सासू-सूनेचे नाते

आज आईंना (सासूबाईंना) पत्र लिहीले. सकाळी खूप वाईट वाटत होते, रडू येत होते. सासू-सूनेचे नाते सर्वांकडेच असे कटु-गोड असते का? माझ्यासारखी नणदेची जेलसी सर्वांना वाटते का? बराच वैयक्तिक विषय व अनुभव आहे. ज्यांना या विषयावर काही विचार मांडावयाचे आहेत त्यांनी जरुर मांडावेत. स्वागत आहे. या चर्चेतून काही "टेक अवे" मला घेता आला तर हवा आहे. संपादकांना हा लेख/ ही चर्चा फुटकळ वाटला तर जरुर उडवावा. लेखात नावे बदलली आहेत.

प्रिय आई,

मला माहीत आहे "प्रिय" या शब्दालाच तुम्ही अडखळला असाल. २/३ दिवस मी नीट वागत नाहीये. आपल्याही चकमकी होत आहेत. मला माझी बाजू सांगायची प्लीज संधी द्या - (१) माझ्या मूड डिसॉर्डरमुळेही तसं होतय (२)माझा स्वभाव अतिशय "जेलस" आहे त्यामुळेही होतय.
मी तुमच्या घरी आले तेव्हा तुम्ही मला प्रेमाने वागवलेत, माझे लाड केलेत, मला सांभाळून घेतलत आणि हे सर्व खरं तर आता मी केले पाहीजे - केवळ कर्तव्यभावनेने रुक्षपणे नव्हे तर आपले जे ऋणानुबंध जुळले त्यातील प्रेमाने मी हे सर्व केले पाहीजे.

तुम्ही म्हणाल मला जेलसी कसली वाटते? मला तुमच्या मुलीची, कामिनीची जेलसी वाटते. तिला अतिशय व्यवहारी, शांत आणि सुस्वभावी आई मिळालेली आहे, तुमचे तिच्यावर खूप प्रेम आहे याची मला जेलसी वाटते. आता तुम्ही म्हणाल (१) सुदैवाने मला माझी आई आहे (२) कामिनी तुमची पोटची मुलगी आहे तेव्हा तुमची माया स्वाभाविकच आहे.

पण मी जरी पोटची मुलगी नसले तरी आपण बरेच सुखदु:खाचे दिवस एकत्र काढले आहेत मग तुम्ही तश्शीच माया माझ्यावर का नाही करु शकत? Sad

मला माहीत आहे मीदेखील चुकते. मी खूप हिडीसफिडीस करते. पण विश्वास ठेवा जेव्हा मी तशी वागते त्याचा आता मला खूप त्रास होतो, लाज वाटते. पूर्वी तर मी पेशंटच होते तेव्हा मला माझे मूड्-स्विंग्स कळत नसत. पण आता मी पूर्ण बरी आहे. अजूनही स्विंग्स होतात पण माझ्या हातून लक्षणीय अपराध घडत नाहीत कारण आता अवेअरनेस आला आहे.

आपण नवीन वर्षाचा संकल्प करायचा का? तुम्ही मला कामिनी समजायचे व मी तुम्हाला सख्खी आई मानणार.

आजपासून मी डायरी लिहीणार आहे. स्टिव्हन डायरी लिहीतात. आज मी स्टिव्हनना म्हटले "तुम्ही डायरी लिहीता ती कोणी वाचेल अशी भीती तुम्हाला नाही वाटत?" ते म्हणाले "सो व्हॉट? वाचली तर वाचू देत." हीच डायरी तुमच्या मुलांकरता तुमची बेस्ट गिफ्ट असेल. मला ते पटले.

आई तुम्हीही डायरी लिहा. नंतर तो ठेवा तुम्ही कामिनीला द्या किंवा मला द्या, तुमची इच्छा. पण हा ठेवा आमच्याकरता अनमोल असेल. आपल्या कितीतरी इन्टेन्स व श्रीमंत भावना आपण कोणापाशीही व्यक्त करु शकत नाही. त्या आपण डायरीत लिहू शकतो.

