतं की 'पहा पहा, पुढचा काळ किती वाईट, स्वातंत्र्य निम्मं झालं!' हे चुकीचं नाही, खोटं नाही. पण दुर्दैवाने 'कलिवर्ज्य काळात स्वातंत्र्य कमी झालं' या विधानाचा अर्थ 'त्याआधी बरंच स्वातंत्र्य होतं हो' असा चुकून काढला जाऊ शकतो. तसा काढला जाऊ नये यासाठीच मी मुळात ते किती कमी होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र तरीही एक गोष्ट निश्चितच आहे की पुर्वीचे शास्त्र्कार अतिरेकी अन्याय न करता त्या स्त्री ला परत समाजात सामावुन घेण्याचा प्रयत्न तरी करतात. हे पुरेसे नाही याने स्त्री चे स्वातंत्र्य ही अधोरेखीत होत नाही मला इतकेच म्हणायचे आहे की ते मर्यादीत का होईना लिबरल भुमिका घेत होते.

यात किंचित गोंधळाचा भाग असा आहे की त्या स्त्रीचं काय होतं याची कोणालाच कधीच पडलेली नव्हती. बलात्कारातून गरोदर राहिली नाही, तर तिला परत घेण्याची मुभा होती. (गरोदर राहिली तर काय याबद्दलचे नियम वर दिलेले नाहीत) कलिवर्ज्य काळात स्त्रीला शिक्षा नसून तिच्या मालकाला, म्हणजे नवऱ्याला शिक्षा अधिक कडक झाली. 'बाबारे, तुझ्या बायकोची (क्षेत्राची) तू काळजी घेतली नाहीस आणि तिच्यावर बलात्कार झाला, तर ती (ते क्षेत्र) तुला पूर्वीच्या स्मृतीकारांनी परत घेण्याची मुभा दिली होती ती आता तुला नाही.'

त्यामुळे 'कलिवर्ज्य पुर्व धर्मशास्त्रांची स्त्री संदर्भात घेतलेली भुमिका तुलनेने अधिक लिबरल होती ती कलिवर्ज्य ने अधिक संकोचित केली तर असे होण्यामागची सोशिओ इकॉनॉमिक कारणे काय असावित ?' यापेक्षा 'कलिवर्ज्य काळात योनिशुचितेवर भर येऊन पुरुषांवर आपल्या स्त्रीला कडक बंदोबस्तात ठेवण्याची सक्ती का झाली?' असा प्रश्न हवा. शेवटी स्त्री अधिक भरडली गेली हे मान्यच. पण प्रश्नाचा फोकस बदलतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरोदर असल्यावरसुद्धा स्त्रीला परत घेतले जाई; अर्थात अपत्याचा त्याग केल्यावर.
ऐकिव माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

राजेश जी तुम्ही जो शोध घेतांना फ़ोकस ठेवतात तो वस्तुनिष्ठ वाटत नाही. अस आहे बघा उदाहरणार्थ मला एका नदीच्या पाण्याची एकुण क्वालीटी तपासायची आहे.आता जर का मी ठरविले मी या पाण्यातील केवळ घातक घटक कोणते आहे तेच शोधुन काढतो तर या हेतु ने केलेला शोध मला केवळ एकांगी च चित्र दाखविणार या उलट जर मी या पाण्यातील केवळ चांगले घटक कोणते आहे तेच शोधुन काढतो या हेतु ने शोध केलेला शोध मला परत वरील प्रमाणेच एकांगी च चित्र दाखविणार. परंतु मी जेव्हा असा हेतु ठेवेल की या पाण्याची एकुण काय क्वालीटी आहे हे वास्तव मला शोधायचे आहे तेव्हा मात्र मला दोन्ही घटकांच जे काय प्रमाण त्या पाण्यात असेल त्याचे वास्तव कळणार. ते काहीही असु शकते पुर्ण घातक घटक असलेले अशुध्द पुर्ण चांगले घटक असलेले शुध्द अथवा मिश्र (कुठल्याही ट्क्केवारीत). पण या हेतुने केलेला शोध मला वास्तवाचे अचुक आकलन करुन देईल.आणि मग त्या वास्तवाचे काय करायचे तो तर पुढचा प्रश्न झाला तो सध्या सोडुन देउ.

