फंडामेंटल अनालिसिस

सर्वप्रथम जे माझे पूर्वग्रह आहेत ते सांगणे योग्य होईल.
१. मुद्दल सुरक्षित ठेवणे, हे माझे मूळ ध्येय आहे. वॉरन बफेच्या शब्दात सांगायचे तर Always follow 2 rules: 1. Never lose money 2. Never forget rule 1.
२. गुंतवणूक करताना मी कधीही कोणावरही विश्वास टाकत नाही. इतर काय म्हणतील ते मी ऐकतो, पण निर्णय मात्र स्वत:चाच घेतो.
३. माझा स्टॉक ब्रोकर्सवर विश्वास नाही.
४. आर्थिक सल्लागार वापरायची वेळ येते, तेव्हा मी प्रथम conflict of interest बघतो आणि fee-only सल्लागाराचा सल्ला घेतो. ( fee-only म्हणजे ज्याला कमिशन मिळत नाही, फक्त माझ्याकडून फी मिळते.)
५. एखादा स्टॉक कितीही सेक्सी वाटला तरीही जर कंपनी नफ्यात नसेल तर मी त्या कंपनीत शेअर्स घेत नाही.
६. स्टॉक घेतो तेव्हा मी ठराविक रक्कमच गुंतवतो. स्टॉक वाढला तर, अरेरे, जरा अजून टाकायला हवे होते असे वाटत नाही, पण स्टॉक पडला तर दुःखही होत नाही.
७. I like the game of investments and I play it to win.

माझा स्टॉक ब्रोकर्सवर विश्वास का नाही?
१. आपल्या पैशाची काळजी आपल्याशिवाय कोणीही घेत नाही.
२. स्टॉक ब्रोकरचा दृष्टीकोन हा कमी पल्ल्याचा (short term view) असतो.
३. ब्रोकर्स बहुतेक करून टिप्स वरून सल्ला देतात, ज्या बहुतेक खोट्या असतात. जर ती बातमी खरी असेल तर तो तुम्हाला कशाला सांगायला येईल? स्वत:च पैसे टाकून अजून कमवेल ना?
४. या वरून पुढचा मुद्दा येतो की ब्रोकर्स किंवा आर्थिक सल्लागार यांनी त्यांचा स्वत:चा पैसा त्यात लावलेला नसतो, तर फुकट फौजदारी करायला त्यांचे काय जाते? They get paid irrespective of whether you make money or not.
५. ब्रोकर्सना काही शेअर विकायचे असतील म्हणून सुद्धा ते एखादी कंपनी चांगली आहे असे म्हणू शकतात. (Pump and dump) आपण स्वत:चे डोके वापरायला नको का?

फंडामेंटल अनालिसिस चे महत्वाचे तत्व म्हणजे केवळ whim वर कोणताही शेअर घेऊ नये, पूर्ण माहिती विचारात घेउन, मनाची खात्री झाल्यावरच शेअर विकत घ्यावा. Fundamental analysis takes time, patience and determination.

आता कुठली माहिती विचारात घ्यायची?
१. इकॉनॉमीची परिस्थिती
२. सेक्टर आणि त्यातील माहिती
३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कंपनीची माहिती: management, कंपनीचा परफोर्मन्स, सेल्स आणी प्रोडक्ट्स, competitive advantage (moat)

माहिती कुठून मिळवायची? Govt sites like SEBI or SEC, कंपनीची वेबसाइट (उदा. L&T )
- company annual report
- income statement
- balance sheet
- cash flow statement
- profit and loss statement

आता इतकी माहिती कोण वाचणार? मला कुठे वेळ आहे ही झंझट करायला, असा विचार तुमच्या मनात येणं साहजिक आहे.
Nobody said that making money was easy. If that were true, majority would be millionaires. It takes effort to make money.