आपल्या दोघींचे नाते इतके वरंवार दुखावलेले आहे की त्यात तत्काळ बदल दिसणे शक्य नाही. पण मी माझ्याकडून नक्की प्रयत्न करणार आहे. तुम्ही हे पत्र नीट वाचाल तर तुम्हाला कळेल, माझे तुमच्यावर प्रेम आहे त्याशिवाय जेलस वाटत नाही. प्रत्येकाची प्रेम दाखवण्याची पद्धत निरनिराळी असते.

सस्नेह/खूप प्रेम,
सारीका (तुमची मुलगी होऊ इच्छिणारी तुमची सून)

ता क - (१) बाथरुममध्ये २ डाय ठेवले आहेत. तुम्हाला हवा तो घ्या.
(२) मी आज फोन चार्ज करायला विसरले आहे. तेव्हा कॉल केलात तरी उचलता येणार नाही.
(३) काम झेपल इतकच करा. आरामही करा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

मला एक गोष्ट कळत नाही कि सासूला आई का म्हणायच? तिखटाच्या डब्याला बाहेरुन साखर हे लेबल लावल तर आतल्या तिखटाची चव बदलणार आहे का? बर गंमत म्हणजे आपण आपल्या आईला अरे तुरे करतो. मग नवर्‍याच्या आईला आई म्हणताना अहो आई अस का म्हणायच? काहींच्या बाबत सासू बाई आई पेक्षा अधिक प्रेमळ असूही शकते. आई नाही म्हणल तरी नात प्रेमळ असू शकत. नणदेच एक बर असत कि ती आपल्या आईशी भांडू शकते. तेच सुनेने केल तर लगेच सुन बदनाम होउ शकते.
सुन मुलीसारखी असू शकते पण मुलगी नाही. असो
ललितपत्र आवडल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

छान लिहीलय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची मुलगी होऊ इच्छिणारी तुमची सून

तुमची इच्छा प्रशंसनीय आहे. त्यासाठी वादावादी, आरोप- प्रत्यारोप, रदारड टाळून तुम्ही चालू केलेला समंजस संवादाचा मार्ग या परिस्थितीत सर्वात योग्य ठरेल यात शंका नाही.

पण त्याबरोबरच, एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे ही प्रत्य्क व्यक्तीचा पिंड वेगळा असतो. फक्त प्रेम व्यक्त करण्याची पद्धतच वेगळी असते असे नाही. प्रेम करण्याची क्षमता, प्रेम करण्याची मनाची गरज, प्रेमाच्या व्यक्तींमध्येही कोण वरचे कोण खालचे अशा गोष्टीतहि दोन व्यक्तींमध्ये फरक असतो. प्रेम, नाते, जिव्हाळा म्हणजे काय; आणि त्याची आप्ल्या आयुष्यातली जागा हेही प्रत्येकाच्या लेखी निराळे असू शकते.

तुम्ही करता तशी इच्छा करणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे दोन्ही तुमच्या बाजूने रास्त आहेत. पण काही वेळा दोन्ही बाजूंची ती गरज / मूलभूत प्रवृत्ती असेलच असे नाही. येथे तसेच असावे असे मी म्हणत नाही, प्रयत्न चालू ठेवून जशी कमी-जास्त प्रगती होत जाईल त्या फीडबॅक वरून आपल्या अपेक्षा समायोजित करणे, रास्त ठेवणे बहुतेकदा योग्य ठरते.

याहून महत्त्वाचे म्हणजे, आपल्या आयुष्यात काय नाही ह्यावर कमी रोख ठेवून काय आहे ह्यावर जास्त मन केंद्रित करावे.
आत्ता जे ''आहे'' ते "नाही" व्हायला एक क्षण पुरतो. तो क्षण चार वर्षांनी येणात आहे की चार तासांनी ते कोणालाही सांगता येत नाही.

थोडक्यात, पळत्याला धरण्याची आकांक्षा धरू नये असे मुळीच नाही. पण हातातले जास्त महत्त्वाचे आहे हे विसरू नका. हातातले अनंत काळापर्यंत हातात असणार नाही.

शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संतुलित प्रतिसाद. शहराजाद, प्रतिसाद खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांनी आई वगैर होण्यापेक्षा (असे होता येते का हे सांगायला मी क्वालिफाईड नाही - मात्र असे शक्य नसावे. सासु ही आपल्या जोडिदाराची आई आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेऊन योग्य त्या अपेक्षा/इच्छा ठेवल्या की पुरेसे असते असे वाटते) तुम्ही चांगली सून व त्यांनी चांगली सासु होण्याचे आवाहन करणे अधिक साकल्याचे व्हावे.

