फ्लेक्स - एक उदयोन्मुख सशक्त बहुजातविधा (भाग १)

(सर्वप्रथम, वाचकांनी नोंद घ्यावी की वरील लेख भाग १ म्हणून लिहिलेला आहे, पण याचा अर्थ असा नाही की भाग २ येईलच. कारण तत्वतः एकच भाग असलेली लेखमालादेखील असू शकते.)

आजचा आपला आसमंत कसा आहे, तर तो गदारोळाचा आहे असं ऐसीअक्षरेच्या संपादकांनीच कुठेशीक लिहून ठेवले आहेे. त्या वाक्यानंतर लेखात मध्ये बरेच काहीसं अगम्य (कोण रे तो म्हणतोय 'आता लक्षात आलं गदारोळ म्हणजे काय ते'? त्यांना अरुणजोशींचे प्रतिसाद वाचायला द्या पाहू.) लिहून झाल्यावर ते म्हणतात, की या गदारोळावर तुमच्यासाठी उत्तर तुम्ही शोधायचे आहे. आणि त्यात जे काय सापडेल...

तो तुम्ही शोधलेला खजिना असेल, म्हणून तो तुमच्यासाठी खरा असेल. असा तुमचा खजिना तुम्हांला सापडो ही 'ऐसी अक्षरे'तर्फे सदिच्छा.

ऐसीच्या दिवाळी अंकाबद्दल माहित नाही, पण गेले काही दिवस ऐसीवर आम्हाला गदारोळच आढळून आला. त्यामुळे आम्ही आमचे लक्ष इतस्तत: वळवले असता अल्लाउद्दीनच्या गुहेप्रमाणे मोठ्ठा खजिना सापडला. ('न'वी बाजू यांना - अहो, आम्हांस माहित आहे, की ती गुहा अलिबाबाची होती आणि अल्लाउद्दीनकडे जादूचा दिवा होता. मात्र तुमचे हात कळफलकाकडे जाण्यास उद्युक्त करणे एवढाच हेतू होता. तो सफळ झाला. इतरही कोणाचे जर हात शिवशिवले असतील तर तुमच्यातही एक 'न'वा अंश आहे हे लक्षात घ्या) आणि त्यास खजिना म्हणण्याचे कारण असे की ते एक मौल्यवान रत्न किंवा एखाददुसरा दागिना नसून ते एक महाप्रचंड भांडार आहे. म्हणून त्यास विधा (पक्षी: विधा उर्फ genre) असे म्हणणे आम्ही पसंद करतो. तर आम्हांस अशी एक उदयोन्मुख विधा सापडली आहे, ती म्हणजे फ्लेक्स. होय होय फ्लेक्स.

कितीही टाळले तरी दररोज जागोजाग दृष्टोत्पत्तीस पडणाऱ्या या अमंगळ, बटबटीत चित्र-शब्दतुकड्यांना कोणी कलाप्रकार म्हणू धजतो हे पाहून कलासमीक्षकांच्या झुंडीच्या झुंडी आमच्यावर तुटून पडतील याची आम्हांस खात्री आहे. (त्यातले किमान निम्मे तरी 'आपल्याला हा साक्षात्कार आधी का झाला नाही!' असा जळफळाट करणारे असतील याचीही आम्हांस तितकीच खात्री आहे.) पण आम्हांस असे क्रांतीकारी विचार करण्याची व त्यापायी तमाम उच्चभ्रूंचा विरोध पत्करण्याची सवय आहे. (कारण हे लोक भुवया डब्बल उंच करून नाक उडवण्यापलिकडे काही करत नाहीत. खळ्ळ फट्याक वगैरे तर नाहीच नाही.) हेलनचे नृत्य पाहूनही आम्हाला अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांची एक नव्हे दोन अनावरणे करण्याची इच्छा होते. पण अशा प्रकारे वरवर बाजारू वाटणाऱ्या कलाकृतींमध्ये किती गहन अर्थ दडलेला असतो हे सांगायला गेले की उच्चभ्रू कलासमीक्षक खवळतात. (तीच दोन कारणे, एक म्हणजे आपल्या सवत्यासुभ्यावर कोणीतरी सांगितलेला अधिकार आवडत नाही, आणि दुसरे म्हणजे 'आपल्याला हा साक्षात्कार आधी का झाला नाही!' असा जळफळाट) असो.

