डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे. सर्व मानवी समस्यांची उत्तरे आहेत. जग बदलण्याची वेळ आलेली आहे. जग संक्रमणावस्थेत आहे. आता क्रांती होणारच आहे या आणि असल्या भ्रामक कल्पनांनी पछाडलेल्यांना पुढे प्रमाणिक राहताच येत नाही. बाबासाहेबांच्या काही वाक्यांना ओढुन ताणुन वेगळा रंग देण्याचा काही मार्क्सवाद्यांचा प्रयत्न हा त्याचेच फलित आहे. मात्र या काळात, जेव्हा मार्क्सवाद हा जागतिक पटलावरुन जवळपास नाहीसा होण्याचा मार्गावर असताना, त्यातील फोलपणा रशियाच्या विघटनानंतर लक्षात आला असताना आपल्याकडे बाबासाहेबांच्या निबंधातील मार्क्सवादाबद्दलची मते कितपत महत्वाची आहेत? असा जर विचार केला तर हे दिसुन येते कि आजच्या काळात त्या निबंधाचे महत्व आणखि वाढले आहे. अलिकडेच डॉ. आनंद तेलतुंबडेंच्या वक्तव्याबाबत जो गदारोळ उठला त्यावरुन हे दिसुन येते कि मार्क्सवाद आणि दलित समस्या यांच्यातील संबंध दुर्लक्षिण्याजोगे नाहीत. निदान भारतात तरी, जेथे जातीयता अजुनही संपलेली नाही, संपण्याची शक्यता नजिकच्या काळात दिसत नाही तेथे या संबंधातील गुंतागुंत अधुनमधुन डोके वर काढणारच.

पुढे जाण्याअगोदर एका हळव्या गोष्टीला स्पर्श करणं भाग आहे कारण त्यावरुन दलितसमाजात मार्क्सवादाचा संबंध हा बाबासाहेबांनंतर कुठे आला हे स्पष्ट होईल. दलित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर १९७२ साली दलितपँथरची स्थापना झाली. अल्पावधीत या संघटनेचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं. जगातील मोठमोठ्या नेत्यांनी या संघटनेची दखल घेतली. आणि १९७५ साली फुट पडुन दलितपॅंथरचा प्रभाव संपला. त्यानंतर काही वर्षांनी लता मुरुगकरांनी दलित पँथरवर प्रबंध लिहिला. त्यात फुटीच्या कारणांचा सविस्तर उहापोह केला आहे. तत्कालिन नेत्यांच्या मुलाखतींवर हा प्रबंध आधारलेला असल्याने त्याला वेगळे महत्व आहे. तूर्तास या लेखासाठी त्यातील इतर कारणांकडे जाण्याची मला आवश्यकता वाटत नाही. मात्र अनेक कारणामध्ये महत्वाचे कारण हे वैचारिक मतभेदांचे होते हे दिसुन येते. राजा ढाले हे आंबेडकरवादी आणि नामदेव ढसाळ यांचा कल मार्क्सवादाकडे यातुन हे मतभेद झाल्याचे मुरुगकरांचे निरिक्षण आहे. आजदेखिल सभेत हा विषय निघाला कि त्यावेळच्या दलित नेत्यांच्या चेहर्‍यावर खंत दाटुन येते. खुद्द बाबासाहेबांचा याबाबत अनुभव काय होता हे जाणुन घेणं देखिल महत्वाचं आहेच. भारताच्या संदर्भात खुद्द मार्क्सचे निरिक्षण चुकले. भारतातील जातीव्यवस्था आधुनिकतेच्या रेट्याखाली संपेल असे मार्क्सला वाटले होते. तसे झाले नाही. ५ ऑगस्ट १८५३ च्या “न्युयॉर्क डेली ट्रीब्युन मध्ये मार्क्स लिहितो…Modern industry, resulting from the railway system, will dissolve the hereditary divisions of labor, upon which rest the Indian castes, those decisive impediments to Indian progress and Indian power. हे अर्थातच प्रत्यक्षात आले नाही. भारतातल्या कारखानदारी, शहरीकरण, आधुनिकता येऊनही जातीसंस्था हि वेगळ्या स्वरुपात चालुच राहिली.

