Skip to main content

लहान मुलांशी निगडीत प्रश्न

परवा ईशान्यला (वय वर्षे ६) एका संमारंभानिमित्त एका फार्महाउसवर घेऊन गेलो होतो. तिथे त्याला बुजगावणे दाखवले. कितीतरी वेळ तो त्याच्याशी खेळत होता. तिथे लावलेले मुळा, कांदा, लसूण, कोबी, इ इ दाखवले. मग परत येताना मॉल मधे गेलो. तिथे एक अतिशय उंच टप्पा खाणारा चेंडू घेऊन दिला. गेमच्या तीन सीडी घेतल्या. 365 stories of animals/faries/ghosts/bedtime/mythology अशी १०-१२ पुस्तकांची सीरीज आहे. त्यातली तीन पुस्तकं उचलली. त्यातली माहिती आणि चित्रं अत्यंत गोड! मला एक dvd player घ्यायचा होता. म्हणून जंबोच्या दुकानात गेलो. Electronics च्या दुकानात ईशान्य पेटूनच उठतो. कोणताही tablet PC , इ पाहिला कि त्यावर तूटून पडतो. मी स्वतः dvd player घेतला आणि त्याच्यासाठी काही नाही हे पाहून त्याने रागाने मला बिलिंग काउंटरवर एक गुद्दाच घातला. (मग) त्याला एक स्वस्तातला टॅब घेतला/घेऊन द्यावा लागला.

इथपर्यंत सगळे ठिक आहे. आणलेल्या गोष्टीत तो गुंतुन गेला. मग मी त्याला एक गोष्ट वाचायला सांगीतली. तो प्रत्येक २-४ शब्दांनंतर वेगळाच प्रश्न विचारू लागला. तेही ठिक. पण सोडलेला शब्द कोठे होता ते विसरू लागला. मग मी शोधून दिल्यानंतर पुढच्या ओळीत येताना चूकीची ओळ निवडू लागला. चक्क योग्य ओळीच्या २-३ ओळी खाली वा वर! मग त्याला 'लक्ष दे' म्हणून सांगताना माझा आवाज चढला तेव्हा घाबरून गेला. मला घाबरू नकोस हे त्याला समजावता येईना. मी त्याला रागावतच नाही म्हणून क्वचित आवाज किंचिंतही वाढला कि तो घाबरून जातो. हे कसे हाताळावे? त्याने बरोबर वाचावे अशी माझी अपेक्षा नसते. फक्त काय वाचत आहे हे लक्षात ठेवावे हे अपेक्षित आहे. त्याला थोडा थोडा अटेंशन डेफिसिटचा त्रास आहे. पण त्याला आवडणार्‍या गोष्टींत (गेम्स, भीम, मॅगी) मधे त्याला जगाचे भान नसते.

रात्री ११ ते ११.३० ला झोपून सकाळी तो ७ वाजता उठतो, ७.४५ ला स्कूल व्हॅनमधे असतो. सुटीच्या दिवशी तो १०.३० ला उठतो. म्हणजे त्याची झोप आणि वाढ यांच्यावर परिणाम होत असेल का? मी ८.३० पर्यंत झोपतो. आल्यावर तो खातो, झोपतो. मग (त्याची) आई त्याचा अभ्यास घेते. मी उशिरा म्हणजे ७-८-९ वाजता घरी पोहोचतो. त्याचे प्रांगणात खेळणे होतच नाही. मग तो इतर मुलांत कसा मिसळेल असे मला वाटते. त्याला खेळते ठेवण्यासाठी काय करावे लागेल.

माझा आणि त्याचा विकडेला संबंध फार कमी (काळ) येतो. मला याचे वैषम्य वाटते. (त्या एकत्रपणाची गरज नाही हा सल्ला अस्वीकार्य आहे, माझ्यासाठी). पाल्यासोबत जास्त वेळ देण्यासाठी काय करता येईल?

समजा काही समस्या नाहीत तरीही सहजीवनातला आनंद वृद्धींगत करण्यासाठी काय करता येईल? मला actionable points जास्त स्वागतार्ह वाटतील.

इथे माझे दिलेले केवळ उदाहरण आहे. असे सर्व प्रातिनिधिक प्रश्न आणि उत्तरे मांडावित.

ऋषिकेश Tue, 17/12/2013 - 17:31

प्रत्येकाने काय करावे हा अत्यंत वैयक्तीक प्रश्न आहे. खरंतर यावर लिहावं का? असा विचार करत होतो. पण इतका चर्चा विषय टाकलाच आहे तर फारतर मी काय करतो याची झलक देऊ शकतो.

१. मी मुलगी झाल्यापासून ऑफीसात संध्याकाळी ६ नंतर थांबायची वेळ महिन्यातून एखाद-दोनच्या वर येऊ देत नाही. अर्थात त्यासाठी सकाळी ८:३० ला ऑफीसात असतो. तसेही ऑफिस हा माझा आर्थिक मिळकतीचा मार्ग आहे. आणि त्याला तितकेच महत्त्व आहे. माझी पत्नीही ऑफीसला जाते. तीही संध्याकाळी ६ पर्यंत घरी येते.

१ब. जी कामे आउटसोर्स करता येतात ती केली आहेत. जसे भांडी घासणे, कचरा/लादी पुसणे, गाड्या धुणे, संध्याकाळच्या पोळ्या, भाजीची पूर्वतयारी (फक्त चिराचिरी वगैरे - भाजीची चव घरगुती आवडत असल्याने भाजी घरीच बनवली जाते) वगैरे कामे आउटसोर्स आहेत. त्यामुळे मुलीला अधिक वेळ देता येतो + थकणे कमी होते.

१कः मी व मुलगी दोघेही सकाळी ५:३० / ६:०० ला उठतो (ती सात/साडेसात वाजता व मी दहा वाजत झोपतो). तिला दिला जाणारा सकाळचा वेळ सगळ्यात क्वालिटी वेळ असतो हे निरिक्षण.

१डः शनिवार-रविवार फक्त कुटुंबाला असतात. ऑनलाईन जाणेही टाळतो. भाजी-बाजारात मुलीला घेऊन जातो. मॉलमध्ये जाणे अगदीच वर्ज्य! त्यापेक्षा तिला एखाद्या चित्र प्रदर्शनाला, प्राण्यांच्या झू मध्ये, कधी जवळच्या चर्चमधे मास ऐकायला, कधी जवळच्या मंदीरातील सकाळच्या किर्तनाला, कधी समोरच्या टेकडीवर, कधी तलावाच्या काठी, कधी नातेवाईक/मित्रमंडळींच्या घरी घेऊन जातो. हा विकांताला तिच्याबरोबर जाणारा वेळ माझा प्राणवायु आहे.

२. माझी मुलगी ६ महिन्यांची असल्यापासून भरपूर मुले (३०+) असलेल्या पाळणाघरांत सोडतो -आजी आजोबाच सोडतात नी घेऊन येतात. (तिचे आजी-आजोबा घरीच असतात, तरीही.) मुले चार लोकांत उत्तम मिसळतात + आपल्याला आराम मिळतो + माझ्या आई-वडिलांना दुपारची शांत झोप मिळते + मी व बायको एकत्र सुट्टी काढून/वर्क फ्रॉम होम घेऊन व तिला पाळणाघरात सोडून चित्रपट बघणे/नाटके बघणे/भरपूर गप्पा मारणे करू शकतो.

२बः घरी भर्पूर लोकांचे येणे जाणे आहे. माझे व पत्नीचे अनेक नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, त्यांची कुटुंबेच्या कुटुंबे अनेकदा घरी येतात / मूड असेल तर रहातात (आम्ही घरी नसु तर त्यांचे ते जेवणही करून घेतात - खातात ;) ) त्यामुळे विविध वयाच्या अनेक व्यक्तींसोबत वावरायची/मिसळायची मुलीला आपोआप सवय होते.

३. मुलगी ६ महिन्यांची असल्यापासून 'पुस्तक' हे तिचे सर्वात आवडते खेळणे आहे. दर आठवड्याला किमान एक तरी पुस्तक आणतो. भरपूर चित्रांचे, विविध शैलीतल्या चित्रांचे, कधी फोटोंचे, कधी कॉमिक्स. तिला त्यातील कथा कळत नाही पण आता (पावणेदोन वर्षाची आहे) बरीचशी चित्रे कसली आहेत/ पात्रे काय करत आहेत हे ती बोबड्या बोलात सांगु शकते. मला विविध गोष्टींचे निरिक्षण करायची सवय आहे. ते तिच्यासमोर प्रकटपणे करतो. जसे नुसते "चिऊ/काऊ" न करता ते कबुतर बघ, ती साळुंकी बघ पासून तो "वेडाराघु" बघ सांगायचो. आता ती किमान १० वेगवेगळे पक्षी कधी ओळखते/ कधी विसरते. १५एक प्राणी सहज ओळखते. १०-१२ बडबडगीतांचे शेवटचे शब्द रिपिट करते.

४. मुलीला कार्टून बघायची आवड आहे. पण ते टिव्हीवर न दाखवता ऑनलाईन दरवेळी वेगवेगळ्या अ‍ॅनिमेशन कंपन्यांनी तयार केलेली गाणी-गोष्टी दाखवतो. मुलांच्या मेंदूत प्रतिमा/चित्रे यांची विविधता ठसावी + एकाच प्रतिमेच्या/हिरोच्या मागे लागणे टळावे हा उद्देश.

५. विकत घेतलेले मोठाले गेम्स शुन्य. काही भेट मिळालियेत तितकीच. त्यापेक्षा क्ले, लेगो सारखे क्युब्ज, हार्मोनियम, पिपाणी, एक डमरू, मोराचे/कावळ्याचे/कबुतराचे/चिमणीचे वगैरे पिसे, रोजची ताजी फुले, खडूचे रंग, वॉटर कल्रर्स, पेन्सिल कलर्स, (कधी पाण्यात कुंकु/कधी हळद/कधी बुक्का घालून केलेले घरगुती रंग), आदल्या दिवशी खालून वेचलेले दगड/फांद्या/काटक्या/माती इत्यादी गोष्तींसोबत ती तासनतास खेळाते.

६. सध्या मुलीला ओरडायचे वय नाही. मात्र तिला योग्य तो मेसेज देण्यासाठी "चांदोमामा, घड्याळ, बाहुली वगैरे तिच्या मित्रांना ओरडा खावा लागतो" ;)

७. घरात कोणाचीच (कोणाही एकाची) सत्ता चालत नाही. अर्थात तिचीही नाही!

आणि सर्वात महत्त्वाचे
८. जमेल+रुचेल्+परवडेल तितकी मुलांची काळजी घेतो. काळजी 'करत' बसत नाही :)

अजो१२३ Tue, 17/12/2013 - 17:42

In reply to by ऋषिकेश

तुमचे कौतुक करावे तितके कमी. सुयोग्य पालक तर आहातच वर फारच नशीबवान पण आहात. आमच्याकडे आजी आजोबा दूर राहतात. घरी कोणीच भेट देत नाही. मुलाला वर्दळ आवश्यक आहे असे वाटते. वर्क फ्रॉम होम अशक्य आहे. आता मंदी आहे म्हणून मी इतके टंकून घेतोय. सात वर्षांत ते ही शक्य नव्हते. वर्दळ मला आवडते. कशी वाढवता येईल?

ऋषिकेश Wed, 18/12/2013 - 09:00

In reply to by अजो१२३

वर्दळ मला आवडते. कशी वाढवता येईल?

वर्दळ नातेवाईकांची/घरच्यांचीच हवी असे कै नै. मित्रमंडळी, त्यांच्या फ्यामिलीजही त्यात येतात.