एका विशिष्ट फ्लेक्सवर (फ्लेक्सचे एकवचन फ्लेक होत नाही.) नजर केंद्रित करण्याऐवजी या लेखात एका नवीन विधेची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे हे सांगितलेच आहे. फ्लेक्सची सोपी व्याख्या म्हणजे एका कोणाचे तरी कशाबद्दलतरी अभिनंदन करणारा किंवा त्यांना वावा म्हणणारा भर चौकात लावलेला रंगीबेरंगी बोर्ड. कालांतराने व्याख्येतल्या 'भर चौकात' ची अट थोडी ढिली होत गेली - एक म्हणजे फ्लेक्स वाढले तसे चौक कमी पडायला लागले. चौक संपल्यावर लोकांनी वेगवेगळ्या भिंती व्यापल्या. आणि खऱ्या दगडमातीच्या भिंती संपल्या तशा फेसबुकावरच्या भिंतींवर त्यांनी जागा घेतली. झकरबर्गच्या कृपेने अजून तरी ती जागा कमी पडलेली नाही. फ्लेक्सची व्यवच्छेदक लक्षणं उकलून सांगायची झाली तर,

- अभिनंदनीय व्यक्तीचा मोठासा फोटो आणि अभिनंदकांच्या फोटोंची वा नावांची मोठी गर्दी असते.
- अगदी थोडक्यात पण भारदस्त शब्दांत अभिनंदनीय व्यक्तीचे कशाबद्दल अभिनंदन केलेले आहे याचे वर्णन असते.
- त्याच्या आसपास उत्तेजनार्थ टिप्पणी असतात, यांसाठी बऱ्याच वेळा स्वतंत्र चित्रे वापरली जातात.

फ्लेक्स या कलाविष्काराची मुळे अनेकविध परिसरांत पसरलेली आहेत. त्यात प्रथम जाणवते ती म्हणजे दृश्य आणि दृश्येतर कला यांची सांगड (अमुक यांनी दिलेल्या या विषयावर 'फ्लेक्स चालतील' असे स्पष्ट लिहिले असते तर त्यांना खचितच अधिक प्रतिसाद मिळाला असता. पण ते एक असो.) चित्रे, छायाचित्रे, आधुनिक कारटुने, शब्द, काव्य आणि राजकीय घोषणा यांच्या संगमातून हा आविष्कार घडतो. यामध्ये येणाऱ्या संदेशांना व त्यांच्या व्युत्पत्तीला राजकीय, सामाजिक, भाषिक आणि वैद्यकीय पदर आहेत. (एखादी कला शहाण्णवकुळी आहे हे सिद्ध करायचे असेल तर असे पदर तपासणे महत्त्वाचे असते.) हे पदर प्राप्त होतात ते वेगवेगळ्या संदर्भात झालेल्या घोषणांमधून 'देवीचा रोगी कळवा, हजार रुपये मिळवा', 'पाणी गाळा नारू टाळा','गप्पी मासे पाळा हिवताप टाळा' 'ताई माई अक्का, विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का' यासारख्या अनेक घोषणांनी सत्तर ते शून्यची दशके दुमदुमून गेली होती. या त्रोटक पण अत्यंत परिणामकारक लघुघोषणा सामाजिक मानसात घुमल्या, रुजल्या, फोफावल्या. त्यांपासून तयार झालेल्या नवीन बीजांचीच जणू उधळण होऊन सर्व फ्लेक्सवर, एखाद्या दुर्लक्षित लॉनमध्ये जागोजाग तण उगवावेत त्याप्रमाणे वाक्यं उगवलेली दिसतात. 'पुढं हो मर्दा, हाण जर्दा' किंवा 'बघतोस काय रागानं, कॅमेरा घेतलाय वाघानं' अशा वाक्यांतून या सर्वाची गंगोत्री कुठे आहे हेे लक्षात येतं.

