वेळात वेळ काढून ...
महाभारतातील अभिमन्यु आठवतो...
त्या द्विशतकी धाग्यात भाग घेणार्यांच्या विषयी मी गोळा केलेली 'विदा'१ - हुश्श. मलाहि हा नवपरिचित शब्द वापरण्याची संधि अखेर मिळालीच! - मला कौरवांनी चारी बाजूंनी वेढलेल्या आणि एकाकी लढणार्या महाभारतातल्या अभिमन्यूची आठवण करून देते.
त्या द्विशतकी धाग्यात आलेले प्रतिसाद-प्रतिप्रतिसाद-प्रतिप्रतिप्रतिसाद-प्रतिप्रतिप्रतिप्रतिसाद असे आहेत:
अरुणजोशी - ८९, मेभु - ५२, मन - ४१, बॅटमन - २६, चिंज - १६, निथ - १६, ऋषिकेश - १५, राघा - १५, नबा - १०.
इतके कौरव चक्रव्यूहात सापडलेल्या एकटया अभिमन्यूवर शस्त्रप्रहार करीत आहेत आणि तोहि तितक्याच तडफेने त्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तरे देत आहे असे चित्र मला दिसले.
१. ही नावे किती वेळा दिसली ह्याची ही गणती आहे.
रूपक
इतके कौरव चक्रव्यूहात सापडलेल्या एकटया अभिमन्यूवर शस्त्रप्रहार करीत आहेत आणि तोहि तितक्याच तडफेने त्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तरे देत आहे असे चित्र मला दिसले.
वारांची (प्रतिसादांची) आकडेवारी पाहता अभिमन्यूपेक्षा ओबेलिक्सचे रूपक अधिक उचित वाटते. (बोले तो, एकटा ओबेलिक्स आख्ख्या रोमन सेनेस ठोकून काढतो नि जेरीस आणतो, तद्वत.)
(बाकी, आमची आकडेवारी सगळ्यात कमी पाहून स्वतःसच 'हात् साला!' म्हणावे, की 'एक ही मारा, लेकिन क्या मारा!'च्या ष्टायलीत स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी, याबद्दल दुग्ध्यात आहोत. त्यामुळे, 'आफ्टर ऑल, नंबर्स डोण्ट म्याटर, वन वे ऑर दि अदर' असे म्हणून प्रकरण सोडून देत आहोत.)
गंमत म्हणजे, एवढे सगळे करून झाल्यावरसुद्धा मला 'सभ्यता' नि 'सम्यकता' म्हणजे नेमके काय, याची पुसटशीही कल्पना नाही. (म्हणजे, 'सभ्यता' म्हणजे काय, ते निदान ऐकून का होईना, पण माहीत आहे, परंतु श्री. अरुणजोशी यांना नेमका तोच अर्थ अभिप्रेत असेल, याबद्दल साशंक आहे. 'सम्यकता' म्हणजे काय, ते माहीतही नाही, आणि ऑनेस्टली, [मराठीतच सांगायचे तर] आय डू नॉट केअर.)
विषय गंभीर तरी भाऊ खंबीर.
आली लहर केला कहर,
आला प्रश्न, केला धागा काढून जश्न!!
चर्चा तर होणारच!!!! तुंबू देत ब्यांड विड्थ....
संकेत स्थळांचा एकच धावा, अरुण भौ आम्हाला हवा!!!.
जल्लोष झालाय जोरात कारण धागा काढलाय तोऱ्यात!!!
बघताय काय रागानं? प्रतिसाद टाकलाय वाघानं!!! वाचकांचा दावा आहे अरुण भौ छावा आहे :) .
शुभेच्छुक
गविकाका (विमानवाले)
मन्दार (धु.भा. स्पेशालिस्ट)
जोजोकाकू (पीयचडी)
मनोबा (घरगुती प्रश्न स्पेशालिस्ट)
पृथ्वी गोल आहे कारण भाऊचा
पृथ्वी गोल आहे कारण भाऊचा विषय खोल आहे.