आता याच प्रमाणे आपण पुरुषाला दिलेल्या स्वातंत्र्याच्या तुलनेत स्त्री ला धर्माने नेमके कीती स्वातंत्र्य दिले होते हा हेतु ठेवुन शोध घेतला तर तो वस्तुनिष्ठ होईल. आणि मग पुरुषाच्या तुलनेत २ % की ०.५ % अथवा जे काय स्वातंत्र्य दिले असेल अथवा अजिबातच दिले नसेल ते समोर येईल. पण त्याने जर समजा २ % स्वातंत्र्य दिले होते हे समोर आले तर त्याचे श्रेय Due Credit त्या शास्त्रकर्त्यांना देणे आणि जे ९८% स्वातंत्र्य दिले नाही त्याचा निषेध Due Criticism ही करता येईल. यात जे जे त्याज्य आहे त्याचा त्या त्या प्रमाणात आणि जे जे स्तुत्य आहे त्याचा त्या त्या प्रमाणात निषेध-अंगिकार करता येईल आणि ते अधिक न्याय्य असेल असे मला वाटते.यात पॉझीटीव्ह शोधुनच दाखवतो आणि निगेटीव्ह शोधुनच दाखवतो असे न होता जे काय Objective सत्य आहे त्याला सामोरा जातो हा अधिक Honest Stand आहे असे मला वाटते. आणि हा वास्तवाच्या अधिक जवळ नेईल असे वाटते.अर्थात यासाठी सत्य जे काय असेल त्याला सामोर जाण्याच Courage अर्थातच पहीली कंडीशन आहे.

कारण दोन्ही पॉझीटीव्ह आणि निगेटीव्ह हेतुने केलेला शोध हे पुढील संशोधनाचा आरंभ निष्कर्षांपासुन करणे असा होईल.जे च बहुतांशी सनातनी आणि सुधारक करत असतात. सत्यान्वेषक या भुमिके ने केलेला शोध अधिक अचुक असे वास्तवाचे आकलन करुन देईल असे मला वाटते.

आता तुमची शोधाची सुरुवात यापेक्षा 'कलिवर्ज्य काळात योनिशुचितेवर भर येऊन पुरुषांवर आपल्या स्त्रीला कडक बंदोबस्तात ठेवण्याची सक्ती का झाली?' यात शोध एकांगी च होतो असे मला वाटते.या एवजी सरळ धर्मशास्त्रांनी स्त्री ला दिलेले स्वातंत्र्य मेझर करण (पुरुषाला दिलेल्या स्वातंत्र्याच्या तुलनेत) अधिक वस्तुनिष्ठ होईल
आता हे करण्यापुर्वी जर सकृतदर्शनी बघितल तर म्हणजे प्रायमा फ़ेसी अथवा आतापर्यंतचा प्राथमिक अंदाज या अर्थाने तर स्त्री ला खरोखरच पुरुषांना दिलेल्या स्वातंत्र्या च्या तुलनेत अत्यल्प असे स्वातंत्र्य दिलेले आहे असे दिसुन येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश जी तुम्ही जो शोध घेतांना फ़ोकस ठेवतात तो वस्तुनिष्ठ वाटत नाही. अस आहे बघा उदाहरणार्थ मला एका नदीच्या पाण्याची एकुण क्वालीटी तपासायची आहे.आता जर का मी ठरविले मी या पाण्यातील केवळ घातक घटक कोणते आहे तेच शोधुन काढतो तर या हेतु ने केलेला शोध मला केवळ एकांगी च चित्र दाखविणार या उलट जर मी या पाण्यातील केवळ चांगले घटक कोणते आहे तेच शोधुन काढतो या हेतु ने शोध केलेला शोध मला परत वरील प्रमाणेच एकांगी च चित्र दाखविणार. परंतु मी जेव्हा असा हेतु ठेवेल की या पाण्याची एकुण काय क्वालीटी आहे हे वास्तव मला शोधायचे आहे तेव्हा मात्र मला दोन्ही घटकांच जे काय प्रमाण त्या पाण्यात असेल त्याचे वास्तव कळणार. ते काहीही असु शकते पुर्ण घातक घटक असलेले अशुध्द पुर्ण चांगले घटक असलेले शुध्द अथवा मिश्र (कुठल्याही ट्क्केवारीत). पण या हेतुने केलेला शोध मला वास्तवाचे अचुक आकलन करुन देईल.आणि मग त्या वास्तवाचे काय करायचे तो तर पुढचा प्रश्न झाला तो सध्या सोडुन देउ.