फ्लेक्सचे दुसरे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यात वापरलेली अस्सल भारतीय रंगसंगती. खरेतर रंगसंगती हा शब्द फारच सपक झाला, त्यासाठी पॅलेट हाच शब्द समीक्षकमान्य आहे. तर या पॅलेटमधून पिवळा, झगझगीत निळा, लाल, केशरी, निऑन जांभळा, निऑन हिरवा अशा रंगांची त्यांत मुक्तहस्ताने उधळण केलेली दिसून येते. रांगोळ्यांच्या रंगांचे ढिगारे एकाशेजारी एक मांडून ठेवल्यावर अस्सल भारतीय नजरेला जो एक अस्सल भारतीय अनुभव येतो त्याचे तादात्मीकरण फ्लेक्स बोर्डांवर दिसून येते.

तिसरे लक्षण (दरवेळी व्यवच्छेदक, व्यवच्छेदक कुठे म्हणत राहायचं?) म्हणजे शहरी भाषेपासून फारकत घेऊन वापरलेली गावरान रांगडी भाषा. पन्नास वर्षांपूर्वी साडेतीन टक्क्यांचे राज्य असल्याने जो तुपकट लोणकढी वास येत होता तो जाऊन त्याऐवजी बोलाईच्या मटणाचा, खमंग रश्श्याचा तिखटजाळ झणका नाकात भरतो. भाषाच नव्हे, तर त्यामागची भावना ही रासवट आहे. स्वतःला वाघ, बेरड, मर्द म्हणणारी आहे. कट्यार काळजात घुसली या नाटकात खान साहेब राजगायकाच्या वाड्यात राहायला आल्यावर 'मवाळ हळवे सूर जाऊद्यात, आज येथूनि दूर' असे म्हणतात. नेमके असेच विधान बहुजनसमाज आज फ्लेक्स या कलाप्रकाराद्वारे करत आहे.

श्री. शं. का. मोत्यावाणी यांनी या विषयावर अधिकारवाणीने लिहिलेेले आहे. ते अर्थातच सर्वच विषयांवर प्रचंड अधिकारवाणीने लिहितात. मग तो आइन्स्टाइचा सापेक्षतावाद असो ('सापेक्ष याचा खरा अर्थ म्हणजे व्यक्तिनिरपेक्ष परिप्रेक्ष्य') की कांटचं तत्त्वज्ञान असो ('कांटची भूमिका इतकी नकारात्मक का होती हे त्याच्या नावावरूनच समजून घेता येते'). ते म्हणतात की 'फ्लेक्स कलाप्रकाराची मुळे राजकारणाच्या आणि आत्मप्रसिद्धीच्या चिखलात बरबटलेली आहेत. सत्तर-ऐशीच्या दशकात मोठ्या नेत्यांतेच पन्नास साठ फुटी कटाउट्स असत... उदारीकरणाची सूज चढल्यानंतर प्रत्येकालाच प्रसिद्धीची हाव चढली. रस्तोरस्ती फ्लेक्स बोकाळले. या लोकप्रियतेचं लोकशाहीकरण असे म्हणता येईल खरे, पण अभिजात कलाप्रकारांना कवटाळून राहणारे स्वयंघोषित उच्चभ्रू याला सवंगीकरण म्हणून नाके मुरडणे अधिक पसंत करतात.'

मोत्यावाणींचे इतर विचार पटत नसले तरी हे म्हणणे मान्य करावे लागते. (आमचा पाठिंबा मिळतो आहे हे वाचून कदाचित तेच आपले मत बदलतील की काय अशी भीती वाटते.) कुठचाही कलाप्रकार एखाद्या देवीला वाहिलेल्या यल्लम्मेसारखा असतो. तिचा जन्म अपघाताने होतो, पण त्यामागे आसक्ती नसते असे म्हणता येत नाही. तिची वाढ अशीच कशीतरी होते, कोणातरी वैयक्तिक हौसेपोटी. वयात आल्यावर तिला राजाश्रय मिळतो. आणि मग काही काळाने तिला पुरेसा जनाश्रय मिळाला की राजाश्रयाची गरज सुटते. मग जनतेच्या प्रेमामुळे कलेसाठी कला म्हणून सुखाने नांदते. फेसबुकाच्या आणि आंतरजालाच्या कृपेने फ्लेक्स हा कलाप्रकार राजाश्रय सोडून जनतेच्या प्रबळ अनुनयावर खंबीरपणे उभा राहिला आहे. आज ना उद्या उच्चभ्रू कलासमीक्षेला या बहुजातविधेची दखल घ्यावीच लागेल.