अलिकडे काही मार्क्सवादी हे मान्य करतात कि जातीसंस्थेबद्दल त्यांचे आकलन चुकले. विशेषतः वर्ग नाहीसे झाले कि जाती आपोआपच नाहीशा होतील आणि वर्ग हा जातीपेक्षा महत्वाचा प्रश्न आहे हि दोन्ही गृहीतके चुकली. मुळात मार्क्सवाद्यांच्या दृष्टीने जात महत्वाची नव्हतीच. जातीचा प्रश्न धर्माशी निगडीत होता आणि धर्म ही अफुची गोळी होती. अर्थ हा base आणि धर्म किंवा तत्सम कुठलेही तत्वज्ञान हे superstructure अशी ती मांडणी होती. सर्वतर्‍हेची विषमता लहानपणापासुन ते अगदी उच्चविद्याविभुषित झाल्यावरसुद्धा अनुभवलेले बाबासाहेब मात्र अगदी वेगळ्या मार्गाने गेले. भारतीय जनमानसातील धर्माचं महत्व त्यांनी अचुक ओळखलं होतं. मनुस्मृतीचा प्रभाव त्यांना माहित होता. भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या जातीसंस्थेचं उच्चटन वर्ग नाहीसे झाल्याने होईल या भ्रमात ते नव्हते. शिवाय मार्क्सवाद्यांनी त्यांना एका बाबतीत निराश केलं होतं. मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये अस्पृश्यांना विणकाम खात्यात प्रवेश नव्हता. तेथे धागा चोखुन काम करावे लागत असे. अशा तर्‍हेच्या भेदभाव नाहीसा करण्यासाठी कम्युनिस्टांनी कुठलिही पावले उचलली नव्हती. त्यामुळे आयुष्याच्या अखेरीला बाबासाहेबांनी मार्क्सवादाबद्दल आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. हा निबंध प्रदीर्घ आहे. पण लेखाच्या दृष्टीने त्याचा गोषवारा देणे आवश्यक आहे.

बाबासाहेबांनी बुद्धाच्या आणि मार्क्सच्या तत्वप्रणालीची सर्वप्रथम मांडणी केली आहे. त्यात मार्क्सवादाबद्दल आपले भाष्य करताना ते म्हणतात कि” …समाजवाद अटळ आहे हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. …साम्यवादाने रशियात पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण होण्यापूर्वी पुष्कळ हिंसा व रक्तपात घडवुन जाणीवपुर्वक योजना आखावी लागली….इतिहासाचे एकमेव स्पष्टीकरण म्हणुन आता कोणीही इतिहासाचे आर्थिक स्पष्टीकरण स्विकारत नाही. कामगारांना वाढत्या प्रमाणात भिकेस लावले आहे हे कोणीही मान्य करत नाही.” मात्र बाबासाहेबांना मार्क्स हा अत्यंत महत्वाचा विचारवंत वाटत होता. त्याची चार तत्वे त्यांना महत्वाची वाटली मात्र त्यावरील बुद्धाचे उपाय त्यांना परिणामकारक वाटले. ती चार तत्वे म्हणजे १. तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्र्चना करणे आहे. २. वर्गावर्गामध्ये हितसंबंधांचा कलह आहे. ३. संपत्तीच्या खाजगी मालकिमुळे एका वर्गाला सत्त मिळते तर दुसर्‍या वर्गाला त्याची पिळवणुक झाल्यामुळे दु:ख मिळते. ४. समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ते नष्ट करुन हे दु:ख दूर करणे आवश्यक आहे.