पहिला टप्पा लोकांना घरी जेवायला बोलावणे. उगाच, विनाकारण! नुसते "एकदा या भागात आलात की घरी या हं जेवायला" असं निमंत्रण नव्हे. या या दिवशी सकाळी जेवायला या, दुपारभर गप्पा मारू किंवा संध्याकाळीच या आणि रात्री जेऊन जा असं टाईम बाऊंड बोलावणं. पहिल्यांदाच घरी येणार्‍या मंडळींना विशेषतः महिलांना अगदी छोटीशी का होऊ ना भेटही द्या. नाही म्हटले तर "पहिल्यांदाच आला आहात घरी. असु दे पद्धत आहे" वफैरे ड्वायलाग तयार ठेवा ;)

दुसरा टप्पा अ:
त्यानंतर मग लोक आपल्या घराला/वातावरणाला सरावली, आपल्याला त्यांचा-त्यांना आपल्या रोजच्या स्वभावाचा अंदाज आला की आपल्याला आवडलेल्या (आपण कंफर्टेबल असणार्‍या) लोकांना रात्री रहायला - नाईट ऑटला- बोलवायचं.

दुसरा टप्पा बः तोवर त्यातील काही आपल्यालाही घरी बोलावतातच, त्यांच्या घरी खुशाल जायचं. जाताना मुलांना खाऊ / नसल्यास मोठ्यांसाठी खाऊ/बाटली यथाशक्ती यथामती घेऊन जा ;) (तुमचा मित्र/मैत्रीण तुम्हाला रोजचे असतात. त्यांच्या कुटुंबीयांसाठी तुम्ही नवे-अपरिचित असता. प्रत्येकाला पहिल्या भेटीत संकेत झुगारून इन्फॉर्मल वागलेलं किती रुचेल माहिती नाही).

मग हळु हळु भेटीगाठी वाढल्या की मग यातले नाविन्य संपते, कोरेपणाचे कंगोरे झिजतात.

टिप१: फक्त तुमच्या मित्रांपुरत्या या भेटी सिमीत ठेऊ नका. तुमच्या मैत्रिणी, बायकोचे मित्र/मैत्रीणी, मुलांचे मित्र्/मैत्रीणी त्यांची कुटुंबे सगळ्यांना बोलावत रहा. आपल्या मित्रांचे कौतुक केलेले, त्यांच्याशी आनंदाने बोललेले आपल्या जोडीदाराला, मुलांना खूप आनंद देते. माझ्या मुलीच्या मित्रमंडळींतील यच्चयावत बच्चे कंपनीसोबत खेळले, त्यांना कौतुक केले, त्यांना जवळ घेतले की मुलीला पूर्वी असूया वाटायची आता कळू लागल्यावर आनंद होतो.

टिप२: सुरवातीला तुम्हाला नक्की आवड्तात व तुम्ही केलेल्या जेवणातील ब्लंडर्स खपतील अशाच लोकांना बोलवा. (आमच्याकडे मोठ्या प्रमाणात जेवण असेल तर मी व बायको दोघेही आचारीअसतो, रोजच्या प्रमाणाचा अंदाज असला तरी १०-१२ लोकांचा अंदाज चुकून पदार्थ बिघडु शकण्याची शक्यता गृहित धरावी लागते.) सरावाने आता १५-२० लोकांपर्यंतचे २ गोडाचे बेसिक जेवण मी व बायको दोघेही एकेकट्याने करू शकु असा विश्वास आहे. :) - पुण्यातील ऐसीकरांना: घरी येताय का बोला? पुढला कट्टा घरी करू ;)

मी Tue, 17/12/2013 - 17:52

तुमचा मुलगा इतर मुलांसारखाच नॉर्मल आहे.

>>त्याला थोडा थोडा अटेंशन डेफिसिटचा त्रास आहे. पण त्याला आवडणार्‍या गोष्टींत (गेम्स, भीम, मॅगी) मधे त्याला जगाचे भान नसते.

त्याला अटेंशन डेफिसिटचा त्रास नाही तर तो ज्या गोष्टींमधे अटेंशन देऊ शकतो अशा फार थोड्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत, त्याची अनेक छंदांशी ओळख करुन द्या, तुमचा त्याच्यासाठीचा अटेंशन स्पॅन वाढवा.

>>मी त्याला रागावतच नाही म्हणून क्वचित आवाज किंचिंतही वाढला कि तो घाबरून जातो. हे कसे हाताळावे?

आवाज वाढवू नका. एवढेच.

>>पाल्यासोबत जास्त वेळ देण्यासाठी काय करता येईल?

त्याचा फोनफ्रेंड बना, त्याच्या डेली-रुटिनचा तुम्ही एक भाग असणे गरजेचे आहे.

>>त्याने बरोबर वाचावे अशी माझी अपेक्षा नसते. फक्त काय वाचत आहे हे लक्षात ठेवावे हे अपेक्षित आहे.

लक्षात ठेवण्याची अपेक्षा अवास्तव आहे, त्याला वाचु द्या, त्या गोष्टींचे संदर्भ तुम्ही त्याला रोजच्या आयुष्यात देत रहा. त्यातली रंजकता त्याला सापडली कि लक्षात रहाण्याची प्रक्रिया सहजगत्या घडेल. फक्त त्याने वाचत रहावे ह्यासाठी त्याच्या आसपासचे वातावरण तसे हवे.

>>मग तो इतर मुलांत कसा मिसळेल असे मला वाटते. त्याला खेळते ठेवण्यासाठी काय करावे लागेल.

त्याला तसे मित्र मिळतील असे वातावरण हवे, त्यानंतर त्याला आवडले तर तो खेळेल अथवा खेळणार नाही. वातावरण उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी तुमची.

>>माझा आणि त्याचा विकडेला संबंध फार कमी (काळ) येतो.

हे बदला. हे अनिवार्य असल्यास परिस्थिती स्विकारा असे सांगेन.

तुमच्या अपेक्षांचे प्रत्यक्ष सादरीकरण कमी करा, पण अप्रत्यक्षरित्या त्याला विविध प्रकारचे वातावरण उपलब्ध होईल हि काळजी घ्या असे सुचवेन.

अजो१२३ Tue, 17/12/2013 - 18:04

In reply to by मी

धन्यवाद. फोनची आयडीया तर जामच आवडली आहे. लगेच अंमलात आणतो.

लक्षात ठेवण्याची अपेक्षा अवास्तव आहे, त्याला वाचु द्या,

इथे घोळ होतोय. माझी अपेक्षा असते कि त्याने हे लक्षात ठेवावे कि १. आपण वाचतोय २. पानावरच्या ३-४ पैकी कोणती कथा वाचतोय. ३. साधारणत: आपली नजर कुठे होती. ४. आपण शेवटी वाचलेला शब्द कोणता?

आशय लक्षात ठेवावा ही अपेक्षा नाही.

अवांतर -तो 'पुढची ओळ' म्हणून कोणतीही ओळ वाचतो, त्याचे काय करावे?

मी Tue, 17/12/2013 - 18:21

In reply to by अजो१२३

आशय लक्षात ठेवावा ही अपेक्षा नाही.
अवांतर -तो 'पुढची ओळ' म्हणून कोणतीही ओळ वाचतो, त्याचे काय करावे?

आय गेट दि पॉइंट. साधारणपणे ती ओळ वाचताना त्याला फार श्रम पडतात त्यामुळे कंटेक्स्ट हरवतो, असे होत असल्यास सोप्या वाचनाने सुरुवात करुन बघा. थोडे ऑफ-दि-रोड - गोष्ट गोष्टीसारखी असु द्या, त्याचा अभ्यास नको, म्हणजे त्याला हवे तसे वाचू द्या, प्रत्येक लाईन महत्त्वाची नाही, त्याचा अटेंशन स्पॅन सुधारण्यासाठी गोष्ट वाचायला सांगु नका, त्याने वाचलेल्या गोष्टींचा संदर्भ(संवादातुन) जेवढा जास्त त्याला समोर येत राहिल तेवढा त्या गोष्टी वाचण्याकढे त्याचा कल वाढत राहिल.

'मुलांनी हाताने जेवले पाहिजे', 'काटा-चमचा योग्य रितिने वापरला पाहिजे' वगैरे गोष्टी मुले मोठी झाल्यावर होणार आहेतच, त्यासाठी पालकांनी चिंतत होण्याचे कारण नाही असे मला वाटते.

............सा… Tue, 17/12/2013 - 19:37

"अटेन्शन डेफिसीट" चा त्रास आहे का हे फक्त "ट्रेन्ड प्रोफेशनल" सांगू शकेल अर्थात डॉक्टर. मी अनेक लोकांना स्वतःच्या "अर्धवट" ज्ञानाने इतरांना लेबलींग करताना पाहीलेले आहे. आणि त्याची मनस्वी चीड आहे.

अजो१२३ Tue, 17/12/2013 - 22:24

In reply to by ............सा…

शाळेत त्याच्या तक्रारी आल्या होत्या. तेव्हा डोक्टरला दाखवले होते. त्यांनी बर्‍याच टेस्ट करून हे सांगीतले आहे.

अजो१२३ Fri, 20/12/2013 - 18:11

In reply to by ............सा…

ईशान्यची attention deficit ची दोनदा करवली होती. मूलतः त्याला अभ्यासच आवडत नाही आणि त्याला असा कोणता त्रास नाही असे माझे म्हणणे बायकोने आणि डॉक्टरने अमान्य केले होते. जनरली attention deficit असेल तर मुले खूप हा य आय क्यूची असतात, इ म्हणतात. पण याच्या बाबतीत आय क्यू नॉर्मल रेंजच्या तळाला निघाला. डॉक्टर म्हणाले कि हे ही इतकं विश्वसनीय नाही कारण याचं attention नाही म्हणूनच आय क्यू कमी येत. नंतर मी प्रचंड शांतपणे घेतलं. एकदम कूल राहू लागलो आणि त्याच्याकडून अपेक्षा करणंच सोडून दिले. अगदी त्याच्या आईचा अभ्यासाचा धोषा पण सौम्य करवून घेतला. अन लो. महिन्यातच त्याचा attention span वाढला. आता तर तो एक गोष्ट वैगेरे सलग वाचतो. अभ्यासाला सलग तास दीडतास बसतो.
मूलांशी आपण कसे वागतो त्याचा त्यांच्या वर्तनावर प्रचंड परिणाम होतो असे एकूणात वाटते.

मिसळपाव Wed, 18/12/2013 - 00:50

" ...त्याच्यासाठी काही नाही हे पाहून त्याने रागाने मला बिलिंग काउंटरवर एक गुद्दाच घातला. (मग) त्याला एक स्वस्तातला टॅब घेतला/घेऊन द्यावा लागला....."- हे खटकलं. घेउन द्यावा लागला?? त्याला नवं खेळणं हवं असणं साहजिकच आहे. पण त्याचबरोबर "बाबाला गुद्दा मारून (किंवा दुसर्‍या प्रकारचं अकांडतांडव करून) उपयोग नाहि" हे त्याला कळणं पण आवश्यक आहे.

एखादि गोष्ट करणं चूक कि बरोबर हे त्याला आत्ता तुमच्याकडूनच कळणार. "मी रागावलो तर तो घाबरतो" म्हणून आत्ता रागावला नाहित त्याला तर पुढे त्याचंच नुकसान होणारे. अर्थात 'रागावणं आवश्यक आहे' म्हणजे ओरडणं, फटके/धपाटे मारणं, खायला-प्यायला न देणं नव्हे. "टाईम आउट" फार उपयोगी पडतो. "आरडाओरडा केलास, फेकाफेकी केलीस तर हा खेळ मिळणार नाहि" एव्हढं (सहसा) पुरतं. अर्थात व्यक्ति तितक्या प्रकृती. माझ्या मुलाना हे उपाय पुरले म्हणजे सगळ्यानाच चालतील असं नव्हे. पण करून पहा असं जरूर सांगेन.