(क्रमशः? अं... कदाचित.)

field_vote: 
4.714285
Your rating: None Average: 4.7 (7 votes)

प्रतिक्रिया

'फ्लेक्स कलाप्रकाराची मुळे राजकारणाच्या आणि आत्मप्रसिद्धीच्या चिखलात बरबटलेली आहेत. ...... स्वयंघोषित उच्चभ्रू याला सवंगीकरण म्हणून नाके मुरडणे अधिक पसंत करतात.'

या तामसी कलाविष्काराचा उत्तम आढावा घेणारा लेख Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin छान आढावा.
कंसात केलेल्या टिपण्या पण खासच _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे ओशाळल्या संज्ञा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्लेक्सकलेचा आढावा घेणार्‍या लेखाचा ले-आऊट व फिनिशिंग आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते काही म्हना पण पुर्वीच्या चुन्याच्या फक्कीवर लिहिलेली विटकरी रंगाची अक्षरे जी हृदयावर कोरली आहेत त्याची मजा या फ्लेक्समदी नाय! नवसाक्षरांसाठी तो ग्रुहपाठ होता तसेच रोजगार ही. एका उमेदवाराची खूण झोळी होती. विटकरी रंगात रंगवणार्‍या कलाकाराचा झोळी शब्द लिहिताना इ व झ मधे इतका गोंधळ झाला होता कि त्याने उरलेले सगळे मतदारांवर सोपवून दिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

फ्लेक्स - एक उदयोन्मुख सशक्त बहुजातविधा याला आमी 'फ्लेक्सविधा' असा प्रतिशब्द सुचवतो. त्या जैविक विविधतेला नाही का जिविधा शब्द दिल्या गेल्या आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

म्हणजे एक भारदस्त दणदणीत वाक्यप्रयोग सोडून सुटसुटीत शब्द वापरायचे? अहो, उच्चभ्रू समीक्षक आधीच आमच्यावर खार खाऊन आहेत. त्यात हे असले नसते पायंडे पाडण्याचा प्रयत्न करून अजून रोष ओढवून घ्यायचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दृश्यकलेसाठी कायपण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळे झाकले तरी कळ्ळे हो गोल्डमॅन कोण आहे ते Wink

बाकी लेख उत्तमच. "इथे ओशाळल्या संज्ञा" हे वर्णन चपखल बसावे लेखाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे गोल्डम्यान आमचे फेवरिट्ट आहेत! दोनएक वर्षांपूर्वी सादलबाबा दर्गा रस्त्यावर यांचं समशेर करी धरलेलं चित्र आणि खाली "गप्प बसलो म्हणून गांडूची अवलाद समजू नका!" ऐसे कडक बोल लिहिलेला फ्लेक्स लावला होता.

मी गाडी थांबवून पोटभर हसून घेतलं. दोनच दिवसांत फ्लेक्स उतरवला गेला. बहुदा ज्याने त्यांना गांडूची अवलाद समजलं होतं त्याला उपरती झाली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगागागागागागागा ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मोठ्ठं नशीब तुमचं!

नाहीतर आम्ही "लिफ्टची अनसर्विसेबल आहे, वापरू नका" अशा फालतू फलकांवर हसतो.

'आला आला फेकू आला' हे मी याची डोळा पाहिलेले उच्चतम फ्लेक्स वा अँटीफ्लेक्स आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हॅट
मूळा लेखात एकाही फ्लेक्सचं चित्र नाही.
काय उपेग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सगळे समीक्षक असलेच रुक्ष! इतका महत्त्वाचा आणि रसाळ (कोल्लापुरी मटनाच्या रस्स्यासारखा झणझणीत) कलाप्रकार आणि त्याची मिमांसा मात्र सप्पकढ्याण!