* "चांगली" ची डेफीनेशन निरपेक्ष आहे हे तुर्तास बाजुला ठेऊ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

* "चांगली" ची डेफीनेशन निरपेक्ष आहे हे तुर्तास बाजुला ठेऊ.
निरपेक्ष की सापेक्ष? (absolute or relative)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी. सापेक्ष म्हणायचं होतं.. निरपेक्ष नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेहमीप्रमाणेच संतुलीत, रॅशनल (भावनिक टाळून) अ‍ॅप्रोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mood disorder is an extremely dangerous disease, especially in the light of restrospective inspection of one's own behavior. Such people go through intense feelings, especially feeling of intense love and respect.

The best idea would be to 'completely' disown the persona of oneself during such swings. One should proceed in full faith with your emotions once others around you tell you with convistion that you are on absolute normal route.

Analysis of life during abnormal psychological conditions, if it is applicable here, should be 'altogther' discouraged.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

One should proceed in full faith with your emotions once others around you tell you with conviction that you are on absolute normal route

I agree with para above. Also having others around is so crucial in some disorders because, one cannot detect change in own behavior. Spouse or any near one has to remind of any abnormal spike-change such as "Feeling magnanimous & positive in un-proportionate size" (Mania) while feeling sleepy all the time & losing interest (Depression)

I agree the importance of having an (disorder-educated) loved one near, is monumental.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे

I agree the importance of having an (disorder-educated) loved one near, is monumental.
पण हे क्वचितच शक्य असत आणि पक्क्या मडक्यांना आपण आकार देऊ शकत नाही.त्यांची स्वतःची इच्छा असली तरीही त्यानाही तो बदल फार शक्य नसतो.

कदाचित तुम्ही Marsha M. Linehan च्या Dialectical behavior therapy (DBT) बद्दल ऐकलेल असेल फार गुणकारी ठरते ही थेरपी. यात तुम्हाला स्वतःबद्दल सजग(conscious) केल्या जात. हि थेरपी बुद्धाच्या mindful awareness/विपश्यनायावरून derived केलेली आहे. याचा वापर करून Borderline personality disorder सारखे अशक्य समजले जाणारे मानसिक आजार पण ठीक होतात. मी फार जवळचे उदाहरणं बघितलेले आहेत.

थोडक्यात विपश्यनाच एक शिबीर (इगतपुरीलाच) कराव. १० दिवसात योगसाधनेमुळे नक्की फरक जाणवेल अस माझा मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की वाचते. दुवा इंटरेस्टींग वाटतोय. स्वतःबद्दल सजग = सेल्फ अवेअरनेस ही अक्षरक्षः मूड डिसॉर्डरची गुरुकिल्ली आहे असे म्हणेन. अर्थात मेंदूतील "रासायनिक असंतुलन" परत मूळपदी आणणं हे औषधांद्वारे करावच लागतं. पण बर्‍याच केसेस मध्ये "औषधोपचार पद्धती + समुपचार" दोन्ही लागते.

अशा डिसॉर्डरमधून पूर्वी भरडले जाणारे लोक आणि आता आधुनिक औषधोपचाराने डिसॉर्डर खणखणीत "मॅनेज" करणारे लोक पाहीले की विज्ञानाचे पाय धरावेसे वाटतात. पूर्वी अंगारे-धुपारे, मारझोड, चेटूक-भानामती वर ढकलणे, अघोरी उपचार करणे चालत असे. पण आता अक्षरक्षः अमाप औषधांचा शोध लागला आहे, थेरपी अस्तित्वात आहेत. कमाल वाटते वैद्यकीय ज्ञानामुळे किती "क्वालिटेटिव्ह" आयुष्य जगायला मिळतं.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे - औषधे वेळेवर घेणे. धिस इज सो क्रुशिअल. औषधांच्या वेळा पाळणे ही दुर्लक्षणिय बाब अजिबात नाही. फार महत्त्वाची असते. अन धरसोड अजिबात चालत नाही. बायपोलर सारख्या डिसॉर्डर्स बर्‍या होतच नाहीत "मॅनेजच" कराव्या लागतात अन काही पथ्यांचा (नियमित व्यायाम + पुरेशी झोप + वेळेवर औषधे) यांचा वसाच घ्यावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचन ही मुळातच passive आहे त्यामुळे त्याचा फार फायदा होत नाही पण नियमित व्यायाम,योगा,लिखाण,टेबल टेनिस( अन्य सुद्धा) सारखे खेळ पण सेल्फ अवेरनेस साठी आणि anxiety कमी करण्यासाठी मदत करतात.