आता याच प्रमाणे आपण पुरुषाला दिलेल्या स्वातंत्र्याच्या तुलनेत स्त्री ला धर्माने नेमके कीती स्वातंत्र्य दिले होते हा हेतु ठेवुन शोध घेतला तर तो वस्तुनिष्ठ होईल. आणि मग पुरुषाच्या तुलनेत २ % की ०.५ % अथवा जे काय स्वातंत्र्य दिले असेल अथवा अजिबातच दिले नसेल ते समोर येईल. पण त्याने जर समजा २ % स्वातंत्र्य दिले होते हे समोर आले तर त्याचे श्रेय Due Credit त्या शास्त्रकर्त्यांना देणे आणि जे ९८% स्वातंत्र्य दिले नाही त्याचा निषेध Due Criticism ही करता येईल. यात जे जे त्याज्य आहे त्याचा त्या त्या प्रमाणात आणि जे जे स्तुत्य आहे त्याचा त्या त्या प्रमाणात निषेध-अंगिकार करता येईल आणि ते अधिक न्याय्य असेल असे मला वाटते.यात पॉझीटीव्ह शोधुनच दाखवतो आणि निगेटीव्ह शोधुनच दाखवतो असे न होता जे काय Objective सत्य आहे त्याला सामोरा जातो हा अधिक Honest Stand आहे असे मला वाटते. आणि हा वास्तवाच्या अधिक जवळ नेईल असे वाटते.अर्थात यासाठी सत्य जे काय असेल त्याला सामोर जाण्याच Courage अर्थातच पहीली कंडीशन आहे.

कारण दोन्ही पॉझीटीव्ह आणि निगेटीव्ह हेतुने केलेला शोध हे पुढील संशोधनाचा आरंभ निष्कर्षांपासुन करणे असा होईल.जे च बहुतांशी सनातनी आणि सुधारक करत असतात. सत्यान्वेषक या भुमिके ने केलेला शोध अधिक अचुक असे वास्तवाचे आकलन करुन देईल असे मला वाटते.

आता तुमची शोधाची सुरुवात यापेक्षा 'कलिवर्ज्य काळात योनिशुचितेवर भर येऊन पुरुषांवर आपल्या स्त्रीला कडक बंदोबस्तात ठेवण्याची सक्ती का झाली?' यात शोध एकांगी च होतो असे मला वाटते.या एवजी सरळ धर्मशास्त्रांनी स्त्री ला दिलेले स्वातंत्र्य मेझर करण (पुरुषाला दिलेल्या स्वातंत्र्याच्या तुलनेत) अधिक वस्तुनिष्ठ होईल
आता हे करण्यापुर्वी जर सकृतदर्शनी बघितल तर म्हणजे प्रायमा फ़ेसी अथवा आतापर्यंतचा प्राथमिक अंदाज या अर्थाने तर स्त्री ला खरोखरच पुरुषांना दिलेल्या स्वातंत्र्या च्या तुलनेत अत्यल्प असे स्वातंत्र्य दिलेले आहे असे दिसुन येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी काही चांगलं दाखवावं किंवा वाईट दाखवावं या भूमिकेतून वरचे प्रतिसाद दिलेले नाहीत. माझं म्हणणं आहे की 'स्त्रीचं स्वातंत्र्य' हा पूर्णपणे गौण मुद्दा होता. कोंडवाडा कसा असावा याचे नियम बदलल्याने गायींचं स्वातंत्र्य कसं कमी झालं याचा विचार करण्यासारखंच ते आहे. त्याचा विचार करू नये असं नाही. 'गायींना पूर्वी चाळीस स्क्वेअर फुटाची जागा मिळे, नवीन नियमांनंतर ती पस्तीस स्क्वेअर फुटावर आली' यातून पूर्वीची व्यवस्था 'गायींसाठी अधिक चांगली होती' असं म्हणताही येईल. पण कुठेतरी त्यांना मुळात किती स्वातंत्र्य होतं याचा विचार व्हायला हवा.