बुजगावण्याशी खेळत होता - उत्तम. त्याची कल्पनाशक्ति वापरेल असे खेळ आणून द्या. आणि त्याच्याबरोबर खेळण्याचा, त्याच्याबरोबर वेळ घालवण्याचा जिवापाड प्रयत्न करा. "चल मोगँबोची गोष्ट करूया - एक वाक्य तू आणि एक वाक्य मी", "मला आत्ता खोलीत काळी/निमुळती वस्तू दिसत्येय. ओळख कुठली?", "आज दुपारी लेगो (तत्सम) सेटने काय करूया तू आणि मी?", "चल अग्गोबाई/ढग्गोबाई CD लाउन नाचूया दोघे जणं", "आपण वेगवेगळ्या बिया लावुया छोट्या कुंड्यातनं, या चार तुझ्या त्या चार माझ्या, तू काय लावणारेस?", "मी आता थोडा वेळ ईशान्य होतो, तू आई हो आणि आई आता बाबा बनणारे" अशी खूप खूप धमाल करा त्याच्याबरोबर. शेवटचा प्रकार जरूर करा. मुलं आपलं किती निरिक्षण करतात बघून थक्क व्हाल!!

............सा… Wed, 18/12/2013 - 01:29

In reply to by मिसळपाव

सुंदर!!! केवढे खेळ सांगीतलेत. पैकी "एक ओळ तू- एक ओळ मी" एवढेच मला माहीत होते. हां रात्री झोपताना गोष्ट मात्र रोज सांगीतली. इतकी झोप अलेली एके दिवशी की तिला चुकुन म्हटले "मग प्रल्हादाने नरसिंहाला मांडीवर घेतले व तीक्ष्ण नखांनी ...." =)) मुलगी (५ वर्षाची चिमुरडी अन टक्क जागी) कसली हसायला लागली. हाहाहा खूप मजा आली ते आठवलं की.
__________
मी मुद्दाम उपमा/रुपक (सिमिल्/र्हेटॉरीक) अलंकार वापरत असे. तिला म्हणे काय गं पोपटासारखा हिरवा मस्त फ्रॉक घातलायस वगैरे. एकदा मी काळा ड्रेस घातलेला पाहून ही म्हणते " ममा यु आर लुकिन्ग सो ब्युटीफुल लाइक अ बॅट" =))
मी तो प्रसंग रीडर्स डायजेस्टला "ऑल इन डेझ वर्क" का कशात पाठविलेला. बहुतेक प्रसिद्ध झाला कारण रीडर्स डायजेस्टचा १ वर्षाचा फुकट सप्लाय (पुरवठा) घरी येत होता.
_____________________
अजून एक खेळ आम्ही खेळत असू - चिऊचं पिल्लू चिऊला म्हणालं "आई आई मला ना अळ्यांचा पिझ्झा आणि कीड्यांचे सॉस देशील का?" ..... असे भन्नाट काँबीनेशन एकमेकींना सांगून आम्ही खूप हसत असू.
_____________
नंतर मुलीने कधी त्याग केला म्हणजे गुलाबी टियारा तिला व अन्य मुलीला हवा असताना एकच टियारा त्या मुलीला दिला व स्वतः हिरवा स्वीकारला तर मी तिला सांगे "गुड जॉब! गॉड हॅज रिटन धिस इन्सिडंट इन गोल्डन कलर मोनोकोर्सीव्हा फाँट" ;)
आणि तिलाही ते खरे वाटे.
_________________
मिसळपाव आपल्या एका सुंदरशा प्रतिसादाने या आठवणी एखाद्या धबधब्यासारख्या आल्या.
____________
अरे हो आणखी एक हा नेहमीचा खेळ -"मी जेव्हा जन्मले (डिसेंबर) तेव्हा शेजारी पाजारी /नातेवाईक म्हणाले - ऐकलत का अमुक अमुक यांच्याकडे बाळ आलय पण काय बाई मेली थंडी कसं जायचं तरी बाळाला पहायला :(
कोणीतरी जुलै मधल्याचं नाव घेऊन तोच डायलॉग म्हणायचा - अमका जेव्हा जन्मला (जुलै) तेव्हा शेजारी पाजारी /नातेवाईक म्हणाले - ऐकलत का अमुक अमुक यांच्याकडे बाळ आलय पण काय बाई मेला पाऊस कसं जायचं तरी बाळाला पहायला :(
पण तू जन्माला आलीस तेव्हा वसंत जवळजवळ आलाच होता मग सगळे म्हणाले - ऐकलत का अमुक अमुक यांच्याकडे बाळ आलय पण आहाहा किती सुंदर वारा वाहतो आहे, कोकीळा गात आहेत, आंबेही आलेत बाजारात चला चला बाळाला पहायला जाऊ अन येताना आंबे आणू :)

मग मुलगी स्वतःच्या जन्मऋतूवर एकदम खूष होऊन खुदू खुदू हसायची :)
_____________
मुलांना ते स्वतः बाळ असताना कसे होते याचे कुतुहल असते. मुलगी तर सारखी एक प्रसंग सांगायला लावायची - "तू इवलसं पिल्लू होतीस ना तेव्हा मी ही नवी नवी आई होते अन मी तुला पालकाचं उकडून वरवरचं पाणी किंवा डाळीचं पाणी देण्याऐवजी, एकदम घट्ट पण द्रव डाळ चमच्याने द्यायचे अन तुला ते आवडत नसे पहील्या ३-४ वेळा तू मोठ्ठा आ करायचीस मग मात्र तुझ्या लक्षात आलं अन तू जीभु बाहेर काढून फक्त चव घेऊन मान वळवायला लागलीस. अशी कशी गं हुषार होतीस तू" ----- वगैरे आठवणी मुलीला फार फार आवडत. त्यांना स्वतःबद्दल खूप कुतूहल सतं अन ते आपणच आठवणी सांगून शमवू शकतो नव्हे ती पण आपल्या मुलांना आपली अमूल्य भेट असते.

मिसळपाव Wed, 18/12/2013 - 02:11

In reply to by ............सा…

धाकट्या मुलीला पहिल्यांदा बेबी सिरियल दिलं त्याचा व्हिडिओ. पहिल्या चमच्यानंतर थोडा अविश्वास - "हि काय भानगड काढल्येय आता ऐन भूकेच्या वेळेला"! - नंतर थोडं आवडतयसं वाटल्यावर चेहेर्‍यावर तशी रीअ‍ॅक्शन, मग जीभ बाहेर काढून चटकन घास खायचा प्रयत्न आणि शेवटी 'कोको' झाल्यावर भोकाड!!!! (पूर्वी तरी एखादि गोष्ट संपायची म्हणजे 'कोको व्हायची'.)

अरूण, खूप व्हिडिओ घे. खोलीच्या कोपर्‍यात कॅमेरा आधीच लाउन ठेवायचा. पंधरा-वीस वर्षानी परत बघशील तेव्हा नक्कि मला थँक्स देशील :-)

पण एक मात्र असतं. खेळायला, दंगामस्ती करायला मुलाना बाबा लागतो. पण सर्दि-पडसं, ताप मंडळी आली की आईशिवाय दुसरं कोणीच नाहि. अशा वेळेला बाबाने मुकाट बाजूला होऊन मायलेकराना यथाशक्ति मदत करावी.

............सा… Wed, 18/12/2013 - 02:30

In reply to by मिसळपाव

हाहाहा "कोको". मस्त.

पटकन मोठी होतात मुलं अन आपलं हृदय मात्र बाळमुठीतच घट्ट पकडलेलं रहातं. मी टेक्सासला होते तेव्हा ३ वर्षाची मुलगी स्वप्नात यायची इतका वेगळाच वाटायचा तो दिवस. आता १३ वर्षाची असली तरी माझ्या स्मरणातलं ३-५ हे जादूमय वय आहे. कारण नंतर ६ वर्षं मी घराबाहेर दूर होते अधून मधूनच जाणं होई.

आता मात्र परत एकत्र आलोय ..... मज्जा सुरु :)
__________
मी लहान असतेवेळी सकाळी बाबा डोक्यावरुन हात फिरवून उठवायचे तेव्हा एक वाक्य ते नेहमी म्हणत "एन्जॉय धिस टाइम. इट इझ द बेस्ट टाईम.". खूपदा मुलीला उठवताना मला ते वाक्य आठवून भरुन येतं पण मी मात्र ते वाक्य म्हणत नाही कारण मन म्हणतं मुलीचा बेस्ट टाईम अजून येईल, खूप येईल, सतत येईल. आता थोडीच बेस्ट आहे अजून खूप चांगलं घडायचय :)

अजो१२३ Wed, 18/12/2013 - 08:51

In reply to by मिसळपाव

अरूण, खूप व्हिडिओ घे. खोलीच्या कोपर्‍यात कॅमेरा आधीच लाउन ठेवायचा. पंधरा-वीस वर्षानी परत बघशील तेव्हा नक्कि मला थँक्स देशील

आपल्या सर्व मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. व्हीडिओ नक्कीच घेईन. त्याच्या आईला हा प्रकार फार आवडतो, म्हणून मी टाळायचो. तसा मी जेव्हा मोकळा असतो (मला ऑफिसचे काम नाही अन् मुलाला शाळा / गृहपाठ नाही) तेव्हापैकी ९०% टाइम तरी आम्ही खेळतच असतो.

अजून एक आहे. ईशान्य लेट लतिफ आहे. कुस वळणे, रांगणे, चालणे, बोलणे हे त्याचे इतर सर्व मुलांपेक्षा १ १/२ वर्षांनी झाले. ३ वर्षांपर्यंत तो केवळ 'पापा' हा एकच शब्द बोलायचा. बहुतेक प्रत्येक मुलाचे शारीरिक मानसिक वय वेगवेगळ्या गतीने वाढते असे असावे. म्हणून शाळेतल्या इतर मूलांच्या गतीने अभ्यास करणे त्याला शक्य नसावे. आई मात्र त्याच्या पाठीमागे पडलेली असते. ते ही फारसे बघवत नाही. मधे मी त्याला १ वर्ष ड्रॉप करावे असा विचार करत होतो. सात्-सात विषय जास्त होता पहिलीला. इतक्या लहानपणी इतकं टाईट शेड्यूल पहायला आवडत नाही. शिवाय त्याचं अभ्यासात लक्ष नसतंच म्हणून त्याच्या आणि त्याच्या आईच्या संवादाला तो गोडवा नसतो गृहपाठ घेताना. असं तुमच्याकडे /पाहण्यात होतं का? मग काय करावं? तसा मी खूप प्रयत्न करून त्याचा गृहपाठ सौम्य करून घेतला आहे.

मिसळपाव Wed, 18/12/2013 - 15:52

"......बहुतेक प्रत्येक मुलाचे शारीरिक मानसिक वय वेगवेगळ्या गतीने वाढते असे असावे. .........." प्रश्नच नाहि - नाहितर छापाचे गणपती होतील ना सगळे!