या चारही गोष्टींवर बुद्ध धर्मामध्ये परीणामकारक उपाय आहेत असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यानी या निबंधात जागोजाग निरनिराळे दाखले दिलेले आहेत. विशेषतः बुद्ध व त्याचा शिष्य आनंद यांच्या संवादातुन बाबासाहेबांनी हे स्पष्ट केले कि हाव असण्याचे कारण मालकी असे बुद्ध धर्म मानतो. भिक्षुंना खाजगी संपत्ती बाळगण्याची परवानगी नाही. त्यात मार्क्सच्या चौथ्या तत्वाचे निवारण होते. तथापी मार्क्सवाद्याची साधने त्यांना कधीही पटली नाहीत. विशेषतः हिंसेच्या ते विरुद्ध होते. बाबासाहेबांना धर्म महत्वाचा वाटत होता. मार्क्सवाद्यांच्या धर्मद्वेषाला त्यांची कधीही मान्यता नव्हती. एक कायमची हुकुमशाही म्हणुन राज्याविषयी असलेला मार्क्सवादी सिद्धांत त्यांना पटला नव्हता. “जर अखेरीला राज्य नष्ट होणार” तर ते केव्हा नष्ट होणार याचा कालावधी साम्यवादी सांगु शकत नाहीत. शिवाय हुकुमशाहीने तिचे कार्य केल्यावर, लोकशाहीचा मार्ग सुरक्षित बनवल्यावर स्वतः संपुष्टात का येऊ नये? हा बाबासाहेबांचा घाणाघाती आक्षेप होता. सरतेशेवटी ते म्हणतात “साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो, (समता,सहभाव व स्वातंत्र्य या)सर्व गोष्टी देऊ शकत नाही”. इतक्या स्पष्ट आक्षेपांनंतर बाबासाहेबांच्या विचारांशी मार्क्सवादाची सांगड घालण्याचा अप्रामाणिकपणा करण्यात अर्थ नाही हे कुणालाही पटेल. तरीही हे प्रयत्न का होतात? याचे उत्तर मार्क्सवाद्यांच्या ढोंगीपणात दडलेले आहे.

मार्क्सवाद हा जगभरातुन नाहीसा होत असला तरी विचारवंत विद्वानांमध्ये ते चलनी नाणं आहे. आणि हे विचारवंत आणि विद्वान घाऊक प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात आणि विद्यापिठात सापडतात. फर्ड्या इंग्रजीत मार्क्सवरची गाडाभर पुस्तके वाचावीत, त्यावर क्रिटीकल थिंकर्सनी लिहिलेली आणखि खंडीभर पुस्तके वाचावीत. पेपर्स लिहावेत, सेमिनारमध्ये वाचावेत. गरीबांच्या शोषणावर वातानुकुलित गाड्यांमधुन प्रवास करुन व्याख्याने द्यावीत, पिचलेल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये भाषणे आयोजित करावीत. आणि हे सारं अतिक्लिष्ट भाषेत करावं म्हणजे विद्वत्तेला आणखि झळाळी प्राप्त होते. बाबासाहेबांनी कितीही स्पष्टपणे लिहिलं तरी बाबासाहेबांचा आणि मार्क्सचा सांधा जुळवण्याचं याचं काम सुरुच असतं. कारण बाबासाहेबांना खोडुन काढता येत नाही. तेवढी त्यांची कुवतही नसते. मग पुढे यांची मजल “मुळात बाबासाहेबांच्या काळापर्यंत मार्क्सचे महत्वाचे ग्रंथ उपलब्ध नव्हते” हे म्हणण्यापर्यंत जाते. त्यातुन त्यांना हे ध्वनित करायचे असते कि जणुकाही हे ग्रंथ बाबासाहेबांच्या हाती लागले असते तर त्यांच्या विचारात फरक पडला असता. खरंतर रशियाच्या विघटनापर्यंत बाबासाहेब हयात असते तर त्यांनी मार्क्सवादावर आणखि हल्ला चढवला असता. ज्या बाबासाहेबांना मार्क्स हा अत्यंत महत्वाचा विचारवंत वाटत होता. त्याच्या ग्रंथांचे अध्ययन बाबासाहेबांनी केले नसेल हे त्यांचे अजस्त्र वाचन ज्यांना माहित आहे त्यांना पटणारच नाही. या सार्‍या बाबी वैयक्तीक पातळीवर सुरु असतील तर एकवेळ समजता येईल मात्र विद्यार्थ्यांना शिकवताना आंबेडकरांचे सुप्रसिद्ध “अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट” हे भाषण घ्यावे कारण त्यात जातीसंस्थेवर प्रखर हल्ला आहे मात्र “बुद्ध कि कार्ल मार्क्स” या निबंधाला हातदेखिल लाऊ नये याला संधिसाधु अप्रामाणिकपणाशिवाय दुसरे काहीही म्हणता येत नाही. मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्ह्टले आहे मात्र खुद्द मार्क्सवाद हा आता बुद्धीमंतांसाठी अफूची गोळी ठरला आहे हे नक्की.