पण आपण ही प्रोसेस सोपी करू शकतो. ती कशी काय?
- कुठल्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवायचे ते ठरवा.
- रिपोर्ट थेट गव्हर्मेंट वेबसाईटवरून किंवा कंपनीच्या वेबसाईटवरून वाचा, ब्रोकरच्या न्यूजलेटरमधून नाही. मुख्य म्हणजे कंपनी रिपोर्टमध्ये रिस्क फॅक्टरबद्दल वाचा. Risk also comes from not knowing what you are doing.
- Study reports from companies WHO HAVE NO CONFLICT OF INTEREST उदा. पब्लीशिंग कंपनी Valueline. They don't sell any other services related to stock market, but again, you can't depend on them 100%.
- रेशिओजचा अभ्यास करा आणि काही ठोकताळे वापरा. (Study ratios and develop your thumb rules).
- स्टॉक स्क्रीनर वापरून तुमच्या आवडीचे स्टॉक शोधा. माझ्या क्रायटेरियानुसार अंदाजे २०० स्टॉक शॉर्टलिस्ट होतात.
- नंतर ही स्टॉकची लिस्ट २०० वरून अंदाजे ३० पर्यंत कमी करा म्हणजे त्या ३० च स्टॉकचा अभ्यास करणे सोपे पडेल. (३० हा माझा ठोकताळा आहे, तुमचा अंदाज वेगळा असू शकेल).

कुठले रेशियो (ratios) बघायचे?: (ही माहिती याहू किंवा गूगल किंवा रॉयटर सारख्या कंपनीकडून मिळू शकते.)
P/E
forward P/E
PEG
P/B
P/S
EPS growth
Current Ratio
Total Debt/assets
Total Debt/equity
ROE (Return on equity)
ROA (Return on assets)
ROI (Return of investment)
Gross Profit margin %
Net Profit margin %
Operating margin %
Sales growth %
Net income growth %
EPS growth %

Also watch for (although they mean little to me personally):
Institutional % held
Insider buying and selling
Dividend yield & stock buybacks

If you want to combine market timing with fundamental analysis, then monitor
- 52 week price range
- 52 week high value and low value
- Moving average (30 day, 60 day etc)

The best time to buy a share is when there is blood on the street. Be greedy when others are fearful and be fearful when others are greedy. The key is not to overpay for a stock. The lower the price than its intrinsic value, the better is profit potential.

खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- Just because a stock is fundamentally cheap doesn't mean it will soar in near future, in fact, it may become even cheaper. You cannot time the market.
- Fundamental analysis cannot predict future. Financial statements are backward looking, meaning they tell you how a company did in the past, not necessarily how it will do in future and how consistently.
- Fundamental analysis consider the financial statements somewhat at their face value. So it cannot protect you from fraud. उदा. सत्यम (बघा https://en.wikipedia.org/wiki/Accounting_scandals and https://en.wikipedia.org/wiki/Securities_fraud )
- If your portfolio size is small, you may be better of investing in market tracking index funds having ultra-low expense ratios.

ता.क. हा कायदेशीर किंवा टॅक्स सल्ला समजू नये.
मधेमधे बरेच इंग्रजी शब्द आले आहेत, त्याबद्दल क्षमस्व. प्रत्येकवेळी शब्दशः भाषांतर जमत नाही/योग्य वाटत नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

forward P/E
PEG ?
P/B बूक व्हॅल्यू?
P/S ?
यांचे long-forms/कंसेप्ट्स सांगाल का?