मला लेट लतीफ मुलाचा अनुभव नाहि* पण माझा असा मुलगा असता तर;
- "चाचणी करून ठरवता येईल का की या मुलाची आत्ता शाळा सुरू करता येईल की एक-दोन वर्ष थांबावं?" ते बघीन. लगेच मित्राना/नातेवाईकाना नाहि विचारणार (पुढचे मुद्दे वाचा कारणासाठी). आत्ता नेटवर शोधाशोध, ऐसीवर विचारणा वगैरे प्रकार वापरेन.
- आत्ता मागे ठेवला आणि नंतर त्याने एकदम घोडदैड सुरू केलीन तर एक वर्ष वर ढकलता येईल ना हेही विचारून ठेवेन. आत्ता लेट लतीफ आहे पण म्हणजे नेहेमीच लेट असेल कशावरून? "लेट ब्लूमर्स" पण असतात.
- समजा हा विसाव्या वर्षी नाहि बाविसाव्या वर्षी ग्रॅज्युअट झाला तर काहिहि फरक पडत नाहि. थोडक्यात नेहेमीची शैक्षणिक पातळी इतर मुलांपेक्षा एक-दोन वर्ष उशीरा गाठलीन तर so what? मुलावर आवाक्यापेक्षा जास्त भार टाकण्यापेक्षा हे बरं नाहि का? हे मला स्वतःला नक्कि पटलंय ना तपासून बघेन. माझी भूमिका, माझे हे विचार लिहून ठेवेन. वर्ष-सहा महिन्याने कसोटिचा क्षण येईल तेव्हा मी योग्य निर्णय घेतला आहे हे मला 'पुराव्याने कळायला' आणि ठाम रहायला याचा उपयोग होईल.
- हा मुद्दा बायकोला/आई-वडिलाना पटलाय का? ज्यांचा रोजच्या जीवनातला सहभाग खूप आहे ते पण या बाबतीत माझ्या बरोबर असलेले बरे. अगदी एकमत नाहि पण विरोध तरी नको.
- त्याला जर खरंच एक-दोन वर्ष मागे ठेवला तर मित्र/नातेवाईक "अरे अरूणच्या मुलाचा म्हणे प्रॉब्लेम आहे काहितरी", "दिसायला नीट दिसतो हो पण", "अहो, तो घरी आला कि जरा लक्ष ठेवा हां." छाप आचरट/अस्थानी/विवेकशून्य/उठळ/क्रूर शेरेबाजी / वागणूक दाखवतील. त्याचा मला कसा बंदोबस्त करता येईल त्याचा विचार करेन.

हे माझे वैयक्तिक विचार. आत्ता काय ठरवाल त्यावर ईशान्यची पुढची काही वर्ष अवलंबून आहेत. त्रिशंकू अवस्थेत रहाण्यापेक्षा काय तो निर्णय आत्ताच घ्यायला तुम्हाला मदत व्हावी या ईच्छेने लिहिलंय ईतकंच.

* - काहिसा अनुभव आहे. माझ्या धाकट्या मुलीचा जन्मदिवस शालेय वर्षापेक्षा दिड महीना उशीरा. त्यामुळे ती मागे पडेल का, वर्गात नेहेमी तिला सगळे त्रास देतील का, दगदग झेपेल का हे प्रश्न आम्हालाही पडले होते. पण तिच्या बालवर्गाच्या शिक्षिकेने सांगितलं की "मी तिला एक वर्ष पाहत्येय. ती व्यवस्थित शिकेल. मागे ठेवलीत तर कदाचित तिला पुरेसं चॅलेंजिंग वाटणार नाहि. सुरू करा आत्ताच. वाटलंच तर पुढच्या वर्षी ब्रेक घ्या". त्यानुसार सुरू केली शाळा नी जमलं सगळं. पण त्या शिक्षिकेने इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलं नसतं तर "पुढच्या वर्षी हिला शाळेत घालायची, आत्ता नाही"
हे आमचं पक्कं झालं होतं.

अजो१२३ Wed, 18/12/2013 - 16:42

In reply to by मिसळपाव

थोडक्यात नेहेमीची शैक्षणिक पातळी इतर मुलांपेक्षा एक-दोन वर्ष उशीरा गाठलीन तर so what? मुलावर आवाक्यापेक्षा जास्त भार टाकण्यापेक्षा हे बरं नाहि का?

मीही असाच विचार करतो. लाईफ चिल होना मंगताय. पण त्याच्या आईला समजावणे बरेच अवघड आहे. तिला समजावल्यानंतर शिक्षकांना समजावणे अजून अवघड. शिवाय त्याचे ग्रेड्स अ अ प्लस ब प्लस असेच असतात. सगळे सी मायनस असते तर माझी केस स्ट्राँग बनवता आली असती. आठवीपर्यंत फुकट पास करतात अलिकडे म्हणून नापास करायचा तर नववीत करा म्हणाले.
मला, त्याला , आईला लोक काय म्हणतात याची चिंता नाही. आमचे मित्र आणि नातेवाईकही फार समजूतदार आहेत. तो काही प्रश्न नाही. चिंता फक्त मलाच आहे. मूल अधिकार्‍याइतके बिझि राहते हे मला खपत नाही. मोठेपणी 'दिल ढूंढता है' ऐकल्यावर त्याला काही 'फुरसत के दिन' आठवले पाहिजेत असे वाटते.
बाकी काल मी नुसतं 'राज्य सरकारच्या पाठ्यक्रमाच्या शाळेत...' इतकं उद्गारेपर्यंत तो प्रस्ताव झुगारला गेला. अन्यथा राज्य प्रशासनाच्या शाळेचा प्रस्ताव चांगला होता. वास्तविक आपलं मुल कोणत्या शाळेत आहे, तिथे काय वातावरण आहे, डोनेशन किती आहे, फी किती आहे, इ इ फॅशन म्हणून पालक सांगतात. मी त्यात पडत नाही पण कुटुंबापुढे चालत नाही.
खरं पाहिलं तर चांगल्या ग्रेडचा अट्टाहास नाही केला तर तो आजही चिल जगू शकेल. पण जगाने एक पेस पकडला आहेत आणि प्रत्येकाने त्यात उडी मारायचीच अशी वातावरणनिर्मिती केली गेली आहे. त्यात तो भरडला जात आहे असे वाटते. कदाचित ही चिंता अस्थानी असेल.

मला व्यवस्थित शब्द सापडल्यावर अजून लिहिन.

ऋषिकेश Wed, 18/12/2013 - 17:05

In reply to by अजो१२३

खरं पाहिलं तर चांगल्या ग्रेडचा अट्टाहास नाही केला तर तो आजही चिल जगू शकेल. पण जगाने एक पेस पकडला आहेत आणि प्रत्येकाने त्यात उडी मारायचीच अशी वातावरणनिर्मिती केली गेली आहे. त्यात तो भरडला जात आहे असे वाटते. कदाचित ही चिंता अस्थानी असेल.

यालाच तर रॅट रेस म्हणतात.
असो. अरूण जोशी, तुम्ही असे हताश व परिस्थितीपूढे नाईलाजाने वागताय हे तुमच्या अन्य प्रतिमेच्या इतके विपरीत आहे की नक्की खरे काय समजेनासे झाले आहे. (आम्हाला तुम्ही काही(च्या काही) गोष्टी समजावण्यात शर्त करता ते आठवा) तुम्ही घरच्यांना या रॅट रेसचे फायदे तोटे समजून सांगितलेत तर ते समजतील असे वाटते.

या विषयावर उपाय सुचवण्यासाठी चर्चेची कौटुंबिक (तुमचे आईवडील, पत्नीचे आईवडील, तुम्ही दोघे व इशान्य) मिटिंग घ्या असे सुचवतो. अश्या ब्रेन स्टॉर्मिंगमधून, ऐसीअक्षरेवरील सुचवण्यांपेक्षा अधिक प्रॅक्टिकल व तुमच्या कुटुंबाशी अधिक रिलेव्हंट उपाय मिळतील.

अजो१२३ Wed, 18/12/2013 - 17:43

In reply to by ऋषिकेश

तुम्ही असे हताश व परिस्थितीपूढे नाईलाजाने वागताय हे तुमच्या अन्य प्रतिमेच्या इतके विपरीत आहे की नक्की खरे काय समजेनासे झाले आहे. (आम्हाला तुम्ही काही(च्या काही) गोष्टी समजावण्यात शर्त करता ते आठवा)

मी कोणताही विचार स्वीकारायला मोकळा आहे. मला कोणतीच अस्मिता नाही. मी कोणत्याच परमानंट विचारसरणीचा नाही. तेव्हा आपल्यात नीट वा नीटसा संवाद झाला नाही असे समजावे. मला जर एखादी योग्य गोष्ट मान्य झाली नाही तर तुम्हाला तुमचे (मला माझे) संवाद कौशल्य वाढवायची किती गरज आहे हे कळावे. असो. तो मुद्दा नाही.

तुम्ही घरच्यांना या रॅट रेसचे फायदे तोटे समजून सांगितलेत तर ते समजतील असे वाटते. या विषयावर उपाय सुचवण्यासाठी चर्चेची कौटुंबिक (तुमचे आईवडील, पत्नीचे आईवडील, तुम्ही दोघे व इशान्य) मिटिंग घ्या असे सुचवतो. अश्या ब्रेन स्टॉर्मिंगमधून, ऐसीअक्षरेवरील सुचवण्यांपेक्षा अधिक प्रॅक्टिकल व तुमच्या कुटुंबाशी अधिक रिलेव्हंट उपाय मिळतील.

आता गंमत पाहा. माझ्या आणि बायकोच्या तहाप्रमाणे घरात प्राधान्याने शाकाहारी अन्न बनावे हा एकच माझा नियम घरी चालतो. बाकी अगदी किती वाजता झोपावे, उठावे , कोणती नोकरी कुठे, कशी, किती पगारावर करावी, पैश्याचं काय करावं, झाडून सगळं बायको ठरवते. त्यांच्याकडे (माझ्याघरी) मातृसत्ताक पद्धत आहे. मला ते एका अर्थाने बरेच वाटते. सुखी गृहीणी असते तसा मी सुखी गृहस्थ आहे. वास्तविक मुलाची अशी चिंता करून निर्णय घ्यायचा कोणताही अधिकार मला नाही. माझ्या मुलाचा कोणता मराठी संस्कार झाला नाही. त्याची मातृभाषा मणिपूरी आहे जी मला येत नाही. आता इथपर्यंत ठिक आहे. कोणत्याही मराठी-मणिपूरी काँबो फॅमिलीत असा प्रकार सामान्य आहे. पुढे जाऊन आमच्या स्पेसिफिक केसमधे बायको मला व्यवहार ज्ञान नाही असे समजते. (असे प्रत्येकच बायको मनातल्या मनात समजत असावी.) ते ९५% खरेही आहे (असं मात्र कोणी मान्य करत नसावं). तरीही सगळं सुरळीत चालतं. फक्त यामुळे दोनच गोष्टी लटकल्या आहेत.
१. महाराष्ट्रात शिफ्ट होणे. पण याची मला घाई नाही. दिल्ली परिसर मला आवडतो. तो फारच पसरला आहे, ३ कोटीच्या जवळ गेला आहे इतकेच काय ते आवडत नाही. हा विषय नाही. असो.
२. मुलाचा इथे सांगीतलेला प्रश्न. ईशान्यची आई लहानपणी प्रचंड वेळ अभ्यास करायची. आणि मी एकदम विपरीत. म्हणून आमचं यावर एकमत होत नाही. शिवाय जे आहे ते नॉर्मल आहे असे तिला वाटते. मला मात्र आळशीपणा, मोकळेपणा, बिनकामाच्या गोष्टी करणे, झोपा, खोड्या, मित्र, प्रवास, सुट्ट्या, इ इ नी बालपण संपन्न असावे असे वाटते. ७ ला उठणे, ३.३० ला परत, २-३ तास गृहपाठ, टीव्ही, गेम्स, आणि लवकर झोपण्याची गरज, मी स्वतः त्याच्यासोबत एकत्र कमी वेळ असणे हे मला हेलावून सोडते.
प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करतोच, पण दिल्लीत सरकार बनत नाहीय (ह्यॅ,ह्यॅ असल्या सिमिली आवडत असतील तुम्हाला म्हणून खास वापरल्यात) तसं उत्तर मिळत नाही.

