जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये :)

किशोर कुमार बद्दल मला नेहेमी एक गोष्ट महत्वाची वाटते कि जी गाणी त्याला मिळाली त्यातला काव्यगुण लक्षात घेतला तर तो रफीला मिळालेल्या एकाचढ एक गाण्याच्या तुलनेत कमी होता. किशोरला अगदी नंतरच्या काळात गुलजार सारखा प्रतिभावंत गीतकार मिळाला. तरीही त्याची गाणी लोकप्रिय झाली यातच किशोरदांचं यश आहे असं मला वाटतं. याबद्दल भिन्न मते असु शकतात पण रफीकडे किंवा तलतकडे असलेल्या गझल किंवा इतर अनेक क्लासिक म्ह्टली जाणारी गीते बाजुला ठेवली कि उरलेली उडत्या ठायीची गाणी किशोरच्या वाट्याला आली. तरीही त्याने ती लोकप्रिय केली. गाईड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. “दिन ढल जाये”, “क्या से क्या हो गया” च्या तुलनेत “गाता रहे मेरा दिल” हे श्रवणीय वाटलं तरी काव्य यादृष्टीने बरोबरीचं ठरणार नाही. शायरीच्या बाबतीत जुन्या संगितकारांनी किशोरचा कधीही विचारदेखिल केलेला नाही. अमिताभच्या सुपरस्टारपदात किशोरचा वाटा आहेच. मात्र “कभी कभी” च्या तरल गीतांसाठी मुकेशला बोलवावं लागलं आणि किशोरच्या वाट्याला आलं ते “प्यार कर लिया तो क्या”. सारखं सुमार गाणं.

त्रिमुर्तीमधील राजसाहेब मुकेशच्याच आवाजात गायिले. दिलीप साहेबांनी रफीच पसंद केला. किशोरची क्लासिक म्ह्टली जाणारी बहुतेक गाणी ही प्रथम देव आनंदने पडद्यावर गायिली त्यानंतर काही प्रमाणात राजेश खन्नाने. अमिताभला मिळालेली किशोरची गाणी कितीही लोकप्रिय असली तरी त्यांना क्लासिक म्ह्णावं काय हा प्रश्नच आहे. इतर अतिशय महत्वाची गणली जाणारी किशोरची गाणी खुद्द किशोरने स्वतःच पडद्यावर गायिली आहेत. त्यात “पायलवाली देखना”, “अगर सुनले तो इक नगमा”, “मेरे मेहबुब कयामत होगी”, “ठंडी हवा ये चांदनी सुहानी”, “अजनबीसे बनके करो ना किनारा”, “कोई लौटादे मेरे बीते हुए दिन”, “हवाओं पे लिख दो”, “जीवन से ना हार जीने वाले” अशी अनेक.

पुढे काही क्लासिक गणली गेलेली गाणी ही नायक म्ह्णुन हिन्दीत फारसे न गाजलेल्या लोकांच्या पदरी पडली. त्यात “तुम कितनी खुबसुरत हो” (किरण कुमार), “चंदा कि किरनोंसे लिपटी हवाये” (बलदेव खोसा), “ये वोही गीत है”, “समा है सुहाना सुहाना” (जलाल आगा)ही काही त्यातील लोकप्रिय गाणी आहेत. आघाडीच्या नायकांनी किशोरचा आवाज कितीही वापरला तरी दिलिपचं रफी बरोबरचं किंवा राज कपूरचं मुकेशबरोबरीचं सातत्य हे ज्या प्रकारचं होतं तसं फारसं कुणाचंही झालं नाही. त्यामुळे झालं हे की “पल पल दिल के पास”, ” देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से” सारखी जबरद्स्त गाणी धर्मेंद्र साठी गाऊन देखिल किशोर हा धर्मेंद्रचा आवाज होऊ शकला नाही. अमिताभच्या वाट्याला क्लासिक आलं ते “रिमझीम गिरे सावन”, आणि दुसरं ” हर हसीं चिज का मै तलबगार हुं” काही प्रमाणात “अभिमान” चित्रपटाचा अपवाद वगळला तर बाकी सगळा मामला “खईके पान बनारसवाला” आणि “जहां चार यार मिल जाये” वालाच होता. पुढे काही मिळालं नाही म्ह्णुन “मंझिले अपनी जगह है” साठी गळे काढणारी माणसे अवतरली.