मी माझे काही विचार सांगतो. तुमचे मत सांगा.
१. पैसे कसे कमवावेत आणि कसे खर्चावेत या दोन्हीसाठी खूप वेळ द्यावा लागतो. पैकी जास्तीत जास्त वेळ पैसे कसे खर्च करावेत यावर द्यावा. ३डी टीव्ही आणला आणि ३डी सीडी आणली (लांबच्या दुकानातून) आणि नंतर ते चाललेच नाहीत (फॉर्मट incompatible असल्याने)तर संपूर्ण खर्च वाया जातो. वार्षिक बचतक्षमता २ लाख असताना २० लाख रुपयाचे लग्न करणे टाळावे. ७५ रु किलो पेक्षा ६५ रु किलोचे चिकू आणले आणि ते गोड निघाले नाहीत वा त्यातले १/३ किडके निघाले तर स्वस्तातले चिकू महाग पडतात आणि महागातले स्वस्त पडतात.
वेळेची कमतरता असते, सगळीच investment and expenditure चे पर्याय आपण चेक करू शकत नाहीत, केवळ काहीच करू शकतो. जास्त फोकस खर्च कसा करावा यावर करावा. राहायचे घर कसे असावे यात भावनिक मुद्द्यांवर भर असावा, विकायच्या वेळी काय किंमत मिळेल हा विचार नसावा.

२. पैशाची किंमत आज सर्वात जास्त असते. आपली नोकरी वा धंदा यातून भविष्यात कसे उत्पन्न वाढेल हे पाहावे. सध्याचा पैसा उडवून टाकावा. किमान पोटाला, इच्छांना मुरड घालून गुंतवणूक करू नये.

३. जमिन आणि सोने डोके बंद करून विकत घ्यावे. त्यांना अविनाशाचे वरदान आहे. त्यांच्या किंमती कितीही पड्ल्या तरी किंमती नाही याच कारणास्तव विकू नयेत. त्यांना लगेच संजीवनी मिळते. बाकि गुंतवणूकांत डोकेफोड असते.

४. सगळ्या ए ग्रेड शेअर्स मधे सगळेच लोक गुंतवत असतात. म्हणून त्यांची किंमत अव्वाच्या सव्वा झालेली असते. व्यक्तिशः आपल्याला ज्या कंपनीची, विशेषतः व्यवस्थापनाची माहिती असते त्यांच्यात लिस्टेड असो वा नसो, गुंतवणून करावी.

५. जीवनात कोणी भरोश्याचा माणूस असेल तर उत्तम. भरोश्याचा आणि हुशार असेल तर अधिकच. त्यालाच व्यवसाय काढून द्यावा. फारच फायदा होतो.

६.वर आपण म्हणता त्याप्रमाणे २० ते ३० कंपन्यांचा शोध केला असता एक सुनिश्चित असं उत्तर मिळत नाही. हा रेशो सांगतो हे करा, तो सांगतो ते करा अशी परिस्थिती होते. आणि जसजसा वेळ जातो तसा सारा अभ्यास पुनःपुनः करावा लागतो. हे कंटाळवाणे असते.

७. जे सुरक्षित गुंतवणूकिचे प्रकार आहेत (उदा डेट, सोने, जमिन) आणि जे नाहीत (उदा. समभाग) त्यांची खूप long-term मधे एकच roi असते. पण विशिष्ट कालात दुसर्‍या प्रकारात प्रचंड चढउतार येतात. करिता माणसाने एका क्षेत्राचे (जसे टेलेकॉम) expert बनत जावे. शेवटी कशात केव्हा किती पैसे लावायचे हे अनिभवाने कळावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सोने, डेट आणि जमीन हे प्रकार सुरक्षित कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

७५ रु किलो पेक्षा ६५ रु किलोचे चिकू आणले आणि ते गोड निघाले नाहीत वा त्यातले १/३ किडके निघाले तर स्वस्तातले चिकू महाग पडतात आणि महागातले स्वस्त पडतात.