............सा… Wed, 18/12/2013 - 19:29

In reply to by अजो१२३

नंबर २ आमच्याकडेही आहे. माझी बालपण संपन्न असण्याची भूमिका आणि नवर्‍याची मुलीकडूनची महत्त्वाकांक्षा या नेहमी क्रॉस होतात. पण हा मतभेद ठीकच असतो. मूल दोन्ही घेतं अन पुढे जातं. एक मात्र करा तुमच्या मुलासमोर "टीम" असल्याचा देखावा करा. मुलं आईबापाच्य मतभेदात स्वतःचा फायदा करुन घेण्यात हुषार असता :)

ऋषिकेश Thu, 19/12/2013 - 09:20

In reply to by अजो१२३

एकदा एकाची सत्ता मान्य केलीयेत ना! मग तुम्ही तसेही काही करू शकत नाही आणि करायची गरजही नाही!
तेव्हा स्वतःच्या डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा निवांत तंगड्या पसरून बसून रहा! ज्याने सत्ता (आणि म्हणून जबाबदारीप) घेतलीये ते बघतील ;)

(आमच्याकडे उलट आहे. कोणीही एक अख्खी सत्ता आणि खरंतर त्याबरोबर येणारी 'संपूर्ण' जबाबदारी घ्यायला तयार नसते, म्हणून हा "सर्वानुमते" नावाचा खेळ खेळत द्राविडी प्राणायाम करावा लागतो :प )

मन Thu, 19/12/2013 - 09:30

In reply to by ऋषिकेश

आमच्याकडे उलट आहे. कोणीही एक अख्खी सत्ता आणि खरंतर त्याबरोबर येणारी 'संपूर्ण' जबाबदारी घ्यायला तयार नसते, म्हणून हा "सर्वानुमते" नावाचा खेळ खेळत द्राविडी प्राणायाम करावा लागतो
नशीबवान आहात. काही ठिकाणी सारेच ही "जबाबदारी" घेण्यास तयार आणि सत्तातूर असतात.
मग घरगुती महायुद्धे होतात.
सगळेच जिम्मेदारी घेण्यास तयार असण्यापेक्षा कुणीच नसलेले आणि "सर्वानुमते", "रेफरेंडम" वगैरे वगैरे वाली स्थिती परवडते.

सानिया Fri, 20/12/2013 - 04:15

ईशान्य ६ वर्षांचा म्हणजे तसा लहानच आहे. त्याचा अटेंशन स्पॅन कमी असणं सहाजिक आहे, पण तरीही हे प्रयोग करून बघा.

१. त्याच्याबरोबर कुठलीही अक्टिवीटी करायच्या आधी, त्याचे लक्ष तपासून बघा. मी त्यासाठी मुलांबरोबर मेमरी गेम्स खेळते. उदा. काही आकडे म्हणून(३,९,५,३,४) त्यांना ते माझ्यानंतर त्याच क्रमाने म्हणायला सांगते किंवा इतर काही पॅटर्न्स(टाळी, चुटकी वाजवणे इ.) त्यांना माझ्यानंतर तंतोतंत तसेच करा असे सांगते. ते लक्षपूर्वक ऐकत आहेत असे दिसले, तरच पुढे कामाची बात करते.

२. मुलांशी बोलताना त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवून बोलावे. ते तुमच्याकडे बघून बोलत नसतील, तर त्यांचे लक्ष नाही आहे असे खुशाल समजावे. काही अपवाद अर्थातच असतात. ADHD, Autistic मुलांना हे कठीण असतं.

३. अटेन्शन डेफिसीट असल्याची शंका असेल, तर एकावेळी १० मिनीटांपेक्षा जास्त वेळाचे काम करण्याची अपेक्षा करू नये. दोन नावडीच्या कामांमधे एका आवडत्या कामाचा ब्रेक द्यावा. १० मिनीटेही अधिक वाटत असतील, तर ५ मिनीटांनीच सुरुवात करा.

४. अटेन्शन डेफिसीट असल्याची शंका असेल, तर शांत, कमी वर्दळीच्या ठिकाणी काम करायला बसवावे. अगदी घरातल्या फ्रि़जच्या, ट्युबलाईटच्या आवाजानेही मुले विचलीत होऊ शकतात. कामाच्या जागी खेळणी किंवा इतर आकर्षणे नसावीत.

५. गोष्ट वाचून झाल्यावर परत एकदा गोष्ट तोंडी आठवून पहावी. मुलाला '५ wh' (what, when, where, who, why) प्रश्न विचारावेत.

सध्या घाईत आहे, पण सवड मिळाल्यास अधिक लिहीन.

घनु Fri, 20/12/2013 - 14:02

धन्यवाद अरुण जोशी ह्या धाग्याबद्दल! मी देखील १.५ वर्षांपुर्वीच 'बाबा' म्हणुन 'प्रमोट' झालो आणि हि नविन जवाबदारी वाटते तितकी सोप्पी नाहि हे जाणवतय आणि असे अनेक प्रश्न मलाही पडतात. पण ह्या धाग्याच्या निमित्ताने बरेच माहितीपुर्ण प्रतिसाद वाचायला मिळाले ज्याचा मला नक्किच फायदा होईल माझी हि नविन जवाबदारी पेलायला.

सध्यातरी माझा एक साधा प्रश्न आहे... माझा मुलगा दिड वर्षाचा आहे, त्याला अजुन बोलता येत नाही आणि बोललेलं निट समजत नाहि... अश्या वेळी तो विनाकारण रडत असेल, हट्टं करत असेल , एखादी गोष्ट करु नको तरी करत असेल (आर्थात काही 'करु नको' हे माझं सांगणच त्याला कळत नसेल :( ) तर ह्या परीस्थीतीत आपण चिडचिड न करता कसे वागावे? कदाचित तो जे वागतोय ते त्याच्या वयाच्या मनाने योग्य किंवा अपेक्षीत असेल आणि मलाच सगळं व्यवस्थीत हवंय म्हणुन चिडचिड होते असेल.

मी त्याला रागावलो की तो घाबरतो आणि शांत बसतो, पण हे चुकीचं आहे ... मला त्याच्या मनात माझ्या बद्दल अशी कुठलीही भिती घालायची नाहिये... कधी कधी तो इतका कांगावा करतो की मी त्याला फटकेही (हलके) देतो - फार guilty वाटतं मला नंतर पण पुन्हा असं घडलं की मी तेच करतो :( .. सध्या मी असा विचार करतो की नाहितरी त्याला काहि कळतच नाहि (नसावं) मी त्याला मारतो त्याबद्दल ... मोठा झाला समजायला लागलं की मग न मारता/चिडता त्याला समजावून सांगत जाउ. पण मुळातच हे माझं वागणं थांबवायचं आहे मला... गरज मलाच बदलण्याची आहे आणि मी पुर्ण "positive" आहे, त्यासाठी कृपया इथल्या अनुभवी आणि जाणकार मंडळींनी मला मार्गदर्शन करावे.

(माझ्या मराठी अशुद्धलेखनाबद्दल माफी)

अश्या वेळी तो विनाकारण रडत असेल, हट्टं करत असेल , एखादी गोष्ट करु नको तरी करत असेल (आर्थात काही 'करु नको' हे माझं सांगणच त्याला कळत नसेल ) तर ह्या परीस्थीतीत आपण चिडचिड न करता कसे वागावे? कदाचित तो जे वागतोय ते त्याच्या वयाच्या मनाने योग्य किंवा अपेक्षीत असेल आणि मलाच सगळं व्यवस्थीत हवंय म्हणुन चिडचिड होते असेल.

तो जे वागतोय त्याने जोपर्यंत त्याला/इतरांस इजा पोहचत नाही तोपर्यंत त्याच्या वागण्यावर तुम्ही 'रिअ‍ॅक्ट' होणं गैर आहे. काळजी घ्यावी लागेल अशा परिस्थितीत मुलांना डिस्ट्रॅक्ट करणं सोपं असतं, 'पॉइंट ऑफ इव्हेन्ट' च्या वेळेस शिस्त, लेक्चर आणि रिअ‍ॅक्शनपेक्षा विषयांतर अधिक उपयुक्त ठरते, 'पॉइंट ऑफ इव्हेन्ट'नंतर परिस्थितीचे आकलन/चिंतन आणि त्यावर मार्ग काढणे अधिक उपयुक्त ठरते हा अनुभव आहे.

तुमच्या किंवा अरुण जोशींच्या एका प्रश्नात काही अलिखित उपप्रश्न आहेत, जसे -
१.१. माझ्या रागावर नियंत्रण कसे ठेवू? (संदर्भ - आपण चिडचिड न करता कसे वागावे?)
१.२ मुलाला शिस्त कशी लावावी? (संदर्भ - अश्या वेळी तो विनाकारण रडत असेल, हट्टं करत असेल , एखादी गोष्ट करु नको तरी करत असेल)

हे प्रश्न 'फक्त' मुलाबद्दलच नसुन घरातील वातावरण, इतर लोकांना असलेली शिस्त ह्याबद्दल आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

अजो१२३ Fri, 20/12/2013 - 15:44

In reply to by घनु

घनु, मी माझ्या मुलावर अगदी ३-४ वर्षांचा असेपर्यंत रागावत असे. पण हे अत्यंत चूक होते हे मला जाणवले आहे. त्याने मुलांची खिलाडूवृत्ती आणि आत्मविश्वास जातो. पाच सहादा वर्षी तर चक्क त्यांना रागावणार्‍याचा, मारणार्‍याचा खराखुरा 'राग' यायला लागतो. तुमची वेळ अजूनही गेलेली नाही.
म्हणून -
१. लहान मुलांवर कधीही रागावू नये.
२. त्यांना मारू तर नयेच नये.
३. तोंडात व गालावर तर कधी म्हणजे कधीच मारू नये.
४. अचानक तर कधी म्हण़ए कधी म्हणजे कधीच मारू नये.
नेहमी चार पाचदा सांगावे. रिपीट त्याच शब्दांत आणि अभिनय करून ५-६ दा सांगावे म्हणजे कळायला चालू होते. उदा. रडू नको म्हणायचे असेल तोंडावर बोट ठेवत ५-६ दा रडू नको असे प्रेमळ आवाजातच सांगावे.
माझे आणि माझ्या मुलाचे यामुळे फार जमते. चक्क तो टीव्ही पाहताना माझ्या मांडीवर रेमोट ठेवून टीव्ही पाहतो. मी त्याचा चॅनेल त्याच्या परवानगीशिवाय कधीच बदलत नाही.
शिवाय कार्टून नेटवर्क आणि तत्सम चॅनल दाखवू नयेत. पोगो दाखवावा. त्यावर भाषा खूप वापरली आहे, फक्त चित्रे नाहीत. त्याला कळो नाहीतर न कळो, अभिनय करत गोष्टी सांगाव्यात.
संपूर्ण घराचे, बागेचे, इ पदार्थावर बोट ठेऊन वर्णन करावे. जसे किचन मधे हे बेसिन, हे ताट, हा नळ, इ इ.

तो जे बोलतो त्यात अर्थ असतो. त्याने बोललेली अक्षरे त्याच्यामागे म्हणावीत. असे केल्याने त्याचे बोल आपल्याला कळले आहेत अशी पावती त्याला मिळते.

मुल कधीच बोलणार नाही ही भिती अकारण बाळगू नये. इतरांशी तुलना करू नये. ईशान्य २.५ वर्षे काहीच बोलायचा नाही, आता त्याला गप्प ठेवणे अवघड आहे.