श्री. शं. का. मोत्यावाणी यांनी या विषयावर अधिकारवाणीने जे काही लिहिले आहे ते असो पण श्री. सावधान खुप्ते यांनीही त्याहीपेक्षा अधिकारवाणीने,मुद्देसूद आणि उदाहरणे देऊन 'फ्लेक्सकला' हा बोर्डकलेचा आधुनिकोत्तर आविष्कार आहे असे सिद्ध केलेले आहे याकडे प्रस्तुत समीक्षकाचे लक्ष वेधतो.

पुढच्या भागात लेखक महाशयांनी सोदाहरण स्पष्टीकरण द्यावे अन्यथा लेख लिहू नये. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यावरुन आठवलं; मिल्येनियमोत्तरीच्या दशकातले थोर समीक्षक श्री. मु.वि.थिएटरवाला यांनी मूकचित्रपटाच्या काळापासून चित्रपटांच्या फ्लेक्सांतून फ्लेकसकलेचा कसा उगम व पुढे विकास झाला त्यावर अतिशय रंजक "फ्लेक्स फ्लेक्स होता है" नावाचा ग्रंथ लिहिला होता. विशेषतः सिनेमाच्या फ्लेक्सवर मधुबालादि अप्सरांच्या बरोबरीने रंगवले जाणारे प्रदीपकुमार, भारतभूषणादि (न)नायकांचे चेहरे व काळाप्रमाणे त्याच तोलामोलाच्या आकारात के.एन.सिंग, प्राण, प्रेमचोप्रादि खलनायकांचे मुखडे पाहून आपलेही चेहरे फ्लेक्सांवर पाहिजेत असे वाटणारे ठाकरे, पवार, मुंडे, देशमुखादि नेते आणि त्यांची तोंडं फ्लेक्सावर पाहून त्यापासून प्रेरणा घेऊन आणि फ्लेक्सावर मुखडा मिरवण्याइतका आत्मविश्वास मिळून सामान्य जनांनी फ्लेक्सकलेचा केलेला अंगिकार हा सगळाच प्रवास रोमांचक आहे.
या लेखात त्याचा उल्लेखही नसल्याचे पाहून आत्यंतिक खेद वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक शङ्का- सप्पकढ्याण कसे कै असू शकते? आंबड्ढ्याण माहिती आहे Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Yes I do feel there can never be SAPPAK-DHYYAN.

Sappak = flavorless/lacking taste
Dhyyaan = strongly flavored

Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा, नेमके Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ष्ट्रॉङ्गली टेष्टलेस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, पण "ढ्याण" हा शब्दप्रयोग तिथे चुकीचा वाटतो. कारण तिखटजाळ, कडूजहर, गोडमिट्ट हे शब्दप्रयोग त्या त्या चवीचे आधिक्य सुचवितात, त्यांतील प्रत्येक प्रत्यय हा अन्य चवींना लागू न पडण्याइतपत स्पेसिफिक आहे-लेट अलोन चवीच्या अभावाला लागू पडणे. त्यामुळे सपक म्हणजे रुचिवैशिष्ट्याचा अभाव सूचित करावयाचा असेल तर ढ्याण हा प्रत्यय लागू पडणार नै असे वाटते.

अवांतरः घरी ढ्याण ऐकला नै कधी. ढाण असा ऐकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय होय ढ्याण नसते.
आंबट ढाण
गार ढोण Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वापरतो बुवा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही फक्त ढ्याणटॅडॅण मध्ये वापरतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ख ह त ह र ह ना हा क ह. तेवढं एखादा फ्लेक्स लावा बॉ. त्याशिवाय शोभा कशी ती नाई!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आपल्याकडून भावी फ्लेक्सकर्त्यांनी एखादा "कोट" घेऊन तो स्वतःच्या फ्लेक्सवर लावावा. म्हणजे नवीन पुस्तकाच्या मागे जसे एखाद्या नावाजलेल्या लेखकाचा 'कोट' असतो तसा.

