'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल

'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे.

'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार.
त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.

त्यातून 'गाय' हा मराठी माणूस. मुंबईकर.
त्यामुळे तमाम मराठी मुंबईकरांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.

'गाय' थंडीत मफलर गुंडाळून हिंडायचा.
त्यामुळे समस्त थंडीत मफलर गुंडाळून हिंडणार्‍यांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.

'गाय' बूट घालत नसे, सँडिलं वापरायचा. त्यामुळे तमाम बूट न घालता सँडिलं वापरणारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे....

***

'गाय'चं एक चित्र चोवीस कोटींना विकत घेणार्‍या नरपुंगवा, नरशार्दुला, तुला कोटि कोटि प्रणाम.
आता लवकरच तू ते चित्र चाळीस कोटीत विकशील, मग तो चाळीस कोटीवाला पुढे ते साठ कोटीत विकेल....
हे नरपुंगवांनो, 'गाय' जेंव्हा हयात होता, तेंव्हा तुम्ही हेच चित्र खुद्द त्याच्याकडून चोवीस लाखात, किंवा चोवीस हजारात जरी घेता, तर तो औषध-पाणी करता, स्वतःचे घर बांधता, आरामात राहता....

.... पण पाण्यासाठी रानावनात वणवण फिरणारी एकादी गाय हेरून, उंच आकाशात घिरट्या घालत तिच्यावर नजर ठेवणारांची तुमची जमात.
ती गाय शेवटी कोसळली, की मग झडप घालून तुम्ही तिचे लचके तोडणार.

आमचा 'गाय' विझत चालल्यावर तुम्ही त्याच्यावर एक फिल्म बनवून घेतलीत, आणि जगभरात दाखवलीत म्हणे. त्यात 'गाय' च्या स्टुडियोत सर्वत्र ठाण मांडून बसलेली धूळ, जळमटं, आणि त्या सर्वात अगदी अविचल, निर्विकार, पुतळ्यासारखा बसलेला, निर्लिप्त 'गाय' दाखवलाय म्हणे.
गाय कोसळत चालल्याची बातमी पसरवण्याचा हा इशारा तर नव्हता?

आता 'गाय' च्या चित्रांची किंमत सदैव आणखी आणखी वाढत रहावी, म्हणून देश-विदेशात मोठमोठी प्रदर्शने भरवली जातील. थोर-थोर समिक्षकांना हाताशी धरून त्यांच्याकडून 'गाय' वर अखंड स्तुतिसुमने उधळली जात रहातील....

***
गाय, चोवीस कोटींची ही बातमी वाचून मला जुने दिवस आठवले... तेंव्हा तुम्ही साठीत, तर मी तिशीत असेन. तुम्ही माझे आदर्श होता. मी तुम्हाला भेटायला यायचो, तेंव्हा तुम्ही आपुलकीनं चवकशी करायचात, मी करत असलेल्या धडपडीचं, माझ्या चित्रांचं तुम्हाला कौतुक वाटायचं... पण तुम्ही स्वतःविषयी, तुमच्या चित्रांविषयी मात्र कधीच काही बोलला नाहीत.
पुढे पुढे तुम्ही खूप अलिप्त होऊ लागलात. तुमच्या स्टुडियोत सर्वत्र धुळीची पुटं, कोळीष्टकं जमू लागली. मी फार व्यथित व्हायचो हे सर्व बघून. एकदोनदा "रविवारी मी येऊन सगळं स्वच्छ करून देतो" असं मी म्हटलं, त्यावर तुम्ही फक्त 'असू दे तसंच' म्हणालात... काही काळानंतर तुम्ही गेल्याचीच बातमी आली.

गाय, अलिकडे तीन-चार वर्षांपूर्वी दिल्लीतला एक कला-व्यापारी माझ्याकडे हळहळ व्यक्त करता झाला. त्यानं तुमच्याकडून पुष्कळ वर्षांपूर्वी प्रत्येकी शंभर-शंभर रुपयात चार चित्रे खरेदी केली होती. आणि काही वर्षांनी ती सव्वा-सव्वा लाखात विकली होती. अर्थात त्या पाच लाखातून तुम्हाला काही देण्याचा विचार त्याच्या मनात येण्याचा प्रश्नच नव्हता. तर त्यानं माझ्याकडे व्यक्त केलेली हळहळ अशी: " अरे यार, मै और कुछ साल रुकता, तो आज एकेक पेंटिंग सत्तर-अस्सी लाखमे बेचता"
... आता चोवीस कोटींची बातमी ऐकून त्याची हळहळ किती वाढली असेल ?

***
हे लिलावकर्तेहो, तुम्ही केवळ महान. गीतेत सांगितलंय, 'समत्वं योग उच्यते' तर तुम्ही महान योगीच. परब्रम्हाचे उपासक. आप-पर भेद तुम्हासि नाही. तुमच्या लेखी सर्व सारखे. कुणाचे चित्र, तर कुणाचा पंचा, कुणाची तलवार, तर कुणाचा चष्मा. कुणाची कवळी तर कुणाचे टमरेल. सर्व सारखे. सर्व लिलाव करण्याच्या वस्तु.
तुम्हाला कोटि कोटि प्रणिपात.

***

आता लवकरच बातमी येईल, साबरमतीच्या संतानं वापरलेलं टमरेल अमूक इतक्या कोटीत लिलावातून विकलं गेलं...
... हे ऐकून बोहरा गल्लीतल्या सर्व टमरेलं विकणार्‍यांचा ऊर अभिमानानं दाटून येईल आणि त्यांची आशा पल्लवित होईल...
... 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल, रघुपति राघव, राजाराम' या गाण्याची सिडी विकणार्‍यांचाही ऊर अभिमानानं दाटून येईल, आणि त्यांची आशा पल्लवित होईल...