शिवाय आपला पेशंन्स वाढवा, मुले पाच वर्षात खोड्या चालू करतात , १२-१४ व्या वर्षी थांबवतात. पालकांच्या रागाने मुलांच्या मनोवृत्ती बिघडतात. मी पेशंन्स कमी असूनही मुलाची गोष्ट येते तेव्हा अपवाद करतो. त्याने घोडा हो म्हटले कि तो थकेपर्यंत घोडा व्हायचे.

शिवाय मुलांना एकच गोष्ट धरून रागावायचे नाही. मनातून तर नाहीच नाही. फक्त रागाचे (रुसण्याचे, पलि़कडे तोंड करून बसण्याचे, असे अनेक प्रकार करता येतील) नाटक करायचे. मुलांकडून हवी ती गोष्ट करून घ्यायच्या फंदात पडायचे नाही. ते कधीच करत नाहीत. (उदा. फोटोसाठी स्थिर थांब.)

मुलांचा विषय अचानक बदलून आपल्या कामाच्या गोष्टीवर आणायचा नाही. फार विरोध होतो. उदा. अंगठा तोंडातून काढ असं थेट नाही म्हणायचे. तो पोपटाच्या खेळण्यासोबत खेळत असेल तए बघू बघू तुझ्या अंगठ्यावर पोपटाचे चित्र आहे का, त्याच्या डोळ्याचे चित्र आहे का म्हणायचे. विषयांतराने मुले फसतात.

मुले संगोपायला पेशन्स लागतो ही वृत्ती आपल्या मनातून काढून टाकायची. पेशन्स नाही, प्रेम लागते.

ऋषिकेश Fri, 20/12/2013 - 16:08

In reply to by घनु

माझा मुलगा दिड वर्षाचा आहे, त्याला अजुन बोलता येत नाही आणि बोललेलं निट समजत नाहि

याच्या अनेक कारणांपैकी दोनः
१. तुम्ही (तुम्हीच असे नाही तुम्ही व कुटुंबिय मिळून) त्याच्याशी किती बोलता? विविध स्वर कसे उच्चारायचे ते मुले अनुकरण + निरिक्षणातून शिकतात. त्याला कडेवर घेऊन बोलतात तर तो तुमच्या ओठांच्या हालचाली, जीभेच्या हालचाली, चढ उतार अधिक आत्मसात करेल
२. तुम्ही बोलताना एक्प्रेसिव्ह असले पाहिजे. ते बघुन ते मूल कशा प्रसंगात कसे एक्सप्रेशन द्यायची ते लवकर शिकते (अदरवाईजही शिकतेच, पण असे केल्याने त्यांना मदत होते)

घनु Fri, 20/12/2013 - 17:15

In reply to by ऋषिकेश

मी, अरुणजोशी आणि ऋषिकेश , खुप खुप धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनपर प्रतिसादांबद्दल.
आणि त्याला अजुन बोलता येत नाही ह्यात मला असे म्हणायचे होते की त्याला निट किंवा पुर्ण असं बोलता येत नाही. तसा तो 'आई-बाबा', 'चान-चान', आपण एक-दोन-तीन असं म्हटलं की लगेच 'चाल-पाच' म्हणतो ... अगदी आपण बोटानेही १,२,३ असं दर्शवलं की तो 'चाल-पाच' म्हणतो :) त्यामूळे सध्यातरी वयाच्या मनाने प्रगती आहे ... पण त्याचं बोलणं, उच्चार, हावभाव तुम्ही दिलेल्या टिप्स मूळे नक्कीच प्रभावी होईल ह्यात शंकाच नाही :) धन्यवाद!!!

(तुम्ही म्हंटल्या प्रमाणे इतर मुलांशी 'तुलना' तर कटाक्षाने टाळतोच, कारण माझ्या बालपणात मी त्याला सामोरा गेलोय आणि तो अतिशय घाणेरडा प्रकार असतो :()

अजो१२३ Fri, 20/12/2013 - 18:52

लहान मुलाला आईचे दूध मुळीच नाही मिळाले तर त्याचे (बालपणानंतर, १० वर्षांनी) काही परिणाम उरतात का?
असतील तर ते टाळताही येतात का?

............सा… Fri, 20/12/2013 - 18:58

In reply to by अजो१२३

There is no ever lasting adverse effect that cannot be successfully averted with sufficient parental love. So do not worry. Love is monumental & only thing we need to be worried abt. No really!!!

Things happen, things break, they damage - it's life But enough love heals it all.

That's my point of view & not a lecture.

अजो१२३ Tue, 24/12/2013 - 21:54

ईशान्य जेव्हा लिहितो तेव्हा तास-दोन तास गृहपाठ केल्यावर त्याच्या बोटावर पेन्सिल पकडण्याच्या जागी स्वेलिंग होते. हळूहळू तो भाग राठ होण्याची वाट पाहावी का? (या संदर्भात) वाईट म्हणजे वरून त्याला तासन तास स्क्रिबलिंग करण्याची सवय आहे. काही उपाय?

ऋषिकेश Thu, 26/12/2013 - 11:52

In reply to by अजो१२३

मुळात या वयात जेव्हा बोटांची घडण चालू असते/ त्यात पूर्ण ताकद आलेली नसते त्यावेळी त्याने सलग तास-दोन तास लेखन करावे का हाच प्रश्न आहे.

यावर दोन बाजूने उपाय आहेत ते सुचवतो:
१. सलग लेखन करण्यापेक्षा दर अर्ध्या तासाने जाता येता ५-१० मिनिटेच लेखन करावे व वेळ वाढवत न्यावा. तसे शक्य नसल्यास शाळेतल्या शिक्षिकांना त्याची ही समस्या सांगावी व त्याला काही दिवस लेखी गृहपाठ उशीरा देण्याची सूट मिळवून द्यावी. जर ही समस्या सर्वच/अनेक मुलांची असेल तर सर्व पालकांनी मिळून पालक सभेत इतक्या जास्त लेखी अभ्यासाबद्दल तक्रार करावी. (एकदा का याला एकट्याला सुट मिळाली की ती एक्सटेन्ड होणार नाही याचीही तजवीज करावी नाहितर अशी सुट मिळवायची सवय लागेल)

२. दरम्यान मुलाला खरी चिकणमाती, वाळु, बाजारातील "क्ले", उकडलेले बटाटे चिवडणे, उकडलेली रताळी चेचणे वगैरे खेळ खेळायला द्यावेत ज्यामुळे त्याच्या बोटांची ताकद वाढेल. त्याला इंटरेस्ट असेल व तिथे शाडूची माती उपलब्ध असेल तर त्याला लहानमोठ्या प्रतिमा, बाहुले, खेळ बनवायलाही उद्युक्त करा (त्याला मूर्ती म्हणा हवं तर ;) ). शक्य असल्यास त्याला एखाद्या कुंभाराकडे नेऊन कुंभकलेचे प्रात्यक्षिक दाखवा. तो आपणहून त्या कलेत उद्युक्त झाल्यास दर विकांताला कुंभारदादांकडे घेऊन जा. आवडते कलादालन मिळेलच शिवाय बोटेही मजबूत होतील :)

अजो१२३ Thu, 26/12/2013 - 12:52

In reply to by ऋषिकेश

धन्यवाद.
वास्तविक मला देखिल जास्त लेखन हा प्रकार या वयात पसंद नाही. तशी सवलत शाळेनेही दिलेले आहे. पण मूलाकडून चांगले ग्रेड हवेत आणि वेळच्या वेळी गृहपाठ हवा ही इच्छा पालकांची (माझी नाही पण ती सौम्य असावी असे प्रबोधन या वयात पत्नीचे करणे अशक्य आहे. ;) ) व शिक्षकांची असते.
बाकी दिल्लीत वाळू, कुंभारदादा वैगेरे शक्य नाही. बटाटे, रताळे इ चा प्रयोग करून पाहिन.

सानिया Fri, 27/12/2013 - 04:34

In reply to by अजो१२३

हा कालावधी जास्त आहे. सहसा गृहपाठ देताना शिक्षक पुढील कोष्टक लक्षात ठेवतात. गृहपाठ लेखन = इयत्ता * १० मिनीटे.

लेखनाव्यतिरीक्त त्याची पिन्सर ग्रिप(तर्जनी आणि अंगठा यांच्या उपयोगाने एक एक वस्तू उचलताना होते ती.) सुधारेल असे खेळ त्याच्याकरून करवून घ्या. त्यासाठी तुम्हाला क्ले, पोळ्यांची कणीक, मणी ओवणे, ट्विजर वापरून वस्तू उचलणे, डॉपरने थेंब सांडून त्यांचे चित्र बनवणे, झिप-लॉक बॅग बंद करायला लावणे इ. खेळ खेळता येतील.

आडकित्ता Thu, 26/12/2013 - 23:34

लेख उडत उडत वाचला.
पण
>>
मी स्वतः dvd player घेतला आणि त्याच्यासाठी काही नाही हे पाहून त्याने रागाने मला बिलिंग काउंटरवर एक गुद्दाच घातला. (मग) त्याला एक स्वस्तातला टॅब घेतला/घेऊन द्यावा लागला.

हे वाचल्यावर, त्याने गुद्दे घातलेत,
मला दुसरंच काही घालावं वाटू लागलं.

६ वर्षे? गुद्दे? अन त्यासाठी 'स्वस्तातला' टॅब? = ६-८ हजार रुपये?
वावावा!

चाईल्ड रिअरिंग, डीलेड ग्रॅटिफिकेशन, जौद्या.

तुमच्या दिवट्यांना तुम्ही किती मातवणार ते तुमच्या खिसापाकिटावर अवलंबून असते हेच खरे.. खिशातल्या नोटा मेंदूतली सारासारविचारबुद्धी गहाण टाकायला लावतात हेही खरेच.

अवांतरः अनेक डॉक्टरांची मुले अत्यंत बिघडलेली पाहिली आहेत. सिंपल रीझन. आईबाप दोघे नोटा छापतात, अन मुलांना कडेवर घेऊन फिरण्याचे काम बहुतेकदा कंपाऊंडर लोक करत असतात.

अजो१२३ Fri, 27/12/2013 - 10:35

In reply to by आडकित्ता

आडकित्ताजी,
स्वस्तातला टॅब म्हणजे ५००० ते ५०००० चे टॅब असतात, पैकी. आमच्या खिश्याला जडच.

बाकी मूलाला मातवण्याचा प्रकार काही आमच्याकडे होत नाही. टॅब पाहिजे हा त्याचा जुना आग्रह होता. वास्तविक तोच घ्यायला आम्ही दुकानात गेलेलो. मी मुलाला बॉक्सिंग सेटप घेवून दिलेली आणि गुद्देगिरी शिकवलेली. त्यात आश्चर्य करण्यासारखे काही नसावे. ६ वर्षाच्या मूलाला राग येण्यात काही नवल नाही असे वाटते.

आडकित्ता Sun, 29/12/2013 - 23:44

In reply to by अजो१२३

इथे डकवतो. हे वाक्य तुम्ही लिहिलेले आहे,
>> अत्यंत लाडात वाढलेली काही मुले खूप सुज्ञ निघतात.………

आता, हे वाक्य पुनः एकदा वाचा ही विनंती:

अत्यंत लाडात वाढलेली काही मुले खूप सुज्ञ निघतात.………

*
दुसरे हे:

>>त्याला एक स्वस्तातला टॅब घेतला/घेऊन द्यावा लागला.

पुनः वाचा:

त्याला एक स्वस्तातला टॅब घेतला/घेऊन द्यावा लागला.

ध्यन्यवाद!

मुलाच्या बाबतीत माझे बरेच तत्त्वज्ञान कंफ्यूजन आहे. I go by my instinct at that time. आपला काही सल्ला असेल तर सांगा, मी पटला तर प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करेन.