आपण एक फ्लेक्स-कन्सल्टंसी काढावी अशी नम्र सूचना करतो आहे. म्हणजे एकाच चौकात दहा-बारा फ्लेक्स असतील आणि त्यावरचे सगळेच वाघ, मर्द ई असतील तर आपल्या फ्लेक्स कडे लोकांचे लक्ष जावे याकरिता काय उपाययोजना करावी वगैरे सल्ले देता येतील. उदा: मासिकांवर असतो तसा एखाद्या हीरॉइन चा फोटो फ्लेक्स वर एका साईडला (किंवा मधेही) असायला हरकत नाही.

आम्ही कलासमीक्षक नसलो, आमच्या मागे झुंड नसली, तरी हे आम्हाला का सुचले नाही याची खंत होतेच. सुमारे एक दीड वर्षांपूर्वी पुण्यात काही काळ सगळे फ्लेक्स उतरवले होते. तेव्हा असे काहीतरी लिहून जनजागृती करायला हवी होती. पण आम्ही पडलो कमर्शियल, त्यामुळे हे असले काहीतरी लिहीले होते Smile
http://www.maayboli.com/node/36190

(ब्याक टू नॉर्मल)
मस्त लेख आहे. जबरी आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुजातविधा म्हंजे काय? कस्ला औघड लेख लिहिलाय? तसा आपल्या नावाने जालीय फ्लेक्स असलेला मराठीआंतरजालकर मी एकटाच आहे म्हणून मला कळू नये असं काहीबाही लिहिलंय आपण. असो. बरेच फ्लेक्स बनवले असते पण तांत्रिक कौशल्याने मी कमी पडतो.
...पण फ्लेक्सीय विधान -
हिशोब उरलाय लक्षात ठेवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अभिजात म्हणजे क्लासिक. तसाच बहुजात हा शब्द आहे. त्याचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे बहुजनसमाजाची. अभिजात कलांवर तशी उच्चभ्रूंची मक्तेदारी असते. फ्लेक्सच्या बाबतीत तसं नाही. दुसरी म्हणजे अपौरुषेय. या कलेची जोपासना करणारे बहुतेक वेळा बोर्डावर स्वतःचं नाव पण लिहीत नाहीत. हजारो कलाकारांनी ही संपन्न करायला मदत केली आहे.

कस्ला औघड लेख लिहिलाय?

समीक्षा ही अवघडच असते. ती सोपी करून लिहिली तर इतर समीक्षक तुम्ही धंद्याशी बेईमानी केल्याबद्दल तुम्हाला वाळीत टाकतात. अनिल सोनवणेंनी लिहिलं होतं की कोणी स्वस्तातला रिक्षावाला गाठला तर इतर रिक्षावाले त्याला धंदा करू देत नाहीत, तसंच. मी जर कलात्मक संकल्पना स्वस्त केल्या तर माझ्यावरही तीच गत येईल. आधीच ते लोक खार खाऊन आहेत...

तसा आपल्या नावाने जालीय फ्लेक्स असलेला मराठीआंतरजालकर मी एकटाच आहे म्हणून मला कळू नये असं काहीबाही लिहिलंय आपण.

छे हो. हा ऐसीवरचा पहिला फ्लेक्स. इतरत्र पहा, हजारो नमुने दिसून येतील.

हिशोब उरलाय लक्षात ठेवा.

भाऊंच्या यादीत तुमचं नाव, आता म्हणा देवा मला पाव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद देतोय, नशीब माना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आधीच ते लोक खार खाऊन आहेत...

खारीसारख्या चपळ आणि ओह-सो-क्यूट-अँड-गरीब-बिचार्‍या जीवाला खाणार्‍या मंडळींपासून जपून असलेलेच बरे. अगदी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते तुमच्यावर खार खाऊन असतील, तर तुम्ही त्यांच्यावर तरस खा. हाय काय नि नाय काय...

(खार का जवाब सॅण्टाक्रूज़ से|)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा, अगदी अगदी!!!!