मेंदूतील "रासायनिक असंतुलन" परत मूळपदी आणणं हे औषधांद्वारे करावच लागतं.
बरोबर आहे OCD वैगेरे साठी खूपच गुणकारी औषधी उपलब्ध आहेत आणि जादू केल्यासारखे पेशण्ट्स दुरुस्त पण होतात.
काही गुणकारी होमिओपथी औषधी पण आहेत मूडडिसॉर्डसाठी, त्यांचे फायदे असे कि दिवसभर ग्लानी राहत नाही.

तरीही काही जे Cluster- B डिसॉर्ड BPD , NPD वैगेरे फक्त औषधी मुळे ठीक होत नाहीत काही डॉक्टर्स पण या पेशण्ट्सला टाळतात. समुपदेश + थेरपी मुळे स्वतःचा स्वीकार करण्याची शक्ती वाढते, guilt कमी होतो आणि सकारात्मक फरक जाणवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The best idea would be to 'completely' disown the persona of oneself during such swings

I think this needs further elaboration. The phases of mania and depression are due to imbalance of chemicals in the body. With the advancement psychological pharmacology, it is possible to artificially induce mania and depression in an individual. It is possible to induce suicidal thoughts, let alone depressive, with medicines and drugs.

In normal course of life, a reasonable negative worldview is reasonable. However, a sustained negative view of 'one's own life' is not reasonable.

When people are abnormally high or low their thoughts and behaviors are totally absurd. When they become normal, they start thinking about their thoughts and actions during mood peaks/lows and feel extremely guilty. This itself pushes them into another cycle of depression or mania. That is why one should disown the entire persona when one was ill.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लाईक करण्यात आले आहे. नेमके अन मार्मिक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फक्त मराठीत असते तर बरे झाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

The best idea would be to 'completely' disown the persona of oneself during such swings

might result into Dissociative identity disorder. bad idea to disown anything that is your part.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचंही मह्णणं पटतय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आमच्या परिचयाचे एक रुग्ण आहेत. त्यांनी मॅनियाच्या वेळी केस, नखे वाढू दिली. कपडे मळके होते. एका दुकानात जाऊन त्या दुकानदाराची ५०-१०० व्हिजिटींग कार्ड्स घेतली. बाहेर येऊन ती हवेत उधळली. तो दुकानदार या माणसाला ओळखत नव्हता. त्याने पळत येऊन याला कानाखाली जबरदस्त चपराकी दिल्या. त्याचे कोणीतरी व्ह्डीओ शूटींग केले.
महाशय उच्चपदस्थ होते. रोज त्यांना तो प्रसंग बोचे. ते shopping complex ५० मी वर असूनही तिकडे फिरकेनासे झाले. 'मी असे कसे केले?'. शिवाय त्यांच्या अशा अपमानास्पद अजून ७-८ गोष्टी होत्या. म्हणून मी त्यांना डिसओनचा फॉर्म्यूला सांगीतला.
मी जे सांगत आहे ते सामान्य प्रकृतीच्या माणसासाठी सांगतोय. अर्थातच वैद्यकीय सल्ला असा नसेल तर मला मान्य आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपले पूर्वीचे अप्रगल्भ स्व डिसोन करण्याचा आढावा घेणारी ही कविता -

Ray Carver has a poem about this dilemma of having to own one’s younger self:

THE AUTHOR OF HER MISFORTUNE

I’m not the man she claims. But
this much is true: the past is
distant, a receding coastline,
and we’re all in the same boat,
a scrim of rain over the sea-lanes.
Still, I wish she wouldn’t keep on
saying those things about me!
Over the long course
everything but hope lets you go, then
even that loosens its grip.
There isn’t enough of anything
as long as we live. But at intervals
a sweetness appears and, given a chance,
prevails. It’s true I’m happy now.
And it’d nice if she
could hold her tongue. Stop
hating me for being happy.
Blaming me for her life. I’m afraid
I’m mixed up in her mind
with someone else. A young man
of no character, living on dreams,
who swore he’d love her forever.
One who gave her a ring, and a bracelet.
Who said, Come with me. You can trust me.
Things to that effect. I’m not that man.
She has me confused, as I said,
with someone else.
~ Ray Carver