बाय द वे, I am not 100% consistent, I cannot be and I don't want to be in most matters.

आडकित्ता Sun, 29/12/2013 - 23:58

In reply to by अजो१२३

या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे.
मुलांबद्दल सांगितलेले सल्ले, न मागता दिलेत, किंवा मागूनही दिलेत, तरी लवकर पचत नाहीत असा अनुभव आहे.

पण, तुम्ही मनापासून विचारला असे गृहित धरून लिहितो, कन्क्लुजन तुम्ही काढा :

काऊंटरवर, गुद्दा मारणे हे तुम्ही लिहिलेत तरी एक गुद्दा पुरेसा ठरलेला नसावा. अती हट्ट केला म्हणून जुनी मागणी का होईना, पूर्ण झाली हा एक अत्यंत वाईट अनुभव त्याच्या गाठीस आला आहे, हे कृपया ध्यानी घ्या.

व्यवसायाने मी आधुनिक वैद्यकाचा डॉक्टर आहे. सायकॉलॉजी/सायकिअ‍ॅट्रीत स्पेशलायझेशन नसले, तरी जितके वाचन, व अनुभव आहे त्या आधारे सांगतो, की अशा अनुभवांची परिणती, बहुतेकदा, पुढे जाऊन, कोणत्याही इच्छा पुरविण्यासाठी आधी 'टॅन्ट्रम्स' व नंतर 'ब्लॅकमेलिंग'मधेच होते.

एक वाक्य लिहितो इथे. कदाचित पटणार नाही,
"A child is the most perfect parasite in the world."

हे कुठे वाचले तेही नक्की आठवत नाही पण सायकिअ‍ॅट्रीचे टेक्स्टबुक होते हे नक्की. या वाक्यावर विचार नक्कीच करून पहा.

आडकित्ता Mon, 30/12/2013 - 00:06

In reply to by बॅटमॅन

गर्भातल्या बाळाला कॅल्शियम कमी पडला तर आईचे शरीर स्वतःला ऑस्टिओपोरोसिस करून ते देते, नंतरही दुधातून देत रहाते, तरीही आईचा मेंदू बाळावर प्रेमच करत रहातो.
ब्याटोबा, नुसत्या लहानपणाच्या वागणुकी इतका सिंपल लोचा नाहिये तो ;)

बॅटमॅन Mon, 30/12/2013 - 00:11

In reply to by आडकित्ता

हा हा हा, असेल हो. मज पामराचे वैद्यकीय ज्ञान शून्यवतच, सबब जाणिवेच्या कक्षेत जेवढे येते त्याआधारे सहमती नोंदवली झाले :)

बाकी नैतिकतेची पुटे सोडूनही हे वाक्य यथार्थ वाटते एकदम.असो.

आडकित्ता Mon, 30/12/2013 - 00:21

In reply to by बॅटमॅन

जस्ट लहान मुलांची मानसिकता याबद्दल धागाकर्त्यास चर्चा अपेक्षित असेल, तर वेळ काढून या विषयावर अधिक बोलायला खरेच मजा येईल.

आडकित्ता Mon, 30/12/2013 - 00:09

In reply to by अजो१२३

>>बाय द वे, I am not 100% consistent, I cannot be and I don't want to be in most matters.
हे बाकी बरोबर आहे तुमचे :)

हा तुमचा मला प्रतिसादः
>>टॅब पाहिजे हा त्याचा जुना आग्रह होता. वास्तविक तोच घ्यायला आम्ही दुकानात गेलेलो.

अन हे मूळ लेखातले वाक्य :(

>> मला एक dvd player घ्यायचा होता. म्हणून जंबोच्या दुकानात गेलो. Electronics च्या दुकानात ईशान्य पेटूनच उठतो. कोणताही tablet PC , इ पाहिला कि त्यावर तूटून पडतो. मी स्वतः dvd player घेतला आणि त्याच्यासाठी काही नाही हे....

या विषयावर इथे थांबतो :)

स्वराश्री Fri, 27/12/2013 - 02:22

१. माझा मुलगा ईशान्य पेक्षा थोडासा लहान आहे. मलाही आधी वाटत होते कि माझ्या मुलाला कदाचित 'attention deficit' चा प्रोब्लेम आहे कि काय. त्याच्या शाळेत बोलून बघितले तेंव्हा टीचर म्हणाली कि मुलांच्या वयाप्रमाणे त्यांचा 'attention span' असतो उदा: ४ वर्ष वय - ४ मिनटे , ६ वर्ष वय - ६ मिनिटे span. हे कदाचित अयोग्य वाटेल. पण असा विचार करून बघा. ह्याचा अर्थ असा कि एखादा खेळ किंवा एखादी activity सहाव्या वर्षी ६ मिनिटे इतका मिनिमम वेळ करू शकला नाही तर त्याकडे गंभीरपणे बघावे. तसेच अशा मुलांच्या बाबतीत एखादी गोष्ट सतत २ तास करून घेण्याऐवजी २ तासात ३-४ activities करून घ्याव्यात. आणि एखादी गोष्ट उदा: एखादे spelling ३-४ वेळा एकाच दमात लिहायला सांगण्या ऐवजी वेगवेगळ्या वेळी एकेकदा/दोनदा लिहायला सांगावे.
२. मुलांबरोबर वेळ देत येत नाही हे माझेही दुखः आहे. पण मी सतत माझ्या नोकरी आणि घरच्या कामांना मोड देऊन जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवायचा प्रयत्न करते. त्यासाठी मुले उठायच्या आधी सकाळी लवकर उठून स्वयंपाक आणि मुले झोपल्यानंतर मागचे आवरणे/कुणाला फोन/इतर आवश्यक कामे आणि नवर्याबरोबर गप्पा. आमच्या दोघांच्या नोकर्या घरापासून जवळ आहेत त्यामुळे घरी तसे लवकर पोचतो. क्वचित घरून काम करावे लागले तर मुले झोपायच्या वेळी स्वताची झोप कमी करूनच करतो. कदाचित तुमच्या बाबतीत तुम्ही ऑफिसचे थोडेसे काम घरी आणून करू शकत असाल तर घरी लवकर पोहोचाल आणि मुलाबरोबर वेळ जास्त देऊ शकाल.
मी साधारणपणे घरांमध्ये हे बघितलय कि आई मुलाला आधी भरवते आणि मग आई वडील नंतर जेवायला बसतात. आमच्या घरी आम्ही सगळे मुद्दाम एकत्र जेवायला बसतो. सुरुवातीला मुल थोडे कमी खाईल, तुम्हा दोघांना बोलायला मिळणार नाही, पण मुलाला तुमच्याबरोबर जेवायला बसायचा आनंद खूप मोठा असेल. जेवताना त्याच्या अभ्यासाचे विषय मात्र टाळावेत.
मुलांशी वेळ देत येत नाही म्हणून मुलांना वेगवेगळी कितीही खेळणी आणून दिली तरी कमीच पडतील, शेवटी मुलांबरोबर वेळ घालवणे हाच मुलांच्या वाढीचा सर्वोत्तम मार्ग आहे. मुले समोर असली कि आम्ही आवर्जून फोन उचलत नाही, उगीच मोबाईल वर सर्फिंग करणे/sms करणे टाळतो, tv बंद ठेवतो. फक्त वीकेंड हि tv ची ठरलेली वेळ.
३. वर ह्रिशिकेश ह्यांनी सांगितलेल्या बर्याच गोष्टी आम्ही घरी करण्याचा प्रयत्न करतो. त्यात अजून एक म्हणजे ज्यांची मुले आमच्या मुलांच्या वयाची आहेत, त्यांच्याशी मैत्री वाढवून 'play dates' arrange करतो. थोडेसे स्वार्थी वाटेल, पण मुलांच्या सुखासाठी करतो. त्यातल्या त्यात ज्यांच्या पालकांशी आपली बरी मैत्री होऊ शकते अशा पालकांना मित्र बनवतो .
४. ईशान्यला शाळेत मैदानी खेळ नाहीत का? तसे नसेल तर त्याला विकेंड ला swimming, gym मध्ये घालुन बघा. म्हणजे त्याची शारीरिक वाढ योग्य होईल. शक्य असल्यास तुम्हीही सहभागी व्हा.
५. घरच्या कामात त्याला involve करून बघा. मुलांकडून थोडीफार कामे करून घेतली आणि त्यांची पाठ थोपटली कि त्यांना खूप बरे वाटते, आपणही ह्या घराचा एक अहेम हिस्सा आहोत हि भावना त्यांना खूप मोलाची वाटते.

ह्या सगळ्या 'rat race' मुळे मुलांची कल्पनाशक्ती कुठे लयाला जात नाही न ह्याचा सतत विचार करा. शेवटी तो grades छान मिळवेल पण आयुष्यात जगण्यासाठी तेच पूरक नाही ना!

अजो१२३ Fri, 27/12/2013 - 10:44

In reply to by स्वराश्री

धन्यवाद.
१. attention span जर इतका कमी अभिप्रेत असेल तर ईशान्यला तो त्रास नाही असे म्हणेन कारण त्याच्या आवडीच्या गोष्टीत तो तासन तास रमलेला असतो. त्याचं वाचन छान आहे. लिहिण्यात मात्र बर्‍याच चूका करतो. पण माझ्या मते त्याला काही महत्त्व नाही कारण लिहिणे ही कला महामुश्किल आहे.
२-३. पूर्वी आम्ही गुरगावला असू तेव्हा आम्हाला चिकार मित्र होते. आता कामाची जागा बदलल्याने, ते दूर झाले आहेत. मात्र एकत्र जेवायचे, इ नियम आम्हीही पाळतो. कामे मूले झोपल्यानंतर करायचा फॉर्म्यूला मस्त आहे. आवडला.
४. हे ही करेन. पण विकेंडला मूलाला असला क्लास लावला तर विकेंड आउटींग वर बंधन येते.

सिफ़र Fri, 27/12/2013 - 13:57

त्याने रागाने मला बिलिंग काउंटरवर एक गुद्दाच घातला. (मग) त्याला एक स्वस्तातला टॅब घेतला/घेऊन द्यावा लागला.

६ वर्षाच्या मूलाला राग येण्यात खरच काही आश्चर्य नाही पण त्यानंतर टॅब घेऊन देणे हे नक्कीच आश्चर्यकारक (माफ करा पण मुर्खपणाचं )वाटत.किमान त्यावेळी तरी त्याला तो देऊच नये. यामुळे मुलांना मोठ झाल्यावर "नाही" ऐकायची सवय राहत नाही आणि त्याचे परिणाम भीषण होऊ शकतात.

आजकाल काही foreign author पुस्तकं वाचून पालक/शिक्षक ,मुलांनी काही चूक केली तरीही त्यांना रागावू नये आणि परत त्यांनी काही चांगल काम केल्यास त्यांची स्तुती करावी, बक्षीस द्यावे अस काहीस वागतांना दिसतात(तुम्ही अस वागता म्हणायच नाहीये मला). माझ्या सदद्विवेक बुद्धीला हे बिलकुल पटत नाही.
पुस्तकं वाचण्यात काही हरकत नाही पण जशीच्या तशी आपल्या संस्कृतीत adopt करण्यात नक्कीच हरकत आहे.
स्तुती करावी तर रागवावं सुद्धा , बक्षीस द्यावे तर शिक्षा( अर्थात मिरची ची धुणी द्यावी असं नाही ) पण करावी.

आम्ही लहान असताना तिर्थरूपांची ऐपत नव्हती म्हणून काही इच्छा पूर्ण करू शकलो नाही सो आज मी माझ्या मुलाच्या इच्छा अतृप्त ठेवणारचं नाही( होऊ द्या खर्च) वेगेरे विचार मुलांच्या मानसिक वाढीसाठी फार घातक वाटतात.