हे सारं विवेचन यासाठी कि महत्वाचा म्हटला जाईल असा नायक देव आनंदचा अपवाद वगळता हाताशी नाही. अशा परिस्थीतीत किशोरकुमार त्या काळात टिकुन राहिला आणि त्या कालावधीत महत्वाची, क्लासिक म्ह्टली जाणारी गाणी त्याने गायिली. पुढे राजेश खन्नाचे “मेरे सपनों कि रानी” युग आले. त्यातला किशोरच्या लोकप्रियतेत त्याकाळच्या तरुणाईचा हात होता हे नाकारता येणर नाही. त्यामुळे गीतांमध्ये काव्यगुण फारसा नसला तरी किशोरच्या आवाजातील तरुणाईचा जोश, सत्तरच्या दशकातील बदलणार्‍या परिस्थीतीचे चित्रपटात पडलेले प्रतिबिंब आणि त्याला चपखल न्याय देणारा तरुण सळसळत्या रक्ताचे प्रतिनिधित्व करणारा, काहीसा बिनधास्त, हॅपि गो लकी, कलंदर असा किशोरचा आवाज त्या पिढीने उचलुन धरला. तेव्हाही “परदा है परदा” रफीच गात होता. “मै पल दो पल का शायर हुं” मुकेशसाठी लिहिलं जात होतं तरीही किशोर नुसता टिकला नाही तर त्याच्या वावटळीत भले भले मागे पडले. हे किशोरच्या प्रचंड गुणवत्तेचं यश आहे असं मला वाटतं.

अतुल ठाकुर

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

क्लासिक गाणी म्हणजे काय किंवा गाणं प्रसिद्ध होण्यासाठी काव्याचा हात किती असतो हे नक्की कळलेलं नाही, पण मी किशोरकुमारचा जबरदस्त पंखा आहे.

किशोरकुमारला इतर कोणी नट नसले तरी त्याने स्वतःसाठी अनेक उत्तम गाणी गायली. चलती का नाम गाडी मधलं 'एक लडकी भीगी भागी सी' सारखं उडतं पण शराबी गाणं असो की 'आ चल के तुझे मै लेके चलू' सारखं शांत रसाने भरलेलं गाणं असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चलती का नाम गाडी मधलं 'एक लडकी भीगी भागी सी' सारखं उडतं पण शराबी गाणं असो की 'आ चल के तुझे मै लेके चलू' सारखं शांत रसाने भरलेलं गाणं असो.

यस्स.
दोन्ही गाणी जाब्रदस्त आहेत. त्या त्या क्याटॅगरीत झकास आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

किशोरकुमारने संगीत दिलेले आणि लताने गायलेले 'कि लिखि तोमाय' हे बंगाली गाणे मला फार उत्कृष्ट वाटते.
---
उच्चारी (मराठी शाब्दिक/स्वैर अर्थ)
---
प्रियोतोमो (हे प्रिया, )
कि लिखी तोमाय (काय लिहू तुला ?)
तुमी छाड़ार कोनो किछु (तू सोडून इतर काही)
भालो लागे ना आमाय (चांगले वाटत नाही मला)

क्रिश्नोचुड़ार बोने छाया घोनो पोथ ('कृष्णचुडा*'च्या वनात दाट सावल्यांतून)
आन्का-बाँका पोथ (एक आडवीतिडवी वाट )
आमार आँगिना थेके (माझ्या अंगणातून निघून )
चोले गेएछे तोमारो मोने (तुझ्या मनात पोहोचते)
बोशे आछी बातायोने तोमारी आशाय.... (तुझ्या आशेवर मी खिडकीपाशी वाट पाहते आहे)