बाकी शुभेच्छुक नावे स्लैटलि मॉडिफाइडः
गविकाका(विमानवाले घुबडपालक)
अदितीतै (म्हैला ब्रिगेड सौंस्थापक आदारस्तंब)
मनोबा ("व्हाय सो क्षयझ" स्पेषलिस्ट)
नवी बाजू (तळटीपसम्राट)
राजेशभौ घासकडवी (विद्रटसेनाप्रमुख)
मेघनाक्का भुस्कुटे (म्हैला ब्रिगेडची मुलूखमैदान)
ऋषिकेश (सौंसदप्रेमी)
अस्मि(कायदोत्सुक)
नितीन थत्ते ऊर्फ थत्तेचाचा (काँग्रेसप्रेमी आणि निधर्मांध ;) )
नाईल ऊर्फ निळे (ब्यान होणार रोजचं, सौंस्थळ आहे घरचं)
नंदनशेठ (कोटीपाडक प्रेरणास्थान)
रमताराम (गुर्जी _/\_)
सगळ्यांनी ह. घेणे.
लोकांची वर्णनं एक लंबर आहेत.
लोकांची वर्णनं एक लंबर आहेत. "(ब्यान होणार रोजचं, सौंस्थळ आहे घरचं)" हे खासच आवडलं.
ही अजून काही:
रुची (पाववाली बाई)
अरविंद कोल्हटकर (विदाजमवोत्सुक)
चिंतातुर जंतू (उचकपाचकसम्राट)
बॅटमॅन (उपेक्षितांचे उभरते लीडर)
अमुक (नूतन उच्चभ्रू)
चंद्रशेखर (बातमीप्रसारक)
अरुण जोशी (प्रश्नविचारू)
(आता वाटतंय, अरुणजोशींच्या फ्लेक्सवर त्यांनाच शुभेच्छुक बनवायला पाहिजे होतं.)
बेसिकमध्ये वांदे
फ्लेक्स ही बहुजातविधा आहे असं गुर्जी लिहू लिहू दमले आणि तुम्हाला काही इथे, फ्लेक्सबद्दल बोलताना संस्कृतप्रचुर शब्दांचा नाद सोडवेना.
'बहुजातविधा' हा कानडी शब्द आहे काय? काय की, आम्हांस कानडी कळेना, म्हणून विचारले.
बहुजनांचा नारा आहे, बॅटमॅन ट्रेटर आहे.
यमक जुळले नाही. बोले तो, बेसिकमध्येच गोची. फिरून एकवार प्रयत्न करून पहा.
भौजन साहित्याचा अभ्यास कमी
भौजन साहित्याचा अभ्यास कमी पडतो आहे. तुम्हा हुच्चभ्रू लोकांचं नवकाव्य सोडलं तर भौजनकाव्य यमकावरच तगतं. उदा. ढगाला लागली कळ, पोलीस टाईम्स मधील बातम्यांचे मथळे (पाटलाची सून त्याच्या मनात भरली, त्याने तिला वाटेतच धरली इ.इ. फेम), इचिभनाछाप किशोरवा"ड्म"य, इ.इ. जे पायजे ते पहा. यमक सगळीकडे आहे!
अहो बोलूनचालून हुच्चभ्रूपणा
अहो बोलूनचालून हुच्चभ्रूपणा करणार्यांकडून संस्कृतची अपेक्षा ठेवणार नैतर काय व्रचदा प्राक्रुतची =))
असो, बाकी निर्यमकी काव्याचा इंपॅक्ट एकदमच फुस्स्स झाला आहे. कमीतकमी "भौजणांनी लावले किटाळ- बॅटमॅनच सूर्याजी पिसाळ" किंवा "भौजनांचा दावा फार आहे, बॅटमॅन साला गद्दार आहे" तरी चाललं असतं. पण या काव्याने पार म्हञ्जे पारच अपेक्षाभंग केला आहे. म्हैला ब्रिगेड सौन्स्थापकाकडून अशी अपेक्शा न्हौती.
प्रमुख
सम्यक नॅशनल कॉंग्रेस, भारतीय सम्यक पक्ष, साम्यक्यसेना, सम्यकवादी काँग्रेस, राष्ट्रीय सम्यकसेवक संघ, राष्ट्रीय सम्यक दल, आम सम्यक पार्टी, महादेश नवसम्यक सेना, भारतीय सम्यकन पक्ष, सम्यक पँथर, इंडिया अगेंस्ट असम्यकता, ऐसी सम्यकता, मीसम्यक, सम्यकवडा, सम्यकरी संघटना, सम्यक संप्रदाय, सम्यक लीग, ए आय डी एम सम्यक, सम्यक मोदी, राहुल सम्यक, सास भी कभी सम्यक थी, राष्ट्रपिता स. गांधी, सम्यकॉसिस, सम्यक कंसंल्टंन्सी सर्विसेस, सम्यक कॉर्पोरेशन ऑफ इंडीया,...