आपल्यला एकच वेळी एखादी गोष्ट बरोबर आणि चूक दोन्ही वाटत असेल तर त्यावर (म्हणजेच आपल्या स्वतःच्या conflict आणि looking good factor वर सुद्धा) काम करावे. उदाहरण टॅब घेतला/घेऊन द्यावा लागला.

अजो१२३ Fri, 27/12/2013 - 14:39

In reply to by सिफ़र

तसं आपलं म्हणणं पटतं, पण अगदी आपल्या एकूलत्या एक मूलासोबत निष्ठूर होणं जमत. विशेष म्हणजे त्याला अजून समज नाही. त्याचं मानसिक वय ४-४.५ वर्षेच आहे. त्याच्यासोबतची दुसरी मुलं बरीच मॅच्यूअर वाटतात.
मी काही कोणत्या पुस्तकाच्या वा तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली नाही (मी ते काही वाचत, इ नाहीच.). अजून दोन तीन वर्षांनी संतुलित वागणे जमेल.
मला आवडली तर एखादी गोष्ट मी त्याच्यासाठी करतो, त्यात माझं बालपण कसं होतं इ आणत नाही.

सिफ़र Fri, 27/12/2013 - 16:27

In reply to by अजो१२३

मी काही कोणत्या पुस्तकाच्या वा तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली नाही (मी ते काही वाचत, इ नाहीच.).
तुम्ही कुठल्याही पुस्तकाच्या वा तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली नाही किंवा सारासार विचार् करता हे तुमच्या एकंदरीत लेखनावरून लक्षात येतच तसा मला म्हणायचे पण नव्हते. मी ते एक generalized मत म्हणून मांडल तुम्हाला उदेशून नव्हे. दुखावल्या गेले असल्यास माफ करावं.

अजून दोन तीन वर्षांनी संतुलित वागणे जमेल.
Its now or never असं माझा वेयक्तिक मत आहे.
आमच्या परिचयाची मुलगी आहे परिचयाची पेक्षा घरचीच म्हणा … आई-वडीलानी लहानपणी खूप चिडकी आहे, समज नाही हळूहळू बरी होईल वेगेरे म्हणून फार लाड पुरविले नंतर थोडी मोठी झाल्यावर पुरवावेच लागले कारण तीला कुठलाही negation सहन होत नव्हत…आत्ता तिच लग्न सुद्धा मोडलं …
(negation च उदा. तू आज छान दिसतेस असा जरी म्हंटल तरीही तिला ते नेहमी दिसत नाही का?
डॉक्टरकडे पण नेले ते पण तिला ते सहन होत नाही… आज ती आई-वडीलांना सुद्धा तुम्ही माझ नुकसान केल म्हणुन दोष देते....

तसं आपलं म्हणणं पटतं, पण अगदी आपल्या एकूलत्या एक मूलासोबत निष्ठूर होणं जमत. विशेष म्हणजे त्याला अजून समज नाही. त्याचं मानसिक वय ४-४.५ वर्षेच आहे. त्याच्यासोबतची दुसरी मुलं बरीच मॅच्यूअर वाटतात.
एखाद्या गोष्टीला नको म्हणणे हे काही निष्ठूरपणाच लक्षण नाही ,पण वागताना द्रष्टाभाव(third person approach)ठेवावाच लागतो. मुलांवर प्रेम असणं, मुलांबद्दल पझेसिव असणं आणि मुलांना घाबरणं यात फार फरक आहे.

अजो१२३ Fri, 27/12/2013 - 16:34

In reply to by सिफ़र

पण वागताना द्रष्टाभाव(third person approach)ठेवावाच लागतो. मुलांवर प्रेम असणं, मुलांबद्दल पझेसिव असणं आणि मुलांना घाबरणं यात फार फरक आहे.

रोचक.

बाकी नाऊ ऑर नेवर हा मुद्दा इतका पटला नाही. आपण उदाहरण दिलेली केस ऑड नसू शकते का? साधारण आमच्या शेजारच्या पालकांपेक्षा मी कमीच लाड करतो. पण मुले वयानुसार सुधारतात हा अनुभवही मोठा आहे. अत्यंत लाडात वाढलेली काही मुले खूप सुज्ञ निघतात.
नक्की काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही पण संतुलन ठेउन वागायचा प्रयत्न करावे.

यावरून एक कामाचा प्रश्न. ईशान्यचे टीव्ही, टॅब, मोबाईल, लॅपटॉप, पिझ्झा, स्क्रिबलिंग, अभ्यासात/जेवण्यात लक्ष नसणे मोजून हेच विक पॉइंट आहेत. बाकी तो छान बाळ आहे. मला वाटतं हे सर्वसामान्य आहे. यात वेळ मात्र जातो. अगदी टॅबवरदेखिल त्याने गेमची रोज एक नवी पातळी ओलांडली तर हरकत नसावी, पण तेच तेच करण्यात काय हशील. एवढ्या मर्यादित गोष्टींतही नकार देणे योग्य आहे का?

सिफ़र Fri, 27/12/2013 - 17:08

In reply to by अजो१२३

अत्यंत लाडात वाढलेली काही मुले खूप सुज्ञ निघतात.………
सहमत. ती केस ऑड असेलही पण थोडा द्रष्टाभाव असल्यास/आणल्यस प्रेमापोटी पालकाच्या चुका कमी होतात …

बाकी नाऊ ऑर नेवर हा मुद्दा इतका पटला नाही.
म्हणूनच माझ वेयक्तिक मत अस लिहिल होत… प्रत्येकाचे अनुभव वेगळे... पण उगाचच विषाची परीक्षा नको म्हणून सुचवलेलं.

ईशान्यचे टीव्ही, टॅब, मोबाईल, लॅपटॉप, पिझ्झा, स्क्रिबलिंग, अभ्यासात/जेवण्यात लक्ष नसणे मोजून हेच विक पॉइंट आहेत.
यावरून बाळ छान आणि सर्वसामान्य आहे , मला पण असच वाटतं.

पण मुलाने चिडचिड केली आणि टॅब घेतला/घेऊन द्यावा लागला. हे काही पटल नाही … चर्चा येथूनच सुरु झाली होती इथेच संपवतो
धन्यवाद

अजो१२३ Fri, 27/12/2013 - 17:13

In reply to by सिफ़र

एवढ्या मर्यादित गोष्टींतही नकार देणे योग्य आहे का?

अहो हे नकारार्थी वाक्य नाही. जन्वीन प्रश्न विचारला होता.

शहराजाद Thu, 02/01/2014 - 05:18

अरुणजोशी, वरील वर्णनावरून इशान्यच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या, आणि त्या दोन्ही त्याच्यावर अवलंबून नसून त्याच्या पालकांवर अवलंबून आहेत.
१) झोपः सहा वर्षाच्या मुलाला रोज साडेसात तास झोप पुरत नाही. (अहो मलाही आठ ते साडेआठ तास झोप लागते.) सुटीच्या दिवशी तो तब्बल अकरा तास झोपतो. अकरा! ह्यातला थोडा भाग आदल्या दिवशीची झोप भरून काढण्याचा असला तरी दररोज किमान दहा तास झोप त्याच्या मेंदूला आवश्यक आहे.
माझ्या मुलाला ( सहाच वर्षाचा आहे) अगदी बाळ असल्यापासूनच लवकर झोपायला आवडत नसे. बालवाडीत दुपारची शाळा असे. त्यामुळे ते चालून गेले. शाळेत जायला लागला तेव्हा साडेसात वाजता बस येत असे. त्यामुळे लवकर उठणे भाग पडे. पण सकाळी झोप कमी झाली तरी रात्री लवकर झोपायची मुळीच इच्छा नसे. येन केन प्रकारे दिवस ताणत बसायचा. आम्हाला वाटले, तो तरीही आपणहूनच लवकर झोपत नसेल तर त्याचा अर्थ त्याला पुरेशी झोप मिळते आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळच्या त्याच्या डॉक्टरांनीही सांगितले की, कदाचित त्याची झोपच कमी असेल, काळजी करू नका. पण ते तसे नव्हते. त्याच्या शरीराला तेवढी झोप पुरत नसे, पण खेळत राहण्याच्या लालचीने तो रात्री जागत बसे. वर्गशिक्षिका सांगत, हा वर्गात नुसता बसून राहतो, मरगळलेला असतो, गोष्टी खूपदा सांगाव्या लागतात इ. आम्ही मुलांच्या समुपदेशिकेचा सल्ला घेतला. त्याप्रमाणे, त्याची रात्रीची झोप किमान दहा तास होईल अशा बेताने त्याला झोपवू लागलो. झोप जास्त होऊ लागल्यावर त्याची मरगळ गेली आणि लक्ष केंद्रित करणे जमू लागले.
अर्थात, लवकर झोपायला लावणे मुळीच सोपे नाही. तोंड धुणे, कपडे बदलणे, पुस्तक/ गोष्ट, इतर वेळकाढूपणा हे सर्व आटोपून साडेआठला झोपायचे तर आठ वाजता झोपायला न्यावे लागते. जेवण, अभ्यास, खेळ, दूरदर्शन इ सर्व त्या प्रमाणात आधी उरकावे लागते. इतक्या आधी जेवणाची सवय नसल्याने आम्हालाही ते थोडे अवघड गेले, पण आता तो आधी जेवतो. आईबापांना नंतर जेवायचे असले तरी जेवणाच्या टेबलावर थोडा वेळ एकत्र बसून गप्पा मारल्या जातात.
आपण हा झोपेचा प्रयोग जरूर करून बघावा अशी कळकळीची विनंती आहे.

२) सहा वर्षाच्या मुलाचा हात तास दोन तास अभ्यास करून दुखतो ह्यात नवल काय? मोठ्या मुलाचाही दुखेल. मी मुंबईतल्या अतिशय नामवंत शाळेत शिक्षण घेतले. वरच्या इयत्तंमध्येदेखील आम्हाला दररोज दोन तास गृहपाठ नसे. मुळात एवढ्या लहान मुलाने इतका वेळ घरचा अभ्यास करावा अशी अपेक्षाच मला रास्त वाटत नाही. १५ ते २५ मिनिटांपेक्षा जास्त अभ्यास असू नये. तो अभ्यासही एकाच वेळी पुरा करणे जमत नसेल तर दोन वेळात विभागून करून घ्यावा. (वरील सानिया यांचा प्रतिसाद बघावा ) इशान्यवर शाळा आणि/किंवा पालकांकडून फार जास्त अपेक्षाचे ओझे टाकले जात आहेत की काय असे वाटत आहे.

अजो१२३ Thu, 02/01/2014 - 11:02

In reply to by शहराजाद

बर्‍याच उपकरणांच्या खेळाच्या नादात झोपेचे खोबेरे होते हे खरे आहे. मी स्वतः देखिल ८ पेक्षा कमी तास झोपलो तर दुपारी ३ नंतर माझे ऑफिसच्या कामात चित्त लागत नाही. सुटीच्या दिवशी इशानही १२-१३ तास झोपतो.

अभ्यासक्रम खरेच क्रूर आहे. सात विषय. क्लासवर्क. होमवर्क. सुट्टीवर्क. तरीही मी त्याला अजून कुठल्या extra currcular activity मधे घातले नाही. त्याला चांगले ग्रेड मिळावेत या त्याच्या आईच्या आग्रहासमोर माझा नाईलाज आहे, अन्यथा शाळेकडे मी तक्रार केली तेव्हा त्यांनी युम्हाला नको असल्यास होमवर्क नका करू असे सांगीतले. पण आपले मूल मागे राहील अशी आईची भिती आहे, त्यामुळे मी काही म्हणत्/म्हणू शकत नाही.