सुस्त शहराच्या गर्भातला कोलाहल

१.दुपार
प्रचंड कातळात कोरलेल्या
मंदिराभोवती माणसाची वस्ती
छोट्या छोट्या गल्ल्या
स्तब्ध वाडे
अधेमधे रांगोळ्या
वाळत घातलेले कपडे
वार्याने फडफडतात
सुस्त दुपारी
सुस्त शहरात
एक ओला वास
उंबर्यावर डोक टेकवून
झोपलेल मांजर
सगळीकडे देवच देव
उभी मूर्ति
आडवा झोपलेला देव
मंदीराच्या दगडी कळसावर 
उगवलेल गवत
अरूंद रस्त्यावर वाहनांचे
मिणमिणते आवाज
एका जुनाट हाँटेलमधला
रेडियोचा नास्टेल्जिक आवाज
शहर पेंगत झोपून जात
संध्याकाळ होते
शहर जांभया देत उठत

२.मार्केट
ताज्या भाज्यांचा ताजा रंग
गर्दीला धक्के देणारी गर्दी
नवीन रस्ते
गुळगुळीत स्ट्रीटलँम्पचा
पिंगट प्रकाश
दारूचे भरलेले ग्लास
नाँनवेजचा वास
शहर पुन्हा सुस्त होऊन झोपत

३.डोंगर
शेजारचे दोन डोंगर
त्यावरचे सर्व दिवे विझतात
एक डोंगर राजाचा
एक डोंगर देवाचा
त्यांच्याकडे जाण्याचा रस्ता नागमोडी
दाट पारंब्यानी झाकलेला आहे
वाटेत एखादा मोर उडी मारून
समोर येऊ शकतो
तेव्हा समजायच शहर इथे संपत

४.नदी
नदीवर एक जुना पूल
एक नवीन पूल आहे
जुन्या पूलावरून पाणी गहिर दिसत
नव्या पूलाखाली नदीने आपल अंग
आक्रसून घेतल आहे
शहराच्या गर्भाच्या प्रत्येक
हुंकारासोबत नदीच्या पाण्यात
तरंग उमटत आहेत
जस कि नदी नाळ न तोडण्याचा
आग्रह करत आहे

कोल्हापूर
डिसेंबर २०,२०१३

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

शब्दचित्रं आवडली.

शीर्षक वाचून मर्ढेकरांच्या 'न्हालेल्या जणु गर्भवतीसम' या कवितेसारखं असेल असं वाटलं होतं. कोलाहलाचं चित्रण, किंवा अपेक्षा सोडली तर त्यातल्या सुस्त संथतेचं वर्णन दुपार मध्ये आलेलं आहे. बाकीच्या कवितांत शहराचे गर्भ उल्लेखापुरतेच आले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!शेवटी नदीच्या संदर्भातून कोलाहल सूचित करायचा प्रयत्न केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Wish you were here...

उत्तम!! असेच काही कसदार येऊ दे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!