खार का जवाब सँटाक्रूज से>>>लाईक कोरेछि Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एवढं पार्लेइंग पाहून डोळ्यांसमोर अंधेरी आली - अशी हांडे-esque पूर्ती अजून कोणी कशी केली नाही बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदननं ठाणं मांडलं तर कल्याणच झालं मग. त्यापुढे कोणी असेल तर कळवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे म्हणजे - आधीच 'उल्हास' त्यात फाल्गुन मास - झाले की !
.
(गरजूंसाठी म्हणीचा अर्थ - http://books.google.co.in/books?id=_gM4AAAAYAAJ&printsec=frontcover&sour...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरे की आता विषय बदला पुर'ता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मंडळी, मुद्दा सोडून भरकटण्याची शीव की हो गाठलीत.
अवांतरातला विहार संपला की कळवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघांचा पहिला प्रतिसाद आणि त्याला माझा हा प्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिसाद =प्रति१०साद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस बात्पे, चाहीये तो सब ऐसीवासीयोंका "कल कट्टा" हो जाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा विसावू या शिवेशी, स्वस्थता अंमळ जि'वाशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खूपच अवांतर; तरीही ऐसीकर्जतन करून ठेवतील असा धागा!
अवांतर असायला हरकत नाही 'पन वेल' इंटेन्शनल पाह्यजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंहं मद नगं रं करुस!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाईक केल्या गेले आहे!!!

शिवाय बाकी बुडती तिथे एखादा धूर्त कोल्हा पुरात तरतो हेही लक्षात घेणेचे करावे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हसवून हसवून मारु नको रे गावकर्‍या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही हो मारत. तुम्ही मात्र वढू पाहताय पुन्हा यात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बास रा पोरा!!! ROFL

बासर्‍याची सरस्वती प्रसिद्ध आहे. आन्ध्रातलं गाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा, हे माहिती नव्हते. रोचक!

बाकी दक्षिणेत लोक लुंगी घालत असल्याने तिथे चेन नै असे म्हणतात बॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चैन कसली डोंबल्याची? पादे पण नांदे Biggrin = : अशी स्थिती Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

मी रज आहे आपल्या चरणांचा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin = : ड हाणू का रे तुला. मी मीटीगमध्ये गेलेली पाहून धुमाकूळ घातलास? जरा ना शिक यातून सारीका!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे.

बाकी,वेल इंटेन्शन्ड कृती असेल तर त्याने एखादा डॉन भाय खळाखळा रडूही शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तळे गाव भर साचेल ना मग Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जवळ चिंच वड वैग्रे असल्यावर साचेल कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि पाणी साचलेच तर मोठ्याशा खडकी आसरा घ्यावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा दादर चढून वरच्या मजल्यावर जाऊन बसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेही नसेल तर दिव्याच्या खंबाला धरून वर चढावे. विजेचा धक्का बसू नये म्हणून तर महालक्ष्मी, गावदेवी, काळबादेवी, भुलेश्वर अशा कोणाचा तरी धावा करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा पहावे येर वडा अन त्यावर चढावे. याचा न घोर पडी ते करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हेही ब्येसच. वडाला पारंब्या असतात, चढणे सोपे जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी एवढे पाणीच पाणी चहूकडे झाले तर धुणे धुवायला धोबी तलाव गाठणे सोडून देतील.
मात्र असल्या पाण्यात धुवून धुवून कपड्यातले कॉटन ग्रीन होण्याची भीती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी. अगोदर कसे तलाव पाळीने वापरायचे ते आता शक्य नाही. हे सर्व बंड गार्डनपर्यंतही पोचेल असं दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅमॅ खूप मजा आली. या निखळ करमणूकीबद्दल धन्यवाद. पण दमले. माझ्याकडून थांबते आता. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवींचे लैच वेळा आभार..

आणखी एक मुद्दा: फ्लेक्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांना लीलया जोडणारे एक हुकुमाचे पान आपल्याला मिळाले आहे.
(उच्चभ्रूंच्या भाषेत: मणौ वज्रसमुत्कीर्णे सूत्रस्येवास्ति मे गति: ॥ रघु. १. ४)

मासल्यादाखल हा फ्लेक्स पहा:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0