या दृष्टिकोनाच्या फरकापलिकडे आपण काही फारसं वेगळं म्हणत नाही आहोत असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याला आपण नविन कोंडवाडा आणि जुना कोंडवाडा म्हणत आहात तो फरक स्वातंत्र्य आणि बंधन असा आहे असं ते म्हणत आहेत. धर्मशास्त्रात स्त्रीवर मते असणे म्हणजे स्त्री धर्मशास्त्राच्या पारतंत्र्यात असणे नव्हे. तसेच असले तर आजही स्त्री घटनेच्या बंधनात आहेच. 'स्त्रीला पुत्र हवा असेल तर' आणि 'आजचे तंत्रज्ञान नसताना' जो पर्याय उपलब्ध करून दिला तो बराच लिबरल वाटतो. (पुत्रच का हा प्रश्न इथे अवांतर आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ज्याला आपण नविन कोंडवाडा आणि जुना कोंडवाडा म्हणत आहात तो फरक स्वातंत्र्य आणि बंधन असा आहे असं ते म्हणत आहेत.

असं वाटत नाही. आधीही स्त्री बंधनात होती, ती नंतर अधिक बंधनात पडली हे त्यांना मान्य असावं. आधी किंचित कमी बंधनं होती हे मान्य व्हावं असा त्यांचा मुद्दा दिसतो. तोही पूर्णता अमान्य नाही. फक्त ते रिलेटिव्ह चेंज बद्दल बोलत आहेत, आणि मी अॅब्सोल्यूट चेंजबद्दल बोलतो आहे.

धर्मशास्त्रात स्त्रीवर मते असणे म्हणजे स्त्री धर्मशास्त्राच्या पारतंत्र्यात असणे नव्हे.

धर्मशास्त्रात स्त्रीविषयी मतं असणं यात विशेष काहीच नाही. स्त्री हा विषय गाळून धर्मशास्त्र कसं लिहिणार? स्त्रीविषयक निर्णय पुरुषांनी घ्यायचे - आपल्या मालमत्तेविषयी घ्यावे तसे - ही परंपरा कायम दिसते. बदल झाले आहेत ते ते निर्णय घेण्यात किती स्वातंत्र्य पुरुषांना आहे याबाबतच.

असो. यापलिकडे मला अजून स्पष्ट करून लिहिता येईलसं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रीविषयक निर्णय पुरुषांनी घ्यायचे - आपल्या मालमत्तेविषयी घ्यावे तसे - ही परंपरा कायम दिसते.

अगदी अगदी. भारतीय राज्यघटना देखिल सगळ्या पुरुषांनीच लिहिली आहे. Wink पण त्याबद्दल कांगावा होत नाही. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

राजेश जी
मला आपण जी मांडणी केली आहे त्यात असहमती दर्शविण्यासारखे काहीच वाटत नाही. तरी मला गंमत वाटते की मग हा फ़रक का येतो. याचे एकमेव कारण मला पुरेशा कौशल्याने माझे म्हणणे मांडायला जमत नाही, शब्दांची अचुक निवड करुन अभिप्रेत असलेला अर्थ पोचवता येत नाही असे मला वाटते. तर आपल्या स्त्री स्वातंत्र्य संदर्भातील विचारांशी मी पुर्णपणे सहमत आहे असे मी खात्रीपुर्वक म्हणतो.मला वाटत आपली अनुभुती एकच आहे फ़रक अभिव्यक्ती त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्मृतींमधील उद्धरणे माहितीपूर्ण आहेत.