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१००% सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत लेख पुराणातील वांग्यांप्रमाणे लेख या स्वरूपात छान वाटतो आहे. परंतु प्रत्यक्षात असे काही नसते. आधुनिक मुली तर सासू सासर्‍यांना कचरापेटीत टाकण्यास लायक असे समजतात असे वाचनात आले आहे व बहुधा ते खरेच असावे. मुलाचे लग्न लावून दिल्यानंतरही त्याचा व आपला जिव्हाळ्याचा संबंध हा फक्त यापुढेही त्याच्याशी एक व्यक्ती यापुरताच मर्यादित राहणार असून त्याचे कुटुंब ही अगदी भिन्न अशी एन्टिटी आहे व या एन्टिटीशी आपले फक्त औपचारिक संबंध असणार आहेत हे प्रत्येक आई-वडीलांनी लक्षात ठेवणे गरजेचे वाटते. असे केले नाही तर वृद्धापकाळात आत्यंतिक निराशा पदरी येणे संभवनीय वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले मत व्यावहारिक आहे. पण ते पचवण लोकांना जड जाते. बर्‍याचदा लोकांची कळत पण वळत नाही अशी अवस्था होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आधुनिक मुलींवर विनाकारण डाफरणे (हे त्या मुली आहे का आधुनिक आहेत म्हणून राग आहे कोण जाणे) सोडल्यास प्रतिसादाशी सहमती आहेच, मात्र प्रतिसाद हा संपूर्ण नाही असे वाटते.

कदाचित पुढिल अत्यावश्यक परिच्छेद/पुरवणी तुमचा प्रतिसाद पूर्ण करेल

जावईसुद्धा सासू सासर्‍यांकडे अजिबात लक्ष देत नाहीत व त्यांना अनेकदा हीनतेने वागवतात. मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर तिचा व आपला जिव्हाळ्याचा संबंध हा फक्त यापुढेही तिच्याशी एक व्यक्ती यापुरताच मर्यादित राहणार असून तिचे कुटुंब ही अगदी भिन्न अशी एन्टिटी आहे व या एन्टिटीशी आपले फक्त औपचारिक संबंध असणार आहेत हे प्रत्येक आई-वडीलांनी लक्षात ठेवणे गरजेचे वाटते. असे केले नाही तर वृद्धापकाळात आत्यंतिक निराशा पदरी येणे संभवनीय वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतकेच नाही तर काही कुटुंबे बघितली तर असेही म्हणावेसे वाटते:
काही सासू सासरे तर आपल्या मुला-नातवांकडे अजिबात लक्ष देत नाहीत व स्वतः अगदीच मनमानी वागतात. आपले लग्न झाल्यानंतर आपल्या पालकांचा व आपला जिव्हाळ्याचा संबंध हा फक्त यापुढेही त्यांच्याशी एक व्यक्ती यापुरताच मर्यादित राहणार असून त्यांचे कुटुंब ही अगदी भिन्न अशी एन्टिटी आहे व या एन्टिटीशी आपले फक्त औपचारिक संबंध असणार आहेत हे प्रत्येक अपत्याने लक्षात ठेवणे गरजेचे वाटते. असे केले नाही तर तरूणपणीच आत्यंतिक निराशा पदरी येणे संभवनीय वाटते.

थोडक्यात काय हे सारे परिच्छेद तितकेच उल्लेखनीय/दुर्लक्षणीय मते आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा प्यारा उग्गीच आहे बरं का ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऋषिकेश

मुलीच्या कुटुंबाबद्लचे तुमचे निरिक्षण गैर आहे असे म्हणता येणार नाही. परंतु परंपरागत भारतीय रुढीप्रमाणे मुलीचे (त्यात जावई आलाच) कुटुंब हे आई-वडीलांच्या कुटुंबापेक्षा भिन्न आहे असे नेहमीच मानले जाते. त्यामुळे त्याचा येथे उल्लेख करण्याची गरज मला वाटली नाही. याच परंपरेने मुलाचे आई-वडील त्याच्या कुटुंबाचा भाग आहेत असे मानले जात असे. आता ही परिस्थिती बदलली आहे व म्हणून मी माझे फक्त मुलाच्या कुटुंबाबद्दलचे निरिक्षण वर दिले आहे.
आधुनिक मुली कितीतरी जास्त कार्यक्षम आहेत आणि अनेक जबाबदार्‍या समर्थपणे पेलू शकत आहेत या बद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. परंतु समाजरचना बदलत चालली आहे व त्यानुसार आई-वडीलांनी बदलण्याची गरज आहे असे मला वाटते म्हणून हा प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्णपणे सहमत आहे.
"आधुनिक मुली सासु सासर्‍यांना कचरापेटी समजतात" वगैरे टाळले असते तर दोघांचेही टंकनश्रम वाचले असते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आधुनिक मुली कितीतरी जास्त कार्यक्षम आहेत आणि अनेक जबाबदार्‍या समर्थपणे पेलू शकत आहेत या बद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही.

गतकाळातल्या मूली कमी क्षम वैगेरे नव्हत्या असा कयास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पूर्वीच्या कालातील मुलींना घराच्या बाहेर पडताच येत नसे. त्यामुळे क्षम असल्या तरी आपली कार्यक्षमता दाखवण्याची संधी अभावानेच मिळत असे. आजच्या मुलींना ती मिळते व त्यामुळे त्या जास्त कार्यक्षम बनू शकल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वीच्या काळी ओबीसींच्या, दलितांच्या आणि कुणब्यांच्या सगळ्या बायका घराबाहेर जायच्या. नीट काम करायच्या. त्यांचा अपवाद करून हे विधान मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

...पूर्वीच्या काळी गणपतीच्या बायकासुद्धा काम करायला घराबाहेर पडायच्या. लोकांच्या घरी पाणी भरायच्या. वर्किंग-क्लास वीमेन होत्या त्या.

ऐकले नाहीत का कधी, "अमक्यातमक्याच्या घरी, ऋद्धी-सिद्धी पाणी भरी"?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता आपण सगळे कुठे ना कुठे पाट्या टाकतोच ना. पण तसे म्हणणे प्रतिगामी ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि घरी येऊन नवऱ्याचा मार खायच्या वगैरे पुरवणी राहिलीच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मार देणारी बायको बिरबलाच्या गोष्टीत ऐकली होती. बायकोला मार देणे अलिकडची फॅशन असेल. पुण्या-मुंबईची असेल. गावाकडे बायकोवर हात उचणाराला नामर्द म्हणतात. अर्थात असे लोक नसतात असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बायकोला मार देणे अलिकडची फॅशन असेल. पुण्या-मुंबईची असेल. गावाकडे बायकोवर हात उचणाराला नामर्द म्हणतात. अर्थात असे लोक नसतात असे नाही.