सोने विकत आणले आणि ते चोरांनी चोरले तर डिमॅट शेअर्सच्या तुलनेत सोने महाग पडते हा युक्तिवाद येथे चालावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच चालावा. सोने विकत घ्यावे ३३००० ने आणि नंतर सोन्याचे १० महाप्रचंड पर्वत सापडावेत हे ही तसेच. होऊ काही ही शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हणुन आम्ही गोल्ड ईटीएफ घेतो. डोक्याला शॉट नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

P/E ratio = Price per share/Earnings per share
साधारणपणे P/E मोजताना मागील ४ क्वार्टरचे earning (also called as Trailing twelve month earning) बघितले जाते. याऐवजी पुढील वर्षाच्या earnings चा अंदाज घेऊन P/E मोजला, तर त्याला forward P/E म्हणतात.
PEG = P/E to growth ratio
P/B = Price/Book value
P/S = Price/Sales

१. <<पैसे कसे कमवावेत आणि कसे खर्चावेत या दोन्हीसाठी खूप वेळ द्यावा लागतो.>> मान्य.
<<राहायचे घर कसे असावे यात भावनिक मुद्द्यांवर भर असावा, विकायच्या वेळी काय किंमत मिळेल हा विचार नसावा.>> भावनिक मुद्दा हा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यामुळे मी काही बोलू शकणार नाही. पण मी घराला नेहमी consumption साठी समजले आहे, अ‍ॅसेट म्हणून नाही. (इंवेस्टमेंट प्रॉपर्टीबद्दल नंतर १ स्वतंत्र लेख लिहायचा विचार आहे).
२. <<पैशाची किंमत आज सर्वात जास्त असते.>> सध्या व्याजाचा दर १०% आहे, असे समजा. मी तुम्हाला आज १०० रुपये देतो किंवा १ वर्षाने ११० रुपये देतो, तर काय घ्याल? फायनान्सच्या द्रुष्टीने दोन्ही पर्याय सारखे आहेत. इथे PV (Present Value) बद्दल अजून लिहायला आवडले असते.
<<सध्याचा पैसा उडवून टाकावा. किमान पोटाला, इच्छांना मुरड घालून गुंतवणूक करू नये.>> असहमत. मुळात आपण गुंतवणूक का करतो? अगदी महत्वाचे कारण म्हणजे आपण निव्रुत्त झालो की तेव्हा कॅशफ्लो चालू राहावा म्हणून. अर्थात अगदी मन मारून आज जगावे, असं म्हणणार नाही मी. But investment is for delayed gratification.
३. <<जमिन आणि सोने डोके बंद करून विकत घ्यावे.>> असहमत. वेगळा लेख/सविस्तर उत्तर लागेल.
४. <<सगळ्या ए ग्रेड शेअर्स मधे सगळेच लोक गुंतवत असतात. म्हणून त्यांची किंमत अव्वाच्या सव्वा झालेली असते.>> सहमत. पण कधी-कधी अशी सुसंधी येते, तेव्हा हात मारायचा.
<<व्यक्तिशः आपल्याला ज्या कंपनीची, विशेषतः व्यवस्थापनाची माहिती असते त्यांच्यात लिस्टेड असो वा नसो, गुंतवणून करावी.>> असहमत. जर कंपनी नीट फायद्यात नसेल तर काय उपयोग? जर कंपनीला भविष्यात धोका असेल तर व्यवस्थापन उत्तम असून काय उपयोग? उदा. आता जिकडे-तिकडे इंटरनेटवर लोक फुकट वाचन करतात, तर तुम्ही वर्तमानपत्राच्या कंपनीचा स्टॉक घ्याल का?
५. <<जीवनात कोणी भरोश्याचा माणूस असेल तर उत्तम. भरोश्याचा आणि हुशार असेल तर अधिकच. त्यालाच व्यवसाय काढून द्यावा. फारच फायदा होतो.>> हे म्हणजे दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिकार करण्यासारखे झाले. पैसा भल्या-भल्यांची नियत फिरवतो. माझे स्पष्ट मत आहे की आपल्या पैशाची काळजी आपल्याशिवाय कोणीही घेत नाही. म्हणून आपण स्वतः शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
६. <<जसजसा वेळ जातो तसा सारा अभ्यास पुनःपुनः करावा लागतो. हे कंटाळवाणे असते.>> एकदम मान्य आहे. पण बर्‍याच गोष्टी ऑटो-पायलटवर टाकता येतात किंवा जरा सुटसुटीत करता येतात.
७. डेट, सोने, जमीन यांना मी सुरक्षित समजत नाही. तसं म्हटलं तर १००% सुरक्षित काहीच नाही. डेट, सोने, जमीन, स्टॉक्स हे वेगवेगळे अ‍ॅसेट क्लास आहेत. आपला उद्देश आहे की इंफ्लेशन (मराठी?) पेक्षा जास्त परतावा (returns) मिळाला पाहिजे, ज्याच्यासाठी इक्विटी मार्केटला पर्याय नाही.
<<शेवटी कशात केव्हा किती पैसे लावायचे हे अनुभवाने कळावे.>> मान्य. पण जर आपण न समजून-उमजून पैसे गुंतवले आणि ते बुडले, तर असा अनुभव काय कामाचा? रूजवेल्टने म्हटलेच आहे "Learn from the mistakes of others. You can’t live long enough to make them all yourself."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Fundamental Analysis फक्त समभागांचा (हा शब्द संभोग शब्दाच्या किती जवळ जातो नै?) केला जातो. तेथपर्यंत पोहोचायला, सुरुवात करायला प्रारंभी जे स्फूट विचार करावे लागतात त्यानुसार मी माझे मत मांडले आहे. तो प्रत्येक एक वेगळा विषय आहे हे मान्यच आहे.