"एक चादर मैली सी" चित्रपट आठवला. कुठल्याशा समाजात विधवेने दिराशी लग्न करायची पद्धत आहे. त्यातील अशा लग्नाची कथा आहे.

आण्खी एक "ज्ञात-रेतक" गर्भधारणेची पद्धत काही समलिंगी जोडप्यांत दिसते. दोन-स्त्रियांचे जोडपे असेल, तर स्त्रीच्या गर्भाशयात स्त्रीच्या भावाचे शुक्र वापरून गर्भधारणा करता येते. अशा परिस्थितीत स्त्रीला आपल्या जोडीदारिणीशी जनुकीय संबंध असलेली गर्भधारणा हवी असेल, पण शरीरसंबंध नको असेल.
अथवा दोन पुरुषांच्या जोडीत पुरुषच्या बहिणीच्या गर्भाशयात पुरुषच्या शुक्रापासून राहिलेला गर्भ, त्यातून जन्मलेले मूल दोघे पुरुष दत्तक घेऊ शकतात.

गर्भात सुरनळीने रेतचिंचन करणे फारसे कठिण नसते. त्यामुळे जुन्या पद्धतीच्या नियोग-शरीरसंबंधाचे भावनिक घोटाळे टाळण्याकरिता नळीने रेतसिंचन करणे म्हणजे काही फार महागाचे नव्हे.

आणि अर्थातच अविवाहित स्त्रीला जर मूल हवे असेल, विवाहितांपैकी पुरुषाला भाऊ नसेल, वगैरे, तर अज्ञात-पुरुषचे रेत उपलब्ध करणार्‍या सेवा सोयीच्या असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात म्हटल्याप्रमाणे उत्तरेत काही ठिकाणी चादर ओढण्याची जी प्रथा आहे, जी नष्ट होत चालली आहे. किंवा आता बोलून दाखवत नसावेत. विधवा स्त्री चं लग्न दीराबरोबर लावून देणे याला चादर ओढणे म्हणतात. हा काही नियोग संततीचा भाग म्हणता येणार नाही. तिला मूल होवो अथवा न होवो, तिचं आयुष्य सावरणे आणि गावच्या वाईट नजरांपासून तिचं संरक्षण करणे असे व्यवहार्य हेतू त्यात दिसतात. मूल होण्याशी त्याचा प्राथमिक संबंध नसावा असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

आता विसंगती अशी आहे की आपल्या संस्कृती त तर या साध्या निरुपद्रवि वीर्यदान पेक्षा ही अधिक प्रभावी व व्यावहारीक अशी नियोगा ची विलक्षण परंपरा होती. व तिला मुख्य म्हणजे धर्म व जन मान्यता ही होती. तिचा वापर होत होता त्या संदर्भात धर्मशास्त्रांनी व्यवस्थित नियम ही घालुन दिलेले होते. तर असा जो समाज एके काळी नियोगा चा सरळ स्वच्छ अवलंब करीत होता जो नंतरच्या काळात अनेक कारणांनी बंद होत गेला. >>>

विविध सूत्रे आणि स्मृतींमधे उल्लेख आलेला आहे म्हणून ही पद्धत जनमान्य होती हे कशाच्या आधारावर समजायचं ? राजघराण्यात धर्मशास्त्राचा हवाला देऊन काही कानगोष्टी सांगितल्या जात असतील. राजघराण्यातल्या ज्येष्ठांना गादीच्या वारसाची चिंता सतावत असताना राजगुरू त्यांना याच स्मृतींचा हवाला देऊन अशा पद्धतीने धर्मसंमत वारस देऊ शकतो अशा गुप्त गोष्टी सांगत असावेत. त्यानंतर पुढचे कार्य बिनबोभाट पार पाडून मग त्याला साधूने फळ दिलं वगैरे मुलामा दिला जात असावा. त्या वेळीही जनतेच्या लक्षात येत असावं, पण मोठ्या लोकांच्या भानगडीत तेव्हांही कुणी पडत नसावं. मला हे असं असावं असं वाटतं. हा माझा तर्क आहे, ज्याला फळ देऊन मुलं झाली वगैरे कथांचा आधार आहे.

