फडकु

वाहता माझा ब्लॉग, गप्पा गोष्टी वाच
कविता नक्की वाच, फडकु म्हणे

फिरवी हा रिक्षा, प्रतिसादाची भिक्षा
शराग्रासि वक्षा, लावुनिया

ध्यान केशरी बंदर, भाळी टिळा निरंतर
छुरी असे जुनी मैतर, फडकुसि

घाव सज्जनांचा, मिळे जो मालकांचा
म्हणे बाणा बाजीप्रभूचा , फडकु तो

बसे याला पार्श्व, सुंदरशी लाथ
इतरांची लावे वाट, दिसता क्षणी

गारठले डोळे, आखडले तन
तरी घासे रीन, फडकु हा

दर तेराव्या सेकंदा, घाली शिवीबाद
वाद घालणे हा नाद, फडकुला

सोडी आवेशात, मालकीचे एक पान
ना मिळता सन्मान, गुमान येई

असा फडकु जहरीला, फुत्कार टाकित
फिरे मागे जावळीत, वास काढीत

मूळ लेखनास प्रामाणिक राहोन, अति समय नष्ट न करोन, शीघ्र गतीस पावोन, शक्य तितुका मीटर चुकवोन विडंबन सादर केलेसि... .

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काकाफाक (काहीच्या काही फालतु कविता )
प्रेरणेचा स्त्रोत - जाम आठवेना. इथंच कुठंतरी वाचलंय.....काय बरं ते ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....