अतुल ठाकुर

संदर्भ:
बुद्ध कि कार्ल मार्क्स – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
Dalit Panther Movement of Maharashtra – A Sociological Appraisal – Dr. Lata Murugkar

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

थोडक्यात पण नेमकं.
बाकी विषय मोठा आहेच.
नामदेव ढसाळ मार्क्सवादी असतील तर सामना मध्ये का लिहितात ते समजले नाही.
अभ्यासू प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उत्तम लेखन.. असेच लेख अजून येत राहु देत.

बाकी, जातीचा प्रश्न धर्माशी निगडीत होता हे गृहितक असल्याने मार्क्सवाद्यांचा अंदाज भारतापुरता चुकला असेल काय? भारतात जाती या सर्वधर्मसमभाव मानणार्‍या आहेत - अफुच्या गोळीला जुमानणार्‍या नाहीत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मन, ऋषीकेष..धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

मार्क्सवाद हा जगभरातुन नाहीसा होत असला तरी विचारवंत विद्वानांमध्ये ते चलनी नाणं आहे. आणि हे विचारवंत आणि विद्वान घाऊक प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात आणि विद्यापिठात सापडतात. फर्ड्या इंग्रजीत मार्क्सवरची गाडाभर पुस्तके वाचावीत, त्यावर क्रिटीकल थिंकर्सनी लिहिलेली आणखि खंडीभर पुस्तके वाचावीत. पेपर्स लिहावेत, सेमिनारमध्ये वाचावेत. गरीबांच्या शोषणावर वातानुकुलित गाड्यांमधुन प्रवास करुन व्याख्याने द्यावीत, पिचलेल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये भाषणे आयोजित करावीत. आणि हे सारं अतिक्लिष्ट भाषेत करावं म्हणजे विद्वत्तेला आणखि झळाळी प्राप्त होते.

हा प्यारेग्राफ विशेष पटला. असल्या विचारजंतांची गर्दी आजकाल लैच झालेली आहे. नकर्त्यांची तितकाच नकर्ती टिवटिव याजपलीकडे त्यास महत्त्व नाही.

मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्ह्टले आहे मात्र खुद्द मार्क्सवाद हा आता बुद्धीमंतांसाठी अफूची गोळी ठरला आहे हे नक्की.

क्या बात!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! या एका वाक्यासाठी तुम्हाला माझ्यातर्फे एक मुळगापुडी इडलीची प्लेट लागू!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅनराव Smile इडली बद्दल आभार. योग्यवेळी वसुल करेनच Smile मुळगापुडी म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

मुळगापुडी म्हणजे काय?

गनपावडर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! या एका वाक्यासाठी तुम्हाला माझ्यातर्फे एक मुळगापुडी इडलीची प्लेट लागू!!!

यार क्या यार !!!

चांगली चिकन बिर्याणी (+ टेकिला) ऑफर करायची सोडून .... इडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आकर्षक लाल्नेकडून इडलीच काय कारलं दिलं जाणार असेल तरी आपली हरकत नाही.
बॅत्यानं फक्त अ‍ॅश , कॅट किंवा बेबो ह्यांच्या हस्ते मुळगापुडीची व्यवस्था करावी.
उड्या पडतील उड्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उड्या कुणावर पडतील हे दिसतंच आहे Wink

बाकी त्या लिष्टेत आमची केसरबाय योहानी नसल्याने निषेध!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा हा, अहो शेवटी आम्ही (दक्षिणी) भटेंच त्याला काय करणार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझा प्रश्न भटे शब्दाबद्दल नाही. त्या दक्षिण शब्दाबद्दल आहे. लातूरच्या माणसाने स्वतःला पश्चिम भारत, दक्षिण भारत, मध्य भारत, उत्तर भारत पैकी काय मानणे योग्य? मी नेहमी काही एक ठरवतो तेव्हा पुढच्याने विपरित ठरवलेले आढळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओके. आमचे घराणे मूळचे कर्नाटकातील असल्याने तो शब्द वापरला इतकेच. लातूरच्या माणसाने स्वतःला काहीही मानावे, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. भूगोलाप्रमाणे पहायचे झाले तर मराठवाडीय मानावे, दख्खनचा रहिवासी मानावे, इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कसला स्वच्छ, काटेकोर नि मुळापासून माहिती देणारा लेख आहे. प्लीज असे लेख आणखीही लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद मेघनाजी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