किती म्हणून आघाड्यांचं प्रमुखपद सांभाळू?
इब्लिस
एका इस्लामिक दंतकथेनुसार इब्लिस हा अनेक जिन्न पैकीच एक होता. (अल्लाउद्दीनच्या "चिराग"मधून दिव्यातून घासल्यावर बाहेर येतो तो एक जिन्न आहे. असे अनेक जिन्न असतात; जिन्न ही मनुष्ययोनी प्रमाणे एक योनी/जन्मावस्था आहे असं ते मानतात.) तर सांगायचं म्हणजे इब्लिस हा अनेक जिन्न पैकी एक.
परमेश्वरानं मानव निर्माण केला तेव्हा परमेश्वराचय एका श्रेष्ठ निर्मितीला; त्या प्रथम मानव आदमला सर्व जिन्न लोकांनी मानवंदना द्यावी अशी आज्ञा केली.
इतर सर्वांनी हे पाळलं. पण एकच जण विरोधात गेला. तो म्हणजे "इब्लिस". मी काही मानवंदना वगैरे देणार नाही हे त्यानं खुद्द परमेश्वरास सांगितलं.
आणि तत्काळ परमेश्वरानं त्यास स्वर्गातून्,जन्नत मधून अधःपतित होण्याचा शाप दिला.
त्यावर हा हबकला नाहीच. उलट इथून पुढं ज्याच्यामुळं ही आपत्ती ओढवली त्या मानवाला - आदमला आणि त्याच्या सर्व पुत्रांना कान भरून गैरमार्गाला लावीन, बहकावत राहीन. अशी त्यानं प्रतिज्ञा केली.
आख्खे जग विरुद्ध असले तरी तो ती प्रतिज्ञा कसोशीनं पाळतोय.
इस्लामिक शास्त्राप्रमाणे हा देवाविरुद्धच्या औद्धत्याचा नमुना . "शरण न येणारे ते वाईट, दुष्ट" हे सांगण्याचा दाखला आहे. "देवाला शरण येणं" हे पुन्हा पुन्हा आवश्यक म्हणून सांगितलय.
इब्लिस हाच सैतान होय.
पण मला ह्या इब्लिसच्या दांडगाईचं जबरदस्त कौतुक आहे.
गट्स पाहिजे तिच्यायला आख्ख्या दुनियेशी भांडण घ्यायला.
अरुण जोशी हे ऐसीइब्लिस आहेत.
थोडी अधिक म्हायती.
उलट इथून पुढं ज्याच्यामुळं ही आपत्ती ओढवली त्या मानवाला - आदमला आणि त्याच्या सर्व पुत्रांना कान भरून गैरमार्गाला लावीन, बहकावत राहीन. अशी त्यानं प्रतिज्ञा केली.
अहो, बहकवणे, कान भरून गैरमार्गाला लावणे म्हणून शंख करणार्या मुल्लांनी लपवलेल्या गैरमार्गांची खरी ष्टोरी अशी आहे:
हा इब्लिस तोच ज्याने सर्परूपाने इव्हला ज्ञानवृक्षाचे सफरचंद खाऊ घातले.
अॅडम अन इव्हमधे प्रेम फुलवले.
अन त्यामुळे अवघ्या मानववंशाची पायाभरणी झाली.
त्यामुळे एकप्रकारे, हा कामदेवच म्हणावा, नव्हे का? ;)
आता हे (सफरचंद खाण्याचं काम) वरिजिनल पाप असल्याने, कान भरून गैरमार्ग वगैरे आलंच ओघानं.. पण आयड्या कशी भारी काढली बघा. आदम अन हव्वा दोघांना हाकलून दिलं देवानं. याला म्हंतात, 'हम तो डूबेंगे सनम, तुमको भी लेकर डूबेंगे' :D
(इब्लिस) आडकित्ता
वरिजिनल पाप
वरिजिनल पाप ही संकल्पना इस्लाममध्ये नाही.
ज्यू - ख्रिश्चन ह्यांच्यात अॅडम - इव्ह ह्यांनी समागम वगैरे पाप वगैरे केल्याचे मानतात.
इस्लाम मध्ये आदम- हव्वा ह्यांनी पाप केले असे मानत नाहित.
आदम हा तर पहिला प्रेषित होता असे मानतात.
अर्थात माझी माहिती १००% ऐकिव आहे; लिखित स्रोत कुणी देउ शकेल तर बरे.
भारिच
भारिच.
कं लिवलय कं लिवलय....
लैच भारि