तद्दन वाढीव अन तितकाच चूक प्रतिसाद ROFL एखाद्या सिष्टिमेत दोष नाहीच असे एकदा ठरवले की असे समर्थन सुरू होते. गावाकडे लाख म्हणत असतील नामर्द वैग्रे, पण ती फ्याशन पुण्यामुंबैची अन अलीकडची आहे हे म्हण्ण्याला अर्थ काय? की दाबली कळ आणि झोडले पुण्यामुंबैला अन वर्तमानकाळाला असा प्रकार चालू आहे? नक्की त्या शंकेला तरी आधार काये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुला माहित नसेल रे. घराबाहेर काही त्रास झाला, कोणी बॉसिंग केलं त्याचा राग बायकापोरांवर काढताना, घरात, चार भिंतीच्या आत न काढता चारचौघांसमोरच काढायचा अशीही पद्धत असेल पुण्या-मुंबईबाहेर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तू कुठे निसर्गाच्या सान्निध्यात वगैरे वाढलाहेस, इतकं सगळं ठाऊक असायला?! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१ हेच लिहायला आलो होतो. प्रतिसाद लिहिला आहे म्हणून तसाच पेष्टवतो:
आधार कसला?
तु दुसरीत झोपाळ्यावर मुलीसोबत बसून रोमांचित वगैरे झालायस का? नाही ना? मग संपलं! तु आहेस निसर्गापासून दूर पुण्यामुंबैत वाढलेला एक यःकश्चित जीव.
अर्थात तुझ्या-माझ्यावर झालेल्या शहरी कंडिशनिंग मुळे आपल्याला काही म्हंजे काही कळत नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किती कळते झाले आहेत ऐसीकर! कौतूक वाटलं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओ हॅलो!!!!!!!!! मी मिरजेत वाढलोय, पुणे अन मुंबैचा वट्ट संबंध नै, काय समजलेत!! निसर्गाच्या सान्निध्यात वाढलो पण अगदी थेट नै. मिरजेत असलो तरी शहरी कंडिशनिंग होतेच म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हॅट साला! मिरज तर मिरज. 'पुण्या-मुंबईचे लोक' ही संज्ञा वापरायला लोक खरोखरच पुण्यामुंबैतले असावे लागतात असं काही नाही. त्यांना लेखकाच्या मते शष्प अक्कल नसणे इतकंच गृहीतक पुरेसं आहे, हे मी तुला सांगायचं होय? जालीय वय किती तुझं बॅटू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तरीही नाहीच!!! जसे नॉर्थवाले लोक 'मद्रासी' म्हंटात तशी ही एक जेनेरिक संज्ञा आहे हे ठौक आहे, पण हे बदलायला हवं. दक्षिण म्हाराष्ट्राची ऐडिंटिटी वळखल्या गेलीच पायजे!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरं, इथून पुढे 'तुम्ही पुण्या-मुंबै-मिर्जेचे लोक...' असं म्हणीन मी. बास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धण्यवाद हो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गावाबाहेरचे सगळे जग पुणे-मुंबैच असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मग सगळे सौदिंडियन मद्राशी असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लुंगी डांस, लुंगी डांस, लुंगी डांस, लुंगी डांस!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डांस नै हो डान्स Wink

मराठी उच्चार दोहोंचे वेगळे होतात. हे म्हणजे लुंगी नेसून डांसा काढल्यागत वाटते ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दिवस सार्थकी लागला थोर विचार ऐकून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रोज आशिर्वाद घेत राहा. संपूर्ण जीवन सार्थकी लावायची क्षमता आहे माझ्याकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

परंतु प्रत्यक्षात असे काही नसते.

I don't agree with this generalization. I have few friends who live happily with their in-laws.

आधुनिक मुली तर सासू सासर्‍यांना कचरापेटीत टाकण्यास लायक असे समजतात असे वाचनात आले आहे व बहुधा ते खरेच असावे.

This is not true.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला प्रतिसाद प्रचंड आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

I have few friends who live happily with their in-laws.
But what about other friends who are not part of this 'few friends' group?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

It should be 'a few', not just few.
Few means none.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शक्य आहे. की जास्त करुन "सासरचा हस्तक्षेप न जुमानणार्‍या" मुली दिसत असतील. मी फार जणींना जवळून ओळखत नाही. अजून २ गोष्टी-
(१) सून जेव्हा नवीन घरात येते तेव्हा "गोईंग दॅट एक्स्ट्रा माइल", तिला कोणी समजून/सांभाळून घेतलेलं असेल तर ती कृतज्ञ रहाते
(२) मला असं वाटतं (अनुभव नाही) की सासरच्यांनी त्यांची वडीलोपार्जित संपत्ती मुलांच्या (मुलगा+मुलगी) नावावर चटकन करुही नये. अगदी शेवटी स्वतःला मिळालेली वागणूक पाहून वेळप्रसंगी खमका निर्णय घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधुनिक मुली तर सासू सासर्‍यांना कचरापेटीत टाकण्यास लायक असे समजतात असे वाचनात आले आहे व बहुधा ते खरेच असावे.

This is not true.