लोडेड लेख. आनंद तेलतुंबडे ह्यांच्यावर टिका असल्यास/नसल्यास त्याअनुषंगाने लेख असायला हवा, लेखाचा शेवट लेखाच्या विषयाला धरुन नाही, सबब लेखकाने भुमिका स्पष्ट करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आनंद तेलतुंबडेंवर नाही. तो दलित मार्क्सवाद्यांवर आहे. मला तेलतुंबडे हे त्या वर्गातील वाटतात. हा लेख लिहुन वर्ष होऊन गेलं असेल. त्यावेळी तेलतुंबडेंवर वर्तमानपत्रात टीका आली होती. त्यांनी आंबेडकरांबद्दल काही आक्षेप घेतले होते असे काहीसे आठवते मात्र आता माझ्याकडे त्याची लि़ंक नाही. तेलतुंबडेंना देखिल ऐकण्याचे भाग्य सुदैवाने लाभले आहे.

लेखात प्रामुख्याने शिक्षणक्षेत्रातील दलित मार्क्सवाद्यांबद्दल लिहायचं आहे. कारण त्यातल्या काहींना मी जवळुन पाहिले आहे आणि त्यांना सेमिनारमध्ये ऐकले देखिल आहे. मला त्यांची धडपड ही चमत्कारीक वाटते. दलित जनतेत बाबासाहेबांचा आजही इतका दरारा आहे कि त्याबाबत यांना काही बोलता येत नाही. आणि यांना तर पोथीतले उपाय आचरण्याची घाई झालेली असते. त्यातुन या लांड्या लबाड्या सुरु होतात अशी माझी समजुत आहे.

लेखाचा शेवट हा विषयाला धरुन नाही असे आपले म्हणणे आहे. मला तर सर्वच मार्क्सवादी एकप्रकारच्या नशेत वावरत असलेले जाणवतात. ही नशा विद्वत्तेची असते. प्रकांडपंडीत बाबासाहेबांच बरचसं लिखाण सर्वसामान्यांना समजेल असं आहे मात्र मार्क्सवादी ज्यांच्या बद्दल लिहितात त्यावर्गाला त्यांचं म्हणणं कळत असेल अशी खात्री वाटत नाही इतक्या जड जंजाळ भाषेत ते मांडलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

मार्क्सवाद हा जगभरातुन नाहीसा होत असला तरी विचारवंत विद्वानांमध्ये ते चलनी नाणं आहे. आणि हे विचारवंत आणि विद्वान घाऊक प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात आणि विद्यापिठात सापडतात.

"Socialism in general has a record of failure so blatant that only an intellectual could ignore or evade it." ________ Thomas Sowell

-----

सोशॅलिझम व मार्क्सवाद ह्या दोन शब्दात मी उडी मारलेली आहे हे मान्य.

आता टॉवेल चा क्वोट लिहिला म्हणून अतुलदा मला छडी घेऊन मारायला येतील. किंवा अंगठे धरून (ओणवा) उभा रहा अशी शिक्षा देतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला आमचे गब्बरभाऊ येथे आहेत म्हणजे मस्तच. एकदम मोकळं वाटायला लागलंय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

अहो मी ही आहे. मी तोच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे वा Smile तेच तुम्ही Smile मस्तच Smile ओळखिची बरीच मंडळी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

या दोन बाजूंमधे समानतेचा सोस हा कॉमन धागा होता/आहे असे आपले माझे मत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बराच जास्त पसारा एकाच लेखात घातल्यासारखा वाटतो. याची लेखमाला बनवून त्याबद्दल विस्तारपूर्वक लिहीण्याचा जरूर विचार करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कमीत कमी शब्दात लिहिण्याचा प्रयत्न असतो माझा Smile वाढवत नेलं की माझं लिखाण कंटाळवाणं होऊ लागतं असा माझा स्वतःचाच अनुभव आहे Smile प्रतिसादाबद्दल धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

मलाही तसच वाटतं. फार पाल्हाळापेक्षा मोजकं पण कॉन्सन्ट्रेटेड लिखाण आवडतं. तुमचे लेख आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉन्सन्ट्रेटेड Smile येस Smile योग्य शब्द Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

छान माहिती. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही.

असे तत्वज्ञान असूच शकत नाही का की ज्यामधे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत ?

कारण एखादे तत्वज्ञान असे ही असू शकते की ज्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत ... पण त्यातली काही उत्तरे समाजधुरीणांना नकोशी व गैरसोयीची आहेत.