भालोबाशा निशी-राते डाक दिये जाय (प्रेम रात्ररात्रभर साद घालते आहे)
कोतो कोथा कोय (किती गुजगोष्टी करीत आहे)
तोमार आशार कोथा (तू येणार ही गोष्ट)
लेखा आछे शोब किनाराय (सारा किनारा भरून लिहीली गेली आहे)
गुन-गुन कोरे मोन ब्यॅथारो छायाय.... (आणि माझे मन मात्र दु:खाच्या छायेत गुणगुणते ... काय लिहू तुला ?)

------------------------------------------------------------------------------------------------------------------
*क्रिश्नोचुडा - एक लाल रंगाचे फूल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किशोर कुमारचा मीसुद्धा मोठा पंखा आहे!
लेखन छानच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अमिताभच्या वाट्याला क्लासिक आलं ते “रिमझीम गिरे सावन”, आणि दुसरं ” हर हसीं चिज का मै तलबगार हुं” काही प्रमाणात “अभिमान” चित्रपटाचा अपवाद वगळला तर बाकी सगळा मामला “खईके पान बनारसवाला” आणि “जहां चार यार मिल जाये” वालाच होता.

काय ओ असं म्हणता अतुलदा, खालील गाण्यांकडे तुमचे फार दुर्लक्ष झालेले आहे -

ही सगळी क्लासिकल नाहीत्/नसतील (मला क्लासिकल मधलं काय बी कळत नाय) ही पण ... गाणी उच्च आहेत. ... ... यातली सगळी अत्युच्च नसतील पण ...

१) किसी बात पर मै किसी से खफा हूं
२) रूप ये तेर जिसने बनाया वोह कही मिल जाये तो हाथ चूम लू
३) इक रोज मै तडप कर ... इस दिल को थाम ...
४) दिलबर मेरे कबतक मुझे ऐसे ही तडपाओगे
५) छू कर मेरे मन को किया तू ने

शिवाय आदमी जो कहता है, ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, रोते हुए आते है सब - अशी काही इतर आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील यादी व्यतिरिक्त
चिंगारी कोइ भडके....
"तू है वही दिल ने जिसे अपना कहा " हे गुणगुणल्यासारखं गाणं दोन्ही माझे फेव्ह्रिट आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान! किशोरकुमार तरुणपणी फार आवडायचा. त्यानंतर तलतपण आवडायला लागला. आणि मग रफी. आता तिघे इक्वलीच आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम कितनी खुबसुरत हो” (किरण कुमार), “चंदा कि किरनोंसे लिपटी हवाये” (बलदेव खोसा), “ये वोही गीत है”, “समा है सुहाना सुहाना” (जलाल आगा
"दिल मेरा किसी ने ऐसा तोडा...." किंवा "नीले नीले अंबर पर..." ही गाजलेली गाणीही आघाडीच्या नायकांवर चित्रित नव्हती.
"हम बोलेगा तो बोलोगे के बोलत है..." हे गाणं पहिल्यांदा "ऐकलं"; तेव्हा "पाहिलं" नवह्तं.
आपोआप समोर प्राण ह्यांचाच चेहरा आला. प्राण नेपाळी लहेजात गाताहेत हेच समोर आलं.
पडद्यावर ते जशाला तसं दिसलं तेव्हा किशोरसायबाला मनातल्या मनात दाद दिली.
.
.
संगीत्,काव्य ह्यातलं समजत नाही. पण किशोरनं नुसतं गळ्यातल्या गळ्यात सुरेल "ह" आणि "म" ही अक्षरं जोडत घुमणारा आवाज काढला की तृप्त वाटतं.
बादवे, "अभिमान" मध्ये किशोर आहे की रफी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मीत ना मिला रे मन का - किशोर
तेरी बिंदीया रे - रफी
लुटे कोई मन का नगर - मनहर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?