दुसरा तर्क असा कि जर नियोग संतती समाज मान्य असती तर लैंगिक विचारांबाबत समाज फारच पुढारलेला होता म्हणायचा. मग रामासारख्या राजाला एका न्हाव्याचं ऐकून आपल्या पत्नीला वनवासात सोडण्याची पाळी का यावी ? तसंच तिला अग्नीपरीक्षा करायला का लागली असावी ? दोन्ही वेळा लोक काय म्हणतील याचा विचार एका मर्यादा पुरुषोत्तमाला करावा लागलेला आहे, इतरांची काय कथा ? यावरून लैंगिक विचारांबाबत समाज बुरसटलेलाच असावा आणि स्त्री ला स्वातंत्र्य वगैरे नसावं असं दिसतं. थोडक्यात राज्यघटनेत हुंडाविरोधी कायद्याची प्रोव्हिजन आहे, पण प्रत्यक्षात काय चालतं ते चालतच आलेलं आहे. घटनेत काय तरतूद आहे हे जसं कायदेपंडीत आज सांगतात तसं तेव्हां धर्मपंडीत प्रभावी व्यक्तींना पळवाट सांगत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

आजच्या काळात तर नियोग संततीचं काहीच काम उरलेलं दिसत नाही. नियोग संतती आणि वीर्यदान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नियोग संतती मधे विवाहीत स्त्रीला परपुरुषाशी रत होऊन त्यातून पुत्र होणे हा कळीचा मुद्दा आहे. आजच्या मॉडर्न जमान्यात त्याची गरज पडणारच नाही. कितीही प्रगत झाला तरी कुठला पुरूष स्त्रीला परपुरूषाबरोबर रत व्हायला परवानगी देईल ?

त्या काळी पुरूषास मूल होईल कि नाही हे तपासण्याची सोय नसल्याने ते दोन तीन बायका केल्यानंतरच लक्षात येत असावं. त्यानंतरही मूल झालं नाही तर लोकलज्जेतस्तव / खानदान कि इज्जत म्हणून / वारस म्हणून रक्ताचं मूल दत्तक घेणे किंवा वरीलप्रमाने साधूचं फळ वगैरे प्रकार केले गेले असावेत. अर्थात बरेच ठिकाणी भावाच्या मुलाला गादीवर बसवले गेलेलेही दिसते. कनिष्ठ समाजात ही प्रथा नसावी.

आताच्या काळात मात्र पुरूषामधे दोष आहे किंवा नाही हे कळतं आणि त्यावर उपचारही आहेत. तसंच मूल होण्याचे आधुनिक उपचार आहेत. कित्येक वेळेला स्त्री पुरुष दोघेही व्यवस्थित असूनही मूल होत नाही, त्यामागे धकाधकीचे जीवन, ताणतणाव, भेसळ, व्यायामाचा अभाव अशी अनेक कारणं असतील. मुद्दा हा आहे कि अशा वेळी अत्याधुनिक तंत्र मदतीला येतं. पुरूषामधे मोठाच दोष असेल त्या वेळीच वेगळा विचार करावा लागतो. आपल्यामधे दोष असतानाही स्त्रीला मूल होऊ न देणे यासाठी मेंदू तसाच कद्रू असायला हवा. शक्यतो, अशा पुरुषांमधे अपराधिक भावना असते, जी स्वाभाविक म्हणायला हवी. लग्न म्हणजे फक्त शारीरीक सुख असं आपल्याकडे आजही मानलं जात नसल्याने मूल होत नाही म्हणून लगेच घटस्फोट घेतला जात नाही. भावनिक गुंतागुंत, बदनामी अशी अनेक कारणं असतात. परदेशात अशा कारणांपायी घटस्फोट होतात असं वाचनात येत असतं. अशा जोडप्यांसाठी डोनरचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचं प्रमाण किती आहे हे काही कळालं नाही. .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....