That may be your opinion and I respect it. My observations however run contrary to that.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आधुनिक मुली तर सासू सासर्‍यांना कचरापेटीत टाकण्यास लायक असे समजतात असे वाचनात आले आहे व बहुधा ते खरेच असावे.<<
वरील वाक्यात काही मुली असा उल्लेख असेल तर ते खरे आहे. त्यासाठी त्यांचा कोडवर्ड डस्टबीन असा आहे. यावर अनुरुप विवाह संस्थेच्या एका कार्यक्रमात चर्चासत्रात याचा विचार झाला होता. मी त्याला उपस्थित होतो. वर्तमान पत्रातही हे येउन गेले आहे. आपल्याला ही आधुनिक मुली म्हणजे हल्लीच्या काही मुली असा अर्थच अभिप्रेत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अर्थातच मला सर्व मुली असा विचार करतात असे म्हणायचे नाही. काही मुली असा विचार करणार्‍या नक्कीच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण इतर सर्व अनुरुप, छान छान स्थळांप्रमाणे त्या नेहमीच ऑलरेडी यंगेज्ड असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बळंच? अशी वाक्ये "क्लिशवर्ड" झालेली आहेत आता खरे तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आधुनिक मुली तर सासू सासर्‍यांना कचरापेटीत टाकण्यास लायक असे समजतात असे वाचनात आले आहे व बहुधा ते खरेच असावे.

आता ह्या (सरसकट)विधानालाच एक्स्ट्रापोलेट करुन 'मुली आधुनिक झाल्या(पक्षी:घराबाहेर पडल्या) म्हणून त्यांच्यातली सासु-सासर्‍यांप्रती असलेली कणव कमी झाली' असे(सरसकट) म्हणता यावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा मुली शिकल्या, कमावायल्या लागल्यामुळे सासू-सासऱ्यांच्या जाचाखाली राहण्याची आवश्यकता राहिलेली नाही. सकच्छ का विकच्छ असे वाद सुरू होते त्याकाळात विकच्छ नेसणाऱ्या सुना आपल्या सासू-सासऱ्यांच्या मतांना कचरापेटी दाखवतात अशीही ओरड झालेली असू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बापरे सकच्छ म्हणजे ते लाल आलवण की काय? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. नऊवारी का पाचवारी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आयला ओके ROFL मी एकदम केशवपनचं केलं त्या सवाष्ण्याचं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी याला "काष्ट्याचं केशवपन" म्हणेन. ते तसंही आता सासू-सासरे असलेल्या पिढीनेच केलंय. आपण त्यांच्यासारखीच, कापडाची लांबी कमी केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काष्टा वॉज मोर लाईक अ पॅन्ट बट विथ मोअर अपिल यु नो!!, बट दि लास्ट जनरेशन शोड डस्टबिन टु इट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही पॅन्ट इंग्लिश का अमेरिकन? (रहावलं नाही. सॉरी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अंहं, हि तर आपली भारतीय पॅन्ट(तसं पहाता दोन्हीत अपिल आहेच नाहिका?), ब्रिटिश आणि अमेरिकन बहूदा ह्याला पॅन्ट म्हणतच नाहित, निदान अमेरिकन ह्याला ट्राऊजर म्हणतात. सॉरी कसचं, सासु-सुनेच्या नात्यात पॅन्ट आली म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा अनुभव उलट आहे. अमेरिकन बाहेरच्या वस्त्राला बिनदिक्कत पँट म्हणतात. ब्रिटीश ट्राउजर म्हणतात. अर्थात अमेरिकेत सुपरमॅन वगैरे लोकांनी "paradigm shift" केलेला असण्याची शक्यता आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सकच्छ का विकच्छ हा वाद सकाळ`मध्ये (परुळेकरांच्या) १९५०च्या पुढेमागे `वाचकांचा पत्रव्यवहार`ह्या सदरामध्ये काही महिने खेळला गेला होता.

तसेच वेणी का अंबाडा हा वादहि. अंबाडावाल्यांनी वेणीवाल्यांकडे असा बंपर टाकला की त्यांचा त्रिफळाच उडाला. (पंक्तीत वाढतांना वेणी आमटीत पडू शकते, अंबाडयात तो धोका नाही!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेणीमुळेच बहुतेक बुफे पद्धत आली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गंगावनासारखा आंबाड्याचा प्रकार असतो त्याला काय म्हणतात? सुपारीएवडी वर्जिनल केशसंपदा अस्लेल्या बाया तो रेडिमेड खोपा पिनांनी डकवून फिरताना आंबाडा देखिल पडू शकतो आमटीत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

...आजतागायत कोठल्याही पंक्तीत (अथवा बफेतसुद्धा) अंबाडीची भाजी दिसलेली नाही, त्यामागचे कारण आज कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीही केल तरी सासू सुनेच नात हे विळ्या-भोपळ्याचे असते असे आमची आई म्हणायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/