किंवा तत्वज्ञान ही व्यक्तीसमूहासाठी सलेली व फक्त व्यक्तीसाठी असलेली गोष्ट आहे ? व्यक्तीने चयन करायचे आहे की कोणते तत्वज्ञान स्वतःपुरते निवडायचे व राबवायचे (स्वतःच्या आयुष्यात) व केव्हा ते खुंटीवर टांगुन ठेवायचे ($$$$) ?

मार्क्स ने एक मुद्दा असा मांडला होता की - Philosophers have only interpreted the world. The real point is to change it.

पण तो चेंज अ‍ॅक्च्युअली करणे हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा - 1) The change agent knows what change needs to be made, 2) He/she has available all the information needed in order to make the decision to conceive and implement the change, 3) He/she has the ability to perform the change, 4) He/she has the ability and a mechanism to monitor the change management process.

--------

$$$$ - तत्वज्ञान खुटीवर टांगून ठेवायचे म्हंटले की इंटेलेक्च्यल्स च्या कपाळावर आठी पडते. त्यांच्यासाठी कमिटमेंट, लॉयल्टी, निष्ठा हे महाप्रचंड महत्वाचे असतात. यांच्याशिवाय त्यांचे पान हालत नाही. पण निष्ठेच्या नेमके विरुद्ध जी संकल्पना आहे ती - संधिसाधुपणा - Opportunism - ही त्यांना अति-तिरस्करणीय वाटते.

संधिसाधुपणा - Opportunism - ची व्याख्या - Opportunism is defined as - propensity of individuals to seek and pursue options/alternatives.

आणि Opportunism ही Transaction Cost Theory च्या मुळाशी असलेली संकल्पना आहे. व Transaction Cost Theory ही काँट्रॅक्ट थियरी च्या मुळाशी असलेली संकल्पना.

-----

निष्ठा मूल्याचे गुलामी मधे रुपांतर कधी होईल हे कोण सांगणार ????????????//

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Opportunism व कमिटमेंट हे पार दोन टोकाच्या ध्रुवावर आहेत असे वाटत नाही.
मी क्ष कंपनीत काम करतो. अधिकाधिक पैसे त्यांना अप्रायझल मध्ये मागतो.
ते मला अधिकाधिक राबवू पाहतात.
जोवर ह्यात काहिसा इक्विलिब्रिअम दोन्ही बाजूकडून आहे, तोवर मी कंपनीशी कमिटेडच असतो.
उद्या त्यांना किंवा मला अधिक चांगलं ऑप्शन सापडलं तर एकमेकांना करारातून मुक्त करण्यास कुणाचीच ना नाही.
मी दुसरी चांगली संधी शोधली म्हणजे मी opportunist आहे हे सत्य आहे. (खरं तर rational आणि opportunist हे शब्द खूप जवळ जातात.)
तरीही कंपनीत काम करताना मी कंपनीशी कमिटेड होतोच की. अगदि सिन्सिअरली काम करणार्‍या "शहाणा बाळ " ह्या क्याटॅगरीतल्या एम्प्लॉयी पैकी मी एक आहे.
तसेही पर्याय शोधणे आणि स्वातंत्र्य भावना ह्या एकमेकांशी निगडित आहेत.
पर्याय शोधणे हे opportunist असण्याच्या जवळ जाते.
स्वात्म्त्र्याचा आदर असेल तर त्याच्याशी निगडित भावना तुच्छ समजायला नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Loyalty किंवा Commitment = 1 / Opportunism.

तुमच्याकडे ५ अल्टरनेटिव्ह्ज आहेत. ५ विकल्प आहेत. म्हंजे तुमची कमिटमेंट (कोणत्याही एका विकल्पास) फक्त २०% आहे.

तुम्ही स्वतःहून बाकीचे सर्व ऑप्शन्स बंद केलेत व फक्त एकच ठेवलात. तुमची कमिटमेंट १००%.

ती कशी. तर अशी => १ भागिले १.

विकल्पोंके द्वार बंद कर देना ही निष्ठा का दूसरा नाम है !!!

--------------

खरं तर rational आणि opportunist हे शब्द खूप जवळ जातात.

अगदी.

Bounded Rationality च्या संकल्पनेचा जन्म (पिताश्री हर्बर्ट सायमन) यातूनच झाला. Bounded Rationality is defined as - Individuals are intendedly rational but limitedly so _______ Oliver Williamson.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0