जय महाराष्ट्र. भारतमाताकी जय. जय हो.

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

Sad!!! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण विकल्या गेलेल्या चित्राची लिंक किंवा झलक पहायला मिळेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

गायतोंडे यांचे चित्र २३.७ कोटीला विकले गेले, जे नंतर ४० कोटीला विकून कोणीतरी स्वतःचा फायदा करून घेईल, म्हणून दु:ख आहे की गायतोंडेंना व्यक्तिशः स्वतःला, त्यांच्या हयातीत पैसे मिळाले नाहीत याचे दु:ख आहे?

Disclaimer: मला तैयब मेहतांची चित्रे अधिक आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दु:ख कसलेच नाही. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दु:ख कसलेच नाही. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे.

चित्रगुप्त जी
तुमचा लेख वाचुन जिवंत असतांना आपल्या आयुष्यात केवळ एकच एक पेंटींग विकु शकलेला, कानकाप्या फ़ेम (ही ओळख अधिक महत्वाची मास अपील असल्याने) विन्सेंट व्हॅन गॊग आठवला, बाकी पेंटीग्ज विकण्यासाठी मृत्युपश्चात ही महत्वाची मार्मीक कलात्मक अट होती. (क्रुसावर चढ तरच तुझ बाकी काय ते बघु) आणि तो मॉर्फ़ीन च्या ओव्हरडोस ने मेलेला भिकारचोट झालेला पॉल गॉगिन ही आठवला. पण सर्वात जास्त उदासिनता दाटुन आली तुमच्या प्रतिसादातील आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे या ओळींनी कारण भादली रेल्वे ट्रॅक कडे जाणारया माणसाचीच ओळ तुम्ही दिली परत, काय आयुष्य असत कलाकाराच यार चित्रगुप्त जी सकाळ खराब केलीत हो तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखाच्या अगदी सुरुवातीला वरती जो फोटो डकवला आहे, तेच हे चित्र आहे.
लोकसत्तातील त्याविषयी लेखः
http://epaper.loksatta.com/201959/indian-express/22-12-2013#page/9/2

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणती काटेरी फांदी कोणाला अधिक ओरबाडेल हे सांगता येत नाही, हे खरे. त्यामुळे 'दु:ख कसलेच नाही' वगैरे पांघरुणे ध्यानात येऊनही मूळ सल जी आहे तिच्याबद्दल आदर आहे.
पण हे सार्वत्रिकच आहे. 'तीसरी कसम' चा राष्ट्रपती पुरस्कार, मंटोच्या कथांना मिळालेली लोकप्रियता, कागज के फूल चे झालेले कौतुक, मदमोहन यांच्या गाण्यांची प्रशंसा, 'उत्तररात्र' वर होणार्‍या चर्चा, 'स्टारी नाईटस' वर आता उधळली जाणारी फुले- या सगळ्यांसाठी त्या कलाकारांना आधी आपले जीवन संपवावे लागले. कदाचित ऐहिक आयुष्यात मिळणारी अवहेलना हीच त्यांच्या आविष्कारांमागची प्रेरणा असेल.
राहता राहिली गोष्ट बाजार भरवण्याची. तर गायतोंडेंचे चित्र चोवीस कोटीला विकले जाण्यात मला तरी काही आक्षेपार्ह वाटत नाही. 'मुसाफिर' या पुस्तकात अच्युत गोडबोलेंनी एक प्रसंग लिहिला आहे. ९/११ च्या घटनेनंतर ते एकदा त्या 'ग्राऊंड झीरो' ला गेले असता समोरच्या एका दुकानात त्यांना काही धुळीने माखलेल्या जीन्स (नेहमीपेक्षा अधिक किंमतीला) विकायला ठेवलेल्या दिसल्या. हे असे का अशी त्यांनी विचारणा केली असता त्यांना उत्तर मिळाले की 'ती वर्ल्ड ट्रेड सेंटर'ची धूळ आहे! त्यामुळे बापूंचे टमरेल आता काही कोटींना विकले गेले तर त्यात नवल नाही.
'गाभारा' ही कविता आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

यात मी काहीच आक्षेपार्ह वाटून घेत नाही कारण माझ्या आक्षेपाला काळं कुत्रंही हुंगून पाहणार नाही.
किंमत केवळ चित्राला नसून एक्स्क्लुजिविटीलाही आहे त्यामुळे चित्रकार मेलेला असणे किंमत वाढण्यासाठी आवश्यक आहे. ज्यांना स्वतःच्या हयातीत चित्रांना किंमत यावी असे वाटते अशांची संख्या वाढल्यास चित्रकलेबरोबरच चित्रविक्रीतंत्र, वादनिर्माणतंत्र, कंपूबाजी, चित्रदलाली इत्यादी अभ्यासक्रम बाजाराच्या मागणीप्रमाणे कलाविद्यालयांमधे उपलब्ध होतील.
दहा वर्षांनी परिस्थिती अधिक चांगली असेल याची खात्री आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेंटिग्जच्या मार्केटबद्दल गब्बरसिंग यांचे काय म्हणणे आहे?
हे मार्केट सामान्य मार्केट फोर्सेस ड्राईव्ह करतात असा दावा आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गब्बर गब्बर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चित्राचं सौंदर्य आणि बाजारभाव यांचं नक्की काय नातं असतं कल्पना नाही. चित्रकाराचं नाव, त्याचा/तिचा इतिहास, त्यामागे असलेलं वलय या सगळ्यालाच किंमत अधिक असते असं दिसतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0