कोणता समभाग निवडावा यापेक्षा पहिल्यांदी कोणते गुंतवणीचे साधन वा त्यांचा पोर्टफोलिओ निवडावा हा लेख प्रथम यायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

किती जवळ जातो नै?

य्ये जवळ ये लाजू नको !!!!

पण हे ऐका. मस्त आहे. आवडेल तुम्हास -

http://www.aathavanitli-gani.com/Song/Tu_Abol_Houn_Javali_Majala

(या पेज वर गेल्यावर उजव्या बाजूला हे ऐकायची सोय आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपयुक्त माहिती.

-- मी टॅक्स वाचण्यासाठी म्हणून विनाकारण गुंतवणूक करत नाही त्यापेक्षा टॅक्स भरतो व हातातील पैसा आवडीच्या गोष्टीवर खर्च करतो.
-- मी तत्वतः विनाकारण (स्वतःला रहायचे नसताना) जागा/फ्लॅट यामध्ये गुंतवणूक करायला तयार नसतो - नाही.
-- मात्र याचा अर्थ मी गुंतवणूक करत नाही असे नाही. उतारवयात आनंदात राहु शकेन इतकी तजवीज होईल या (आणि इतक्याच) बेताने गुंतवणूक करतो. बाकीचे पैसे आवडीच्या गोष्टींवर खर्च करतो.
-- शेअर्स घेताना मी फक्त कंपन्यांची माहिती, त्यांचे रिपोर्ट्स, काही मानके (जसे पी/ई, ROI वगैरे) पाहतो व शक्यतो ब्यु चीप कंपन्या घेतो. आतापर्यंत सतत फायदाच होत आला आहे. (अपवाद सुरूवातीच्या काळात "वरळी सीलिंकच्या पुढिल टप्प्याला मंजूरी मिळायची शक्यता" या बातमीला भुलून घेतलेला HCC व "न्युमॅटिक इंजिनची प्राथमिक चाचणी यशस्वी झाली" या बातमीला भुलून घेतलेला टाटा मोटर्स). तुम्ही दिलेली माहिती उपयुक्त आहे व त्याचा अधिक उपयोग होईलही.

पण, वरील लेख विस्कळीत वाटला. काही उदाहरणे घेत माहिती योग्य क्रमाने टप्प्या टप्प्याने आली असती तर अधिक वाचनीय झाला असता.

माहिती बरीच आहे हे मान्य, त्यातील वेचक माहिती सोदाहरण दिलीत तर विस्ताराने चर्चा करता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!